बॉण्ड आणि नोटीस पिरीअड !

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2017 - 11:38

हा प्रत्येक खाजगी कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍याचा जिव्हाळ्याचा विषय. पण कायद्याचे ज्ञान तोकडे असल्याने तितकाच किचकट विषय. तर या संबंधित नियमांवर आणि कायद्यावर चर्चा करायला हा धागा.

धाग्याची सुरुवात करायला मला धागा सुचायचा तात्कालिक किस्सा देतो.

आमच्या ऑफिसमध्ये गेल्या वर्षी नोटीस पिरीअड अचानक एक महिन्यावरून तीन महिने केला गेला. तसे नमूद केलेले एक लेटर प्रत्येकाला वाटून त्यांच्याकडून साईन करून परत घेण्यात आले. तरी काही जणांनी टाळाटाळ करून ते द्यायचे टाळले. आता गेल्या महिन्यात एका मुलाने जॉब चेंज केला. पण त्याला केवळ एकच महिना नोटीस पिरीअड देऊन दुसरीकडे रुजू व्हायचे होते. तशीच त्या कंपनीची अर्जन्सी होती. पण आमच्या कंपनीने मात्र त्याला याची परवानगी दिली नाही. जर एकच महिना नोटीस पिरीअड द्यायचा असेल तर दोन महिन्यांचा पगार आम्हाला द्यावा लागेल असे ते अ‍ॅग्रीमेंट होते. आता गंमत म्हणजे त्याने ते अ‍ॅग्रीमेंट साईन करून परत केलेच नव्हते. पण तरीही एचआर लोकांनी सांगितले की आम्ही लेटर इश्यू केले म्हणजे झाले. आता ते तसेच. तुम्ही साईन करून परत दिलेले असो वा नसो!

त्यानंतर तो थोडाफार भांडला, पण त्यांनी दाद दिली नाही. अखेरीस तो ज्या कंपनीत जाणार होता त्यांनी ७५ टक्के रक्कम म्हणजेच दिड महिन्याचा पगार दिला आणि २५ टक्के याने स्वत:च्या खिशातून घातले आणि अश्याप्रकारे तो दोन महिन्यांना पगार जमा करून तो सन्मानाने बाहेर पडला. पण जर त्याच्या नव्या कंपनीने ही दर्यादिली दाखवली नसती तर लटकलाच असता. किंवा स्वत:ला बराच मोठा भुर्दंड पडला असता. आता या परिस्थितीत आमच्यात चर्चा झाली की जर का त्याने ते अ‍ॅग्रीमेंट साईनच केले नव्हते, तर या आधारावर कायदेशीर मार्गाने कोर्ट कचेरी करत तो लढला असता, तर निकाल त्याच्या बाजूने लागला असता का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो .... अचानक बाँड पिरिअडच्या कालावधीत असा बदल करता येत नाही. ( बहुतेक )

बॉण्ड नाही, नोटीस पिरीअड बदलण्यात आलाय. एक महिन्यांचा तीन महिने. आधी वाटलेले फक्त नवीन कर्मचार्‍यांसाठीच हा नियम. पण आम्ही आधी एक महिना नोटीस पिरीअड वर जॉईन झालेल्यांनाही आता तीन महिने नोटीस पिरीअड केला आहे.

This is called constructive notice. Difficult to contest in court. Because once he has received hr letter. He is deemed to have accepted the terms. The new company wilk also collect the sum from him in some form.

ओह अमा! म्हणजे आम्ही सारेच बुरी तरहा फसलो आहोत तर ..

योकु, येस्स... ९० दिवस मुळात अडकवायलाच आहेत, बाकी हॅण्डओवर करायला एक महिना चिक्कार झाला..

एक प्रश्न - जर मला उद्या सरकारी नोकरी लागली आणि महिन्याभरात जॉईन व्हायचे असेल तर माझी कंपनी मला अडकावून ठेऊ शकते का?

९० दिवसाचा नोटीस पिरियड आमच्याहीकडे होता आता तो ६० दिवस केलाय . योकु म्हणतो तसा खरच जाचक पिरियड आहे . अमा म्हणतात ते बरोबर आहे . इश्यू /साइन वगैरेचा मुद्दा फार प्रभाव पाडत नाही . हे लोक HR पॉलिसी अंतर्गत सहज गुंडाळतात .

बाकी तुमच्या मित्राच्या दुसऱ्या कंपनीने काही दर्यादिली वगैरे दाखवली नाहीये. त्या प्रकारला कॉर्पोरेट्स मध्ये बाय आउट म्हणतात . समोरचा कॅण्डीडेट वर्थ असेल तर कंपन्या रेडी होतातही . कॉमन प्रॅक्टिस आहे ही

नोटीस दिल्यावर कंपन्या ३ महिने लुख्खागिरी करणाऱ्या माणसाला का पोसतात? बॅड ब्लड फिरतं ते वेगळच.
बरं, महिन्याभरात टांग मारून गेलं तर ब्रिजेस बर्न होण्याव्यतिरिक्त काय होतं? पीएफ पैसे ट्रान्सफर इ. ला कंपनीची मदत लागते का अजून का आता ते आपलं आपलं मॅनेज करता येतं? व्हेकेशनचे पैसे देणार नाही कंपनी फार तर.

माझ्या पहिल्या जॉब वाल्या कम्पनी ने असाच दूष्ट्पणा केला होता..नोटीस पीरेड १ महिन्यावरून ३ महीने केला, तशी नोटीस ५ वाजता पाठवली आणि apprisal वर based increment चे लेटर ६ वाजता पाठवले, त्यामूळे ज्याना कम्पनी सोडायची होती ते सुध्हा ३ महीन्यासाठी अडकले...आणि हा कालावधी non-negotiable केला होता....आणि त्या काळात राजीनामा दिलेल्या व्यक्तीला खूप काम देण्यात येत असे...
तुम्ही आणि तुमचे सहकारी आता अडकले आहात....नवीन जॉब ची ऑफ्फर स्विकारताना ३ महीन्यानन्तर जॉईन करता येईल अश्या बोलीवर च करा...नवीन कम्पनी ला खरच गरज असेल आणि चान्गला उमेद वार असेल तर ते थाम्बता

मुद्दा कळला नाही... १ मंथ नोटीस देऊन जॉईन केला तर पुढच्या कंपनीनं त्याला accept नसत केले का?
नक्की काय अडकले होते की २ मंथ पगार दिला..
कोर्टात घेऊन जातात का बॉण्ड तोडला म्हणून?

<<नोटीस दिल्यावर कंपन्या ३ महिने लुख्खागिरी करणाऱ्या माणसाला का पोसतात? बॅड ब्लड फिरतं ते वेगळच.>>
काही समजत नाही.. माझ्या कंपनीमध्ये एक जण होता, २ वर्षे कामाचा अनुभव होता त्याला. तो उशिरा येई, आणि कितीही काम असले तरी 5:30 ला बाहेर. त्याच्या टीमलीडने विचारले की म्हणे, "मैं तो एमबीए की prep कर रहा हूँ!"

हिरव्या तांबड्या अतितंग पँट्स घालून येई. मॅनेजर बिनेजर सर्वांना "क्या भाSSई " अशी हाक मारे. तेही बिचारे वैतागले होते. पण आमची कंपनी काही बाबतीत हरिश्चंद्राच्या तत्वांवर काम करीत असल्याने त्यांनी ह्या वळूला 3 महिने पोसला, आणि मग एमबीए करावयास पाठिवला. तिथेही किती उजेड पाडला असेल, तोच जाणे.

काही समजत नाही कंपन्यांचे. म्हणून मग तेव्हा आम्ही एचारांना शिव्या घालत असू, की अशा वळूंना पोसण्यापेक्षा, जे जास्त वेळ बसून काम करतात त्यांना पैसे वाढवून द्या चायला...

आम्ही अेक महिना नोटीस पिरियड ठेवला आहे.
पण कोणी राजीनामा दिला की शक्य तितक्या लौकर चार्ज हॅंड ओव्हर करुन आम्ही रिलीव्ह करतो.
अेक आठवडा पेक्षा जास्तवेळ कुणाला लागल्याचे आठवत नाही.

तीन महिने नो पि इज जस्ट टू मच.

नोटीस दिल्यावर कंपन्या ३ महिने लुख्खागिरी करणाऱ्या माणसाला का पोसतात? बॅड ब्लड फिरतं ते वेगळच.>>>>>> +१

मी मध्यंतरी एक कंपनी जॉइन केलेली. तिथे तर विचित्रच रुल होते. जॉइन केल्यापासुन ३ महिन्यात नोकरी सोडायचीअसेल तर एक महिना नो पि.
६ महिन्याच्या प्रोबेशन पिरीयड नंतर सोडली तर तीन महिने नो पि. Uhoh नैतर सेटलमेंट करत नाहीत. शिवाय पगारातुन २०% रक्कम कंपनी घेणार तुमच्या नावावर इनवेस्टमेंट म्हणुन. आणि नो पि नसेल तर हे पैसे मिळणार नाहीत. मी जॉइन झाले त्यादिवशीच अपॉइंटमेंट लेटर घेतलं काही कारणामुळे. तर त्यात हे सगळे नो पि चे रुल. २० % च मी आधीच नाही म्हणुन सांगितलेलं. पण लेटर मधे माझी कामाची वेळ इंटरव्युत सांगितलेल्या पेक्षा १ तासाने वाढवली होती. मी विचारलं तर म्हणे तेच बरोबर आहे वैगेरे. मोजुन ६ दिवसात रामराम ठोकला.

आता या परिस्थितीत आमच्यात चर्चा झाली की जर का त्याने ते अ‍ॅग्रीमेंट साईनच केले नव्हते, तर या आधारावर कायदेशीर मार्गाने कोर्ट कचेरी करत तो लढला असता, तर निकाल त्याच्या बाजूने लागला असता का?

>>> ह्याबद्दल कोणाला काही माहित आहे का?

मी काम केलेल्या बहुतेक कंपन्यांचा नोटिस पिरियड 3 महिने होता, पान कोणीच 3 मागिन्या साठी अडकवून ठेवले नाही.
उलट एकदा प्रतिस्पर्ध्या कडे जात असताना, माझा लॅपटॉप आई कार्ड पाहून घेऊन 1 महिना गार्डन लिव्ह वर पाठवले, म्हणजे मी कंपनीच्या रोल वर राहून पूर्ण पगार घेत होतो पण कॅम्पणीच्या कोणत्याही कामात सहभागी होऊ शकत नव्हतो.

दुसरी कडे परस्पर सहमतीने HR ने 20 दिवसात सोडले

नवीन कंपनी मध्ये जोइनिंग बोनस चा ट्रॅप आहे.
जॉईन झाल्यावर तुम्हाला काही पैसे मिळतात, पण 6 महिन्यांच्या आत सोडलित तर ते पैसे परत करावे लागतात,

म्हणजे समजा 1 लाख बोनस ठरला असेल तर माझ्या खात्यात येताना टीडीएस कापून 70 हजार येतात, पण मला परत करायची वेळ आलिबतर मला 1 लाख परत करायला लागतात.
30 %चे नुकसान

अमा, म्हणताहेत ते खरे आहे. मूळ करारात अशी अट असतेच, कि यापुढे वेळोवेळी ज्या सूचना देण्यात येतील त्या सर्व मान्य असतील वगैरे.
ते पत्र मिळताक्षणीच, ते नामंजूर आहे असे लेखी नोंदवून राजीनामा दिला असता तर गोष्ट वेगळी.
आजकाल अशी अडवणूक करणार्‍या कंपन्याबाबत नेटवर ( निनावी ) लिहायची सोय आहे. निदान नव्याने येणार्‍यांना तरी सावध करता येते.

माझ्यासोबत झाले होते. एका एमएनसीत असतांना आयपीएल (बीसीसीआय) मधून ऑफर आली. कंपनीला एक महिना नोटीस पिरियड होता. पण आयपीएलचा मिडिया डायरेक्टर मागेच लागला होता, नही, तू अभी के अभी जॉइन कर तीन दिनमें, ऑफर्ड सॅलरी तीनपट.... बॉसशी बोललो, तो म्हणाला काहीतरी सेटींग करु, तू फक्त सात दिवस काढ इथे.. पण ते सात दिवसही मी दोन्हीकडे काम करत होतो थोडा थोडा वेळ... शेवटी नोटीसपिरियड क्लिअर केला नाही तर सॅलरी मिळणार नाही, मलाच एक सॅलरी पे करायला लागेल असा काही नियम होता. सातव्या दिवशी पेपर टाकला,. पीएफ-ऑफिस क्लिअरन्स वगैरे सर्व क्लिअर करुन घेतले. पगारातले थोडे पैसे गेले, सुट्या वगैरेंचे मिळाले नाही... पण छोड ना यार! बीसीसीआयच्या चौथ्या माळ्यावर साक्षात आयपीएल च्या ऑफिसात सुंदर रामन, ललित मोदींसोबत काम करायला मिळतंय.. कोण छाटछूट विचार करत बसेल... Happy

{१ मंथ नोटीस देऊन जॉईन केला तर पुढच्या कंपनीनं त्याला accept नसत केले का?
नक्की काय अडकले होते की २ मंथ पगार दिला..}

कंपनी रिलीज लेटर किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकीट देत नाही पूर्ण नोटीस पिरियड सर्व नाही केला तर. Absconding ठरवतात. चांगल्या मोठ्या कंपन्या अशा उमेदवारांना घेत नाहीत. बॅकग्राऊंड क्लिअरन्स पास होत नाही. पुढे खूप प्रॉब्लेम येऊ शकतात.

माझी आधीची कंपनी निव्वळ लोकांना अडवायचं म्हणून ३ महिने बसवून ठेवायचे. अशा लोकांना प्रोजेक्ट् मधून रिलीज पण करण अलाउड नव्हतं. एका दोघांच्या चांगल्या ऑफर देखील गेल्या या पॉलिसी मुळे.

आता कँडीडेट ३ महिन्यात अजून इंटरव्यू देत रहातात. आधीचं ऑफर लेटर दाखवून अजून चांगला पगार मागतात. आधीच रिजाईन केलेलं असल्यामुळे नंतर ऑफर देणाऱ्या कंपनीला ३ महिने थांबावं लागत नाही. म्हणून बऱ्याचदा सगळ्यात पहिली ऑफर देणाऱ्या कंपनीत जॉईन करत नाहीत. यामुळे कंपन्या ३ महिने थांबायला तयार होत नाहीत.

विचित्र गुंता आहे सगळा

व्यत्यय यांनी नेमका मुद्दा मांडला आहे.

थोडी एचआर वाल्यांचीही बाजू आली असती तर बरे झाले असते. माझ्या स्वतःच्या फर्ममध्ये मला चांगली माणसे शोधायला खूप वेळ लागत असे. एक पोस्ट भरायची तर दिवसाला किमान चार मुलाखती व असे कितीही दिवस चालत असे.

चांगले उमेदवार मिळणे, त्यांचे बॅकग्राउंड चेक करणे, व इतर अनेक कामे एच आर साईड ने असतांना कदाचित बदली उमेदवार कंपनीला गरज असतांना महिन्यात उभा करणे शक्य होत नसते. त्यामुळे कदाचित हा तीन महिने वाला फॉर्मुला कंपन्यांनी शोधून काढला असावा.

तसेच आयटीमध्ये युनियन नसल्याने कंपन्यांची मनमानीही चालत असेल. खरेतर आयटी नोकरदार आणि कंपनी हे समकक्ष असावेत, पण आयटीकंपन्याही आता वेठबिगार स्टाइल वागू लागल्यात कि काय असा प्रश्न पडला..

आमच्याही कंपनीत 3 महिने नोपी आहे, कंपनी आयटी नसतानाही. बॉस दयाळू असेल तर जितकी पिएल असेल तितके दिवस ऍडजस्ट करून लवकर निघता येते नाहीतर बसा तीन महिने. आणि एकदा रिजाईन केले की सुट्टी घेता येत नाही, जरी तुमची सिक लिव्ह वगैरे शिलकीत असली तरीही.

भारतात सरकारी नोकरी सोडली तर बाकी सगळीकडे जशी कंपनी तसे नियम आहेत, सुसूत्रता अजिबात नाही.

पीएफ सरकारी खात्यात जात असेल तर मिळतो पण आपली मनमानी करून नोकरी सोडली तर पीएफ ग्रजुईटी शिल्लक सुट्ट्यांचे पैसे इत्यादी सगळेच गंगार्पण होते.

कंपनीने बाय आऊट केले असेल आणि तुम्ही 1 वर्षात नोकरी सोडलीत तर पूर्ण रक्कम परत करावी लागते.

सगळ्या बाबतीत पीळ आहे नुसता.

खासगी कंपन्यांमध्ये फॅक्टरीज वगळता अन्यत्र युनियन करता येत नाही ? मी आजवर मनुफॅक्टरिंग कंपन्यानमध्येच काम केलंय जिथे फॅक्टरयांमधे युनियन होती पण ऑफिसात नव्हती, सध्याच्या कंपनीतही नाहीये. असा नियम आहे का? सुरवातीच्या काळात एका बहुराष्ट्रीय कंपनीत होते तिथे ऑफिसात युनियन होती. पण ती संपली असे नंतर ऐकलेले. त्यानंतर कुठल्याही ऑफिसात युनियन पहिली नाही. कधी विषय निघाला तर लोक हसत हसत 'युनियन काढली तर कंपनी दुसऱ्या दिवशीच तीन महिन्याचा पगार हातात ठेऊन घरी पाठवेल' म्हणतात. कायद्याने बंदी आहे की कंपन्याच युनियन टिकायला देत नाहीत? त्याच कंपन्या फॅक्टरीत मात्र युनियन काढायला देतात.

नोटीस दिल्यावर कंपन्या ३ महिने लुख्खागिरी करणाऱ्या माणसाला का पोसतात? बॅड ब्लड फिरतं ते वेगळच.
बरं, महिन्याभरात टांग मारून गेलं तर ब्रिजेस बर्न होण्याव्यतिरिक्त काय होतं? पीएफ पैसे ट्रान्सफर इ. ला कंपनीची मदत लागते का अजून का आता ते आपलं आपलं मॅनेज करता येतं? व्हेकेशनचे पैसे देणार नाही कंपनी फार तर.}}}}}}}}}}}}}}}}

नोटीस दिली की लुक्खगिरी करत भटकता येत नाही हो, तुम्ही करत असलेले काम दुसऱ्याला शिकवा, आधी सुरू झालेल्या असईनमेंट जायच्या आधी संपवा नाहीतर जाणे एक्सटेंड करा
इत्यादी बरेच उद्योग असतात.

रिजाईन केले तरी नव्या असईनमेंट्स गळ्यात टाकणे सुरूच असते. आमच्या इथे लोक वैतागतात नुसते. बाकीचे लोक संध्याकाळी घरी गेले तरी हे बसून कामे संपवित राहतात कारण जायच्या आधी संपले नाही तर रिलिविंग लेटर गेले पाण्यात. शेवटच्या दिवशी ऑफिस वेळ संपेपर्यंत सुदधा कामे करताना पाहिलंय इथे लोकांना.. इथे नोकरी सोडायची तर लोक आधीपासूनच प्लॅन करून पिएल वगैरे साठवतात आणि कामेही शक्य तितक्या आधी युक्तीने निपटवतात. नाहीतर मेलात तुम्ही. बॉस तुमच्या किती प्रेमात आहे आणि त्याचा स्वभाव कसा आहे यावर बरेच अवलंबून राहते.

साधना, तुम्ही म्हणटाय ते जॉब प्रोफाइल वर अवलंबून असते,
सेल्स मध्ये असणारा माणूस नुसतीच नोकरी सोडतोय कि नोकरी सोडून प्रतिस्पर्ध्याकडे जातोय या प्रमाणे जमीन अस्मानाचा फरक पडतो रिस्पॉन्स मध्ये
नुसताच जात असेल तर प्रोजेक्ट हॅन्ड ओव्हर, नवीन प्रोजेक्ट मध्ये इंन्व्हॉल्व न करणे, चालू प्रोजेक्ट मध्ये प्रत्येक डिस्कशन ला दुसऱ्या माणसाला बरोबर पाठवणे ( काही जास्तीच्या कमिटमेंट्स दिल्या जात नाहीयेत हे पाहायला) असे करून महिना तरी काढतात,
प्रतिस्पर्ध्याकडे जात असेल तर नो दया माया, लौकरात लौकर हाकलून देतात, Happy

मला कुठेतरी वाचलेलं आठवतंय की अगदी सीईओ लेवलचा माणूस असेल तरी मॅक्स ३० दिवस (अगदी ताणून ४५ दिवस) नोटीस पिरीअड पुरेसा असतो. (लिंक मिळाली तर डकवीन इथे) तीन महिने खरोखरीच जाचक आहे. आमच्या इथे तर तीन महिने नॉन निगोशिएबल आहे. मॅनेजर/एच आर यांसोबत डिस्कशन सुद्धा नाही याविषयावर... Sad

ऋन्मेऽऽष खुप छान विषय सुरु केला आहेस...
यावर मी आणि माझ्य मित्रां मध्ये काहि वेळा चर्चा झालेली... माझे काही प्रश्न ही आहेत ....

१) माझ्या माहिती प्रमाणे कोणतीही Employment हि always at will असते. आपल्या इथे जर एखाद्या Employee ला कामावरुन काढुन टाकायचे असेल तर Employer ने Employee ३० ते ९० दिवस द्यायला लागते ( unless its misconduct reason)

२) ९० दिवसांची नोटीस ( कामगार व कंपनी ह्या दोन्ही बाजुन) हा मुद्दा बहुदा भारतीय कामगार आणि अस्थापण मधील कॉंट्रॅक्ट सदरात मोडतो - त्याचा मुख्य हेतु हा आहे कि कामगार सोडुन गेल्यास त्याच्या जागी येणारा नवीन कामगार, त्याच ट्रेनींग इ.इ. व Business Continuity साठी दोन्ही बाजुने योग्या वेळ मिळावा व कंपनी चे नुकसान होउ नये.. जर नवीन उमेदवार निवड, त्याच कामाचे ट्रन्झिशन हे ३० दिवसात झाले तर Employer ने तुम्हाला रिलीज केल पाहीजे.
पण जर एकादा Employer त्या ९० दिवसांची नोटीस हे आडवनुक म्हणुन वापरली आणि तुम्ही लेबर कोर्टात गेलात तर त्या ठिकाणी खालील मुद्दा महत्वाचा ठरेल.. ९० दिवसांची नोटीस The 90 days clause in the agreement is for the purpose of smooth transition and business continuity in case you decide leave the current employment. In this if you could prove that your work position's transition could be done in 30 days, then there is no reason of serving complete 90 days. And in turn you should be released. मला हे अस वाटण्याच कारण अस आहे की Employment Agreement मधील नोटिस पिरीयड चा मुळ हेत ( primary objective) हा ट्रन्झीशन आणि बिझनेस कंट्यनीटी हा आहे, ना की तुमच्या कडुन नोटीस पिरीयड बाय करुन पैसे मिळवणे. As soon as you complete the primary objective of Notice Period (that is the smooth transition of your work responsibility) you should be released.

जाणकारानी कृपया आधीक माहीती असल्यास वा बदल असल्यास सुचवावे..

that is the smooth transition of your work responsibility
>>>>>>

हे कोर्टात सिद्ध करणे अशक्यच !

Pages