लहान मुलांसाठी सुयोग्य टॅब किंवा इतर एज्युकेशनल डिवाइस

Submitted by स्वान्तसुखाय on 27 February, 2017 - 02:11

लहान मुलांसाठी योग्य, ज्ञान आणि मनोरंजनासाठी उपयुक्त असे i-pad, tablet वा तत्सम educational device सुचवा . Plz highlight its special features and approximate budget. The appropriate educational programs, apps are also welcome.

प्राधान्य:

१. ५-८ वयोगटाकरिता interactive असावा.
२. आकार व वजन हाताळण्याजोगे व दृष्टिस कमी त्रासदायक असावा.
३. Video , audio clips, you tube videos, educational apps should b easily downloaded and saved in d device itself.
४. लहान मुलांकडून हाताळला जाणार असल्याने फार महाग व गुंतागुंतीचा नसावा.

अशा उपकरणांचा वापर मुलांकडून केवळ टाइम पास किंवा " तुझ्यावाचून करमेना " या प्रकारचा न होता ज्ञान व मनोरंजनाचे साधन म्हणून व्हावा या करता कोणती काळजी घ्यावी हयावरही कृपया आपले मत मांडा...

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

device कुठलाही असो, educational अ‍ॅप्स डाउनलोड करता येतात. आयपॅड, टॅब दोन्ही ५-८ वयोगटासाठी चांगले आहेत. आयपॅड वर istation अ‍ॅप मला विशेष आवडते. pearson success app ही मस्तं आहे.
>>>अशा उपकरणांचा वापर मुलांकडून केवळ टाइम पास किंवा " तुझ्यावाचून करमेना " या प्रकारचा न होता ज्ञान व मनोरंजनाचे साधन म्हणून व्हावा या करता कोणती काळजी घ्यावी हयावरही कृपया आपले मत मांडा...------

वेळ निश्चीत करावी. तसेच एका वेळी किती मिनिटे हे ही ठरवावे. ५-८ वयोगटाला एकावेळी ३० मिनिटापेक्षा जास्त असु नये. deviceदेण्याबरोबरच लिहिण्याचीही सवय लावावी. त्यासाठी chalkboard (किंवा पाटीपेन्सिल), whiteboard, वही हे सुद्धा वापरायला द्यावे. ५-८ वयोगट एकावेळी २० मिनिटांपेक्शा जास्तं लिहु शकत नाही. मी होलसेलमध्ये फुलस्केप्स आणुन ठेवते आणी क्लिपबोर्डला लावुन देते. अक्षर सुधारावे म्हणुन ते तीन रेघावाले पेपर्स असतात तेही आणले आहेत. so, devices as well as other writing/reading material available असु द्या.

Thanx Raya..device च्या बरोबरीने लेखन साहित्य देण्याची कल्पना विशेष आवडली...

सर्व प्रकारच्या डिवाइस वर यु ट्यूब विडियो थेट डाउनलोड होतात का ?

मी अशा प्रकार चे डिवाइस प्रथम च घेणार आहे...त्यामुळे खरेदी
करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...कोणत्या गोष्टीना प्राधान्य दयावे याबद्दलही अनुभवी युझर्सनी कृपया मार्गदर्शन करावे...