I Love You

Submitted by अनाहुत on 31 March, 2017 - 21:21

" यार आज १ एप्रिल आज कुणालातरी मस्त april fool बनवूया . "

" अरे आज बघू कोण कुणाला सगळ्यात भारी fool बनवतंय . "

" अरे कोण काय काय करतंय ते बघू तर . "

" चल कोण कुणाला सगळ्यात भारी बनवतय त्यावर winner ठरवू काय. जिंकेल त्याला मानलं . "

" अरे हर जगह सुमित भाई हि आगे रहेगा आज भी और कल भी . "

" ए सुम्या बस कर हा तुझी पोपटपंछी अरे इथं सगळ्याला माहित असत "

" तरीपण आपणच winner होणार सुमित पाटील is the winner . "

" ए बस झालं हा तुझं . "

" अरे त्याच काय घेऊन बसलाय ते नुसतंच मोठमोठ्या बाता मारत असत चल जाऊ आपण . यार राहुल चल ना . आर लक्ष कुठं आहे राव तुझं . अरे इथं चालय काय आणि तू करतोय काय . चला रे . " सगळ्यांच्या डोक्यातून नवीन नवीन कल्पना निघत होत्या . पण राहुल स्वतःतच मग्न होता त्याच्या डोक्यात दुसरच काहीतरी चाललं असावं असं .
=============================================================

" माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग . मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत . इतके दिवस मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही सांगता आलं ग . आज सांगतोय I Love You... !!! I Love You Swati....!!! I Love You.... !!!!

" का थांबलास इतके दिवस ? माझे कान आतुरले होते हे ऐकण्यासाठी . I Love You too...!!" तिच्या डोळ्यात आभाळ दाटून आलं होत आणि ती त्याच्या डोळ्यात खोल बुडत चालली होती .

इतक्यात " यो... राहुल, तू तर कमालच केलीस राव आम्हा सगळ्यांपेक्षा भारी केलस. आजचा winner तू आहेस . The Best of the Best . "

" अरे याला कुणी तरी सांगा नको तिथं इंग्रजी झाडत असत . "

सगळे जमा झाले होते तिथं आणि प्रत्येकाला काहीतरी बोलायचं होत . सगळा गोंधळ गोंगाट चालला होता .

तिच्या डोळ्यातले अश्रू थांबता थांबत न्हवते . तिला काय करावं ते सुचत न्हवत . राहुलला मित्रांनी खांद्यावर घेतलं . त्याला काहीतरी बोलायचं होत पण कुणी त्याच ऐकतच न्हवत . शेवटी न राहवून तो ओरडला, " थांबा मी नाहीये आजचा winner आणि मी खोट बोलून तिला फसवलही नाही . मला गेले कित्तेक दिवस तिला हे सांगायचं होत पण न्हवत जमत . आज खूप प्रयत्न करून हे बोलू शकलो . पण नंतर तर तुम्ही माझ्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी टाकायला निघाला . माझं खरंच प्रेम आहे तिच्यावर I Love You Swati आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग . मला या जगात दुसरं काही नको आहे मला फक्त तू हवी आहे . तुझी साथ हवी आहे . देशील ना मला साथ . तिच्या डोळ्यात वाहणारे अश्रू तसेच होते सोबत तिच्या ओठावर हसूही होत . त्याने आपला हात पुढे केला . देशील ना मला साथ तिनेही हात पुढे करून त्याच्या हातात दिला आणि मानेने हलकेच होकार दिला . त्याने पुढे होऊन तिला मिठीत घेतलं तीही आवेगाने त्याला बिलगली . सर्वानी एकच गलका केला .

आजचा 1st April ' April Fool ' नाही तर ' Cool ' ठरला होता .....

Group content visibility: 
Use group defaults

कल्पना चांगली आहे, पण कथा अजून फुलवता आली असती. गडबडीत आवरल्यासारखी वाटली. पुढल्या लिखाणासाठी शुभेच्छा Happy

सर्वांचे आभार ... थोडी गडबडीतच लिहिली होती आणि मुद्दाम थोडी शॉर्ट केली आहे .

भावी उमेद् वाराना चान्गला सल्ल दिला आहे ह्यामधून, मनात असेल तर सान्गून टाका..दिवस कोणता ते बघत बसू नका
Lol