बॉण्ड आणि नोटीस पिरीअड !

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2017 - 11:38

हा प्रत्येक खाजगी कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍याचा जिव्हाळ्याचा विषय. पण कायद्याचे ज्ञान तोकडे असल्याने तितकाच किचकट विषय. तर या संबंधित नियमांवर आणि कायद्यावर चर्चा करायला हा धागा.

धाग्याची सुरुवात करायला मला धागा सुचायचा तात्कालिक किस्सा देतो.

आमच्या ऑफिसमध्ये गेल्या वर्षी नोटीस पिरीअड अचानक एक महिन्यावरून तीन महिने केला गेला. तसे नमूद केलेले एक लेटर प्रत्येकाला वाटून त्यांच्याकडून साईन करून परत घेण्यात आले. तरी काही जणांनी टाळाटाळ करून ते द्यायचे टाळले. आता गेल्या महिन्यात एका मुलाने जॉब चेंज केला. पण त्याला केवळ एकच महिना नोटीस पिरीअड देऊन दुसरीकडे रुजू व्हायचे होते. तशीच त्या कंपनीची अर्जन्सी होती. पण आमच्या कंपनीने मात्र त्याला याची परवानगी दिली नाही. जर एकच महिना नोटीस पिरीअड द्यायचा असेल तर दोन महिन्यांचा पगार आम्हाला द्यावा लागेल असे ते अ‍ॅग्रीमेंट होते. आता गंमत म्हणजे त्याने ते अ‍ॅग्रीमेंट साईन करून परत केलेच नव्हते. पण तरीही एचआर लोकांनी सांगितले की आम्ही लेटर इश्यू केले म्हणजे झाले. आता ते तसेच. तुम्ही साईन करून परत दिलेले असो वा नसो!

त्यानंतर तो थोडाफार भांडला, पण त्यांनी दाद दिली नाही. अखेरीस तो ज्या कंपनीत जाणार होता त्यांनी ७५ टक्के रक्कम म्हणजेच दिड महिन्याचा पगार दिला आणि २५ टक्के याने स्वत:च्या खिशातून घातले आणि अश्याप्रकारे तो दोन महिन्यांना पगार जमा करून तो सन्मानाने बाहेर पडला. पण जर त्याच्या नव्या कंपनीने ही दर्यादिली दाखवली नसती तर लटकलाच असता. किंवा स्वत:ला बराच मोठा भुर्दंड पडला असता. आता या परिस्थितीत आमच्यात चर्चा झाली की जर का त्याने ते अ‍ॅग्रीमेंट साईनच केले नव्हते, तर या आधारावर कायदेशीर मार्गाने कोर्ट कचेरी करत तो लढला असता, तर निकाल त्याच्या बाजूने लागला असता का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे कंपनी एक महिना नोटीस देऊन काढू शकते.
अर्थात ते काढून टाकताना एक महिन्याचा पगार देऊन घरीच बसवतात. अगदी संध्याकाळी साडेपाच वाजता फोन येतो. खाली बोलवतात. लेटर हातात. आणि तुम्ही परत जागेवर येईपर्यण्त तुमचा पीसी लॉक झालेला असतो. या मागच्या रिसेशनच्या आठवणी आहेत. गेले दोनचार वर्षे कॉन्ट्रेक्ट एम्प्लोयीना काढण्याव्यतिरीक्त फारसे काही घडले नाहीये. तुर्तास काम चिकार असल्याने गळाला लागलेला मासा त्याच्या मर्जीने डबक्याबाहेर जाऊ नये म्हणून हा आटापिटा..

भारतात 'अ‍ॅट विल' चा कायदा आहे का? तसं असेल तर आणी बॉण्ड (नॉन-कॉम्पिट) नसेल तर नोटीस पिरियड साठी निदान कायदेशीर-रित्या तरी कंपनीज काही अडवणूक करू शकत नाही. सगळं वाचून अ‍ॅट-विल नसावा असं वाटतय.

इंटरनॅशनल फिनान्शियल रिपोर्टींग स्टँडर्ड प्रमाणे ( IFRS ) कर्मचारी कधीही सोडून जाऊ शकतात असेच गृहित धरले जाते. स्टाफ ट्रेनिंग कॉस्ट म्हणूनच कॅपिटलाइज्ड करू दिल्या जात नाहीत. म्हणजे त्यांच्या ट्रेनिंग वर झालेला खर्च हे तूमचे फिक्स्ड अ‍ॅसेट धरले जात नाही तर ज्या वर्षी तो खर्च होतो, त्याच वर्षी तो पुर्ण्पणे खर्च धरला जातो.

१)नियुक्ती पत्रातील नोटिस पिरियड उभय पक्षी लागू असतो..... तितके दिवस किंवा त्या दिवसांचा पगार... अंशतः नोटिस पिरिय्ड लागू करायचा असेल तर अंशतः पगार..... तुमचा पुढील नियुक्ती कर्ता त्याची गरज निकडीची असेल तर तुम्ही लौकर यावे म्हणून तितक्या दिवसाचा चेक तुम्हाला देतो व तुमच्या कडून नविन नियुक्तीकाराची पावती मागतो.
गरज निकडीची असेल तर नोटिस पिरियेड नुसार येवू देतो. कित्येक बाबतीत एच आर विभाग एकमेकांशी बोलून एकमेकाची निकड भागवण्याच्या दृष्टीने अ‍ॅडजस्ट करतात,
कर्मचार्‍याची गरज निकडीची असेल तर तो खिश्यातून नोटिस पिरियेडचा पैसा भरतो, काही ठिकाणी रजा सुध्दा अ‍ॅडजस्ट केली जाते.
२) तुम्ची सर्व्हिस कंडिशन केव्हा ही बदलता येते. त्यात फक्त नियमबाह्य असू नये.
३) १ महिना की २ महिने की ३ महिने योग्य? ते कंपनीच्या धोरणावर आणि कामाच्या क्रिटिकॅलिटीवर अवलंबून आहे.
४)फ्रॉड वगैरे केले असेल तर नोटिस पिरियडचा पैसा देणे वा नाही हे व्यवस्थापनाच्या मर्जीवर सर्वस्वी अवलंबून असते.
बाँड वगैरे कायद्याच्या दृष्टीने टिकत ( विथस्टँड) होत नाही.

फॅमिली असेल तर तीन महिन्यांची गरज भासत असेल. प्रथम ऑफिसातली कामे देउन टाकायची. मग स्वतःचे पर्सनल लाइफ, मुलांच्या शाळा बायको चा जॉब घर शिफ्ट स्कूल नव्या अ‍ॅडमिशन ह्या सर्वां साठी वेळ लागतो. म्हणून सर्व समावेशक तीन महिने असावे बहुधा.

मी वर दिलेले मॅन्युफॅक्चरैंगमध्ये ग्राह्य आहे

आपण ऑफर लेटर साईन करतो त्यात 'आज या पॉलिसिज आहेत आणि या सब्जेक्ट टु चेन्ज आहेत' हे सप्ष्ट लिहिलेले असते.
आपण ते 'सब्जेक्ट टु चेंज' असण्यावर सहि करतोच.
१ महिन्याचा ३ महिने नोटिस पिरियड्/व्हेरिएबल कोम्पोनंट वाढवणे/अमुक एक अलावन्स कमि करणे/वाढ्॑वणे/मर्ज करणे हे चेन्ज स्वीकारावे लागतात.कोर्टात चॅलेन्ज करुन विशेष फायदा होणार नाहि.
बॉन्ड मात्र एकदा साईन केल्यावर त्याच्या अटि बदलता येत नाहित.
हे सर्व कम्पनी कडे पाठपुरावा करायला किति वेळ आहे यावर असते.जर वेळ्/पैसा नसेल तर 'सर्टिफिकेट न देता सोडणे' इतकेच होते.वेळ आणि पैसा भरपुर असेल तर लिक्विडेटेड डॅमेजेस लावणे वगैरे होऊ शकेल.
पे ऑफ करायला लावुन रिलीज करणे हे काहि फार अन फेअर नाही.कंपनीला पर्यायि माणूस शोधणे ट्रेन करणे यात बिलिंग चे नुकसान होते.
आता ३ महिने नोटिस पिरियड विरुद्ध अ‍ॅक्शन घेणे चालु आहे ना?

अरे कोर्टात वगैरे कुठले जाताय? एकदा का गेलात की तुमचे नाव आख्ख्या इंडस्ट्री मध्ये ब्लॅक लिस्ट झालेच म्हणुन समजा. अपवाद फक्त "बिझनेस कॉम्पिटीटरचा" असू शक्तो पण तो देखिल ताकही फुंकरुन पितो.

तिन महिने नोटीस पिरियडचा दुसरा एक पॉझिटीव्ह फायदा म्हणजे काढुन टाकताना तब्बल तिन महिन्यांचा पगार मिळू शकतो. Proud

Because once he has received hr letter. He is deemed to have accepted the terms. <<<<<
शंका आहे मला, कारण स्ट्रीक्टली लिगली स्पिकिंग, अशा बदललेल्या टर्म्सचे लेटर मिळालेच नाही असा बचाव होऊ शकतो, मिळाले तरी ते मान्य नाही, वा मान्य आहे असे लिहुन दिलेले नाही, हा देखिल बचाव ग्राह्य धरला जाऊ शकतो. मात्र अशा कंडिशन बदलण्याची वेळ व जॉब बदलताना दिलेला राजिनामा यातिल काळाचा तारतम्य पुर्वक विचार कोर्ट करु शकते व निर्णय कोणाही एका बाजुने लागु शकतो. उदा. समजा चारपाच वर्षांपूर्वीच अटी बदलल्यात, अन आत्ता लढु लागलात तर निर्णय एम्प्लॉईच्या विरोधी जाईल, पण गेल्या एक दोन महिन्यातच अटी बदलल्यात अन रिझाईन दिलाय, तर निर्णय एम्प्लॉइच्या बाजुने लागेल.
सहसा कंपन्या अडवणूक करीत नाहीत व लौकरही सोडतात.
हल्लीच्या ट्रेण्ड नुसार एक महिना पिरियड असतो, फार क्वचित ३ महिने दिसतो. Happy पण तरीही याबाबत काही जनरलाईज्ड विधान करता येणार नाही. गरज व त्याकरता बाजारात उपलब्ध मनुष्यबळ याचे गुणोत्तराशी त्या त्या इंडस्ट्रीमध्ये हा नोटीस पिरियड निश्चित केला जातो.

कंपन्यांचे हातात त्यांचे हुकमी एक्के असतात, ते म्हणजे शिल्लक रजा. रिझाईन दिल्यावर शिल्लक रजा घेता येत नाहित असा नियम सहसा अस्तोच, व ज्या काहि दांड्या होतिल त्या विदाउट पे होतात, ज्यावेळेस, शिल्लक रजांची किंमत मात्र केवळ "बेसिक" सॅलरीने दिली जाते. कॉस्ट सेव्हिंग होते ते कंपनीचे. तरी बरे आहे, हल्ली नमो कृपेने किमान बेसिक १५,००० झाले आहे. Proud त्यामुळे काढल्यास किमान १५,००० तिस दिवसांचे दराने रजांची किंमत मिळेल.

बाकी हे एच आरचे म्यानेजर्स एकमेकांशी पुरेपुर संधान बांधुन असतातच. का असु नये? Wink तिकडे राजकीय पुढारि कसे वेगवेगळ्या पक्षात राहुनही एकमेकांशी संधान बांधतात... अगदी तस्सेच.
तेव्हा सल्ला इतकाच राहिल, की उगा नियमांवर/कायद्यावर बोटे ठेवित कुठेतरी "पंगा" घेत बसू नये. Happy

तुमच्या मूळ Appointment Letter मध्ये जो दिलाय तोच कायदेशीर ग्राह्य धरल्या जाईल. नविन बॉंड जो लिहून घेतला तो कायद्याच्या कसोटीवर Null & Void ठरतो. कारण Contract चं सुत्र आहे...
Offer + Acceptance = Agreement
And an agreement enforceble by law is a contract.
पण ईथे एक अट आहे ती म्हणजे There must be free consent to agreement याचा अर्थ काय?
याचा अर्थ असा आहे की कनसेंट कोणत्याच दबावात दिलेलं नसावं, म्हणजेच Free consent.

आता जे ऑलरेडी नोकरीत आहेत त्यांचा कनसेंट Free consent होऊच नाही शकत. म्हणन तो Agreement/Bond null and void ठरतो.

आपण ऑफर स्वीकारताना 'कंपनी पॉलिसी वेळोवेळी गरजेप्रमाणे बदलतील आणि मी स्वीकारेन' अश्या अटीवर सही केलेली असते.(हे अत्यंत अनफेअर आहे पण भारतात ग्राह्य धरले जाते.) तसेच कंपनी मेल ने एखादा बदल कळवून, त्यावर तात्पुरत्या कागदावर बिना साक्षीदार सही घेऊनही कोर्टात ते ग्राह्य धरले जाते.
एखादा बदल अगदी अन्यायकारक असेल आणि राईट टू अर्न वेजेस वाल्या कलमाचा भंग करत असेल तर ते एम्प्लॉयमेंट मध्ये असताना एम्प्लॉयर कोअर्शन खाली सही करावे लागले असे कोर्टात मांडता येते.(असे मांडता येऊ नये म्हणून कंपन्या 'मी हे ऍग्रीमेंट नीट वाचले आहे, लीगल सल्ला घेतला आणि आणि कोणत्याही दबावाखाली न येता सही करत आहे' असं कलम टाकून वाचायला 5 मिनिटं देऊन समोर सही करून घेतात.)
शक्यतो कंपनीत नाती न दुखावता गोडीगुलाबीने अश्या करारातून पैसे भरून किंवा वेळ देऊन सुटका करून घेता आलेली जास्त बरी.पुढे बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन ला गरज लागते.

ईमेल वर जर 1 वर्षाच कन्फर्मेशन दिल असेल तर तो मेल बॉण्ड म्हणून कंसीडर करत का ??

व्हीटसपवर एका मित्राने हा प्रश्न विचारला आणि हा धागा आठवला. बॉन्ड हा मेलवर होतो की बाँड पेपरच हवा. कागदोपत्री व्यवहार? म्हणजे मी आजवर तरी ईमेलवर असे कधी पाहिले नाही. प्रत्येक कंपनीने कागदावरच साईन घेतली होती.

Pages