२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली भाग 4

Submitted by sariva on 20 March, 2017 - 22:18

परेडची प्रतिक्षा करत असलेला राजपथ

ज्या परेडची सर्व जण आतुरतेने वाट पहात होते,त्याचा प्रारंभ अखेर झाला.परेड कमांडर सर्वात पुढे,त्यानंतर उप-कमांडर,त्यानंतर परमवीर चक्र विजेते व अशोक चक्र पुरस्कार विजेते उघडया जीपमधून एकामागून एक असे आले.त्यांनी राष्ट्रपतींना सलामी दिली.युद्ध काळात प्राणांची बाजी लावून असाधारण शौर्य दाखविणाऱ्यांना परमवीरचक्र दिले जाते व अशीच कामगिरी शांतता काळात करणाऱ्यांना अशोक चक्र प्रदान केले जाते.या सर्व जणांची माहिती,त्यांची कामगिरी एकीकडे सांगितली जात होती.
१ परेड कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरावणे.

2 उप-कमांडर मेजर जनरल राजेश सहाय

3 परमवीरचक्रविजेते सुभेदार मेजर व ऑनररी कॅप्टन सेवानिवृत्त बाणा सिंग

४ परमवीर चक्र विजेते नायब सुभेदार संजयकुमार

5परमवीर चक्र विजेते सुभेदार योगेंद्रसिंग यादव

६ अशोक चक्र विजेते लेफ्टनंट कर्नल जसराम सिंग व मेजर जनरल सायरस पीठावाला

संयुक्त अरब अमिरातीची तुकडी व बँड .UAE च्या या 129 जणांच्या तुकडीत तिन्ही सेनादले होती व मागे त्यांचे contingent.


UAE च्या मिलिटरीचे सध्याचे हे बँडपथक. यात 35 musicians होते.


61 घोडेस्वारांचे पथक.उमदे,देखणे घोडे अगदी लक्षवेधक होते.15 ऑगस्ट 1953 पासून हे पथक कार्यरत आहे.This is the only serving acting force in the world! अश्वशक्ती यश बल...Ashwashakti for..have a supreme ...असं काहीसं याचं वर्णन केलं होतं.61 घोडेस्वारांच्या पथकानंतर आले mechanized columns..म्हणजे मिलिटरीतील मॉडर्न weapons व vehicles. दूरवरून येताना दिसणारी ही वाहने उत्कंठा वाढवित होती.

1) प्रथम पाहू टँक टी-90 (भीष्म).याचा मोटो आहे; अव्वल 58 सर्वश्रेष्ठ.135 मीटर अंतरावर मारा करण्याची क्षमता. दुरूनसुद्धा त्यांचा ताफा मोबाईलमधे मावत नसल्याने 2-3 फोटो काढले.


2) हे आहे इंन्फंट्री काँबॅट व्हेइकल BMK-2/बॉलवे मशीन पिकेट.या बटालियनने खूप सन्मान मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.याचे आदर्श वाक्य:पहला,हमेशा पहला! युद्धघोष:गरूड का मूँह (?) बोल प्यारे.

3)ब्रह्मोस:861 मिसाईल रेजिमेंटच्या अत्याधुनिक ब्रह्मोस मोबाईल प्रणालीचे हे mobile autonomous launcher. भारत व रशियाची संयुक्त निर्मिती आहे.ध्वनीच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने जाऊन ते 290 किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते!या रेजिमेंटचा युद्ध घोष:सही करो,पहली बार करो,सदैव करो.


4) Weapon locating RADAR Swathi(स्वाती). हे रडार भारतीय बनावटीचे आहे.शत्रूचे कोणतेही हत्यार...कोणतीही मोटार,आर्टिलरी गन,रॉकेट यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी वापरतात.

5) CBRN (Chemical,Biological,Radiological & Nuclear) Recce vehicle.475 इंजिनिअर ब्रिगेडच्या CBRN कंपनीचे हे वाहन.2010 मधे या कंपनीची स्थापना झाली.या वाहनांची निर्मिती जोधपूर,अहमदनगर,पुणे व ग्वाल्हेरमधे करतात.

6) Transportable satellite terminal (DCN).तीन्ही सैन्यदलांचे एकमेकांशी कम्युनिकेशन करण्यास लागणारे नेटवर्क यामुळे मिळते.मोटो: तीव्र चौकस


7) आकाश vehicle Weapon system.troop level radar.This is the first indigenously developed air defence system capable of short range surface to air missiles.


८)DHANUSH (धनुष)Gun System. 156mm /45 calibre धनुषहे बोर्ड 215 वर्षांपेक्षा जुने असून जगातील अत्याधुनिक व high-tech गन्स बनवते.

9) Fly past by Advanced Light Helicopters ध्रुव; Weapon system रुद्रसह.

यावेळी या 4 हेलिकॉप्टर्सनी ताशी 150 किमी वेगाने येऊन diamond आकार सादर केला.


क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार छान. मला पण ही परेड बघायला खूप आवडते.
योगेंद्रसिंग यादव ५ वे आहेत. चौथे नाहीत.

योगेंद्रसिंग यादव यांचे यू ट्यूब वरील कारगील युद्धा बद्दल असलेले वर्णन अंगावर काटा आणणारे आहे. सर्वांनी मुद्दाम बघावे.

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.

आदरणीय विक्रमसिंहजी,चूक दर्शविल्याबद्दल मनापासून आभार. चुकीची दुरूस्ती केली आहे.धन्यवाद.

टिव्ही वर बघताना हे सगळे डोळ्यासमोरुन झरझर निघून जाते, इथे मात्र अगदी निवांतपणे बघायला मिळतेय आणि सविस्तर माहितीही !