एक थोर गायक म्हणून गेलेला आहे, 'गाना न आया, बजाना न आया, दिलबर को अपना बनाना न आया'. आमची हे असले संशोधन करणारी टीम यातील तिन्ही गोष्टींशी अगदी परिचित आहेच. या संशोधनात वेळ जात असल्यानेच आम्हाला या गोष्टी जमलेल्या नाहीत. मात्र आमचे टीकाकार याच्या बरोब्बर उलटे आहे असा आरोप करतात.
तर पूर्वीच्या ऋषीमुनींनी जशी जीवनाची कोडी सोडवली, तशी आमची टीम चित्रपटातील कोडी सोडवणे हे आपले ध्येय समजते. या टीम ला दिल समजले, इश्क समजले, बरेच काही नियम समजले, पण ही गाणी मात्र काय खाउन लिहीली गेली आहेत ते अजिबात कळत नाही. तर आमच्या टीम ने काही गाणी "सोडवायचा" प्रयत्न केला पण कोणालाही ते जमले नाही. सुरूवातीला बरे होते. लोक काय सांगायचे ते सरळसोट सांगून टाकत. कोणाला झोपवायचे असेल तर 'सो जा राजकुमारी सो जा', 'आजा री आ निंदिया...' वगैरे. या गाण्यांचे पुढे 'दो नैना एक कहानी, थोडासा बादल, थोडासा पानी' वगैरे अॅब्स्ट्रॅक्टीकरण झाले व लोक गाणी ऐकताना गुंगून जाण्यापेक्षा ती न झेपल्याने झोपू लागले. तरी उपमा कंट्रोल मधे होत्या तोपर्यंत ठीक होते. म्हणजे 'जैसे बरसे कोई बदरिया ऐसे अखियाँ बरसे' मधे ही केवळ उपमा आहे, शब्दश: घ्यायची नाही - म्हणजे डोळ्यातून अश्रू स्प्रे मारल्यासारखे खाली पडत नाहीत याची कल्पना आली. तरी पाणी वरून खाली पडते यापेक्षा या दोन्हीत काय साम्य आहे हा प्रश्न राहिलाच. पण तरी ठीक होते.
मात्र नंतर या उपमासृष्टीत अचाट गोष्टी येउ लागल्या. त्या उपमा, अलंकार कोणालाच कळेनात. शेवटी कंटाळून यावर रिसर्च करणारे लोक सोडून जाउ लागले. त्यामुळे 'अच्छा दोस्त' नावाच्या चिरविरही व्यक्तीच्या कहाणीप्रमाणेच हा ग्रंथ अपूर्ण राहणार अशी भीती वाटू लागली. मात्र तेवढ्यात आम्हाला लक्षात आले की या रिसर्च करणार्यांनी ही गाणी सोडवायचा प्रयत्न करताना काही नोट्स काढल्या होत्या. त्या वाचून हे किती मोठे आव्हान होते ते वाचकांच्या लक्षात यावे म्हणून त्याच येथे एकत्रित करून सादर करत आहोत. पुढील रिसर्च कोणाला करायचा असेल तर जरूर याचा फायदा होईल. नाहीतरी विज्ञानातील अनेक शोध आधीच्या शोधांवर आधारितच असतात.
१. "फूल बने है घूंगरू, घुंगरू बन गये फूल..."
म्हणजे नक्की काय? समजा यात सुरूवातीला m घंगरू असतील व n फुले असतील. तर त्यावर हे गाणे गायल्याने काय होईल याच्या बर्याच शक्यता निर्माण होतात. जीआरई वगैरे परिक्षांना हे गाणे लावता येइल अशी शिफारस आमची टीम येथे करत आहे.
तर (m घुंगरे + n फुले) + (हे गाणे) =
अ. n घुंगरू व m फुले: कारण अदलाबदल एकदमच झाली
ब. (m + n) फुले. कारण पहिल्यांदा फुले घुंगरांमधे बदलली व नंतर ती सगळी घुंगरे पुन्हा फुले झाली.
क. (m + n) घुंगरे. कारण फूल बने है घुंगरू, घुंगरू बन गये फूल हे कवितेचे नियम लावले तर एकच वाक्य दोन रूपांत म्हंटले आहे त्यामुळे गणितदृष्ट्या ते वेगळे धरता येणार नाही.
त्यामुळे या गाण्यात ऋषी कपूरने डफलीवर टिचकी वाजवल्यानंतर सृष्टीची अवस्था नक्की काय होती याबद्दल बरेच संदेह आहेत.
२. ".. उन को ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते, अपनी तो ये आदत है के हम कुछ नही कहते"
हा खुलासा सुमारे साडेचार मिनीटं आणि तीन कडवी चालतो. आता 'हम कुछ नहीं कहते' म्हणून जर एवढी मोठी गजल म्हंटली जात असेल तर ही व्यक्ती बडबडी असेल तर काय होईल!
३. "दुख मेरा दुल्हा है, बिरहा है डोली,
आँसू की साडी है, आहोंकी चोली..."
या वाक्यातील उपमा ज्या दिशेने चालल्या आहेत ते पाहता पुढच्या काही वाक्यांना नक्कीच सेन्सॉर ने उडवले असेल.
४. " देख के तेरा रूप सलौना, चाँद भी सर को झुकाता है..."
Hey Moon! How is it going?
Not much. Just reflecting!
Why the sad face then?
Oh this guy on earth is saying that there is some girl who looks better than how I look to him from there. I am sad at their brilliance.
५. "ऐ चाँद मुबारक हो तुझे रात सुहानी..."
अरे माझ्या खगोलजीनियस मित्रा, जेव्हा तुला रात सुहानी दिसते व समोर चंद्र दिसतो तेव्हा तेथे लख्ख उन पडलेले असते. हे म्हणजे अमेरिकेने ऑस्ट्रेलियाला ख्रिसमस ला 'लेट इट स्नो लेट इट स्नो..." गाणे ऐकवण्यासारखे आहे..
६. "..जब भी झरनों से मैने सुनी रागिनी, मै ये समझा तुम्हारी ही पायल बजी"
https://www.youtube.com/watch?v=YDkBL3lYgKc&t=1m13s
उपमेला उपमा. मुळात झरनों से रागिनी हीच उपमा आहे. ती जेव्हा ऐकली तेव्हा काहीतरी दुसरे वाजल्यासारखे वाटले. म्ह्णजे मी झर्याचा आवाज ऐकला (मूळ आवाजः पाणी), तेव्हा मला नेहमी जे ऐकल्यासारखे वाटते (पाणी->रागिणी), तेव्हा मला तुझी पायल वाजल्यासारखे वाटले (पाणी->रागिणी->पायल)
७. "जिन्हे इस जहाँ ने भुला दिया, मेरा नाम उन मे ही जोड दो,
मुझे तुमसे कुछ भी ना चाहिये, मुझे मेरे हाल पे छोड दो"
महापालिका विस्मृतीत गेलेले कवी विभाग-२. रजिस्टरः ११/मविगेक/२०१५
लेखनिकः "अं.... काय नाव लिहायचं?"
८. "कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा...
...
उनसे कहना जब से गये तुम मै तो अधूरी लगती हूँ..
...
यहाँ का मौसम बडा हसीं है फिरभी..."
कबूतर म्हणेल हे सगळं चिठ्ठीतच का नाही लिहीलं? उगाच आणखी मला काम. बातम्या झाल्या, मौसम का हाल झाला, आता त्यात " ब्रिस्बन कसौटी मे सचिन तेंदुलकर ब्यानवे पे खेल रहे है..." घाला म्हणजे स्कोरबिर ही सांगून पूर्ण बातमीपत्रच तयार होईल.
९. चाँद को क्या मालूम, चाहता है उसे कोई चकोर
वो बेचारा दूर से देखें, करे न कोई शोर
कायच्या काय. चकोर गप्प बसला म्हणे. तो ओरडला असता तर चंद्राला ते कळणारच होते!
१०. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, नवतरूणी काश्मिरी
https://www.youtube.com/watch?v=sGD6IXRZnk0&t=43s
हे गाणे गाजल्याच्या नोंदी सापडतात. पण आश्चर्य म्हणजे या गाण्यात तो तिची तारीफ करत आहे असे समीक्षक लोकांना वाटलेले दिसते. म्हणजे कोणाला हे गाणे कळालेच नसावे.
चिनार: चिंचेचे झाड
काश्मिरी नवतरूणी: तू
यातून वरच्या दोन्हींत जेवढा फरक आहे तेवढा खालच्या दोन्हीत आहे असेच सुचवायचे असावे. तसेच भारतात व्हर्च्युअल रिअॅलिटी खूप आधीपासून होती हे हे गाणे सिद्ध करते, ती ही टेलिपॅथिक. तिने गॉगल घातल्यावर याला काश्मीर दिसते.
११.
"हम तुम, एक कमरे मे बंद हो, और चाबी खो जाय"
यातील कमरेमे बंद होण्याच्या फॅण्टसीमुळे यातील लॉजिकल गोची पुढे येत नाही. जर दोघे खोलीच्या आत असतील तर आतून कुलूप कशाला लावायची गरज आहे? केवळ कडी लावून काम होणार नाही का? याउलट जर कुलूप दुसर्याच कोणीतरी बाहेरून लावले असेल तर किल्ली हरवली काय किंवा सापडली काय काहीच फरक पडणार नाही. पण एकूणच फार ब्राइट नसावेत हे. घनघोर अंधेरा फक्त "आगे" असतो, किंवा दोघांपैकी कोणाला खावे हे वाघ यांचे ऐकणार असे समज हेच दाखवतात.
१२. "हमने सनम को खत लिखा, खत मे लिखा,
ऐ दिलरूबा, दिल की गली, शहर-ए-वफा..."
हे पत्र नक्कीच मिळाले नसणार. पत्ता नीट लिहीत नाहीत आणि उगाच पोष्टाला दोष. वरचा दिल की गली वगैरे पत्ता जरी खरा मानला तरी तो पत्राच्या वर लिहायचा असतो, पत्राच्या आत नाही.
१३. तुझको नजरे ढूँढ रही है, मुखडा तो दिखलाजा हो मुखडा तो दिखलाजा
रस्ते पर है आस लगाये आनेवाले आजा...
वाट पाहात आहे ते ठीक आहे, पण रस्त्यावर कशाला बसायला पाहिजे. त्यात मुखडा तो दिखलाजा म्हंटल्यावर ताबडतोब दोन बकर्या तिच्याजवळ येत असल्याने हे गाणे नक्की कोणाला उद्देशून आहे याबद्दलही शंका आहेत.
१४. हाय ये फूलसा चेहरा, ये घनेरी जुल्फे
मेरे शेरों से भी तुम मुझको हसीं लगती हो
https://www.youtube.com/watch?v=yQOIDLOYg1Y&t=1m15s
सर्कशीतील रिंगमास्टर च्या सत्कारसभेत पत्नीला उद्देशून केलेली तारीफ.
15. दूरातल्या दिव्यांचे, मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे, आभाळ सांडलेले
या लेले ला काय काय अचाट गोष्टी करायला सांगत आहेत या गाण्यात! मणिहार काय मांड, आभाळ काय सांड, काहीही.
पण एकूणच या लेले लोकांबद्दल फार आकस दिसतो. स्वतःच्या बाहुपाशांत कोणी 'लेले' असून सुद्धा एकटेच फिरत असल्याच्या तक्रारीही सापडल्या आहेत
“फिरते है हम अकेले, बाहोंमे कोई लेले”
नव्हता वाचला आजवर. एकंदरीत
नव्हता वाचला आजवर. एकंदरीत संशोधन समितीचा अहवाल जर मंत्रीमंडळाला सादर झाला तर गाणी मंजूर करण्यासाठी एक समिती नेमून तीत खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ, पदार्थविज्ञानशास्त्री, तर्कशास्त्री, सरकारी वीजमंडळ सचिव, मनपा दिवाबत्ती विभाग कर्मचारी, अ(न) अर्थशास्त्री इत्यादी सदस्य नेमले जातील ही दाट शक्यता आहे.
समितीत एकमत न झाल्यास लवाद नेमण्याचा उपाय जी आर मधे असेलच. गीतकारांना लवादाचे समाधान होईल असे स्पष्टीकरण द्यावे लागेल. तीन वेळा असमाधानकारक उत्तरे दिली तर परवाना जप्त केला जाईल...
भारी आहे लेख.
भारी आहे लेख.
कुठले कोट करू असे झाले, पण खालचे एकच नंबर आहे.
ब्रिस्बन कसौटी मे सचिन तेंदुलकर ब्यानवे पे खेल रहे है..." घाला म्हणजे स्कोरबिर ही सांगून पूर्ण बातमीपत्रच तयार होईल >>>
हा लेख आणि घुंगरू फूल वाचून
हा लेख आणि घुंगरू फूल वाचून परत हसले.
लेट इट स्नो......
लेट इट स्नो......

"अपनी तो ये आदत है के हम कुछ नही कहते" हा खुलासा सुमारे साडेचार मिनीटं आणि तीन कडवी चालतो >>
आता मी न हसता 'जेव्हा तुझी नी माझी' ऐकूच शकत नाही.
बरेच कँडिडेट आहेत आपल्याकडे
बरेच कँडिडेट आहेत आपल्याकडे यासाठी
उबला उबला क्यों लगता है यह बदन
ये जलन तो ख़ामख़ा नहीं
यह खलिश जो है वह ख़ामख़ा नहीं
हाँ तपिश तो है पर ख़ामख़ा नहीं
सोप्पंय बाबा, जा जाऊन पॅरासिटॅमॉल घे. गातोस कशाला?
किंवा
थका थका सूरज जब नदी से होकर निकलेगा
हरी हरी काई पे पाँव पड़ा तो फिसलेगा
तुम रोक के रखना, मैं जाल बिछाऊं
तुम पीठ पे लेना, मैं हाथ लगाऊँ
दिन डूबे ना
आं??? जेम्स बॉण्डच्या पिक्चरमधले व्हिलनसुद्धा फार फार तर पृथ्वीवर काहीतरी घडवून आणण्याच्या प्रयत्नात असतात. अक्खी सूर्यमाला ओलीस ठेवण्याचे प्लानिंग ते पण नाही करत.
पूछे जो कोई मेरी निशानी, रंग हीना लिखना (इथपर्यंत समजून घेतेय मी)
गोरे बदनपे ऊँगलीसे मेरा नाम अदा लिखना (कुणाच्या?)
कभी कभी आस पास चाँद रहता है
कभी कभी आस पास शाम रहती है
(काय संबंध? )
आऊं तो सुबह, जाऊं तो मेरा नाम सबा लिखना
बर्फ पड़े तो, बर्फ पे मेरा नाम दुआ लिखना (आधारकार्डवरचं नाव कोणतं?)
अशक्य हसले.
अशक्य हसले.
सगळेच
सगळेच
माझेमन
माझेमन
भारी आहे लेख.
भारी आहे लेख.
कुठले कोट करू असे झाले,........ +१.
लेले अशक्य आहे.
भारी आहे लेख.
.
पहले पहले प्यार की मुलाक़ातें
पहले पहले प्यार की मुलाक़ातें याद हैं गाण्यात तर ती त्याला सरळसरळ फसवते आहे. तो सुरूवातीलाच क्लीअर करतो की मेरा नाम 'दिवाना' आहे आणि मी विसराळू आहे. नंतर माझं नाव काय आहे असं तो बापडा विचारतो त्यावर ती त्याला 'अंजाना' असं सांगतेय. म्हणजे झाला का आयडेन्टिटी क्रायसिस? वर पुन्हा तिचं नाव विचारल्यावर ती 'सुलताना' असं सांगतेय. म्हणजे गंडवणंच झालं की नाही?
वर पुन्हा तिचं नाव
वर पुन्हा तिचं नाव विचारल्यावर ती 'सुलताना' असं सांगतेय. >>>
ते दोघे खासगी वविला गेलेले असतात. तिथे एकमेकांचे आयडी विचारत असतात. त्याचे जुने आयडी तो विसरलेला असतो.
पण हिला त्याचे सर्व आयडी ठाऊक असतात. शेवटी ती सुलताना हा आयडी डिक्लेअर करते तेव्हां त्याला शॉक बसतो.
कारण सुलताना अॅडमिन असते.
आचार्य
आचार्य
कारण सुलताना अॅडमिन असते. >>
कारण सुलताना अॅडमिन असते. >>
गोरे बदनपे ऊँगलीसे मेरा नाम
गोरे बदनपे ऊँगलीसे मेरा नाम अदा लिखना (कुणाच्या?)>>> खूप हसले
आम्हाला कळत नाही तोवर ठीक
आम्हाला कळत नाही तोवर ठीक होतं एक वेळ. पण कवी काय लिहितोय ते त्यालाच सुधरायचं बंद होतं तेव्हा काय करायचं?
बादलों से काट काट के कागज़ों पे नाम जोड़ना
ये मुझे क्या हो गया
डोरियों से बाँध बाँध के रातभर चाँद तोड़ना
ये मुझे क्या हो गया
कधी सूर्य पळवायचा असतो, कधी चंद्र तोडायचा असतो. एकंदरीत असामाजिक प्रवृत्तींना चालना देणारी जाहीर वक्तव्ये केल्याबद्दल वरील सद्गृहस्थास अटक का करण्यात येऊ नये?
आयडेंटिटी क्रायसिसवालं गाणे
आयडेंटिटी क्रायसिसवालं गाणे
मेरा नाम इश्क
तेरा नाम इश्क
उद्या आईचे नाव आणि वडिलांचे नाव या रकान्यात ही नावं घालून बीएमसीतून मुलाचे बर्थ सर्टिफिकेट काढून दाखवा. ओप्पन चॅलेंज आहे आपलं...
इश्क हे त्यांचं मिडल नेम आहे
इश्क हे त्यांचं मिडल नेम आहे गं.
त्यांची खरी पहिली नावं 'येलाल' आणि 'येमलाल' अशी आहेत आधार कार्डावर.
माझेमन
माझेमन आणि अनु
येलाल' आणि 'येमलाल
येलाल' आणि 'येमलाल
अनु..
अनु..
कसं काय डोकं चालतं इतकं?
त्यांची खरी पहिली नावं 'येलाल
त्यांची खरी पहिली नावं 'येलाल' आणि 'येमलाल' अशी आहेत आधार कार्डावर>>> अनू
येलाल येमलाल
येलाल येमलाल
त्यांची खरी पहिली नावं 'येलाल
त्यांची खरी पहिली नावं 'येलाल' आणि 'येमलाल' अशी आहेत आधार कार्डावर >>>
तुफान हसलेय लेख व प्रतिक्रिया
तुफान हसलेय लेख व प्रतिक्रिया वाचुन…
येलाल येमलाल. : हाहा: : हहगलो
येलाल येमलाल.

त्यांची खरी पहिली नावं 'येलाल
त्यांची खरी पहिली नावं 'येलाल' आणि 'येमलाल' अशी आहेत आधार कार्डावर.
एपिक उत्तर!!!
<<<<<<<
सगळे मायबोलीकरांचे आणि मूळ
सगळे मायबोलीकरांचे आणि मूळ फार एंड यांचा लेख अतिशय भारी आहेत .
मला असं वाटून गेलं की अशा एखाद्या धाग्यावर जे मायबोलीकर प्रतिक्रिया देऊन त्या मूडचा आनंद घेत असतात त्यांचे गेटटुगेदर व्हायला पाहिजे
अ & अ वाल्यांचे स्पेशल गेट
अ & अ वाल्यांचे स्पेशल गेट टूगेदर व्हायला हवे
माझेमन आणि अनु
माझेमन आणि अनु
Pages