मायबोलीकर भटक्यांचा ४था सह्यमेळावा.....

Submitted by गिरीविहार on 22 March, 2017 - 09:02

वेळ दुपारचे दोन वाजलेले, स्थळ अहमदबाद, कंपनीचे शाखा कार्यालय, मोबाईलवर मेसेज खणखणला.. तुमची सन्ध्याकाळची सहा वाजताची मुम्बई फ्लाईट सहा ऐवजी सात वाजता सुटेल. तसदीबद्दल क्षमस्व. मनात म्हटले ठीक आहे, एक तास उशिरा, काळजीचे कारण नाही, सात वाजता अहमदाबाद, आठ वाजता मुम्बई, नऊ वाजेपर्यन्त घरी, बराच वेळ आहे तरी..

वेळ सन्ध्याकाळचे पाच, स्थळ अहमदबाद विमानतळ, परत मोबाईलवर मेसेज खणखणला.. तुमची सन्ध्याकाळची सात वाजताची मुम्बई फ्लाईट सात ऐवजी आठ वाजता सुटेल. तसदीबद्दल क्षमस्व. मनात म्हटले ठीक आहे, अजुन एक तास उशिरा, काळजीचे कारण नाही, आठ वाजता अहमदाबाद, नऊ वाजता मुम्बई, दहा वाजेपर्यन्त घरी, वेळ मिळेल तयारी करायला...

वेळ रात्रीचे आठ, स्थळ अहमदबाद विमानतळ, अजुन विमान निघालेले नाही.. सहाचे विमान सरते शेवटी साडेआठ वाजता निघणार, शेवटी एकदाचे विमान रात्री साडेआठ वाजता मुम्बई साठी उडाले... परत एकदा मनाला समजावले, आपण जरी साडेदहा वाजे पर्यन्त घरी पोहोचलो तरी पंधरा मिनीटे मिळतील सॅक भरुन निघायला, काहि काळजी नाही...

वेळ रात्रीचे दहा वाजलेले, स्थळ पश्चिम द्रुतगती महामार्ग, तुफान पाऊस पडतोय, तुफान रहदारी, मनात चरफडत होतो पण काहिच शक्य नव्हते. परत एकदा मनाला समजावले, आपण जरी अकरा वाजे पर्यन्त घरी पोहोचलो तरी पंधरा मिनीटे मिळतील सॅक भरुन निघायला, काहि काळजी नाही...

घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे सव्वा अकरा वाजलेले, गेल्या गेल्या सामान बाजुला ठेउन सॅक भरायला घेतली.. घरातल्यांच्या प्रश्नाथक नजरा, हा आताच अहमदाबाद वरुन आला अन चालला कुठे... घरी सांगितले ट्रे़कला चाललोय, दोन दिवसांकरता. शेवटी न जेवता रात्री साडे अकरा वाजता घरातुन निघालो तो याच विश्वासावर कि कोकणकन्या एक्ष्प्रेस नेहमी पंधरा ते विस मिनीटे उशिरा येते ठाणे स्थानकात.....

हा सर्व खटाटोप चालला होता मायबोलीकर भटक्यांच्या ४थ्या सह्यमेळाव्यात सहभागी होण्यासाठी... दुसरा मेळावा कंपनीच्या बाली प्रवासामुळे चुकला होता अन मला हा मेळावा चुकवायचा नव्हता.. कारण हाच एक असा कार्यक्रम असतो जेव्हा वर्षातुन एकदा सर्व मुम्बई-पुणे-नाशिकचे मायबोलीकर भटके एकत्र येतात, भेटतात, अनुभव शेअर करतात, गप्पाटप्पा होतात, नविन ओळखी होतात, नविन काही शिकायला मिळते... या वर्षीचे ठिकाण ठरले होते खेड तालुक्यातील किल्ले रसाळगड, अन तिथे जाण्यासाठी रात्री पावणेबारा वाजता ठाणे स्थानकात कोकणकन्या एक्ष्प्रेस पकडणे जरुरी होते.....

भांडुप स्थानकात पोचुन ईंद्राला फोन केला कि गाडीची स्थिती काय आहे कारण ते काही जन छत्रपति शिवाजी स्थानकातुन गाडी पकडणार होते. त्याने सांगितले गाडी लेट आहे अन अजुन सुटलेली नाही, काही काळजी करु नकोस, एक सुटकेचा निश्वास सोडला अन ठाण्याला जाणारी गाडी पकडली. मनात म्हटले आपली सर्व धावपळ कामाली आली आणि आता काही आपला मेळावा चुकत नाही. ठाण्याला फलाट क्रमांक पाच वर पोचलो तर सर्व मायबोलिकर (योगेश अहिरराव, स्वछंदी, डेविल, घारुअण्णा, शापित गंधर्व, नविन, आनंद काळे) आधिच येउन पोचले होते. विषेश उपस्थिती होती ति नाशिक नगरीतुन हेम अन राहुलची...

शेवटी एकदाची रात्री पाऊण वाजता कोकणकन्या एक्ष्प्रेस ठाण्याला आली. लागोपाठ दोन दिवस आलेल्या सुट्टयांमुळे अन कोकणातील लावनी महोत्सवामुळे गाडी पुर्ण भरलेली होती. पहिल्यांदा ठरविले कि ठाण्यात उघडणारया साधारण डब्यात चढुया, पण त्या साठी लागलेली भली मोठी रांग बघुन दुसर्या डब्याकडे वळालो अन सर्वजन हर हर महादेव करत त्या गर्दीत घुसलो. डबा पुर्ण भरलेला होता. कसेबसे बसलेल्या लोकांच्या पायात घुसत दोन सीट मधील जागेत उभे राहीलो अन् सर्वांच्या सॅक सामानाच्या रॅक वर ठेवल्या. गाडीत सर्व लोकांच्या चेहर्यावर कुतुहल होते कि भर पावसात हे लोक कुठे चालले आहेत. तसेच उभ्या उभ्या प्रवास सुरु झाला. भरपुर पाउस पडत असल्याने पुर्ण डबा ओला होता त्यामुळे खाली बसताही येत नव्हते. तसेच उभ्या उभ्या या आधीच्या ट्रेकच्या आठवणी काढत प्रवास चालु झाला. पुर्ण प्रवासात, झोपाळलेल्या अवस्थेत या आधी झालेल्या अन् या पुढील करावयाच्या ट्रेक वर चर्चा झाली अन पहाटे पाच वाजता गाडी खेड रेल्वे स्थानकात पोचली...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा: रे वा:: गिरी! सुरुवातच एक्सायटींग आहे. सगळ्या टांगारुंनी वाचण्यासारखी सुरुवात आहे.. आणि अशा धावपळीतही माझं पार्सल आणायला तू विसरला नाहीस याबद्दल तुला दंडवत _/|\_

थोडा आणखी मोठा भाग हवा होता.. मला सर्व भागांचा मागोवा ठेवणे जमत नाही, आणि एखादा भाग चुकला कि वाईट वाटते.

>>>गाडीत सर्व लोकांच्या चेहर्यावर कुतुहल होते कि भर पावसात हे लोक कुठे चालले आहेत. तसेच उभ्या उभ्या प्रवास सुरु झाला. भरपुर पाउस पडत असल्याने पुर्ण डबा ओला होता त्यामुळे खाली बसताही येत नव्हते. >>>
-
कोणत्या संवत्सरांतील पर्जन्य ऋतुतील वर्णन म्हणायचे??