२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली भाग 2

Submitted by sariva on 18 March, 2017 - 06:34

68 व्या प्रजासत्ताक दिनाचे आम्हाला मिळालेले पास;ज्यांमुळे आम्हाला सर्व कार्यक्रम बऱ्यापैकी जवळून पाहता आला.

आमच्या डाव्या बाजूला सेक्रेटरी लेव्हलच्या लोकांच्या राखीव जागा होत्या.
त्याच्या डाव्या बाजूस प्रमुख मंच होता.
हा मंच आमच्यापासून सुमारे 50-60 मीटर अंतरावर होता.
समोरच्या बाजूला अलिकडे दूरदर्शन साठीचा टॉवर होता,व त्याला लागूनच टेहळणीसाठीचा टॉवर होता.
रस्त्याच्या पलिकडील बाजूस वृत्तपत्रांचे छायाचित्रकारांसाठी टॉवर होता.

समोर प्रमुख मंच दिसतो आहे.कॅप व रिस्टband पहा.

दूरदर्शन ,टेहळणी व वार्ताहर यांचे टॉवर


या सुरूवातीच्या रिकाम्या खुर्च्या
zz
झूम करा

हाऊस फूल झाल्यानंतरचे काही फोटो.सुमारे सव्वा लाख लोकांची उपस्थिती होती!

सतर्कता व सुरक्षेचा एक भाग म्हणून त्या परिसरातील आजूबाजूच्या सर्व टेरेस आदल्या दिवशी दुपारी 1 पासूनच सील केलेल्या असतात.वॉच टॉवरवर सतत डोळयात तेल घालून सर्व दिशांना टेहळणी करणारे सतर्क सैनिक पूर्ण कार्यक्रमभर आपले कर्तव्य बजावत असतात. घिरट्या घालणाऱ्या ड्रोन हेलिकॉप्टर्सची सुरक्षेच्या दृष्टीने टेहळणी सतत चालू होती.एकंदर आम्ही तिथे पूर्ण सुरक्षित होतो.
मुख्य कार्यक्रम सुरू होणार होता सकाळी बरोबर 9-57 ला ! वेळ पाहिल्यावर 'पंचांग बघून मुहूर्त काढलाय की काय?'असा विचार मनात आला. या मुहूर्तावर मुख्य पाहुणे- अबुधाबीचे क्राऊन प्रिंस महंमद बिन झायेद अल् नहयान यांच्यासह राष्ट्रपतींचे कार्यक्रमस्थानी राजकीय सन्मानाने आगमन होणार होते.
आम्ही कार्यक्रमस्थळी लवकर आलो होतो,त्यामुळे आजुबाजूचे निरीक्षण करायला भरपूर वेळ मिळाला.'डाल डाल पर सोनेकी चिड़िया करती है बसेरा','ए मेरे वतनके लोगो' यासारखी 2-3 च देशभक्तीपर गाणी पुन्हा पुन्हा लावली जात होती.तेवढ्यात राजपथावर कार्यक्रमपुस्तिकांनी भरलेला लष्कराचा ट्रक आला व त्याचे वाटप सर्वांना केले जाऊ लागले.या पुस्तिकेत कार्यक्रमाची रूपरेषा,माहिती व काही फोटोही होते. प्रत्यक्ष कार्यक्रम बघताना याचा खूप उपयोग झाला.
हा ट्रक व कार्यक्रम पुस्तिका.


इंडिया गेट.... धुक्यात हरवलेले, तिरंग्याच्या रंगात lighting केलेले,अमर जवान ज्योत दिसत असलेले...

बांगड्या बघा.

मिलिटरी ऑफिसर्स...फोटोच्या मूडमधे

आम्हाला नीट दिसू न शकलेल्या इतर व्यवस्थेचे काही स्क्रीनशॉटस् देत आहे.
फ्लाय पास्ट कंट्रोल रूम/1 air formation signal regiment/communication सेंटर व
आकाशवाणी साठी व्यवस्था


3
४ परेड कंट्रोल रूम

विश्वशांती व एकतेचा स्तंभ असलेल्या सारनाथ येथील अशोक स्तंभाची मुख्य मंचासमोरील प्रतिकृती.

राष्ट्रीय दूरदर्शनच याचे live प्रसारण करत असल्याने व लोकांसाठी उत्कृष्ट प्रसारण करता यावे यासाठी त्यांचीही भरपूर तयारी होती. उच्च क्षमतेचे 28 दूरदर्शनचे कॅमेरे तेथे सज्ज होते.8 कॅमेरे इंडिया गेटवर,6 राष्ट्रपती भवनासाठी व 14 राजपथासाठी!शिवाय 3 Ariel कॅमेरे होते व panoramic view साठी 80 फूट उंचीच्या 2 hydraulic क्रेन्सही होत्या.सर्व फोटोंचे संकलन,mixing, editing करण्यासाठीची व्यवस्थाही होती.21 तोफांच्या सलामीसाठीची तयारी.
१ पूजा करताना
२ इथे तोफगोळा ठेवाय चा

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच चालली आहे हि मालिका .
एक शंका, इथे फक्त आमंत्रितांनाच प्रवेश असतो ना ? त्याचे निकष काय असतात म्हणजे आमंत्रण कसे मिळवायचे किंवा कुणाला मिळू शकते ?

दिनेशदा,साधारण 15 दिवस आधी याची तिकिटे नागरिकांना ऑनलाईन/दिल्लीत उपलब्ध होऊ शकतात.यावर्षी 10 जाने.पासून ती मिळणार होती.त्यामुळे आमंत्रण मिळालेले असलेच पाहिजे असे नाही.याशिवाय काही दिवस आधी या कार्यक्रमाची रंगीत तालिम होते.त्याची तिकिटे सुध्दा काढता येतात.त्याची माहिती आंतरजालावर उपलब्ध होते.