२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली भाग ८

Submitted by sariva on 2 April, 2017 - 10:55

१० National Security Guard Contingent & Mounted Column
राष्ट्रीय सुरक्षा गार्डस् च्या तुकडीचे हे अतिशय लक्षवेधक व सर्वांची वाहवा मिळालेले पथक.एका तालात व अतिशय जोशात जॉगिंग करत येणारे black cat कमांडोज पथकाच्या अग्रभागी होते. प्रेक्षकांनी त्यांना अगदी उत्स्फूर्त दाद दिली.त्यांच्या मागे येणाऱ्या Aircraft intervention vehicle व अन्य वाहनांवर कमांडोज वेगवेगळ्या पोझिशन्स घेऊन सज्ज होते.Unmatched dedication & ruthless Training is the bedrock of NSG! मोटो: सर्वत्र,सर्वोत्तम सुरक्षा. देशाचा सन्मान व अखंडता राखण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.जमीन,पाणी,जंगल,शहर,हवाई अशा सर्व ठिकाणच्या आणीबाणीची परिस्थिती हाताळण्याचे कठोर प्रशिक्षण त्यांना दिलेले असते.कोणत्याही क्षणी (with short notice) अतिरेकी विरोधी कारवाया,ओलिसांची सुटका करणे वा अन्य आपातकालीन स्थितींचा सामना करण्यास ते सदैव सज्ज असतात.त्यांचे हे खास पथक पाहताना ऊर अभिमानाने अगदी भरून आला! मुंबईला ताज व Trident हॉटेलवरील अतिरेकी हल्ल्याच्या वेळी या कमांडोजने बजावलेली महत्त्वाची कामगिरी सर्वपरिचित आहेच.





आता राहिली NCC व NSS ची पथके
11) राष्ट्रीय कॅडेट कोअरच्या विद्यार्थ्यांचा बँड. बँडधून: कदम कदम बढ़ाये जा


12) NCC Boys' Marching Contingent

13) Band :Girls (NCC)
बिर्ला बालिका विद्यापीठ,पिलानीचा बँड. धून: सारे जहाँसे अच्छा


14) Girls'(NCC) Marching Contingent.
सिनिअर डिव्हिजनच्या या विद्यार्थिनींची निवड देशातील सर्व 17 निदेशालयातून (डायरेक्टरेट) केली जाते.

⁠⁠⁠15) सामुहिक पाइप व ड्रम बँड. (NSS) राष्ट्रीय सेवा योजना. 152 संगीतकार. धून: इंडिया गेट


16) NSS marching Contingent.
160 स्वयंसेवकांची ही पलटण होती.1969 साली महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने NSS ची स्थापना झाली.सध्या याचे 36 लाखाहून अधिक सदस्य आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users