भगवंत

Submitted by सेन्साय on 10 March, 2017 - 08:02

नुसत्या जलाचा अर्थ देखता
जाणवते तुझी अभेदता
द्रव - वायू - जड प्रकारे
सामावले ज्यात विश्व सारे

तूची ब्रह्मा तूची विष्णू
तूची माझा महेश्वरारे
तीनही लोके भरूनी राहिला
हरि माझा सावळा रे

काय सुंदर दिलीस रे जाण
सोडुनिया सारा बुद्धिभेद
जल हेच जीवन जाणले मी
त्यापासुनीच जीवनाचा आरंभ वेध

बुद्धी अन वाणीच्या प्रभावाने
जिंकली मी पृथ्वी सातत्याने
तरी माझा विवेक हरला
धर्म - वर्ण जाती भेदाने

कोणी कसाही करोत व्यक्त
अंशतः जरी असेल तो भक्त
ज्याची असेल श्रद्धा शुद्ध
उद्धरेल त्यांना माझा भगवंत

- अंबज्ञ

Group content visibility: 
Use group defaults

छान ! Happy
ते फोटोमधे वासरु आहे का???

धन्यवाद कावेरीजी Happy

फोटोमध्ये गिर जातीच्या गायीचे वासरु आहे ते सोबत

ॐ श्री सुरभ्यै नमः ।