आई

Submitted by Akshayaj on 10 February, 2017 - 04:25

इवलीशी होतीस माझ्या पोटातून बाहेर आलीस तेव्हा;
तुला जवळ घेतल्यावर डोळ्यांची तळी तुडुंब भरली होती तेव्हा..

जन्मल्या दिवसापासून तुझ्यात गुंतून गेलं माझं जग;
तुला जिवापाड जपताना काळजाची अजूनही होते तगमग..

मनीमाऊच्या पिल्लासारखी घट्ट बिलगतेस तेव्हा आनंदाच्या लहरी उसळतात मनात;
'आई,आज काय झालं माहितेय' हा तुझा पुकारा असतो प्रत्येक क्षणी माझ्या कानात..

तुझं सर्वस्व असणाऱ्या बाबाची तू परी असलीस, तरी आईचं स्वतंत्र विश्व आहेस तू;
तुझ्या निरागस हास्यापायी कितीही खाचखळगे पार करणाऱ्या हिरकणीची ताकद आहेस तू..

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

मनीमाऊच्या पिल्लासारखी घट्ट बिलगतेस तेव्हा आनंदाच्या लहरी उसळतात मनात;
'आई,आज काय झालं माहितेय' हा तुझा पुकारा असतो प्रत्येक क्षणी माझ्या कानात..>>>>..हलके फुलके शब्द....खूपच मस्त! ! !
तुमचं नाव खूप छान आहे,मला हे अक्षरा,अक्षदा ,अक्शया असलेली नावं खूप आवडतात...

''अपूर्व नाते
आई लेकीचे ''
सुंदर कविते सम सुंदर व्हावे