२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली , भाग १६

Submitted by sariva on 4 April, 2017 - 10:48

नुकतेच जमिनीवरचे रोमांचकारी क्षण अनुभवले होते;आता सर्वांचे लक्ष लागले होते आकाशाकडे! हवामान अनुकूल असेल,तरच विमानांद्वारे सलामी (fly past)दिली जाईल,अशी तळटीप कार्यक्रमपत्रिकेत होती.वेगवेगळ्या ठिकाणाहून उड्डाण करून विमाने येथे येणार होती. हवामान ढगाळ होते,कधीही पाऊस कोसळण्याची शक्यता होती! त्यामुळे काय होणार,याबद्दल आम्ही जरा साशंकच होतो.पण..पण अखेर नशिबाने आम्हाला साथ दिली! आपण खूप सुदैवी आहोत;असं त्याक्षणी वाटलं.

प्रेक्षकांत खूप उत्साह व उत्कंठा होती.जागेवरून उठून,उभे राहून लोक आकाशाकडे नजर लावून होते.
1) सर्वप्रथम राष्ट्रपतीभवनाच्या दिशेने आली 3 मिग 35 attack helicopters.त्यांनी चक्र formation सादर केले.इंडियन एअरवेजहून उड्डाण करून ती आली होती व त्यांचा वेग होता 240 किमी/तास.ग्रुप कॅप्टन होते सुरेश तिवारी.Flying skills बघून प्रेक्षक खूष झाले.

2) नंतर आली इंडियन एअरवेजहूनच उड्डाण केलेली 3 C 130 J सुपर हर्क्यूलस विमाने.वेग:350 किमी/तास. त्यांनी V आकारात हर्क्यूलस फॉर्मेशन सादर केले
3) नंतर आले 'नेत्र' ( the eye in the sky)विमान.ही DRDO निर्मित खास विमाने आहेत.युद्धात उपयुक्त अनेक प्रगत इलेक्ट्रॉनिक उपकरणे यात असून it is equipped with early warning system containing radar.
4) नंतर इंडियन एअरवेजहून उड्डाण केलेली C17 ग्लोब मास्टर व जोधपूरहून उड्डाण करून आलेली 2 सुखोई विमाने यांनी ग्लोब फॉर्मेशन केले. वेग 500 किमी/तास.
1


5) एरवी निळेभोर असलेले आभाळ आज ढगाळ,काळसर होते. 300 मीटर्स उंचीवर 780 किमी/तास या वेगाने आलेल्या विमानंनी Tejas formation सादर केले.ही विमाने यावेळी या कार्यक्रमात प्रथमच सहभागी झाली होती.

6) मग बिकानेरजवळील नाल एअरपोर्टवरून उड्डाण करून आलेल्या 5 जग्वार विमानांनी जग्वार फॉर्मेशन सादर केले.
7) मग नुकतीच अपग्रेड केलेली 5 मिग 29 अपग्रेड superiority fighters आली.Air to air व air to ground माऱ्यासाठी ही अतिशय शक्तिशाली विमाने!
त्यांनी fulcrum formation केले.प्रेक्षक रोमांचकारी फ्लाय पास्टचा थरार मोठ्या उत्साहाने,उत्सुकतेने अनुभवत होते. प्रत्येकाची नजर सतत आकाशाकडे खिळलेली! कारण न जाणो एखाद्या क्षणाला आपण मुकलो तर; ही मनात धास्ती.
8) नंतर 3 सुखोई MK विमानांनी त्रिशूल फॉर्मेशन सादर केले.
ही सर्व विमाने प्रचंड गतीने डोक्यावरून आकाशात झेपावत असताना निर्माण होणारा ध्वनी उरात धडकी भरवत होताच,पण त्यांच्या उड्डाण कौशल्याने अचंबितही करत होता.

9) नंतर आला कार्यक्रमातील सर्वोच्च कौशल्याचा क्षण! Heart stopping moment च म्हणा ना!900 किमी/तास या प्रचंड वेगाने सुखोई M30 MK विमान आले व vertically( 90 ° ) आकाशात झेपावले! खरोखरच काळजाचा ठोका चुकविणारा तो क्षण! मान उंचावून त्याचा ठाव घेणेही अवघड!High speed in low level & a vertical climb! Very difficult task.निःशब्द झाले सर्व जण काही क्षण!अगदी धन्य वाटले!

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users