चार माणसे...

Submitted by राजेंद्र देवी on 4 April, 2017 - 03:56

चार माणसे...

हयातीत असावीत जोडलेली चार माणसे
मयतिला काय करायचीत हजारो माणसे

सुखात असावी सहभागी चार माणसे
दुःखांत काय करायचीत मुखवट्याची माणसे

माहेर सोडून येते जेव्हा मायेची चार माणसे
पाठीशी असावीत घरातील चार माणसे

सद्वर्तनं असावे तर नावाजतील चार माणसे
अथवा बोलतील माघारी चार माणसे

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असेल कवितेत दम तर(च) प्रतिसादही देतील चार माणसे
(मी तिसरा, अजून एक शोधा)

असेल कवितेत दम तर(च) प्रतिसादही देतील चार माणसे
(मी तिसरा, अजून एक शोधा) --

सापड्ले....

अक्षय दुधाळजी धन्यवाद....

हा हा हा ....

लग्न जमवायला माणसे चार
खांदा (मेल्यावर) द्यायला माणसे चार
चारोलीच्या ओली चार
प्रतिसादाला माणसे चार ...

सगळं चार चार भारी जमलाय