ग्रीन ग्रेवीतली वडी

Submitted by मंजूताई on 15 March, 2017 - 05:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वडी : अर्धी वाटी सालासकट उडदाची डाळ तीन तास पाण्यात भिजवून वाटलेली व चवीपुरते मीठ
ग्रेव्ही : एक पाव पालक ब्लांच करुन एका हिरव्या मिरचीसह वाटलेला, एक वाटी दही,
मसाला: चार हिरवे वेल्दोडे, एक मोठी विलायची, पाव जायफळाचा तुकडा, पेरभर दालचिनी तुकडा, चार लवंगा व दोन मिरी, चवीपुरते मीठ

क्रमवार पाककृती: 

मसाले कोरडे भाजून पूड करुन घ्यावी. वाटलेली डाळ एका तेल लावलेल्या ताटली ओतून वाफवून घ्यावी. थंड झाल्यावर कापून तेलात तळून घ्याव्या. त्याच कढईत पळीभर तेलात मसाला (अर्धा) टाकून वाटीभर दही टाकून मोठ्या आचेवर सतत ढवळावे जेणेकरुन दही फाटणार नाही. त्यात पालकाची पेस्ट टाकावी. चवीपुरते मीठ व अर्धी वाटी पाणी टाकून उकळी काढावी. खाण्यापूर्वी तळलेल्या वड्या टाकून एक उकळी काढावी. भाकरी पराठ्यांबरोबर छान लागते ही भाजी.

वाढणी/प्रमाण: 
चार माणसांकरिता
अधिक टिपा: 

वड्या टाकून खूप उकळू नये. कांदा, आलं,लसूण, टोमॅटोच्या ग्रेव्हीपेक्षा वेगळ्या चवीची भाजी.
क्रीम टाकल्यास अजून उत्तम लागते.

माहितीचा स्रोत: 
खाद्य पदार्थाला वाहिलेलं च्यनेल.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.
मसाला अर्धाच टाकायचा म्हटलंय. उरलेल्या अर्धा कुठे टाकायचाय का?

अमितव, खूप कमी मसाला मिक्सरवर वाटल्या जात नाही व दुसरं म्हणजे मला खूप जास्त मसाला ( स्ट्राॅंग) आवडत नाही चवीप्रमाणे जास्त टाकू शकता. उरलेला मसाला दुसर्यांदा भाजी कराल तेव्हा वापरु शकता किंवा इतर कुठल्याही भाजीत. वड्यांत आलं हिमी टाकली असती तर जास्त चविष्ट झाल्या असत्या.

मस्त आहे रेसीपी. उडदाच्या ऐवजी बेसनच्या वड्या थोड्या भाजून घातल्या तर कसे लागेल असा विचार करतीये.

अदिति, पालक पनीर टाईप
रुनम्या , पालक पनीर टाईपचरे, कढी पकोडा नाही, ह्यात पालक जास्त व दह्याची हलकी चव आहे. कढीत मेन घटक दही असतो....
ममो, नक्की कर सोपी आहे. झब्बु दे फोटोचा!