...... होली है

Submitted by सेन्साय on 11 March, 2017 - 20:58

holi-essay-celebrations-of-school-students.jpg
.

तन रंग लो जी आज मन रंग लो ...... होली है........

दरवर्षी रंगपंचमी आली की पाणी वाचवा , सुके रंग वापरा , रासायनिक रंग नको तर घरच्या घरी ऑर्गेनिक रंग बनवा अश्या प्रकारच्या सर्व चर्चाना उधाण येते. प्रत्यक्षात अंमल बजावणी कोण किती करतो ते त्या सणाच्या दुसऱ्या दिवशी आपला आपला चेहरा अंघोळी नंतर आरश्यात पाहिला की स्वतःचे स्वतःला नीट समजत असते आणि तेवढ़या त्या क्षणापुरते अवचित निश्चय होतो पुढल्या वर्षी असे नाही हां ..... किंवा त्याच्या अगदी उलट गौरवपूर्वक रंगाळलेल्या चेहऱ्यांच्या सेल्फ़ीचे सोशल मिडियावर प्रदर्शन भरते.

काय उचित हे ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि स्टेट्सचा प्रश्न असला तरी आजच्या एकंदर पर्यावरणविषयी जागरूक नागरिक काय म्हणतात हे जाणून घ्यायला सदरची चर्चा आणि त्यानुसार अपेक्षित कॉमेंट्स .....

बाकी रंग पंचमी न खेळणाऱ्या मंडळीनी इथेही कोरडे राहिले तर चालेल पण कोरडी कॉमेंट नको ....
ज्यांना पर्यावरण पूरक अशी इको होळी खेळायची इचछा आहे त्यांच्या माहितीसाठी काही रंग बनवण्यासाठी उपयुक्त आणि प्रमाणित माहिती खाली देत आहे.

Indian Council of Agricultural Research says;

Innovation led S&T initiatives of ICAR are endeavouring to make life go green way. Among such efforts, development of eco-holi colors is one of the technology that has shown commercial potential with high consumer preference

The technology of producing eco-powders using natural dyes was developed taking the ill effects of synthetic dyes into consideration under NAIP – Value Chain in Natural Dyes. Around 12 eco-shades are developed, out of which 6 eco- shades yellow, pink, orange, green, blue and violet were popularized as per the opinion of the consumers. The eco-powders are made using flowers, roots, seeds, barks etc. from various plant sources which are very safe to the human health. The medium chosen was also safe for use on skin.

SOURCE(Plant) ---------COLOUR

Bixa orellana_________________Orange
Marathi Name: शेंदरी.

Tagetus erecta_______________Yellow
Marathi Name: झेंडूफूल

Beta vulgaris_________________Pink
(beet roots,बीटचे कंद )

Indigofera tinctora__________Blue
Marathi Name: नीळ

Tagetus errecta +
Indigofera tinctora__________Green

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तैमुरजी प्रतिसदाबद्दल धन्यवाद ... तुमचा वाचनाचा व्यासंग मोठा आहे त्यानुसार तुम्हाला भावलेले किंवा न आवडलेले ह्या विषयासबंधी विचार विस्तृतपणे जाणून घ्यायला नक्की आवडेल

उपयुक्त माहिती ! आमच्या सोसायटीत इको फ्रेंडली , पाण्याचा वापर न करता होळी खेळणार आहेत यंदा. त्यांना तुम्ही लिहिलेले दाखवते . धन्यवाद

धन्यवाद तैमुरजी
धनयवाद जाई..उत्स्फूर्त आणि सक्रिय प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
@ऋन्मेश --ह्यांच्या प्रोसीजर सोप्या आहेत आणि अनेक साईट वर उपलब्ध आहेत. उदाहरण म्हणून खाली वाचा -

१) लाल चंदन लाल गुलालाप्रमाणे वापरू शकता. जास्वंदाचे फूल वाळवून त्याची पावडर तयार करावी. यात कणीक मिळवू शकता. सिन्दुरियाच्या बिया लाल रंगाच्या असतात, यांना वाळवून कोरडा आणि ओला रंग बनवता येऊ शकतं.

२) दोन लहान चमचे लाल चंदन पावडरला पाच लीटर पाण्यात टाकून उकळून घ्या. नंतर यात वीस लीटर पाणी मिसळा. डाळिंबाची साले उकळून लाल रंग तयार केला जाऊ शकतो.
 
३) पलिता, मदार आणि पांग्री यावर लाल रंगाचे फुलं लागतात. हे फुलं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानं लाल रंग मिळेल.

अश्या अनेक सोप्या कृती आपण नवीन जुगाड़ करत वापरु शकतो

घरीच करू रंग
------------
पिवळसर झेंडू, पारिजातकाची देठं, गोल्डन रॉड, खैर, बेलफळाची साल वेगवेगळ्या भांडय़ांत पाणी घालून उकळल्यास पिवळसर-लाल रंगाच्या छटा मिळवता येतात. शेवंती, सागाची पानं, पिवळ्या बोगनवेलीची फुलं, यातूनही पिवळ्या रंगाच्या विविध छटा मिळू शकतील. आंबेहळदीचं जमिनीतील खोड, हळद पावडर आणि हळकुंड याद्वारे गडद पिवळा रंग मिळेल. चेहऱ्याला लावण्यासाठी हा पिवळा गुलाल अगदी ‘हटके’ दिसेल. पिवळा रंग उत्साहाचा, बुद्धिमत्तेचा निदर्शक आहे. हळदीच्या पावडरमध्ये लिंबू पिळलं की गडद नारिंगी-लाल रंग मिळेल. कर्दळ, पालक, पुदिना, तुळस अशा अनेक हिरव्या पानांपासून सुंदर गडद हिरवा रंग मिळवता येतो. ही पानं बारीक वाटून पाण्यात मिसळता येईल किंवा ती वाळवून भुकटीसुद्धा करणं शक्य आहे. गुलाबी-किरमिजी रंगासाठी कांद्याची सालं पाण्यात उकळवून घ्यायची आणि मग ते पाण्यात सोनचाफ्याच्या पाकळ्या टाकून ते थोडा वेळ तसंच ठेवलं की त्याचा नकोसा वाससुद्धा निघून जातो आणि सुरेखसा रंग मिळतो. गडद किरमिजी रंगासाठी बीट बारीक वाटून पाण्यात मिसळलं की दाट रंग मिळतो.  जॅकरन्डा (नीलमोहोर), गडद रंगाचा मिलेशिया आणि निळी जास्वंद या फुलांच्या पाकळ्या वाळवून, चुरून त्यात कणीक किंवा मैदा घातला की सुंदर निळा रंग मिळेल. याचप्रमाणे कात आणि चुना एकत्र करून गडद तपकिरी रंग मिळवता येतो. हे सर्व ऑरगॅनिक रंग लहानथोर सर्वाच्याच आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत.
– डॉ. कांचनगंगा गंधे

पाण्यात सोनचाफ्याच्या पाकळ्या टाकून ते थोडा वेळ तसंच ठेवलं की त्याचा नकोसा वाससुद्धा निघून जातो

डॉ. कांचनगंगा ह्यांनी वर दिलेल्या पद्धतींमध्ये तैमुरजींचे उत्तर मिळाले