स्वप्न....

Submitted by पोलेकर प्रसन्न on 4 March, 2017 - 00:36

एक अधुरी कहाणी...
ती करायची पुरी...
तो आपलाच रस्ता....
तिथे आपलीच दास्तां..
जिथे हरवलेले सारे..
ते भेटीचे किनारे....
येते सारे आठवून ..
होते उधाण हे मन.....
ते स्वप्न...ते स्वप्न....

ती फुलराणीची बाग.....ती आणि मी...
तो वारा,ती साद...
घेऊन तुझा हातात हात....
पाहत बसतो मी तुझ्या डोळ्यांत ...
अगदी हरवून जातो ...
तुझ्या हलक्या हलक्या स्पर्शात....
हे सगळं पाहता येत ..बंद करून डोळे...
तेही काळोख्या अंधारात.....
ते स्वप्न....ते स्वप्न...

ती जिद्द मनाची..तो छंद मनाचा...
बेधुंदी मनाची...तो भास मनाचा...
ती आवड मनाची....तो ध्यास मनाचा....
हे सारे कुरवाळून निजते......
ते स्वप्न....ते स्वप्न...

मी नेहमी रात्रीची वाट पाहत असतो.....
थकलेल्या जीवाला स्वप्नांचा आधार देत असतो...
जे कधीच नाही पाहिलंय...ते स्वप्नात पाहत असतो...
जे कधीच नाही मिळालंय.....ते स्वप्नात जगत असतो....
मी आणि माझं मन जिथे नेहमी आनंदी असतो....
ते स्वप्न....ते स्वप्न...

Group content visibility: 
Use group defaults

मी नेहमी रात्रीची वाट पाहत असतो.....
थकलेल्या जीवाला स्वप्नांचा आधार देत असतो...
जे कधीच नाही पाहिलंय...ते स्प्नात पाहत असतो...
जे कधीच नाही मिळालंय.....ते स्वप्नात जगत असतो....
मी आणि माझं मन जिथे नेहमी आनंदी असतो....
ते स्वप्न....ते स्वप्न...>>>>>हे खूप आवडल..........

धन्यवाद अक्षय....
अजून तरी नाही ..पण जेंव्हा केव्हा लिहेन तेंव्हा नक्की देईन...

ती जिद्द मनाची..तो छंद मनाचा...
बेधुंदी मनाची...तो भास मनाचा...
ती आवड मनाची....तो ध्यास मनाचा....
हे सारे कुरवाळून निजते......
ते स्वप्न....ते स्वप्न...
मस्तच !!!!!!!