२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली , भाग १७

Submitted by sariva on 4 April, 2017 - 11:41

कार्यक्रमाचा समारोप:
आता या संस्मरणीय कार्यक्रमाची सांगता होण्याचा क्षण जवळ आला होता.

राष्ट्रपतींच्या घोड्यावरील अंगरक्षकांचे दल राष्ट्रपती व मुख्य पाहुण्यांना सन्मानपूर्वक व सुरक्षितपणे राष्ट्रपती भवनाकडे नेण्यासाठी आले.त्यांच्या प्रमुखाने सर्वांना झेंड्याला राष्ट्रीय सलामी देण्यासाठी आज्ञा दिली.

जन गण मन हे राष्ट्रगीत झाले.


गाड्यांचा ताफा आला होताच,त्यातून राष्ट्रपती,प्रमुख पाहुणे,पंतप्रधान व इतर मान्यवरही कार्यक्रमस्थळ सोडून हळूहळू मार्गस्थ होऊ लागले.

त्याचवेळी म्हणजे राष्ट्रगीत संपताच प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा करण्यासाठी तिरंग्यातील रंगांचे शेकडो फुगे आकाशात सर्व दिशांनी सोडण्यात आले.खूप सुंदर दिसत होते ते फुगे.त्या फुग्यांनी सर्व प्रेक्षकांना पुन्हा खिळवून ठेवले!अजूनही किती तरी जणांचा पाय तेथून निघत नव्हता.

मग आम्ही परतण्यापूर्वी जरा फोटोसेशन केले.


बरे झाले पावसाने कार्यक्रमात व्यत्यय आणला नाही! त्यामुळे सर्व कार्यक्रम नीट बघता आले वगैरे बोलत बाहेर पडू लागलो असतानाच पावसाचे जोरदार आगमन झाले! जणू कार्यक्रम पूर्ण होण्याची वाट बघतच थांबला होता तो! सगळीकडे अगदी अंधारून आले होते.
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users