जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ९

Submitted by Mayur Mahendra ... on 23 February, 2017 - 02:34

" म्हणजे जँक तो बाईकवाला ईसमही तूला पकडण्यासाठीच तूझ्यावर नजर ठेऊन होता तर " रॉन
" कदाचीत "
जाऊदे या विषयावर आपण नंतरच निवांत चर्चा केलेली बरी. ईथे आपल्याला आता जास्त वेळ थांबायला नको. अगदी कोणत्याही क्षणी ती माणसं आपला माग काढत ईथेही पोहोचतील. " रॉनच्या बोलण्याने ते तीघंही पून्हा सावध झाले.
" चल रॉकी आपल्याला आत्ताच या गूहेतून बाहेर पडायला हवं " ज्युलीची जीवघेणी घाई पाहून तो ताबडतोब रॉनचा आधार घेत ऊभा राहीला.
" तूला आठवतयं रॉकी ती माणसं तूला या गूहेत कूठून घेऊन आली होती ते.
म्हणजे आपल्याला ईथून बाहेर पडायला बंर झालं असतं ना ?" जँक
" तेच तर मला नेमकं आठवत नाही ना. त्यांनी मला ईथे आणताना माझ्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधली होती. त्यामूळे मला काहीच दिसत नव्हतं. " रॉकी थोड्या नाराजीच्या स्वरातच म्हणाला.
" ठीक आहे. काही हरकत नाही. आपण चैघंही आता एकञच पूढे जाऊ. " जँक ऊगाचच त्याला धीर देण्याचा निष्फळ प्रयत्न करत पूढे निघाला.
मग रॉनने पटकन तीथल्या दोन दगडांच्या चींचोळ्या कपरीत अडकवलेली लाकडी मशाल खेचून बाहेर काढली. सोबत मोबाईलच्या फ्लँश लाईटचा ऊजेड तर होताच. पण त्यात त्या मशालीच्या अग्नीची हवीहवीशी वाटणारी ऊब माञ नक्कीच नव्हती. आता त्यांना अगदी सावधपणेच पूढे जावं लागणार होतं. कारण वेबपासून त्यांच्या जीवाला असलेला धोका अजूनतरी पूर्णपणे टळला नव्हता. शीवाय त्या गूहेत मागे बल्बच्या अंधूक प्रकाशात बसलेली ती माणंस देखील वेबच्या साथीदारांपैकीच होती.
नाही म्हटलं तरी हळूहळू वातावरणात एक अनामीक भीती दाटून येत होती. त्यातच भर म्हणून की काय, गूहेतील छोट्या-मोठ्या श्वापदांची कीर्र आणखीनच भयानक रंग चढवत होती.
ते तीघंही आता अगदी शांतपणे प्रत्येक गोष्टीची चाहूल घेत पूढे जात होते. सर्व काही व्यवस्थीत चालू असताना ज्युली अचानकच पटकन खाली वाकली. आणी गडबडीने आजूबाजूला पाहू लागली.
का विचारलं तर म्हणे तीच्या डोक्यावरून कोणतातरी विद्रूप पक्षी वेगाने ऊडत गेल्याचा भास तीला झाला होता. पण प्रत्यक्षात तर तंस काहीच घडलं नव्हतं. ज्युलीच्या शेजारीच रॉन व जँक तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत कसल्यातरी गंभीर मूद्यावर चर्चा करण्यात व्यस्त होते. पण रॉकीच्या चेहऱ्यावरील हावभावावरून तरी तो अजूनही थोडा घाबरलेलाच वाटत होता. कदाचीत आपण पून्हा पकडले जाऊ याची हलकीशी हूरहूर त्याच्या निरागस मनाला सारखी सतावत असावी.
तीथून अगदी सावधतेने थोडं पूढे गेल्यावर ते चैघंही एक-दोन मिनीटं अचानक समोर पाहतच राहीले.
कारण त्या अंधाऱ्या गूहेतून बाहेर पडण्यासाठी तीथे आणखीन तीन-चार भूयारांची तोडं आ वासून ऊभी होती.
" आता आपण कूठून जायचं रे ?" ज्युलीला काहीच कळत नव्हतं. खंरतर ती खूपच घाईत होती.
तो एक गूतांगूतीचे मार्ग असलेला भाग वाटत होता. पण त्यापैकी नक्की कोणत्या भूयारातून गेल्यावर ते बाहेर पडतील हे माञ कोणालाच माहीत नव्हतं. अगदी रॉकीलाही.
" थाबं गं. मला थोडा विचार करू दे " ज्युलीची बडबड ऐकून रॉकी तीला शांत करत म्हणाला.
जँक आणी रॉनतर अजूनही कसलीतरी चर्चा करण्यातच व्यस्त होते. कदाचीत त्यांना तीथून बाहेर कसे पडता येईल. याचाच विचार ते करत असावेत. कारण काहीही माहीत नसताना ऊगाचच त्यापैकी कूठल्यातरी भूयारात घूसणं, म्हणजे निव्वल मूर्खपणाच होता. आणी यावेळी खरंतर त्यांच्याकडे वेळही फार कमीच होता.
रॉकीने लगबगीने आजूबाजूला पाहीलं. कदाचीत तो ऊगाचच काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत असावा.
" जँक ती माणंस मला जेव्हां या गूहेत आणत होती, तेव्हां त्यांच्यापैकी एकाचं बोलणं माझ्या कानावर पडलं होत. तो त्याच्या साथीदाराला सांगत होता. की या गूहेत प्रवेश करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.
म्हणजे त्यांनी मला ज्या भूयारातून ईथे आणलं होतं, तो " रॉकी त्याला जे आठवत होतं ते जँकला भराभर सागंत होता.
" मग रॉकी सागं पटकन, ते यापैैकी कूठल्या भूयारातून तूला ईथे घेऊन आले होते ते " ज्युली तीच्या समोरच्याच तीन-चार भूयारांकडे ईशारा करून त्याला विचारत होती.
" ते माञ मला माहीत नाही गं. माझ्या डोळ्यांवर तर त्यांनी काळी पट्टी बांधली होती. त्यामूळे मला काहीच दिसत नव्हतं " हे सांगताना रॉकीला स्वतःचीच भयंकर चीढ येत होती.
" आपण एक काम करू.,
मीञानो माझ्याकडे या गूहेतून बाहेर पडण्याचा एक सॉलेड प्लान आहे. " कदाचीत खूप विचाराअंती रॉनला काहीतरी सूचलं असावं.
" आता काय आणी पंचाईत ?" ज्युलीने संधी साधून अगदी योग्य वेळी त्याला टोमणा मारला होता.
" तू गप्प बस गं " रॉन अखेर नाईलाजास्तव दाट-आोठ चावून तीच्यावर खेकसला. मग हळूहळू स्वतःलाच शांत करत तो पूढे बोलू लागला.
" समजा आपण जर दोघां-दोघांचा ग्रूप करून या भूयारात घूसलो तर ?
म्हणजे बघा, आता आपण चैघंहीजण एकञच पूढे जाणं धोक्याचं आहे. बरोबर, शीवाय आपल्याकडे आता वेळही फार कमी आहे. त्यामूळे आपण दोघं-दोघंजण येथयेथील प्रत्येक भूयारात जाऊया. आणी मग ज्याला बाहेर पडायचा मार्ग सापडेल त्याने पून्हा या ठीकाणी येऊन सर्वाना कळवावं. "
" पण रॉन मी काय म्हणतो. आपण आता एकञ भेटलोच आहोत तर आपण पूढेही एकञच जाऊया ना कशाला ऊगाचच वेगवेगळं जायचं " जँकने त्या तीघांसमोर स्वतःचंही मत व्यक्त केलं.
" पण मलातरी असं वाटतंय की रॉनचा प्लान देखील अगदी योग्य आहे. रॉन म्हणतोय त्याप्रमाणे आपण पून्हा बरोबर दहा मिनीटानीच या ठीकाणी येऊन भेटू.
त्यामूळे मग आपला वेळही वाचेल. आणी आपण चैघंजण एकञ पकडले जाण्याचीही भीती आपल्याला राहणार नाही. काय बोलतो. " मलाही अगदी हेच सांगायचं होतं अशा अवीर्भावात रॉकीने रॉनला सहमती दर्शवली.
" हो चालेल. तूम्ही जर व्यवस्थीत विचार करून ठरवलंच असेल तर मग माझी काहीच हरकत नाही. " अखेर जँकनेही रॉनच्या अद्भूत प्रस्तावाला होकार दिला.
" हां ठीक आहे, ठीक आहे " असं बोलून ज्युलीेने नाक फूगवत रॉनकडे बघून तोडं वाकडं केलं. खरंतर रॉनने सांगीतलेल्या मार्गाशीवाय वेळेअभावी आता त्यांच्याकडे दूसरा पर्यायही उपलब्ध नव्हताच म्हणा.
मग लगेचच फार वेळ न घालवता जँक व ज्युली पहील्या भूयारात शीरले. आणी रॉन रॉकीला घेऊन दूसऱ्या भूयारात गेला.
आत खूप अंधार होता. त्यामूळे ज्युलीला तीच्या मोबाईलची फ्लँश लाईट पून्हा चालू करावी लागली. त्या भूयारात अगदीच जीवघेणी शांतता पसरली होती. आणी ती क्षणाक्षणाला आणखीनच दृढ देखील होत होती. त्यात भर म्हणून की काय पूढे कोळ्याच एक मोठं, वेडेवाकडं जाळं फ्लँश लाईटच्या अपूऱ्या प्रकाशात लकाकत होतं.
" हळू पायाखाली बघ " ज्युली चालताना मध्येच धडपडली. सूदैवाने जँक तीच्या बाजूला होता. म्हणून ती खाली तोडांवर पडण्यापासून वाचली.
" मला तरी हा ईथून बाहेर पडण्याचा मार्ग असेल अंस वाटत नाही गं " जँक आजूबाजूला नजर फिरवून बोलत होता. कदाचीत तो काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असावा.
" ते बघ तीथे काय आहे ?" ज्युलीला त्या मंद प्रकाशात काहीतरी हलताना दीसलं होतं. पण तीने जवळ जाऊन पाहायच्या अगोदरच ती हलणारी वस्तू त्या ठीकाणावरून अचानक गायबही झाली होती.
" काय होतं गं ते ?" जँक
" काय माहीत ?
ईथे सहसा कोणीच कधी येत नसावं. मला तर ईथे खूप भीती वाटतेय.
चल आपण पुन्हा मागे जाऊन त्यांची वाट पाहू. " ज्युली ऊगाचच घाबरत-घाबरत जँकचं न ऐकता त्याला खेचतच पून्हा मागे घेऊन आली.
" हे दोघं अजून कसे काय येत नाहीत. दहा मीनीटे तर होऊन गेली ना " त्या भूयारातून मागे आल्यावर ती मोबाईलमध्ये वेळ पाहून बोलत होती. कारण त्या चैघांनीही दहा मिनीटातच त्या ठीकाणी येऊन भेटायचं ठरवलं होतं.
" जरा थांब गं. आपण आजून थोडा वेळ त्यांची वाट पाहू. पण तरीही जर ते दोघं ईथे आले नाहीत तर मग माञ आपल्याला तीथे जाऊन त्यांना बघावं लागेल. " जँक
अखेर जे नको व्हायला हवं होतं तेच झालं. जवळजवळ पंधरा-वीस मिनीटं होऊन गेली असावीत तरीदेखील रॉनचा आणी रॉकीचा
काहीच पत्ता नव्हता.
मग शेवटी नाईलाजास्तव कंटाळून जँकला ज्युलीसोबत दूसऱ्या भूयारात जावंच लागलं. त्या गूहेत ईतर भूयारांपेक्षा दगडाचं प्रमाण खूपच होतं.
पूढे पूढे तर त्या दगडांवर कसलीतरी वेडीवाकडी भंयकर चीञे देखील कोणीतरी काढून ठेवली होती.
जँक अगदी लक्षपूर्वक त्या चीञांकडे पाहत होता. पण त्याला काही महत्वाचं असं त्या चीञांत आढळलं नाही. कदाचीत जँकला त्या चीञांचा अर्थच कळला नसावा. ज्युली तर ती चीञे पाहून फक्त घाबरण्याचं काम करत होती. ती स्वतःही घाबरत होती. आणी मग जँकलाही घाबरवत होती.
" जँक ती बघ मशाल "
त्या गूहेतील असंख्य छोट्या-मोठ्या दगडांपैकी एका काळ्या दगडावर ती मशाल पडली होती. आणी अजूनही अद्ययावत पेटत देखील होती.
" अगं पण ही मशाल ईथे आहे. मग ते दोघं कूठे गेले. ?
वेब ने या दोघांना पून्हा पकडलं तर नसेल ना. " जँकच्या चेहऱ्यावरची चीतां आता स्पष्ट झळकत होती.
" चल आपण पूढे जाऊन बघू कदाचीत ते दोघं पूढेच गेले असतील " ज्युलीने ती पडलेली मशाल ऊचलत जँकला धीर देण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
" ओके चल " जँक
मशालीच्या अपूर्व ऊजेडात हळूहळू ते दोघंही त्या भूयारात आणखीनच पूढे जात होते. अखेर कसेतरी धडपडत ते भूयाराच्या शेवटपर्यतंही पोहोचले खरे. परंतू तीथेही रॉकीचा व रॉनचा कोणताच मागमूस नव्हता.
" हा पागल रॉन रॉकीला घेऊन नक्की गेला कूठे ?
तरी मी तूम्हाला सांगत होती. रॉनच्या प्लान अगदी फाल्तू आहे म्हणून पण त्यावेळी माझं ऐकायला माञ कोणीच तयार नव्हतं.
आता आली ना पंचाईत. " ज्युली अगदी संधी साधून रॉनच्या चूकांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न करत होती.
" ते दोघं ईथेही नाहीत मग गेले तरी कूठे
असतील. तूला काय वाटतं ज्युली ?" जँक ज्युलीच्या चेहऱ्याकडे पाहून तीला विचारत होता. कदाचीत त्याला तीचं ऊत्तर हवं होतं. परंतू तीच्या चेहऱ्यावरही प्रश्नचीन्हच दिसत होते. खरंतर त्यांना काहीच कळण्यास गत्यांतर नव्हतं.
मग थोडा विचार करून ते दोघंही पून्हा त्या गूहेतून मागे फीरले. आणी त्या चैघांनीही जीथे एकञ भेटायचं ठरवलं होत. त्या ठीकाणी येऊन पोहोचले.
" जँक मला तरी असं वाटतंय की कदाचीत ते दोघं आपली वाट पाहून आपल्याला शोधण्यासाठी या तीसऱ्या भूयारातच शीरले असावेत " ज्युली
" हो आता आपल्याकडे दूसरा पर्यायच ऊरला नाही म्हणा. त्यांना शोधण्यासाठी आपल्याला तीथेच जावं लागेल " जँक
मग आणखीन विचार करण्यात फार वेळ न घालवता. त्या दोघांनीही रॉनला व रॉकीला शोधण्यासाठी तीसऱ्या गूहेच्या तोडांत प्रवेश केला.
ती गूहा ईतर दोन्ही गूहांपेक्षा खरंतर खूपच अरूंद होती. आणी तेथील मातीमध्ये थोडा ओलावा देखील होता. पूढे पूढे तर ती संपूर्ण गूहाच त्या चिखलाने व्यापली होती. जणू काही एखादा पाण्याचा अमर्याद झरा त्या गूहेला लाभला असावा.
पूढे गेल्यावर त्या चिखलाचं रूपांतर हळूहळू दलदलीत होत होतं. त्यातच अधून-मधून मोठमोठी दगडं त्या भरीव चीखलातही तोडं वर करून आपआपलं अस्तीत्व प्रस्थापीत करून जगत होती.
अखेर ना ईलाजास्तव त्या चिखलाच्या दलदलीतून त्यांना आता पूढे जावं लागणार होतं. जँक पूढे असल्यामुळे त्याच्याच हातात मशाल होती. तीथून थोडं पूढे गेल्यावर साधारण पाच-सहा फूटांवर दोन दगडांच्या एका चीचोळ्यां फटीतून त्यांना सूर्याच्या तेजस्वी प्रकाशकीरणांच दर्शन घडलं.
पहाटेचा ऊगवता सूर्य त्यांच्यासाठी सूटकेचा श्वास घेऊन आला होता.
क्षणभरासाठी का होईना त्याचा जीव सूखावला. अखेर त्यांना त्या गूहेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला खरा पण रॉनचा व रॉकीचा माञ अजूनही काहीच पत्ता नव्हता. जँकने ज्यूलीकडे मशाल देण्यासाठी मागे वळून पाहीलं.
आणी आणखीन एक धक्का त्याच्या हद्याचा ठोका चूकवून गेला. नखशीकांत हदरणं म्हणजे काय याचा त्याला आता चांगलाच प्रत्येय येत होता.
कारण त्या ठिकाणी मागे कोणीच नव्हतं.
क्षणभर जँक मागे पाहतच राहीला. तीला आवाज देत राहीला, तीची वाट पाहत राहीला. ती आता दिसले, मग दीसेल पण तीची तर हलकीशी चाहूलही त्याच्या नशीबी नव्हती.
त्या अभीरत अंधाऱ्या गूहेत तो आता एकटाच होता. हो अगदी एकटाच.
एका वेळी एकञ असलेली ती नीरागस पोरं आता क्षणार्धात सर्वापांसून नकळतपणे वेगळी झाली होती.
जँक थोडा वेळ शातंच राहीला. अशा कसोटीच्या परीस्थीतीत आपल्या चंचल मनावर ताबा ठेवण्याची कला त्याला चांगलीच अवगत होती.
मग एकाएकी बसलेल्या दगडावरून तो ताडकन ऊठला. आता मागे वळून पाहण्यात काहीच अर्थ नाही. हे समजण्यास त्याला फार वेळ लागला नाही. कारण वेब व त्याच्या मांणसानीच ज्युलीला व त्या दोघांना पून्हा पकडलं असेल याचा विचार करण्याची त्याला आता फार गरज नव्हती.
" मी जर ज्युलीला शोधण्यासाठी पून्हा मागे गेलो. तर ते मलाही पकडतील. त्यापेक्षा मला ईथूनच लवकरात लवकर निसटायला हवं.
जर मी या गूहेतून सूखरूप बाहेर पडलो तर मी नक्कीच त्या तीघांसाठीही मदत घेऊन येऊ शकतो.
शीवाय यांचा स्मग्लीगंचा धंदा ऊद्वस्त करण्यासाठी देखील मला फार वेळ लागणार नाही. पण कसंही करून मला ईथून आता लवकरात लवकर निसटायला हंव. तर आणी तरच मी यांची मदत करू शकेन " जँक खूप वेळ स्वतःशीच पूटपूटत होता.
मग तीथून निसटण्याचा ठाम निर्णय करून तो त्या फटीतून येणाऱ्या प्रकाशाकडे वळला.
जवळ गेल्यावर त्याला कळलं की त्या गूहेचं तोडं बाहेरूनच एका वर एक दगड रचून बंद करण्यात आलं होतं. जर तीथली एकही दगड हलवण्याचा प्रयन्त जँकने केला असता तर वरून सर्वच दगडांची रास त्याच्या अंगावर पडण्याची दाट शक्यता होती. तीथून बाहेर पडण्यासाठी जँकला त्या दगडांना अगदी सावकाशपणेच वरच्या बाजूने काढणं आवश्यक होतं. शिवाय जँकचे पायही त्या दलदलातील चिखलात अडकले होते.
मग फार वेळ न घालवता जँकने लगेचच त्याच्या हातीतील लाकडी मशाल खाली ठेवली. आणी मग मोठ्या मेहनतीने बाजूचाच एक मोठा दगड त्याने पूढे सरकवला.
त्यामूळे त्या मोठ्या दगडावर ऊभं राहून वरच्या दगडांपर्यतं त्याचा हात पोहोचणं आता अगदीच शक्य झालं होतं.
परीस्थीतीही अगदी बीकटच होती म्हणा. पण तरीही तो अख्ख जग विसरून मोठ्या हूशारीने त्यावर मात करत होता.
मग त्याने लगेचच वरचा एक दगड ऊचलून अलगदच तो दगड खाली दलदलीत फेकला. पण ते करताना त्या ऊचललेल्या दगडाच्या बाजूचाच एक मोठा दगड त्याच्यावर पडणार होता. पण सूदैवानं त्याचं तीकडे लक्ष गेलं आणी तो क्षणार्धात बाजुला झाला. त्यामूळे तो दगड खाली चीखलात जाऊन पडला.
त्याला आता अजीबात थांबून चालणार नव्हते.
त्यांनंतर तो एकानंतर-एक छोटे-मोठे दगड ऊचलून खाली चीखलात फेकू लागला. जँक जस-जसे वरचे दगड काढत होता. तस-तसी आशेची रवीकीरणं आत येऊन ऊजेडाचं साम्राज्य प्रस्थापीत करता-करता त्याचे डोळे दिपावत होती.
आता तीथून बाहेर पडण्याएवढी जागा तरी त्या ठिकाणी ऊपलब्ध झाली होती.
गूहेतून बाहेर पडल्यावर त्या तीघांसाठीही मदत आणनं जँकसाठी अगदीच शक्य होतं.
पंरतू तो योग कदाचीत अजूनतरी त्याच्या नशीबी आला नसावा.
कारण जेव्हां बाहेर पडण्यासाठी जँकने त्याचा ऊडवा पाय त्या दगडावर ठेवल्याबरोबर कोणीतरी त्याच्या नकळतच मागून एक जोराचा वार त्याच्या डोक्यावर केला होता. तो वार एवढा जबरदस्त होता की मागे वळून पाहण्याचे प्राणही त्याच्या थकलेल्या नजरेत आता ऊरले नव्हते. त्याच्या डोळ्यांवर दाट काळा अंधार क्षणाक्षणाला वाढू लागला. फक्त दाट काळा अंधार. आणी मग एकाएकी तो धपकन खाली कोसळला.

क्रमशः
पुढील भाग लवकरच..............

भाग १० साठी
http//www.maayboli.com/node/61839

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त....!!! पण आता मला जरा थोडी थोडी शंका येतेय की, ह्या चौघापैकीच कोणीतरी 'मुख्य सुत्रधार' असावा..!! असो, उगीच 'सस्पेंस' फुटायला नको...!! पुढचे पुढं बघु...!!! पुढील भागाच्या प्रतिक्षेत....!!!

दर्जा...!
Abdul Hamid यांच्याशी सहमत. बघुया काय होतय पुढे...!
यावेळी खूप वाट पहायला लावली राव. आता पुढचा भाग लवकर येऊ दे.

मयुर,
"जॅक फ्लेचर अँड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किंग बार्बोसा"
हे बरोबर शीर्षक आहे का?