उन्हाळ्यात खाता येतील अश्या पदार्थांच्या पाककृती मिळतील का?

Submitted by स्वप्ना_राज on 7 April, 2017 - 03:53

दरवर्षीप्रमाणे 'ह्या वर्षी उन्हाळा फार कडक आहे' असं सगळे म्हणायला लागलेत. मसाल्याच्या भाज्या किंवा आमट्या घशाखाली उतरेनाश्या झाल्या आहेत. 'तेच तेच आणि तेच' खाऊन कंटाळा आलाय. पण नुसतं सॅलड/सूप्स/फळं खाऊन अख्खा दिवस निभावणार नाही हेही ठाऊक आहे.

तुमच्यापैकी कोणाकडे खास उन्हाळ्यात लंच/डिनरला खाता येतील अश्या काही पदार्थांच्या - मग ते महाराष्ट्रीयन, बंगाली, पंजाबी, दाक्षिणात्य, गुजराती, परदेशी काहीही असोत - पाककृती आहेत का? असल्यास प्लीज प्लीज इथे पोस्ट करा. हा माझा SOS आहे Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उन्हाळ्यात रोजचा स्वयंपाक कमी मसालेदार करते. जिथे शक्य आहे तिथे फोडणीला तेलाऐवजी तूप वापरते. नेहमीपेक्षा अर्ध तेल/तूप वापरते. हिरवी मिरची ऐवजी जास्त तिखट नसलेली लाल मिरची. बडीशोप, आलं, कढीलिंब, चक्रीफुल असे मसाले वापरते मिरी, दालचिनी, लवंग ऐवजी. रोज नियम म्हणून ताक/दही दोन्ही जेवणात. काकडी, टोमॅटो , कलिंगड, संत्री अश्या गोष्टी dining table वर ठेवते. येत-जाता नुसत्या डोळ्याला दिसल्या तरी मनाला थंड वाटतं. रोजच्या दहिभातात आणि कोशिंबीरीत थोड्या द्राक्ष, संत्री, डाळिंब अश्या फळांच्या फोडी घालायच्या. Hope it helps!

भरपूर दही घालून केलेली रायती अथवा कोशिंबिरी हा एक चांगला पर्याय भाजी- आमटीला होऊ शकतो.
त्याबरोबर खायला कमी तेलावर भाजलेले पराठे छान लागतात.

एकंदर पोर्शन साइज कमी ठेवा. तेलकट व मसालेदार आंबट बाहेरचे कमी खा. एस्प. मुंबईत कारण पदार्थ लगेच खराब व्हायला सुरू होतात. बाहेर खावेच लागले तर ब्रेड बटर, जाम सेडविच असे खा.ती सॅडविचची हिरवी चटणी सुद्धा आंबू शकते उन्हाळ्यात. आइसक्रीम खायचे असल्यास चांगल्या कंपनीचेच खा. कोक पेप्सी नो नो. त्या ऐवजी, नारळ पाणी, लस्सी किंवा माझे फेवरिट फ्रेश लाइम सोडा स्वीट. हे बेस्ट.
घरून शक्यतो डबा व चरायचे पदार्थ ऑफिसात न्या.
मी ऑरेंज ज्यूस ट्रोपिकाना फ्रिज मध्ये गार करून काचेच्या बाटलीतून नेते. ऑफिसात दुकान सूरू करू न देउन मग घुटके घेत बसते.
दही भात, ताक भात. पोळी कैरीची चटणी, घावने, कमी तेलात परतले ल्या भाज्या असे न्या. चिकन व अंडी तब्येतीला गरम अस्तात असा समज आहे. त्याचे सेवन मर्यादेत करा. सोडायचे नाही. कमी प्रमाणात. एकावेळी थोडे थोडे खा. जवळ पाण्याचे बाटली कायम बाळगा.
घरून साधे फिल्टरचे पाणी नेले तरी सोपे पडते. महाग मिनरल वाटर्ची गरज नाही.
सीझनल फ्ळे व भाज्या खा. सलाड मध्ये काकडी, टोमॅटो, कांदा. लिंबू. लै भारी. मुख्य म्हणजे तहानलेल्या लोकांना प्राण्यांना पाणी ऑफर करता आले तर बघा.

सातुचे पीठ हे आमचे लहानपणीचे उन्हाळ्यातले दुपारचे खाणे लहानांपासून मोठ्यांपर्यन्त ४ चे खाणे म्हणजे सातुचे पीठ. आई गहू भाजून त्यात सुंठ आणि काय काय घालून दळून ठेवायची ते तयार पीठ फक्त चिंच गुळाच्या पाण्यात घट्टसे भिजवून चमच्याने खायचे... चविष्ट, थंड, पौष्टीक सगळेच...
गव्हाच्या ऐवजी सातू वापरले तर अजून उत्तम!

१) दही बुत्ती / दही भात
२) मी लिहिलेल्या पद्धतीने केलेले वांग्याचे सुदानी भरीत ( हे टिकतेही आणि तोंडाला चवही आणते.)
३) काकडीचा कायरस
४) कच्च्या कैरीची कढी
५) कांद्याची कोशिंबीर ( कांदा किसुन त्यात तिखट, मीठ, साखर, जिरेपूड आणि लिम्बू )
६) चिंचेचे / कोकमाचे सार
७) नीर डोसा
८) लेमन राईस
९) खमंग काकडी
उन्हाळ्यात मिळणारी सर्व फळे
जिरे घालून ठेवलेले पाणी ( हे पाणी गरम पितात, थंड नाही )
वाळ्याचे पाणी, पालक सूप किंवा ताकातली भाजी, चाकवत, रुह आफजा सरबत

१) पारसी पद्धतीने केलेली पाटीया
२) कारवारी पद्धतीची डाळतोय
३) कुठलिही पातळ खीर
४) कदंबम
५) चंदनाचे सरबत

३) काकडीचा कायरस>> खूप वर्षानी ऐकला हा शब्द. आमच्याकडे आई नेहेमी करायची. कायरस असला की २ जास्तीच्या पोळ्या जायच्या. Happy

काकडीचा कायरस>>

कैरीचा छान होतो आणि ह्या दिवसात कैरी मुबलक उपलब्ध!
कैरीचे पन्हे पण छान... उकडून अथवा कच्ची किसून त्यात वेलची घालायची स्वाद देखिल येतो आणि थंड देखिल

सातुचे पीठ - आमची पध्दत - १ किलो गहु, १/२ किलो डाळं (चिवड्यात घालतात ते. डाळ नव्हे) जिरं. गव्हाला पाण्याचा हात लावुन थोडावेळ झाकुन ठेवायचे. नंतर कांडुन त्याची साल काढायची. आता हे मी फु प्रो. मधे कणीक मळायच्या अटॅचमेंट ने करते. थोडी सालं सुटली की गहु पाखडुन घ्यायचे. पुन्हा थोडा पाण्याचा हात लावायचा परत फु प्रो. मधे फिरवायचे. हि प्रोसेस २ - ४ वेळा करावी लागते. सालं नीट निघाली की गहु पांढुरके दिसायला लागतात. त्यानंतर गहु थोडावेळ पेपर किंवा मऊ कपड्यावर पसरुन ठेवायचे. कोरडे झाल्यावर कढईत थोडे थोडे घेऊन बेताच्या आचेवर भाजायचे. लाह्या फुटल्या सारखा आवाज येतो आणि भाजलले गहु तांबुस दिसतात. डाळं निवडुन ते ही थोड भाजुन घ्यायचं. जिरंही भाजायच. थंड झाल्यावर एकत्र दळुन आणायच. मी घरीच दळते.

खायच्या वेळेस पाण्यात गुळ विरघळवुन थोड थोड पीठ भिजवायचं. गोड्पणा, जिर्‍याची चव आपल्या आवडीप्रमाणे Happy

सकाळी नाश्त्याला नाचणीची आंबिल (गार सुद्धा छान लागते) किंवा ज्वारीच्या पीठाची उकड खाता येईल. दोन्ही शीत पदार्थ आहेत.

खायच्या वेळेस पाण्यात गुळ विरघळवुन थोड थोड पीठ भिजवायचं. >>>

आई आम्हाला चिंच गुळाच्य पाण्यात भिजवून द्यायची ते पण छान आंबटगोड लागायचे ! Happy
बाकी रेसिपी कदाचित तुम्ही दिली तशीच असावी आई देखिल घरी जात्यावर दळायची! Happy

संध्याकाळी हलके हवे असल्यास मेतकूट तुप भात एक नंबर रात्रीचे जेवण!

लसणाचे पिठले आणि भात गरमागरम वर तुपाची धार!

ताकाची कढी,
खमंग काकडी (उपवासाला करतात तशी)
मुगाची खिचडी (वर हलकी फोडणी देउन)
काश्मिरी पुलाव आणि मठ्ठा
भाज्या मसालेदार न करता, हळद, मिरचीवर चांगल्या लागतात चेंज म्हणुन. (गोडा मसाला, गरम मसाला, लाल तिखट वगैरे बाद). नुसतं धणेजिरे पावडर, हिंग वापरता येईल हळद मिरचीबरोबर.

पेये- कोकम सरबत, पन्हे, ताक, लस्सी, सोलकढी, मट्ठा, फोडणीचे ताक, असं आलटुन पालटुन जेवणाआधीच प्यावे.

मी पाण्यासारखे ताक पितो. दिवसभरात जवळपास दोन अडीच तांबे. साधारण सहाशे ग्राम दही त्यासाठी वापरतो. रोजचा खुराक झालाय.

अधूनमधून दोनतीन दिवसा आड गर्लफ्रेंडसोबत नारळपाणी पिणे होते. आधी दोघांत एक घ्यायचो, आता वेगळेवेगळे घेतो.

पाणी तर अफाट पितो, एक खास छोटी टप्परवेअर बाटली वापरायला सुरुवात केलीय. आधी मोठी वापरायचो, आता त्यासोबत छोटीही वापरतो. मोठी डेस्कवर असते आणि छोटी माझ्यासोबत ऑफिसभर फिरते. बरेचदा मी सिक्स पॉकेट घालतो, तर त्यात डाव्या गुडघ्याजवळच्या खिशात पडून असते. काढली, दोन घोट मारले, संपली, भरली, पुन्हा काढली, दोन घोट मारले हे दिवसभर चालूच राहते. जेवायच्या अर्धापाऊण तास आधी मात्र हे टाळतो. त्यामुळे जेवण कमी खाल्ले जात नाही.

बाकी मांसाहार आणि चमचमीत मी टाळू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व !
परवाच ऑफिसची एका प्रोजेक्टची बार्बेक्यू नेशनमध्ये पार्टी होती. ईतर सारे कलीग एका पारड्यात आणि मी एका पारड्यात अस्सा तुटून पडलो. मध्ये गर्लफ्रेंडचा दोनदा फोन येऊन गेला, कमी खा रे, हावरटासारखा तुटून पडू नकोस. उगाच तिला सांगितले असे झाले.

असो, ताक वगैरे माझ्या प्रचंड आवडीचे असल्याने आतापर्यंत तरी ही स्ट्रॅटेजी कामात येत आहे. काही त्रास झाला तर कळवेनच Happy

परवाच ऑफिसची एका प्रोजेक्टची बार्बेक्यू नेशनमध्ये पार्टी होती>>>>ऑ? माझ्या भावाची ही परवा बार्बेक्यू नेशनमध्ये पार्टी होती. प्रोजेक्ट चीच. Uhoh

Barbecue nation food quality is ordinary. Generic. Much hype.
Today i have stored coconut water in a covered glass in fridhe. Is is so cold and delicious. Make sure to cover the glass otherwise the water will catch other food smells.

उसाचा रस, पन्हे, ताक, दूध, दही, शहाळे, आणि आंबे, टरबूज, खरबूज, आलू बुखार, संत्री, अननस, पेरु, कैरी, द्राक्ष, गोड चिंच, काकडी
थोडे वरण, भात, भाजी, पोळी.. थोडे नेहमीचे नाश्त्याचे पदार्थ.

Cocojal is the brand which sells pre packaged coconut water.

Seen lot of folks getting there Tupperware tumbler filled from coconut vendors on the way to office.

Barbecue nation food quality is ordinary. Generic. Much hype.
>>>
+७८६
पण ऑफिसच्या जवळ आहे, आणि पोटभर खायला स्वस्त पडते. त्यामुळे आमच्या अश्याही महिन्यातून दोन-तीन फेर्‍या होतात.
त्यातून पोटाला काही त्रास झाला नाही हे विशेष, अगदी आमच्यातील एक जण पाईल्सच्या त्रासाने हैराण असतो तो देखील ठणठणीत आहे. एक थंड बीअर प्यायला त्यामुळे असेल तर कल्पना नाही. पण एकंदरीत उन्हाळ्यातही तिथे जाऊ शकतो. वा उन्हाळ्यातही मांसाहार करू शकतो. आपल्याला काहीतरी होईल हे डोक्यातून काढून टाकणे गरजेचे Happy

बीपीवाल्यांनी नारळपाणी जरा जपून प्याले, किंबहुना टाळले तर उत्तम. नॅचरल = हेल्दी ही समजूत जरा डेंजरस असते.

बीपीवाल्यांनी नारळपाणी जरा जपून प्याले, किंबहुना टाळले तर उत्तम. नॅचरल = हेल्दी ही समजूत जरा डेंजरस असते >>> असे का? जरा समजावुन सांगाल का, माझ्या मम्मीला त्रास आहे बिपीचा आणी आम्ही देतो तिला नारळपाणी बर्याचदा

सब्जा घातलेलं पाणि, पाण्यात काकडी, मींट , लिंबाच्या फोडी घालून ते पाणि, गुलकंद, धने भीजवलेल पाणि ,काकडीच सुप, भरपूर सॅलड,भाजलेल कणिस

Today I made Mangalore cucumber +curd+ millet flour+mung flour+ ginger,salt,cumin, coriander (no water added) dhirdee. I came out very yummy and crispy.

हा SOS टाकला आणि मग इथं यायला जमलं नाही. इतकी माहिती दिल्याबद्दल सर्वांचे खूप आभार!

साऊथ ईंडियन पध्दतीच्या आमट्या थोड्या पातळ असल्याने ह्या ऋतूत चालू शकतील का? तुमची एखादी फेव्हरिट साऊथ इंडियन आमटीची रेसिपी असल्यास शेअर कराल का? माझं चपाती खाणं जवळपास बंद झालंय कारण तोंडात घोळत रहाते Sad म्हणून सध्या भातासोबत खाता येतील अश्या पातळ आमट्यांच्या शोधात आहे.

पारसी पद्धतीने केलेली पाटीया, कदंबम, नाचणीची आंबिल, Cucumber rice ह्या पदार्थांच्या रेसिपीज मिळतील का?

पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार Happy

दिनेश यांच्या यादीतले १,४,५ आणि ९.पिकलेले बेलफळ मिळाल्यास त्याचे सरबत
माकडखाण्यातलं -
विलायती चिंचा
कवठ
तोरणं
रायआवळे तिखटमिठ लावून
कैरीच्या फाकी/अंबाडे मिठात मुरवलेले
करवंदं.

Pages