२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली,भाग ७

Submitted by sariva on 2 April, 2017 - 10:19

DRDO (रक्षा अनुसंधान और विकास संघटन)
1) Advanced Towed Artillery Gun System. 155mm/52 calibre. भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया'योजनेअंतर्गत बनवलेली ही स्वदेशी अस्त्रप्रणाली आहे.



2) Medium Power RADAR(मध्यम शक्ति रडार)-आरूध्र.हे स्वदेशनिर्मित multi-functional रडार DORD बंगलोरने तयार केले आहे.

अर्ध-सैनिक (para-military)व अन्य सहाय्यक सिव्हिल फोर्सेस यांचे गट आता आपण पाहू.
१ सीमा सुरक्षा फोर्स : उंटांची तुकडी
घोडेस्वारांच्या तुकडीइतकेच,किंबहुना थोडे अधिकच सर्वांचे लक्ष वेधून घेणारे,सर्वांना जिंकून घेणारे हे शाही पथक!नेत्रसुखद रंगीबेरंगी पोषाख,केशरी फेटा,अचकन,भरघोस मिशा इ.त राजबिंडे दिसणारे उंटस्वार व त्यांना साजेसे सजविलेले उंट! व्वा,काय नजारा होता!या तुकडीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व उंटस्वारांची उंची 6 फुटांपेक्षा जास्त,सर्वांच्या मिशांची ठेवण एकच राखलेली व सर्व उंट 5 वर्ष वयाचे,चांगले पारखून घेतलेले तरूण उंट!



2) सीमा सुरक्षा फोर्स: उंटावरील बँड
पोषाखात crimson व ऑरेंज कलरचे प्राबल्य असणारा हा बँडही आकर्षक व वैशिष्ट्यपूर्ण होता.This band of border security force is the only band in the world; which is Camel mounted!बँड धून: हम है सीमा सुरक्षा बल



घोडे व उंट यांच्या पथकानंतर त्यांच्या मागोमाग लीद वगैरेची साफसफाई तत्परतेने करणारे हे सफाई कामगार! त्यांचे कामही तितकेच आवश्यक व महत्वाचे!


3) Coast Guard (तटरक्षक) marching Contingent.
शिस्त व समर्पण हे वैशिष्ट्य असलेले हे आणखी एक युवा पथक.समुद्रातून 7000पेक्षा अधिक जणांचे प्राण वाचवल्याचे क्रेडिट त्यांना जाते.

4) CRPF Band
केंद्रीय रिझर्व पोलिस बलाचा बँड. बँड धून : देश के हम है रक्षक



५ CRPF Marching Contingent.
148 जवानांची ही तुकडी. It is largest & one of the oldest para military forces in the world.मोटो: सर्व्हिस अँड लॉयल्टी.


6) CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) बँड. बँड धून: अमर सेनानी


7) CISF marching Contingent
स्फूर्ती,उत्साह यांनी भारलेली 148 जवानांची तुकडी. आदर्श वाक्य: संरक्षण एवं सुरक्षा


8) Delhi Police Band: 68 जणांचा सहभाग. बँड धून: दिल्ली पुलिस

9) Delhi Police marching Contingent.
'आपके लिए,आपके साथ सदैव' असे म्हणणाऱ्या या पथकाचे नेतृत्व केले होते असि.कमिशनर ऑफ पोलिस श्री बलराम यांनी. आदर्श वाक्य: शांती,सेवा और न्याय

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users