दारूचे दुकान !

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 March, 2017 - 02:10

दारूचे दुकान !

गल्लीत दारूचे दुकान उघडले, आणि दुधाचा धंदाच बसला !

- ऋन्मेष

---.---.---.---.---.----.---

काल ही लघुकथा लिहिली होती. मायबोलीवर प्रकाशित केली होती. पण आज तो धागा उडाला आहे. अर्थात याला बहुधा मीच जबाबदार आहे. मलाच कमीत कमी शब्दात अपेक्षित आशय वाचकांपर्यंत पोहोचवता आला नाही. त्यामुळे काही जणांनी आपल्या मनाने अर्थ काढले आणि धाग्यावर थोडासा गोंधळ उडाला.

अर्थातच, तो धागा गोंधळ उडवण्याच्या हेतूने काढला नव्हता. दारूला विरोध करणारे माझे या आधी बरेच प्रतिसाद मायबोलीवर येऊन गेले आहेत. या धाग्यामागेही तसाच उदात्त हेतू होता. त्यामुळे धागा उडाल्याचे वाईट वाटले. म्हणून कथेचा अर्थ समजावत धागा पुनर्रजिवित करत आहे. त्या अनुषंगाने ईच्छा असल्यास चर्चाही अपेक्षित आहे.

--------------------------

कथेचा अर्थ फारच सोपा आहे.

दुधाचा धंदा बसला कारण लोकांनी आपल्या मुलांच्या दुधाचे पैसे आपल्या दारूवर खर्च करायला सुरुवात केली.

दारूचे दुष्परीणाम म्हणून आपण बरेचदा स्वास्थ्य, आरोग्य, अपघात, मारामारया, दंगे या विविध पैलूंवर जास्त चर्चा करतो.
पण दारूचा सर्वात मोठा फटका आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्यांना बसतो. या दारूने आयुष्यात प्रवेश केल्यानंतर त्यांचे ईतर गोष्टींचे बजेट कोलमडून पडते. व्यसनाच्या आहारी गेलेल्याला दारू ही जीवनावश्यक गरज वाटू लागते. तिला तो प्राथमिकता देतो आणि ईतर जीवनावश्यक गोष्टींना त्यापुढे दुय्यम समजले जाते. मग बायकापोरांच्या दुधाचे, कपड्यांचे, शिक्षणाचे पैसे दारूसाठी वापरले जातात. त्या पैश्यांसाठी बायकापोरांना कामाला जुंपणे, मारहाण करणे हे ही ओघानेच होते. वर कथेत उल्लेखल्याप्रमाणे कित्येक गल्ल्या, कित्येक गावं आहेत या देशात. तिथून ही किड गेल्याशिवाय या देशाचा, आपल्या समाजाचा रूट लेव्हलवर विकास होणे अशक्यच आहे !

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कैच्या कै लॉजिक!
>>>>>
त्यांनी एक अपवादाचे उदाहरण देऊन जे लॉजिक मांडू पाहिले ते पटले का? Happy

आज मोहल्ल्यात ड्राय डे साजरा झाला.
दारूची अधिकृत विक्री शून्य.
मात्र दारूचा खप आणि सेवन नेहमीपेक्षा काही पटींनी जास्त.
असे वाटते हे ड्राय डे वगैरे मद्य व्यापारांचेच मार्केटींग फंडे आहेत.
काय बोलता?

क्लिनिकल स्टडी पेक्षा लोकांना त्यांनी पाहिलेल्या दोन चार उदाहरणांवरुन एखादा व्यसनी पदार्थ हानीकारक आहे की / किती हानीकारक आहेत हे ठरवणे हे खचितच अधिक शास्त्रोक्त आणि अर्थपूर्ण ठरेल.

तंबाखू, सिगरेटमुळे कॅन्सर होतो, धुम्रपानामुळे हृदयधमनीत प्लेक तयार होउ शकतो, दारु व्यसनी पदार्थ आहे त्याचे अतीसेवन करण्याकडे कल झुकतो कित्येक लोक याला बळी पडतात मग मेंदुवर तसेच इतर शारीरीक दुष्परिणाम उद्भवतात वगैरे अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे शहाणपणाचे ठरेल.

Pages