जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ५

Submitted by Mayur Mahendra ... on 9 February, 2017 - 12:45

अचानक जँकची नजर तेथील एका मोठ्या झाडाकडे गेली.
त्याला आठवलं.
ते झाड त्याने याआधीही पाहीलं होतं.
" पण त्यात काय एवढं विशेष कधीकधी दोन झांड एकसारखी तर दिसू शकतातच ना. "
स्वतःशीच पूटपूटत तो पूढे निघाला.
अखेर कंटाळल्यामूळे त्या तिघांनीही पून्हा गप्पा मारण्यास सूरूवात केली.
" तूम्ही कूठे राहता "
ज्युलीने वेबला सहजच विचारलं.
" मी ईथेच......डोगंराच्या पायथ्याशी रोरीस्टर अपार्टमेटंमध्ये राहतो,
आणी तूम्ही "
" आम्ही, आम्ही एरीझोना सोसायटीत "
" तिघंही "
" हो तिघंही " ज्युली
आपली आई घरी वाट पाहत असेल म्हणून ज्युलीने घरी फोन करण्यासाठी नबंर डायल केला खरा पण
" यू आर ट्राईगं टू कॉल ईट ईज नॉट रिचेबल प्लिझ यू मे बी ट्राय अगेन लेटर " फोनमधून आवाज आला.
" शी यार आता या फोनला काय झालं ?" ज्युली
" या डोगंरावर एवढी घनदाट झाडी असल्यामूळे ईथे कधीकधी रेजंच नसते. सो डिअर ज्यूली मँम फोन ट्राय करून आता काहीही फायदा नाही. कदाचीत फोनवर कॉल करण्यासाठी तूम्हांला पून्हा वरती जावं लागेल "
वेब थोडं गालात हसत-हसतच बोलत होता.
" नको राहूदे, वरती जाण्याच्या अगोदरच आपण खाली पोहोचू.
ह्या रॉनमूळेच मी ईथे आले नाहीतर........."
" हो, हो तू अगदी कूकूळं बाळच आहेस ना की मी सांगीतलं आणी तू पटकन तयार झालीस "
" तूच मला झोपेतून ऊठवून ईथे घेऊन आलास "
" हो का मला माहीतचं नव्हतं की तू झोपेतही चालतेस ते "
" शटअप, स्टूपीड, पागल कूठला "
" हा हा हा "
" आता निरलज्जासारखा हसू नकोस नाहीतर......."
" नाहीतर काय करशील "
" आता ए प्लीझ तूम्ही दोघं भांडू नका हा " जँकने अगदी कळवळून दोघांनाही आेरडून सांगीतलं.
त्यामूळे ज्युली रॉनकडे पाहून तोडं वाकडं करत निमूटपणे पूढे चालू लागली.
मग रॉननेही तीला जीभ दाखवून चिडवलं.
म्हणे जस्यास तसे.
ईकडे वेब मनातच हसत त्या दोघांच्या भांडणाची मजा पाहत होता.
" वेब आपण पायथ्याशी कधी पोहोचणार आहोत यार. माझे पाय तर आता खूपच दूखू लागलेत.
अजून कीती वेळ चालावं लागेल आपल्याला "
चालून कंटाळल्यामूळे वैतागलेल्या ज्युलीने पाय आपटतच वेबला विचारलं.
" आता फार वेळ लागणार नाही...... थोड्या वेळात पोहोचू आपण पायथ्याशी "
वेबने ज्युलीकडे न पाहताच अडखळत उत्तर दिलं.
" तूम्ही रोजच येता का ईथे " रॉन
" नाही रे मी म्हटलं ना कधीकधी येतो ईथे कटांळा आला की " वेब
" ओ आय फरगॉट दँट, मी विसरलोच, तूम्ही आम्हांला या अगोदरही सांगीतलं होतं " रॉन
त्या चैघांना खूपच उशीर होत होता. खंरतर डोगंरावर चढण्यासाठी त्यांना जवळजवळ दीड तास लागला होता. पण ऊतरताना माञ बराच वेळ होऊनही ते चैघं अजूनही डोंगराच्या पायथ्याशी पोहोचले नव्हते.
" तूला आठवंतय रॉन आपण चढताना कोणत्या वाटेने चढलो होतो ते. "
जँक रॉनच्या चेहऱ्याकडे पाहून बोलत होता. कदाचीत त्याला रॉनचं ऊत्तर हवं होतं.
" ती वाट जर माझ्या लक्षात असती तर आपण केव्हांच पायथ्याशी पोहोचलो नसतो का ?
मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं ना तूला की मला नाही आठवत. आपण कोठून आले ते "
यावेळी रॉन थोडा वैतागूनच बोलला.
मागे एकसारखं दिसलेलं ते झाड आणी एकंदरीत त्यांना खाली ऊतरण्यासाठी लागणारा बराच वेळ या बाबीवरं जँकचं मन आता विचार करू लागलं होतं. तेवढ्यात तो अचानक जागच्याजागीच खीळून ऊभा राहीला.
त्याने थोडं लक्षपूर्वकच पाहीलं. त्याने याआधी जो झाड पाहीला होता. हूबेहूब तसाच दिसनारा दूसराही एक झाड पून्हा त्याच्या दृष्टीस पडला होता.
" आपण सारखं-सारखं फिरून एकाच ठीकाणी येतोय की काय ? "
तो स्वताःशीच पूटपूटला.
मग त्याने यावीषयी त्या तीघांनाही कल्पना दिली.
रॉन व ज्यूली तर दोघंही नूसते ठोम्ब्यासारखे ऊभेच होते. त्याना कळतचं नव्हतं की जँक नक्की आपल्याला काय सागंण्याचा प्रयन्त करतोय.
पण त्यांच्यासोबत असलेल्या वेबने माञ जँकला धीर देण्याचा निष्फळ प्रयन्त केला.
" राञीच्या वेळी अशाप्रकारचे भास तर कधी कधी होतातच. तू नको ते विचार नको आणूस मनात.......कळलं " वेब
" पण......"
" मी म्हटलं ना अरे वेड्या दोन झाडं कधीकधी एकसारखी दीसू शकतातच ना " वेबने जँकचं बोलंण थांबवतच पून्हा म्हटलं.
" पण त्यात एवढं साधर्म्य " जँक
वेब त्याच्या वागण्याबोलण्यावरून थोडा अनूभवीच वाटत होता. कदाचीत खरंच त्याला त्या दाट जंगलाविषयी माहीती असावी.
मग ते चैघंही जण पून्हा शांतपणे पूढे चालू लागले. पण जँकचं काही समाधान होईना त्याने पायाखालची एक छोटीशी ओली दगड ऊचलून त्या झाडाच्या खोडावर X अशी खूण केली व तो पूढे निघाला. जेणेकरून जर तोच झाड पून्हा त्याच्या दृष्टीस पडला असता तर तो त्याला ओळखू शकला असता.
जँकने मूद्दामूनच चालताना पून्हा मोबाईलमध्ये वेळ पाहीली. त्यावेळी पाऊने दहा वाजत आले होते म्हणजे जवळजवळ दोन तास त्या घनदाट जंगलात तेही राञीच्या भयान अंधारात ते वेड्यासारखे फिरत होते.
दाट झाडी व वाढलेल्या ओल्या गवतामूळे त्यांना चालताना ञास होत होता. पण घरी लवकर पोहोचण्याच्या ओढीमूळे कोणी बोलून दाखवत नव्हतं एवढंच.
अचानक वेबने त्याच्या जँकेटच्या खीशातून एक सीगारेट काढली आणी रॉनकडे पाहीले.
" ओढणार का ? "
रॉन नाही म्हणताच जँकेटच्या दुसऱ्या खीशातून माचीस काढून तो ती सीगारेट पेटवू लागला. त्यावेळी हवेचा वेग ईतका जोरदार होता की त्याच्या माचीसची काडी सारखी विजत होती.
एकदा वीजली, दोनदा वीजली पण ती सीगारेट काही पेटायचं नाव घेईना.
म्हणून मग सीगारेट पेटवण्यासाठी वेब समोरच्या एका मोठ्या पारंब्यानी व्यापलेल्या वडाच्या झाडामागे गेला.
तेवढ्यात कसलातरी हलकासा आवाज कूठूनतरी आला पण हवेच्या झोतामूळे तो हळूहळू नाहीसा देखील झाला.
इकडे ती तीघंही पोरं त्याची वाट पाहत झाडासमोरच ऊभी होती. जवळजवळ दोन, तीन मिनीटं झाली असावीत वेब झाडामागून समोर न आल्याने रॉनने त्याला हाक मारली. पंरतू त्याचं काहीच प्रतीउत्तर येईना. त्याने पून्हा एकदा आवाज दिला पण तरीही त्याची कोणतीच हालचाल नव्हती. शेवटी थोडा वेळ थांबून ना ईलाजास्तव ते तीघंही जण त्याला बघण्यासाठी झाडामागे गेले.
जँक तर आ वासून पाहतच राहीला. त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.
रॉनने देखील आपली तिष्न नजर आजूबाजूला फिरवली. परंतू त्या ठिकाणावरून अचानक गायब होणं जवळजवळ अशक्यच वाटत होतं.
फक्त त्या भयान शांततेचा भंग करत वडाची सूकलेली पानं सैरावैरा उडून नूसतं धुडगूस घालत होती.
ज्युलीलातर आच्छर्याचा मोठा धक्काच बसला. ती मोठ्याने किंचाळत ओरडत होती.
" कसं शक्य आहे हा वेब अचानकच कूठे गायब झाला. तेही आपल्याला काहीही न सांगता.....नाही तो असेल इथेच कूठे तरी, शोधा त्याला "
खंरच कारण एवढ्या कमी वेळात अचानक गायब होणं निव्वळ अशक्य होतं. अगदी हवेत विरघळून जावा तसा तो त्या झाडामागू हळूवार दिसेनासा झाला होता.

क्रमशः
पुढील भाग लवकरच.........

भाग ६ साठी
http//www.maayboli.com/node/61690

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं चाललयं !
पण प्रत्येक भागात , मागची आणि पूढची लिन्क द्याल का ?
शोधाशोध करायला लागते नाहितर ..

" यू आर ट्राईगं टू कॉल ईट ईज नॉट रिचेबल प्लिझ यू मे बी ट्राय अगेन लेटर " फोनमधून आवाज आला.
" शी यार आता या फोनला काय झालं ?" ज्युली
" या डोगंरावर एवढी घनदाट झाडी असल्यामूळे ईथे कधीकधी रेजंच नसते.

मोबाईल मध्ये रेंज नसेल तर काहीच ऐकु येत नाही मग फोन मधुन IVR चा आवाज कसा काय आला