प्रजासत्ताक दिन २०१७, भाग १८: खास रोषणाई

Submitted by sariva on 4 April, 2017 - 12:16

प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच सुरु झालेला हा जोरदार पाऊस मग अगदी संध्याकाळी अंधार पडेपर्यंत चालू होता.अगदी पावसाळा वाटावा असे वातावरण होते.रात्री थोडीशी उघडीप होताच खास प्रजासत्ताक दिनाची रोषणाई बघण्यासाठी मुद्दाम बाहेर पडलो.
लाइटिंग केलेले राष्ट्रपती भवन इतके सुंदर दिसत होते! बहुतांश सरकारी कार्यालयांवरही रोषणाई केली होती.
आमच्यासारखे बरेच लोक हे बघायला बाहेर पडले होते; त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती.
पार्किंगचा प्रश्न होताच त्यामुळे जमतील तसे थोडेफार फोटो काढले व बाकी सारे फक्त डोळे भरून पाहिले...कधीही विसरले जाणार नाही असे!माझ्याच भाग्याचा मला हेवा वाटत होता.एखाद्या गोष्टीचा योग यावा लागतो;असे म्हणतात ते खरे आहे!
त्या रोषणाईची थोडीशी झलक इथे सादर करत आहे.

१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
समाप्त .
धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता सगळे भाग क्रमाने वाचीन काढले. खुप सुंदर.. प्रत्यक्ष कधी बघू शकेन का, याची कल्पना नाही. पण जवळ जवळ तोच अनुभव या मालिकेने दिला.