प्रेस *6 टू म्यूट युर लाईन....

Submitted by विद्या भुतकर on 27 February, 2017 - 23:40

डिस्क्लेमर: खालील प्रसंगातील पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा माझ्याशी कणभरही संबंध नाहीये. तसे वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आणि असलाच कुणाशी संबंध तर तो तुमच्याशी असण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे पोस्ट वाचून झाल्यावर एकदा स्वतःला आरशात जरूर पाहून घ्या.

वेळ: अमेरिकेतील रविवार सकाळ , भारतातील रविवार संध्याकाळ

कल्पनाने कॉन्फरन्स कॉल सुरु केला. कॉल सुरू होतानाच पुन्हा एकदा तिने ऐकले, 'प्रेस *6 टू म्यूट युर लाईन....'

सगळं जग त्या म्यूटवरच चालू होतं....

कल्पना: 'हाय, धिस इज कल्पना. एनिवन देअर?'

कुणाचंही उत्तर आलं नाही तसे तिने स्पीकर चालू करून म्यूटचे बटण दाबले.

'अरे तिला भूक लागली असेल तो फॉर्म्युला मिक्स करून देना तेव्हढा?' तिने नवऱ्याला सांगितलं.

'किती घालायचं पाणी?' त्याने ओरडून विचारलं.

'बघ ना तूच त्यावर सूचना दिल्या आहेत.' ती आतल्या खोलीतून ओरडली.

'हाय' फोनवर आवाज आला तसे तिने अनम्यूट करून,'हाय धिस इज कल्पना व्हूज देअर?' विचारलं.

'हाय कल्पना धिस इज कृष्णा. हाऊ आर यू?', कृष्णाने विचारले.

'आय एम गुड. हाऊ आर यू?' तीन विचारले.

'गुड ...गुड.....', कृष्णा.

'गुड...' कल्पना.

इतके गुडगुड होईपर्यंत तिकडे कल्पनाच्या पोरीने भोकाड पसरलं होतं. कल्पनाने रूमचा दरवाजा लावून घेतला.

'सो व्हॉट इज द स्टेट्स ऑफ द प्रोग्रॅम नाऊ?' तिने विचारले.

'या इट इज टेस्टेड. नीड यूर इनपुट. आय सेंट यू अन ईमेल. कॅन यु चेक?', कृष्णा.

ती मेल चेक करेपर्यंत त्याने म्यूट केले होते. त्याच्या बायकोने त्याला हाक मारली होती.

'डिनर इज रेडी....', बायको.

त्याने फोन चालू असल्याने हातानेच सांगितले आणि भूक लागल्याची खूण केली. ती राईस सांबार आणायला किचनमध्ये गेली.

'कृष्णा, ये इसमे कुछ टेस्ट केसेस मिसिंग लग रहे है?', कल्पनाने दार उघडून आत आलेल्या पोरीला तोंडावर बोट ठेवून 'शूSS' करून अनम्यूट केले होते.

मग कृष्णाने अनम्यूट केले. तोवर स्वयंपाकघरात दोन तीन वाट्या प्लेट पडल्याचा आवाज आला. त्याने हातात लॅपटॉप घेऊन जाऊन बायकोला रागाने हातवारे करूनच विचारले, 'काय झाले?'.

तिच्या हातात विसळलेली अजून २-४ भांडी होती.

'सॉरी अबाऊट द्याट.' कृष्णा.

'इट्स ओके. तो वो टेस्ट केसेक का...',कल्पना.

'येस, आय विल ऍड मैनाक हियर. कॅन यु होल्ड?',कृष्णा.

'येस प्लिज..',कल्पनाने असे म्हणत पुन्हा फोन म्यूट केला आणि मघापासून समोर उभ्या असलेल्या मुलीला मांडीवर घेतलं आणि बाटली हातात घेऊन दूध पाजू लागली. मागून आलेल्या नवऱ्याकडे तिने रागाने पाहिलंच.

दोनेक मिनिटांनी...

'हाय धिस इज मैनाक. येस कल्पना. व्हॉट इज मिसिंग?', मैनाक.

कल्पनाने अनम्यूट करून बोलायला सुरुवात केली. दूध बऱ्यापैकी पिऊन झाल्यामुळे मुलगी मांडीवरून पळून गेली होती. हातातली बॉटल खाली ठेवून ती बोलली,'मैनाक, I had told you to add exception scenarios and negative test cases too.'.

'Yes Kalpana, sorry, but I didn't get a chance to work on that today.', मैनाक बोलला. रविवारी दिवसभर काम करून त्याला आधीच चिडचिड होत होती. अजूनही तो ऑफिसमध्येच होता.

त्यांचे बोलणे होईपर्यंत कृष्णाने म्यूट करून सांभार राईस हातात घेतला होता. सांबार भुर्रकन ओढताना त्याला जोरजोरात ठसका लागला.

तो पाणी घ्यायला जाणार इतक्यात कल्पना म्हणाली,'So you should have checked with Krishna for someone to help you.' कृष्णा आपले नाव घेतल्यावर तिथेच थांबला. बायकोला 'पाणी आणशील का?' विचारायचे तर ती तिची सिरीयल सुरु करून बसली होती.

त्याने उबळ तशीच दाबली आणि बोलला,'येस कल्पना, पर अभी सब बिझी है. कोई और इसमें लेकर आना मुश्किल है.' कसंबसं ते वाक्य पूर्ण करून त्याने फोन म्यूट केला आणि जोरजोरात खोकत किचनमध्ये गेला. त्याच्या बायकोने,'होपेलेस आहेस' टाईप्स लुक दिला आणि पुन्हा टीव्हीत डोकं घातलं.

तिकडे मैनाकच्या मैनेने संध्याकाळपासून एका पाठोपाठ फोनचा सपाटा सुरु केला होता. त्यानेही फोन म्यूट करून तिचा फोन घेतला.

'अरे बाबा I am in a meeting.' त्याने वैतागून सांगितले.

'I knew it, you didnt even want to go out with me.' मैना.

'I do dear. But give me 10 mins, I'll be there.', त्याने गयावया केली.

'ok, I'll wait for another 10. Not more.', मैना.

'थँक्स डिअर', मैनाक.

हे चालू असताना, कृष्णाने प्रोजेक्ट प्लॅन ओपन केला आणि प्रत्येकाचे काम काय आहे हे सांगायला सुरुवात केली.

'कॅन यु सी माय स्क्रीन?',कृष्णा.

'येस, येस....' कल्पना म्हणाली. पण तोवर तिच्या नेटवर्कला काही प्रॉब्लेम आला आणि आता ती कितीही बोंबलली तरी तिचा आवाज पलीकडे जात नव्हता. तिने कॉल बंद करून पुन्हा सुरु केला. तेव्ह्ढ्यातही तिने किचनमध्ये भाजी गॅसवरून उतरून कट्ट्यावर ठेवली, पोळ्यांची कणिक भांड्यात घेतली.

कॉल सुरू केल्यावर सर्वांचे पुन्हा एकदा 'हाय हाय' झाले.

'नाऊ कॅन यु हिअर मी?' तिने सर्वाना विचारले.

'येस' म्हणून कृष्णाने पुन्हा स्क्रीन शेअर केली. तो स्क्रीनवर काहीतरी दाखवत बोलत आहे तोवर त्याच्या स्क्रीनवर एका मित्राचा मेसेज दिसला,'नेक्स्ट विकेंड पार्टी पक्का ना?'.

त्याने घाई घाईने मेसेज बंद केला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली. पण मित्राला काही चैन नव्हती.

'इस बार, वेट बार चाहिये पार्टी में. मैं तो मंडे छुट्टी लेनेवाला हूं...तू भी ले लेना...', मित्राचे एकामागे एक मेसेज येतच होते आणि कृष्णा धडाधड ते बंद करत होता.

शेवटी त्याने 'Do not disturb' स्टेट्स लावून बोलायला सुरुवात केली.

'कल्पना, See, कोई और रिसोर्स नहीं है अभी.'.

'But the client needs it done this week.', ती वैतागली. शिवाय मागे नवरा पोरीला सोडून स्वतःचे आवरायला गेला होता. पोरीने हिच्या लॅपटॉपचा चार्जर काढून घेतला होता. लॅपटॉप मरायला टेकला होता.

तिकडे म्यूटवर मैनाक, घडयाळाच्या काट्याकडे बघत बसला होता. त्याच्या मित्राने त्याला कॅन्टीन मधून पोहे आणून दिले. 'थँक्स यार' म्हणत पोह्याचे दोन घास खाल्ले. रात्रीची जेवायची वेळ झाली तरी अजून सुट्टी झाली नव्हती. पोटात कावळे जोरजोरात कोकलत होते.

'Yaar, she is waiting for me for an hour, can you hold this for a minute? Let me freshen up and come? If they call me, just dont say anything.' म्हणत मैनाकने हेडफोन मित्राच्या कानाला लावला आणि अजून दोन घास तोंडात घालत बाथरुमकडे पळाला.

मागे कल्पना आणि कृष्णा आणखी कुणाला काम लावता येईल त्याचा हिशेब करत होते.

'I think Reena would be good fit, she has worked on this project.',कल्पना.

'वो शादी के लिये जा रही है नेक्स्ट वीक', कृष्णा .

'ओह...फिर तो मैनाक कोही ये काम खतम करना पडेगा. मैनाक... मैनाक.... कॅन यु हिअर मी?',कृष्णाने विचारले.

आता मित्राला फोनवर काही बोलताही येईना. समोरून मैनाक पळत येताना दिसला. तोवर...कल्पनाच्या पोरीने भाजीचं भांडं कट्ट्यावरून खाली ओढलं होतं. नवरा कुठे दिसत नव्हताच.

'ओके असाईन इट टू मैनाक. I need to go now....' म्हणत कल्पनाने फोन बंद केला.

मैनाकने फोन अनम्यूट केला तेंव्हा कृष्णा त्याला म्हणाला,'मैनाक I need you to finish this work as soon as possible. I'll send you the details in an hour.'

इतका वेळ जागेवर नसल्याने त्याला काही बोलताही येईना. तिकडे मैनेचा फोन येतंच होता.

त्याने 'ओके' म्हणून फोन ठेवून टाकला आणि मैनेचा फोन घाईने उचलला.

कृष्णाने दोन वडे सांबार मध्ये घेतले आणि टीव्ही बघत खात बसला. कल्पना पोरीला आणि किचन साफ करत बसली.

तिच्या नवऱ्याने, कृष्णाच्या बायकोने आणि मैनेने,'संपला एकदाचा कॉल' म्हणून दीर्घ श्वास घेतला.

विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय...
त्याचा बायकोने... हे बदलायला हवं. 'त्याचा बायको' हे पेटंटवाले दोन शब्द आहेत ! Wink

भारी! Biggrin

'त्याचा बायको' हे पेटंटवाले दोन शब्द आहेत ! >>> सुधा !!!

सही!

अगदी बरोबर लिहिलय. कालच आमच्याकडे snow day होता त्यामुळे मुलगी घरीच होती. तिला ममाच्या कामात interest होता म्हणून मिटिंग्सच्या वेळेला बाजूला बसली होती.
एका कोणत्यातरी मिटिंगमध्ये मला वाटल मी म्यूटवर आहे. म्हणून मी तिच्याशी बोलत होते. तर एका colleague चा मेसेज आला - "Your daughter understands Marathi!". Happy काय माहिती कोणी काय काय ऐकल

अगदी, अगदी झालं वाचून Happy
तिच्या नवऱ्याने, कृष्णाच्या बायकोने आणि मैनेने,'संपला एकदाचा कॉल' म्हणून दीर्घ श्वास घेतला. >>> हे आमच्याकडे प्रत्येक कॉलनंतर होतंच, तंतोतंत !

वेळ: अमेरिकेतील रविवार सकाळ , भारतातील रविवार संध्याकाळ >> इथे अमेरिकेतील शनिवार संध्याकाळ , भारतातील रविवार सकाळ असं लिहायचं होतं वाटतं...

मजा आली वाचुन आणि नीट च रिलेट करता आलं !

मला वाटतं, अशा कॉल्स वर एक वेगळा धागा च निघाला पाहीजे, गमती-जमती, वैताग, नामुष्की, वेळ वाया जाणे, असे पुष्कळ प्रसंग सांगता येतील...

कुरुडी, एक्दम मान्य, मोठा विषय आहे हा. Happy
मराठी कुडी, आम्च्याकडे माझा कॉल हा मोठा वादाचा मुद्दा असतो. नवरा फोनवर असताना मी सर्वाना गप्प बसवते आणि माझा चालू असताना मुलान्च्या मारामार्या, रडारड चालू असते. तेव्हा नवर्याशी भान्डण काढायला अजून एक विषय. Wink

सर्वान्चे आभार. Happy
विद्या.

Thanks B.S. Happy

छान लिहिलंय, आवडलं!

अशा कॉल्स वर एक वेगळा धागा च निघाला पाहीजे, गमती-जमती, वैताग, नामुष्की, वेळ वाया जाणे, असे पुष्कळ प्रसंग सांगता येतील ...>>> आणि जे घरातून ऑफिसची कामं करतात, त्यांच्याविषयीसुद्धा वाचायला आवडेल. घरातून काम केल्याने त्यांना होणारे फायदे, तोटे, येणाऱ्या अडचणी, गमतीजमती.

मस्त आहे .
आमच्या वेगवेगळ्या कॉलवर वेगवेगळ्या गमती जमती झाल्या होत्या .
एका अमेरिकनचा कुत्रा नेहमी भुंकत असे. आम्हाला त्याची सवय झाली होती म्हणा .
दूसरा एक भारतिय , एक्दा अनम्युट ठेवून त्याच्या कुत्र्याला , ब्रेक्फास्ट झाला आता आंघोळीला जा म्हणून समजावत होता .
एक्दा कोणीतरी , कार मधून कॉल घेतला आणि बिचारा विसरला वाटतं . ४-५ मिनीट काहितरी अगम्य बोलण्याचे आवाज येत होते .पीएममो सांगून सांगून दमला , प्लीज सगळे म्युट वर जा म्हणून . पण त्याचे लक्श नव्हते वाटते. शेवटी पीएम्मो ने सांगितलं कॉल ड्रॉप करून सगळ्यानी परत डायल करा.

आमचा एक थोडा वेंधळा बॉस (श्रीनी)होता, त्याचे २ किस्से, हा माणूस एकदा बोलायला लागला कि थांबतच नाही अशी त्याची ख्याती

कॉल जॉइन करताना स्वतःचं नाव सांगाव लागतं, जेंव्हा कॉल सोडून जाता, तेच नाव XYZ left the conference असं कळतं..
हा श्रीनी, जरा लेट आला कॉल मध्ये, सगळं बोलणं झाल्यावर म्हणाला, मला अजुन एक कॉल आहे, मला जे सांगायचं होतं ते झालं आहे, तुम्ही पुढे चालू ठेवा. असं म्हणून त्याने कॉल ड्रॉप केला, आणि पुढे जे झाले ते ऐकून काही वेळ कुणालाच काही कळलं नाही आणि नन्तर सगळेच जे हसत सुटले !! हा कॉल जॉइन करताना स्वतःचं नाव सांगायच्या ऐवजी डायरेक्ट बोलायलाच लागला होता, आणि ती सगळी बड्बड left the conference अशी ऐकू आली ! !

याच माणसाने एकदा कहर केला होता....३ स्तर वरचा त्याचा बॉस (वेंकट) पुण्याला आला होता, आणि एक पुर्ण टिम ची tele-conference घ्यायची ठरली होती...हा श्रीनी हैदराबाद हून tele-conference अटेंड करणार होता, अजून पण बरेच सिनियर लोक असणार होते कॉल मध्ये....
कॉल सुरु झाला, श्रीनी ने ग्रुप बद्दल माहीती द्यायला सुरवात केली, प्रोजेक्ट बद्दल पण माहीती दिली...पण ही प्रस्तावना थांबतच नाही हे पाहून श्रीनी च्या बॉस नी एक-दोनदा त्याला interrupt केलं पण गडी काही ऐकेना ! अजून १-२ नी प्रयत्न करून पाहीले, पण उपयोग शुन्य!
मग वेंकट नी त्याचा (बेस्ट) अटेम्प्ट केला, "श्रीनी , श्रीनी , श्रीनी , श्रीनी " त्याने श्रीनी च्या नावाचा धोशा चालूच ठेवला
श्रीनी : "येस वेंकट"
वेंकट म्हणाला, " आय थॉट CSMA/CD ऑल्वेज वर्क्स, बट इट डजंट !!"

हे ऐकून tele-conference मधली सगळीच मंडळी हास्य-कल्लोळात बुडून गेली!

हाहा Happy कुरुडी, स्वस्ति. Happy एकेक नमुने असतात कॉलमधे. मला वाटते की या कॉलससाठी एटीकेट्स असतात ते लोकांना शिकवून ठेवले पाहिजेत. Happy

मयुरी अनुभव नाहीये तेच बरे आहे. आताच पोराना शाळेत सोडताना शेजारी बसून नवर्याचा कॉल चलू होता. वैताग येतो. धड बोल्ताही येत नाही. पोराना सारखे गप्प करावे लागते.

Pages