२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली , भाग १४

Submitted by sariva on 4 April, 2017 - 09:16

यानंतर शाळेतील मुलांच्या 4 कार्यक्रमांचे सादरीकरण झाले.पण हे कार्यक्रम फक्त प्रमुख मंचासमोरच सादर केले गेले. लांबून नीट फोटो आले नसते,म्हणून काढले नाहीत,फक्त कार्यक्रम पाहिला.म्हणून त्याचे screen shots देत आहे. ती मुले परत जातानाचे थोडेच फोटो काढले होते,तेही देत आहे.

1)दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,नागपूर,महाराष्ट्र.
या गटात दिंडोरी जिल्ह्यातील गोंड अदिवासींचे 'सैला' हे लोकनृत्य 165 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केले.
नवीन पीक आले की गोंड अदिवासी अत्यंत जोशात,हर्षोल्हासात,अगदी आकर्षक रितीने हे सैला नृत्य साजरे करतात व यातून निसर्गाचे आभार व्यक्त करतात.यावेळी स्त्री-पुरुष रंगबेरंगी वेशभूषा करतात,नटतात,बैलांनाही सजवतात.पिकाचे रक्षण करण्यासाठी उभारतो त्या बुजगावण्याच्या आसपास मांदर,टिमकी,बासरी या पारंपारिक वाद्यांचे सूर व सुमधुर गीत यांवर थिरकत ते हे नृत्य करतात.
सूर्यदेवाच्या उपासनेने या नृत्याच्या सादरीकरणाला प्रारंभ होतो व काही लोक बुजगावण्याच्या रूपात सुद्धा यात सामील होतात.
1







2) युवाशक्तिचे आव्हान
सर्वोदय कन्या विद्यालय चिराग दिल्लीच्या १५० विद्यार्थिनींनी-आपल्या देशाच्या ज्या युवाशक्तिने देशाला विकास व यशाच्या मार्गावर अग्रेसर करण्याचा निश्चय केला आहे,त्याला या नाच-गाण्यातून सलाम केला होता. यातून या विद्यार्थिनी राष्ट्रसेवेत समर्पित होण्यासाठी,अप्रगत/मागास वर्गाला वर आणण्यासाठी व जागतिक स्तरावर राष्ट्राचा ठसा उमटविण्यासाठी देशाच्या युवाशक्तिला प्रेरणा देत होत्या. त्यांचे गाणे अंतर्मनाला स्पर्श करून देशभक्तीची भावना जागृत करत होते व देशातील युवावर्गाला विकासाच्या नव्या उंचीवर पोहचण्यासाठी प्रोत्साहित करत होते.नाचताना त्यांनी तयार केलेला भारताचा नकाशा 'विविधतेतून एकता'हे आपले वैशिष्टय दर्शवित होते.
"हमने वादे किए,इस वतन के लिए
सर उठ़ाके चले,नाज़ इसपे हमें
गीत गाते रहे,गुनगुनाते रहे
..हर दिलमें खुशियोंके रंग..तिरंगा चाह रहा|
सलाम हर सच्चाई को
सलाम हर अच्छाई को
सलाम इस जसबे को
.....मेरा सलाम,मेरा सलाम|
सब है आगे,हम चल पड़े
नयी मोड़पे,नयी सोचसे
खूब रंग है खिले...
सब संग चल पड़े|
हमें रोके,है किसमें ये दम?
तिरंगा चाह रहा,सरको उठा....
वतनके वास्ते,कुछ कर दिखा!"
या जोशपूर्ण गाण्यावर व नृत्यावर सर्व प्रेक्षक मुग्ध झाले होते.
1





३)आसाम नृत्य शैली
माऊंट आबू पब्लिक स्कूल,रोहिणी,नवी दिल्लीच्या 147 विद्यार्थ्यांनी अतिशय जोशात,उत्साहात जे नृत्य सादर केले,ते आसामच्या 'सत्रिया'या प्रसिध्द नृत्यशैलीपासून प्रेरणा घेऊन.आसामच्या 'टुकारी'या लोकगीतावर हे नृत्य आधारित होते.या नृत्यातून ईश्वराने निसर्गातील सर्वश्रेष्ठ निर्मिती मानवाच्या रूपात करून आपल्या जीवनात सकारात्मकता निर्माण केल्याबद्दल सर्व शक्तिमान ईश्वराविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती.
1


4) तिरंगा साक्षी है
केंद्रीय विद्यालय,पीतमपुरा,दिल्लीच्या 162 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय आवेशात व तालात 'तिरंगा साक्षी है' हे जोशपूर्ण नृत्य सादर केले.राष्ट्रप्रेमाच्या भावनेने भारलेले हे सर्व जण आपल्या राष्ट्रध्वजाचे-तिरंग्याचे गुणगान करत होते व भारताच्या वीरांची गौरवगाथा,मजबूत प्रजासत्ताकाची निर्मिती,महिला सशक्तीकरणासह इतर अनेक प्रगतीच्या टप्प्यांचा तो कसा साक्षीदार आहे,हे सांगत होते,तिरंग्याबद्दलचा आपला आदर,अभिमान व्यक्त करत होते.ज्ञानशक्तिच्या बळावर आपला देश पुन्हा जागतिक स्तरावर अग्रभागी राहील;असा विश्वासही ते विद्यार्थी व्यक्त करत होते.
यातील गाण्याला संगीत दिले होते दूरदर्शन प्रोड्यूसर प्रमोद मेहता यांनी.
"लाल किलेकी प्राचीरोंने ये आवाज़ सुनायी है,
भूले नहीं,ना भूलेंगे कैसे आज़ादी पायी है |
दो-चार नहीं,लाखो वीरोनें अपनी जान गवायी है |
तिरंगा साक्षी है,तिरंगा साक्षी है,तिरंगा साक्षी है ,|
लोकतंत्रकी ताकद क्या है,ये हमने बतलाया है,
तिरंगा साक्षी है....
मिलजुलकर रहते है कैसे,रह रहकर दिखलाया है |
आगे बढेंगे विज्ञान के साथ,मिलके चलेंगे हाथोमें हाथ |
नारी यहाँ अबला नहीं,ये श्रध्दा,ममता,शक्ती है |
गणतंत्रका मंत्र फैलायेगा,विश्वास यही और आस यही |
ग्यानशक्तिसे भारत महाशक्ति बन जायेगा |
तिरंगा साक्षी है,तिरंगा साक्षी है,तिरंगा साक्षी है |"





क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users