२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली , भाग १2

Submitted by sariva on 3 April, 2017 - 19:06

16) गुलमर्ग मधील winter sports
राज्य: जम्मू-काश्मीर
या राज्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ गुलमर्ग येथे खेळले जाणारे winter sports येथे दाखविले होते. हा बर्फाच्छादित चित्ररथही सुंदर होता.
2650 मीटर उंचीवर असलेले गुलमर्ग. हिवाळ्यात बर्फाच्छादित झालेले हे ठिकाण जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते व winter sports चे एक आकर्षक destination बनते.
चित्ररथाच्या अग्रभागी कांगरी (fire pot) सह असलेल्या स्नोमॅन ची विशाल प्रतिकृती राज्यातील हिवाळा ऋतूचे आगमन दर्शवित होती.त्याच्यामागे गुलमर्गचे हिमाच्छादित मोहक पहाड दाखविले होते व त्यावर स्कीइंग करणाऱ्या खेळाडूंच्या प्रतिकृती दाखविल्या होत्या.
चित्ररथाच्या मागच्या भागात कर्णमधुर काश्मिरी संगिताचा आस्वाद घेत बर्फाच्छादित झाडांच्या आसपास काही लोक पोलो खेळताना व हिम-स्कूटर चालविताना दाखविले होते.एक केबल कारही दाखविली होती.हा चित्ररथ बघून प्रेक्षक खूष झाले.
1
17) कामाख्या मंदिर
राज्य: आसाम. आसामची राजधानी गुवाहाटीचे प्रसिद्ध कामाख्या मंदिर या चित्ररथात दाखविले होते.
गुवाहाटीत नीलाचल पर्वतावर असलेले हे कामाख्या मंदिर देशातल्या मोठ्या शक्तिपीठांपैकी एक मानले जाते.'अम्बुवाची'उत्सवाच्या वेळी देश-विदेशातून अनेक भक्तगण या मंदिरात येतात.इतर मंदिरांपेक्षा कामाख्या मंदिराचे वेगळेपण म्हणजे या मंदिरात पूजा करण्यासाठी कोणतीही मूर्ती/चित्र नाही.मात्र तेथे प्राकृतिक गुलाबी रंगाची शंक्वाकार,स्त्री जननांगाशी साम्य दर्शविणारी एक खाच आहे.गुहेतील झऱ्याच्या पाण्यामुळे ही सदैव ओलसर राहते.असे मानतात की शेताची मशागत करत असताना या खाचेतून धरती मातेचा मासिक स्त्राव होतो. म्हणून या स्थानाला 'का-माय-खा' नाव दिले गेले आहे.याचा अर्थ आहे-'पौराणिक जननी माता'.
या चित्ररथात कामाख्या मंदिराचे विहंगम दृश्य दाखविले असून या प्राचीन देवीचे गुणगान करणारे साधु-संत दाखविले आहेत.
चित्ररथाच्या अग्रभागी ५ फूट उंच,विशालकाय ध्यानमग्न साधू दाखविला आहे. मागील बाजूस कामाख्या मंदिराच्या प्रांगणात अनुयायी व पर्यटक दाखविले आहेत.चित्ररथाच्या बाजूंवर हिंदू देवी-देवतांचे चित्रण आहे.
1

विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या या चित्ररथांनंतरचे सर्व चित्ररथ केंद्र शासनांच्या विविध योजनांशी संबंधित व त्यांची माहिती देणारे होते.
18) वस्तू व सेवा कर
स्वातंत्र्यानंतर कर सुधारणेच्या दिशेने टाकलेले सर्वात मोठे पाऊल म्हणजे वस्तू व सेवा कर (GST). या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात त्याचेच परिचयात्मक प्रदर्शन वित्त मंत्रालयाने केले.जी.एस् .टी. 'एक राष्ट्र-एक कर-एक बाजार' हे लक्ष्य साकार करेल.
"देशको था जिसका इंतजार |
करव्यवस्थामें होगा सुधार||
चाहे वस्तू हो,या जेवर |
एक टॅक्स का कायदा...GST,GST||
देश करेगा तारिफ इसकी,
अनुपालन है इसका आसान |
पूरे देशमें एक समान,
अलग अलग टॅक्स का क्या काम..
पूरे देशमें एकही नाम GST GST ||
या जाहिरातवजा गीताची पार्श्वभूमी या चित्ररथाला होती.
केवळ भारतीय कर व्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचेच नव्हे,तर देशाच्या आर्थिक परिसंस्थेत सुद्धा नवीन आयाम विकसित करण्याचे सामर्थ्य वस्तु व सेवा करात आहे. संवैधानिक विधेयक पास झाल्यानंतर या कर सुधारणेला एक नवीन गती मिळाली आहे.अत्याधुनिक IT प्रणालीच्या प्रयोगाने करदात्यांना GST चे अनुपालन करणे अत्यंत सरळ व सुगम होईल.सरकार लवकरात लवकर GST लागू करण्यासाठी प्रतिबध्द आहे.
चित्ररथाच्या अग्रभागी GST चा मूळ उद्देश -केंद्र व राज्यांत लागू अनेक अप्रत्यक्ष करांऐवजी केवळ एक कर-GST दाखविला आहे-ज्यामुळे या कराचा मूळ उद्देश 'unified national market' साकार होईल.
चित्ररथाच्या मागच्या भागात वस्तू व सेवा करामुळे अपेक्षित लाभ-जसे गुंतवणूक व मालाच्या उत्पन्नात वाढ आणि परिणामी रोजगार,निर्यात व सकल घरेलू उत्पादनात (GDP) वाढ दाखविली आहे.यामुळे भारत अधिक समृध्द राष्ट्र बनेल.
1


१९) खादी
सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या या चित्ररथात हे तिन्ही प्रकारचे उद्योग दाखविले होते.'प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम' व 'खादी' कार्यक्रमांतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोगाने केलेल्या प्रयत्नांमुळे यांचा विकास झाला आहे.
स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांच्या मिल्समधे निर्माण झालेल्या सुती कापडामुळे घरेलू अर्थव्यवस्थेवर झालेले दुष्परिणाम कमी करण्यात ;तसेच भारतीय कामगार व विणकरांना इंग्रजांच्या जुलूम/दडपशाही पासून वाचविण्यात खादीची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे.स्वातंत्र्यानंतर सरकारच्या बऱ्याच प्रयत्नांमुळे खादी व ग्रामोद्योग यांना खूप प्रोत्साहन मिळाले आहे. खादीला 'एक गौरवशाली वैश्विक ब्रँड ' स्वरूपात स्थान मिळाले आहे.
वेगवेगळ्या खादी उत्पादनांना बाजारात असलेल्या मोठ्या मागणीमुळे लघु उद्योगात कार्यरत लोकांना पुरेसा रोजगार मिळत आहे. सध्या खादीच्या मागणीत मोठी वाढ झालेली असून विविध सरकारी विभागात सुध्दा खादीचे युनिफॉर्मस् पुरविले जात आहेत.चित्ररथाचा प्रारंभ सौर चरख्याच्या विशाल प्रतिमेने झाला आहे.विजेच्या उत्पादनाबरोबरच हा चरखा दुप्पट मात्रेत सूतही विणतो. चित्ररथावर विणकर व कामगारांना विविध उद्योगांत अनेक प्रकारची उत्पादने तयार करताना दाखविले आहे.जसे-कापड,फर्निचर,भांडी,हँडमेड कागद,वनस्पतिज औषधी उत्पादने,सौंदर्य प्रसादने,ऑरगॅनिक अन्न,बायोगॅस,खते इ.ही उत्पादने समाजाच्या सर्व स्तरांतून प्रशंसली जात आहेत.
"चलो बनाए हर रंग खादीका,
खुद बन जाये,हर ढंग खादीका,
"चलो बनाए हर रंग खादीका,
खुद बन जाये,हर ढंग खादीका,
हम बन जाये,हर रंग खादीका,
स्वाभिमान का रंग है खादी,
बलिदान का रंग है खादी,
सादगी और धीरजवाला,
जीने का ढंग है खादी|" हे गीतही लावले होते.
'Khadi is not just a fiber,but it is a way of life!'असंही चित्ररथावर लिहिलं होतं.


२०) प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) : सर्वांना घर
राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्या भागीदारीतून सर्व शहरी परिवारांना 2022 सालापर्यंत एक पक्के घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २५ जून २०१५ ला 'प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) चा शुभारंभ झाला. आवास (हाऊसिंग) व शहरी गरिबी उपशमन मंत्रालयाच्या या चित्ररथात सरकारचा हा विचार व उद्देश प्रदर्शित केला होता.
हे मिशन चार आयामांवर (verticals) कार्य करत राज्ये व केंद्रशासित प्रदेशात घरांच्या कमतरतेची समस्या संपवण्याच्या हेतूने प्रयत्नरत आहे. हे ४ आयाम म्हणजे-१) स्वस्थानी स्लम पुनर्विकास (In-situ slum rehabilitation). 2) ऋण आधारित व्याज सबसिडी योजना (CLSS) Credit Linked Subsidy Scheme) 3) भागीदारीत फायदेशीर आवास/निवास (AHP) Affordable Housing in Partnership. 4) लाभार्थी आधारित व्यक्तिगत आवास(गृह) निर्माण किंवा विस्तार.Beneficiary Led Individual House Construction or Enhancement.
या योजनेनुसार गृहनिर्माण करताना नवीन व पर्यावरण हितकर (ecofriendly) कन्स्ट्रक्शन व तंत्रज्ञानाचा वापर करण्यासही प्रोत्साहन दिले जाते.
चित्ररथात काही लोक गृहकर्ज घेण्यासाठी बँक / गृह वित्त कंपनीत (housing finance company) जाताना दाखविले आहे. नॅशनल हाऊसिंग बँकेला लाभार्थींना व्याजात सूट देतानाही दाखविले आहे. चित्ररथात एक निर्माणाधीन घर,एक नवनिर्मित बहुमजली इमारत व शेवटी आपल्या घराचे स्वप्न साकार झाल्यावर प्रफुल्लित झालेला एक परिवारही दिसतो.
" सबकी आँखोंका सपना,
घर हो एक अपना |
सपना साकार है करना, है ना, है ना?
....प्रधानमंत्री आवास योजना !
लोन मिलेगा बँकोंसे,संस्थानोंसे,
पंख बनाओ अपनेही अरमानोंके
अशियाना हर होगा साकार,
अब करना नहीं है इंतजार |
उम्मीदोंकी,विश्वासोंकी..
योजना है सबके आवास की..
हे विषयानुरूप गाणेही लावले होते.
1

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users