जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ४

Submitted by Mayur Mahendra ... on 8 February, 2017 - 09:24

लवकर झोपल्यामूळे रॉनला दूपारी कधी जाग आली कळलंच नाही.
मग थोड्या वेळाने भानावर येत त्याने चहा ठेवला.
हॉलमधील मोठ्या स्लाईड विडोंपाशी बसून ते दोघंही त्या तजेलदार चहाचा आस्वाद घेत सर्वाच्यांच नजरेत भरणाऱ्या हिरव्यागार डोगरांला न्याहाळत बसले होते. दाट झाडीने व्यापलेलं ते विशाल डोंगर पाहून नेहमीच त्याचं कैतूक करावसं वाटत असे. खंरच खूप सूदंर होतं ते.
ईतकं की पाहताक्षणी कोणालाही त्या डोगंरावर जाण्याचा मोह आवरता आला नसता. पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जँकने कधीही कोणालाच त्या डोगंरावर गेल्याचं पाहीलं नव्हतं.
कारणही तसंच होतं म्हणा. त्या ऊंच डोगंरावर एवढी दाट झाडी होती, की वरती चढण्याचा कोणताच मार्ग नजरेत नव्हता.
" आज आपण जाऊया का तिथे ? "
अचानक खूप दिवसांपासून मनात दडवून ठेवलेली ईच्छा रॉनने जँकसमोर प्रकट केली.
" कूठे ? "
जँकच्या या प्रश्नावर रॉनने समोर पाहीले.
अर्थातच रॉनच्या ईशाऱ्याचा पूसटसा अर्थ जँकला नक्कीच समजला होता. रॉन त्या डोगंरावर चढण्याविषयीच बोलत असावा हे त्याने पटकन ओळखले.
मागील खूप दिवसांपासून रॉनच्या मनात त्या डोगंराच्या माथ्यापर्यतं पोहोचण्याची तीव्र ईच्छा रूप होती. रॉनला लहानपणापासूनच अशा ऊचं ठीकाणी जाण्याची खूप आवड. त्याने जँकला एकदा दोनदा यावीषयी कप्लना देखील दिली होती. पण जँकच्या व्यस्त शेड्यूल मूळे तरी त्यांनी काही काळापूरता वरती जाण्याचा नाद सोडून दिला होता.
" तीथे काय वाढून ठेवलंय आता, ईकडे रॉकीचा अजूनही आपल्याला काहीच पत्ता लागलेला नाही आणी तूला आता त्या डोगंरावर जायचं सूचतंय " जँक थोडा रागातच बोलला.
" मी आजच्या दिवसच घरी आहे रे आणी मला सांग आपण रॉकीला कसे काय शोधणार आहोत ? मूख्य म्हणजे त्याबद्दल काहीच माहीती नसताना आपण सूरूवात तरी कूठून करायची ? "
" काही ना काही मार्ग नक्कीच निघेल रे ! तू एक प्राव्हेट डिटेक्टीव्ह असूनही असं बोलतोयेस म्हणजे कमाल झाली बूवा "
" थांब एक मार्ग आहे.....आपल्याला रॉकीच्या कॉलेजमध्ये चैकशी करायला हवी, तूला आठवंतय रॉकीची आई काय म्हणाली होती ते ? " रॉनने थोडं विचारपूर्वकच आपलं मत मांडल.
" काय ? "
" ' रॉकी कॉलेजला गेला त्यानंतर तो पून्हा घरी परतलाच नाही '...........................म्हणजे तो कॉलेजध्ये असताना कीवां कॉलेजमधून घरी येतानाच त्याच्यासोबत काहीतरी घडलं असावं कीवां.......कदाचीत तो कॉलेजपर्यतं पोहोचलाच नसावा " रॉन
" हो असं होऊ शकतं " जँक
" आपल्या सोसायटीतील वॉटसन अंकलनी देखील त्याला कॉलेजमधून घरी येताना पाहीलं होतं. असं ईनेस्पँक्टर रसेल सांगत होते " रॉन
" म्हणजे तो कॉलेजमधून घरी येता-येता नाहीसा झाला असं तूला वाटतं " जँक
" exactly तो घरी येतानाच कूठेतरी गेला असेल कीवां कोणीतरी त्याला कीडनँप केलं असेल "
" पण कूठे गेला असेल तो ?
आणी त्याला कोण का कीडनँप करेल ?" जँक
" अरे वेड्या तेच तर आपल्याला शोधायचं आहे " रॉन
" यस आय नो बट...........मला तरी असं वाटतय की आपण समजतोय तसं रॉकी स्वतःहून घर सोडून गेलाच नसावा नक्कीच त्याला कोणीतरी किडनँप केलं असेल "
" हो हवं तर मी कँटीकन वरून आल्यावर आपण ऊद्या संध्याकाळीच रॉकीच्या कॉलेजमध्ये जाऊन त्याची चैकशी करू पण आज............आजचा दिवस तरी मला वाया घालवायचा नाही तूला माझ्यासोबत त्या डोगरांवरती फिरायला यावंच लागेल "
रॉनने संधी साधून मोठ्या हूशारीनेच जँकच्या नकळत विषयाला कलाटणी दिली होती.
" नाही रे आज नको आपण नंतर कधीतरी जाऊ.
कंसं वाटेल ते ?
रॉन अजून सापडला नाही आणी आपण ईकडे डोगंरावर फिरायला जाण्याच्या गप्पांमध्ये रंगलोय "
" चल ना कोणी काहीही बोलणार नाही.आणी.......
आपण त्याला शोधण्यासाठी प्रयत्नतर करतोयच ना. मला कीती दिवसानंतर आजच वेळ भेटलाय आपण ज्यूलीलादेखील सोबत घेऊ "
जँकला रॉनची कमालच वाटत होती. आपल्या कामाशी तडजोड करून तो स्वतःहून फिरण्यासाठी तयार झाला होता.
" येईल का ती ?
आणी जरी ती येण्यास तयार झाली तरी तीची आई तीला आपल्या सोबत पाठवेल का ? " जँक
" ते तू माझ्या वर सोड, मला सकाळपासून घरी बसून खूपच कंटाळा आलाय, तू तरी घरी एकटाच काय करणार आहेस, तूला रॉकी काय आजच्या आज सापडणार आहे काय ? "
" ठीक आहे बाबा...............डोगंरावर फिरायला जाणं म्हणजे तूझा जीव की प्राण नाही का ?
आपण जाऊया तीथे "
शेवटी ना ईलाजास्तव जँकला रॉन बरोबर जाणंच भाग होतं. कारण तोही घरी एकटाच बसून कंटाळला असता. मगथोड्या वेळाने ते दोघंही घराचा दरवाजा लॉक करून ज्युलीच्या बंगल्यापाशी पोहोचले.
ज्युली आपल्या मऊ बिछान्यावर झोपण्याचा मनसोक्त आनंद लूटत होती. जणू काही ती कदाचीत एखाद रोमँनटीक स्वप्नच पाहत असावी.
" हळू पायाचा आवाज करू नकोस "
रॉनने व जँकने संधी साधून गूपचूपच बाहेरच्या ऊघड्या खीडकीतून तीच्या रूममध्ये प्रवेश केला.
मग अलगदच रॉनने तीच्या तोडांवर हात ठेऊन तीला जागं केलं.
" ऊ...... तूम्ही दोघं ईथे माझ्या बेडरूममध्ये काय करताय ? "
" शू...शांत बस ओरडू नकोस नाहीतर गब्बर येईल."
" पागल तू माझ्या आईला गब्बर म्हणालास, मूळात तूम्ही दोघं ईथे आलातच कसे ? "
ज्युलीने दबक्या आवाजातच त्या दोघांना पून्हा प्रश्न केला.
खिडकीच्या दिशेने ईशारा करत जँकने ज्युलीला डोगंरावर फिरायला येण्याचं निमंञण दिलं.
" अरे पण कधी जायचं आहे आपल्याला "
" आज आणी हो आत्ताच "
" नाही नाही आत्ता नाही कसं शक्य आहे हे, तू मस्करी तर करत नाहीस ना " ज्युली गालात हसतच म्हणाली.
" नाही तूला आमच्यााबरोबर यावच लागेल जरी तू नाही म्हटलंस तरी " रॉन
" शी आता हे कधी ठरलं "
" तूला आपल्या मैञीची शप्पथ " रॉन
वेड्या माझ्या आईने तूम्हा दोघांना ईथे पाहीलं जरी ना तरी ती तूमची काय अवस्था करेल सागतां येत नाही बूवा "
तेवढ्यात अचानक दरवाजावर कोणीतरी ठोकू लागलं.
" ज्युली तू कोणाबरोबर बोलतेयेस थांब मी आलेच, आता ते दोघं बदमाश तर नाहीत ना तूझ्यासोबत "
एवढं बोलून ज्युलीच्या आईने खाडकन दरवाजा ऊघडला. आणी ती पाहतच राहीली.
खंरच ते दोघं बदमाशच होते. ज्युलीला घेऊन ते केव्हांच तीच्या रूममधून पसार झाले होते. आणी थेट धावतच त्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोहोचले होते.
" आई ग धावून धावून दमले मी "
ज्युली धापा टाकतानाच खोडकरपणे हसत होती. रॉनने अगदी सफाईदारपणे तीला तीच्या आईच्या नकळत लपवून आणले होते.
" काढ दहा डॉलर, काढ, मी म्हटलं होतं ना तूला की मी ज्युलीला धावतच तीच्या घरातून बाहेर काढीन म्हणून "
रॉनने जँकसमोर हात पसरत पैशांची मागणी केली.
" हो का दहा डॉलर हवेत तूला थांब हा देतो "
अंसं म्हणत जँकने रॉनच्या पाठीवर एक चांगलाच जोराचा रट्टा लगावला.
" आई गं तूझ्यातर, तूला पैसे नव्हते द्यायचे तर तसं सागांयचस ना खाली फूकट........"
रॉनच्या या कृतीवर हशा पिकला नसता तरच नवल.
अखेर थोड्या थट्टा मस्करीचा पाहूणचार घेतल्यावर त्यांनी डोगरांवर चढाई करण्याच्या योजनेवर लक्ष केद्रींत केलं.
" लोकं म्हणतात ते काय खोटं नाही. ईथे पायथ्याशी ईतकी झाडी आहे की वरती चढणं म्हणजे जवळजवळ अशक्यच " जँक
" आता काय करायचं ? " ज्युली
" रॉन आपण कसे काय पोहोचणार आहोत वरती ?
मी ऊगाचच तूझ्याबरोबर आलो असं मला वाटू लागलंय आता " जँक
येवढ्या ऊत्साहाने आपण या ठीकाणी आलोय खरे पण ईथे तर वरती चढण्यासाठी साधी पायवाट देखील सापडत नाही "
ज्यूली थोडं हसूनच बोलली तीचा तर अजूनही थट्टा मस्करीचाच मूड होता.
त्या तीघांनी सर्व ठीकाणी नजर फिरवली पण सगळीकडेच वेळीनी व काटेरी झूडपानी जाळं निर्माण केलं होतं.
जँक तर कंटाळून पून्हा घरी जाण्यासाठी निघाला.
" चल रॉन आपल्याला आता पून्हा घरचीच वाट धरावी लागेल. या दाट झाडीतून वरती जाणं म्हणजे जवळजवळ कठीणच...... "
" या जगात कोणतीच गोष्ट कठीण नसते माझ्या मीञा, समोर बघ "
रॉनने जँकचं वाक्य अर्धवट तोडतच त्याला थांबवलं.
जँकने समोर पाहीले रॉनच्या अतोट प्रयन्ताअंती शेवटी त्यांना वरती चढण्यासाठी एक चिचोंळी पायवाट सापडली होती.
" ग्रेट यार यू आर जिनीअस, शेवटी काहीही झालं तरी तू आज वरती चढायचंच असं तू ठरवून आला आहेस का ? " जँक
मग फार वेळ न घालवता हिरवीझाडी व वाढलेलं गवत तूडवत ती तीघंही मडंळी गप्पा मारत वरती चढू लागली.
" यार केवढीशी ही पायवाट ईथे तर जवळजवळ चार पाच वर्ष तरी कोणी कधी फिरकलं नसावं " ज्युली
" अगदी बरोबर म्हणूनच तर मी या डोगंरावर चढायच ठरवलंय. गाईज आय प्रॉमीस यू आपली आजची संध्याकाळ खूप मजेत जाणार आहे " रॉन
" म्हणजे कशी काय ? " ज्युलीने रॉनला मुद्दामूनच खोडकरपणे विचारले.
" म्हणजे ज्या ठीकाणी मनूष्यवस्ती नसते त्या ठीकाणी आपल्याला निसर्गाचं सूदंर मनमोहक रूप पाहायला मिळंत मी लहान असताना माझे अजोबा मला अशाच अनोळखी निसर्गाच्या सांनीध्यात फिरायला नेत असत. तेव्हांपासून मला निसर्गाची ओढ लागली ती कायमचीच "
रॉनचं बोलणं ज्यूली अगदी लक्षपूर्वक ऐकत होती तीच्या मनात देखील निसर्गाचं सूंदर रूप हळूहळू दाटून आलं होतं.
" मला सूद्धा अशा ठीकाणी फिरायला खूप आवडतं. एकदा तर आम्ही अमेरीकेत असताना हँलीकँप्टर मधून अलास्काचा विस्तीर्ण जंगल पाहीला होता. तीथे देखील अगदी दूरपर्यतं पसरलेली दाट झाडी नजरेत भरत होती..... खूप सूंदरं दृश्य होतं ते "
खरंतर ज्युली चक्क फेकत होती. हे त्या दोघांनाही माहीत होतं. पण ते ऊगाचच तीचं बोलणं एेकण्यामध्ये त्यांना ईटंरेस्ट आहे अंस भासवत होते.
हळूहळू त्यांच्या गप्पा मध्ये रंग चढू लागला. मग जँकने ही त्याला निसर्गाविषयी वाटणारं स्वतःचं मत व्यक्त केलं.
वाट अरूंद असल्यामुळे एकामागोमाग गप्पा मारत ती मडंळी सावकाशपणे पूढे जात होती. पानाना, गवताला स्पर्श होताच शहारून येई झाडाची पाने ओली होती कदाचीत गारा पडल्या असाव्यात. अशा थंडगार वातावरणात ते डोंगर चढत होते. त्यातच वेड्यावाकड्या काटेरी वेली त्यांची वाट अडवत होत्या.
मग थोडया वेळाने कठोर चढाई अंती त्यांना डोगंराचा विस्तीर्ण माथा दिसू लागला.
" खूप मजा येतेय ना जँक तूला काय वाटंत वरती काय असेल ? " ज्युली
" आय डोन्ट नो वरती काय असेल बट वरतून खालचं दृश्य कीती सूंदर दिसत असेल ना.
आय कान्ट ईम्याझीन " जँक
" रॉनला सूद्धा जँक ऊत्साही झालेला हवा होता. कारण थोड्या नाराजीणेच तो त्याच्यासोबत डोगंरावरती येण्यास तयार झाला होता.
" गाईज आता वरती जाण्यासाठी फार अंतर ऊरलं नाही "
जवळजवळ दीड तासांच्या खडतर पण रोचक चढाईनंतर अखेर धापा टाकत ती मंडळी डोंगराच्या माथ्याशी पोहोचली.
कोवळ्या गवताने व्यापलेल्या माथ्यावरच्या त्या अल्लड हिरवळीकडे पाहून पोरांचा उत्साह शीगेला पोहोचला नसता तरच नवल. त्यातच वेडी रंगीबेरंगी फुलपाखरे फुलातील गोड मधाशी वेड्यासारखी खेळत त्या मधूबनाची शोभा आणखीनच वाढवत होती.
" वाव वॉट अ बिव्हटीफूल व्हीव यार "
समोरचा सूदंर परीसर पाहून ज्युलीच्या तोडांतून अचानकच आनंदोद्गार निघाले.
गप्पा मारताना ते तीघंही त्या हिरव्या गवतावर बसून कधी लोळू लागले हे त्याचं त्यानाही कळलं नाही.
डोक्यावरचे स्तब्ध आभाळ न्याहाळत ती पोरं बसली होती.
" आता समजलं जँक तूला ?
ईथे येण्यासाठी मी ईतका आग्रह का करत होतो ते ?.........
मला हेच निसंर्गाचं मनमोहक दृश्य पाहायचं होतं "
रॉन अगदी भरभरून बोलत होता.
" रीअली दिस ईज एक्स्ट्रीमली बिव्हटीफूल "
मग जँकनेही त्याच्या बोलण्याला दूजोरा दिला.
कधीमधी खट्याळ हसताना थंडगार वारा अंगावर शहारे आणून रोमाचं फूलवत होता. अगदी मनाला मोहून टाकणारे वातावरण तीथे निर्माण होत होते.
" आपण दिवसभर ईथेच बागडत राहावं असं मला आता वाटू लागलंय " ज्युली
जँक ने सांगीतल्याप्रमाने त्या डोंगर माथ्यावरून खालील सर्व भाग अगदीच छोट्याशा क्षितीजाप्रमाने भासत होता. दूरदूरवर नजर पोहोचत होती. त्या गाड्या, बिल्डींगी, रस्ते, मूंग्याच्या जमावाप्रमाने भासणारी ती माणसांची रहदारी खूप काही पाहण्यासारखं होतं त्यात.
पण मग पाहता-पाहता अचानक सर्वच दृश्य पालटून गेलं. हळूहळू संपूर्ण वातावरणात एक विलक्षण बदल घडून येत होता. नकळत वाऱ्याचा वेग बेसूमार वाढला.
मातीचे धूळ कण, दगड, धोंडे, झाडांची सूकलेली पानं-पाचोला यांची सांगड घालत वाऱ्याच्या वाढलेल्या वेगाने क्षणार्धात वादळाचं रूप धारण केलं.
त्यातच भर म्हणून आभाळाला छेदत एका छोट्याशा विजेच्या चमकण्याने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. त्या काळ्या मेघांनी दाट अंधार करायला सूरूवात केली होती. त्याचं ते अक्राळ-विक्राळ रूप पाहून व गडगडाट ऐकून त्यांना घाबरावं की त्यांचं मनोभावे कैतूक कराव हेच कळंत नव्हतं..
तेवढ्यात वरती आभाळाकडे पाहता-पाहता अचानकच दवाचा एक छोटासा लाजरा थेबं जँकच्या गालाला स्पशून गेला. त्याच्या रेशमी स्पर्शाने जँकच्या रोम-रोमात शहारून आलं. म्हणे खूपच शीत होता तो. अन आसमंतातून मोत्याच्या धारा बरसू लागल्या. अशा चीबं ओल्या क्षणी मन मोहून गेले. क्षणार्धात ह्दयाशी भिडणारे गाणे गावेसे वाटले. बेफीक्र होऊन आनंदाने गर्जावेसे वाटले. जणू काही जगण्याचा आनंद तो पाऊस त्या निरागस पोरानां समजावत होता.
मग पावसामूळे भिजण्यापासून वाचण्यासाठी ती तीघंही मंडळी धावतच तेथील एका वडाच्या विशाल झाडाखाली येऊन थांबली. त्या वडाच्या लाबंलचक पारंब्यामूळे पावसाच्या माऱ्याचा एकही थेबं त्यंनाा स्पर्श करू शकत नव्हता. पंरतू आकस्मीतरीत्या बरसलेल्या पावसाने माञ पाखरांची झोप उडवली होती. अगदी बराच वेळ झाडाखाली थांबून ती पोरं पाऊस कमी होण्याची प्रतीक्षा करत ऊभी होती.
" यार आपल्याला आता खाली ऊतरेपर्यत खूपच ऊशीर होणार " जँक
" हो ना रे " रॉन
" आपलं ठीक आहे पण ज्युली तूझं काय ? " जँक
" तू नको काळजी करूस आपण घरी पोहोचू वेळेवर " ज्युलीने कदाचीत पाऊस कमी होण्याची पूसटशी आशा मनामध्ये बालगली असावी म्हणूनच ती असं म्हणत होती.
" बरं पाऊस थोडा कमी झाल्यावर आपण निघू ईथून " रॉन
" मला तरी वाटत नाही की हा मूसळधार पाऊस लवकरात लवकर कमी होईल " जँक
" राञ होण्याच्या अगोदरच आपल्याला खाली ऊतरायला हवं " रॉन
पोरांना पावसाचा बेसूमार आवाज ऐकूनच पाऊस कमी होईल असं वाटत नव्हतं पण अचानकच पाऊस आला तसा थोड्या वेळाने अचानक कमी देखील झाला होता. त्यावेळी तीघांनाही तेच हवं होतं. पण पाऊस ओसरेपर्यत अखेर उशीर झाला होता. अंधार खूपच वाढला होता. राञ झाली होती.
" आता काय करायचं आपण "
जसजसा अंधार वाढत होता तसतशी ज्यूलीच्या मनाची हूरहूर देखील हळूहळू वाढत होती. फक्त ती कोणाला जाणवू देत नव्हती एवढंच.
" चला खाली " जँक
" अंधांरातून ? " रॉन
" नाही,
तूम्ही दोघांनीही सोबत मोबाईल आणलेत ना " जँक
" हो " ज्युली
" मग कसली वाट बघताय काढा की आता " ज्युली
सूदैवाने तिघांकडेही मोबाईल होते. त्या मोबाईलच्या फ्लँश लाईटच्या अपुऱ्या प्रकाशात चाचपडत ती पोरं आता खाली उतरू लागली.
" ज्युली चल आता पटकन आपल्याला लवकरात लवकर खाली ऊतरायला हंव " रॉन
" आपण तीकडून आलो होतो ना रॉन " जँक
" मला नाही आठवत " रॉन
" आणी मलाही " ज्यूली
" काय रे तूम्ही पण ?
मला वाटलं तूम्ही आपण आलो ती पायवाट तूमच्या लक्षात असेल " जँक
" अरे मला खंरच नाही आठवत आपण कोठून आलो होतो ते " रॉन
" अरे मग आता आपण खाली कसे काय ऊतरणार आहोत. ईथे सगळी झांड तर सारखीच दिसतात. आणी या अंधारात वाट शोधणं म्हणजे......." जँक अखेर वैतागलाच
" डोन्ट व्हरी जँक काहीना ना काही मार्ग तर नक्की निघेलच आपण ईथेच थांबून राहण्यापेक्षा चालत राहीलेलं बरं " रॉन
"यू आर राईट चलो फीर "
आेल्या मातीच्या सूगंधाने अवघं वातावरणच मंञमूग्ध करून सोडलं होतं. चालताना नकळत रातकीड्यांचा आवाजही कधी ऐकू येऊ लागला हे देखील त्यांना कळलं नाही. मग अचानक रॉन चालता- चालता थांबला.
" का रे काय झालं " जँक
" मागे बघ " रॉन
जँकने रॉनच्या म्हणण्यानूसार मागे वळून पाहीले.
निळी जिन्स व लाल जँकेट घातलेला एक उचंपूरा पण धडधाकट ईसम त्यांच्या मागून सावकाशपणे येत होता. त्याच्या हातात एक छोटीशी बँटरी देखील होती.
" आता हा कोण ? " ज्यूलीने त्याला बघताच विचारले.
" आय कान्ट रिकग्नाईज हिम " रॉन
त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यामूळे जँकने थोडं दूरूनच त्याच्या चेहऱ्यावर मोबाईलच्या फ्लँश लाईटचा प्रकाश केला. अंधूक प्रकाशातही त्याची वाढलेली दाढी नजरेत भरत होती. तीघांपैकी कोणीही त्याला ओळखत तर नव्हतंच शीवाय याआधी कधी त्याला पाहील्याचं देखील कोणाला आठवेना.
त्याचा रूबाब आणी त्याची दमदार शरीरयष्टी पाहून कोणालाही सहज त्याची personality भावली नसती तरच नवल, अगदी तो चाळीशीतला असला तरीही.
" हाय गाईज आय एँम वेब "
" हाय "
" पण बाय द वे तूम्ही तीघं या वेळी ईथे काय करताय ?"
" आम्ही या डोगंरावर सहजच फिरण्यासाठी आलो होतो. पण पावसामूळे आम्हांला वरतीच थाबांव लागलं. तूम्ही भेटलात म्हणून बंर झालं नाहीतर आम्हाला खाली ऊतरायला खूपच ऊशीर झाला असता."
जँकच्या बोलण्यातही तथ्य होतं कारण नाही म्हटलं तरी वेब भेटल्यामूळे त्या तीघांनाही अंधारात गप्पा मारण्यासाठी आणखीन एक सोबती मिळाला होता.
" वेब तू ईथे कसा काय ? म्हणजे एवढ्या राञी " रॉननेही सहजच विचारलं.
" मी कधीकधी कंटाळा आला की येतो या ठीकाणी.....असंच फिरण्यासाठी पण आज तर या पावसामूळे मलादेखील खूपच ऊशीर झालाय "
" वेब आम्ही खाली ऊतरण्याची वाट विसरलोय. तू ईथे कधीकधी येतोस म्हणालास ना मग तू आम्हाला मदत करशील ? "
" व्हाय नॉट तूम्ही काळजी करू नका मला या डोगरांवरून खाली ऊतरण्याच्या सर्वच छोट्याछोट्या पायवाटा माहीत आहेत. मी पण आता घरीच चाललोय सो तूम्ही माझ्या मागून या " वेब
" रॉन तीकडून नको आपण या वाटेने लवकर खाली पोहोचू " वेबने रॉनला अडवत दूसऱ्या बाजूने येण्यास सागींतले.
एवढ्या घनदाट जंगलात आपल्यासोबत कोणीतरी आहे याची जाणिवच ज्युलीच्या मनाला धीर देत होती.
कधीकधी वाऱ्याची मंद झूळूक अंगाला स्पर्शून जाई तो गारवा मनाला मोहून टाकी पण त्यानंतर पुन्हां सर्व पूर्वीसारखे शांत,स्तब्ध होत असे अशा भयान जंगलातून राञीचा प्रवास करण्याची ही त्या तिघांचीही पहिलीच वेळ.
आता ते चैघंही मोबाईलच्या फ्लँश लाईटच्या व सोबतीला एका बँटरीच्या अंधूक प्रकाशात गप्पा मारत खाली उतरत होते.
अंधारात नाही म्हटलं तरी काहीच दिसत नव्हतं फक्त एक निरव शांतता आपले अस्तीत्व प्रस्थापीत करू पाहत होती.
अखेर चालून कंटाळल्यामूळे जँकने मोबाईल वर गाणं लावलं.
" व्हेन फॉल ऑन द नाईट व्ही टर्न ऑफ द लाईट रू रू रू रू...... रू रू रू रू.....
" स्टॉप ईट जँक
बदल ते या वेळी नेमकं हेच विचीञ गाणं तूला लावायचं होतं " ज्यूलीला राञीच्या अंधाराची खूप भीती वाटत असे त्यातच जँकने लावलेल्या गाण्यामूळे तीच्या अंगावर सरसटून काटा आला होता.
" ओके देन नाऊ लिसन वन ऑफ द फेमस हींदी रोम्यानटीक सॉन्ग
" ए राते, ए मैसम, नदीका कीनारा. ए चंचल हवा.
कहा चलदीए हम "
" जँक गाणं बंद कर आता नको लावूस " वेबने अचानकच जँकला गाणं बंद करण्याचा सल्ला दिला.
"ऐवढ्या राञी जंगलात आवाज करणं योग्य नाही "
" का? "
" नको लावूस रे गाणं मूळात तूम्ही जास्त आवाजच करू नका " हे बोलताना वेब घाबरला होता. जरी तो दाखवत नसला तरी त्याच्या कापऱ्या आवाजावरून ते स्पष्ट जाणवत होतं "
" पण का असं काय आहे या जंगलात वेब ?
की तू एवढा घाबरून बोलतोयेस ते " रॉनला कोणतीही गोष्टी जाणून घेण्याची खूप सवय अखेर तो एक डिटेक्टीव्ह होता ना.
" जाऊदे आता विषय निघाला तर सांगतोच तूम्हाला. तो थोडा वेळ शांत राहीला मग त्याने लगबगीने आजूबाजूला पाहीलं व शून्यात नजर टाकून तो बोलू लागला.
असं म्हणतात की या दाट जंगलात राञीचे अतृप्त आम्ते वास करतात.
" आर यू मँड " रॉन
" हो, तूला खोटं वाटेल पण हेच सत्य आहे.
फार वर्षापूर्वी या डोगंराच्या माथ्यावर एक कपटी जादूगर राहत होता तेव्हा या सर्व परीसरावर एका फिलीप नावाच्या राज्याची राजवट होती.
जादूगराचे तेथील राणीवर प्रेम बसले होते. त्याला माहीत होते राणीबरोबर आपले मिलन म्हणजे हि अशक्यातील बाब आहे. तरी देखील तो तीच्या वर प्रेम करायचा. त्याने ठरवले, की तो आपल्या काळ्या जादूचा वापर करून तीला आपल्या प्रेमात अडकवणार, त्यावेळी जादूगराच्या या काळ्या योजणेबद्दल राणीला कळाले. आणी तीने त्याला मारण्याची ऊलट योजना रचली.
अखेर राणीने जादूगराला मारले. पण मरण्यापूर्वी त्याने या डोगंरावर काळी जादू केली. आणी त्यात राणीला देखील याच डोगंरावर बंधीस्त करून ठेवले.........................तेही कायमचे "
वेबने एका श्वासात एकलेली सर्व घटना सांगून टाकली
" ओ रीअली मग.... आय मीन मग पूढे त्या राणीचे काय झालं "
" राणीचं काय झालं ते कोणालाच माहीत नाही.
पण काहीजण म्हणतात की कदाचीत त्या राणीचा आम्ता अजूनही याच डोगंरावर बंधीस्त आहे.
शिवाय खूप जणानी पाहीलंय ईथे जंगली प्राणी राञीच्या शीकारीसाठी भटकत असतात. ईथे जर एकदा का त्यांना कोणाची हलकीशी चाहूल लागली की त्याचा जीव घेतल्याशीवाय ते काही त्याला सोडत नाहीत."
जरी वेब आपल्याला घाबरवण्यासाठी अस म्हणत असला तरी त्याच्या बोलण्यात काही खोट नव्हंती हे लक्षात येताच जँकने गाणं बंद करून मोबाईलमध्ये वेळ पाहीली. त्यावेळी राञीचे सव्वा सात वाजले होते. म्हणजे त्यांना डोंगरावरून खाली उतरताना खूपच उशीर होत होता.
" पण वेब माझा या भूता प्रेतावरं काही विश्वास नाही " जँक
" नाहीतर काय भूत वैगरे कधी अस्तीत्वातच नसतात फक्त हे सर्व आपल्या मनाचे खेळ " रॉन
" हो मी देखील तूमच्या दोघांच्या मताशी सहमत आहे. पण तरीही प्रत्येक गोष्टीत नाही म्हटलं तरी आपल्याला खबरदारी ही घ्यावीच लागते.
ईकडे ज्यूली शांतच होती कदाचीत वेबने सांगीतलेल्या घटनेच्या मर्माचा तीच्या काळजावर प्रहार झाला होता.
" चला लवकर नाहीतर आपल्याला घरी जाईपर्यतं खूपच ऊशीर होईल "
ज्यूलीला आता माञ खाली लवकर पोहोचण्याची घाई झाली होती.
चैघांनीही आपआपली चालण्याची गती वाढवली. भराभर पाऊलं टाकत ती मंडळी एकामागोमाग चालत होती आणी चालतानाच अचानक जँकची नजर तेथील एका मोठ्या झाडाकडे गेली.
त्याला आठवलं.
ते झाड त्याने याआधीही पाहीलं होतं.

क्रमशः
पुढील भाग लवकरच..........

भाग ५ साठी
http//www.maayboli.com/node/61681

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

" शू...शांत बस ओरडू नकोस नाहीतर गब्बर येईल."

" पागल तू माझ्या आईला गब्बर म्हणालास,

बहुतेक जॅक ने सर्वानाच शोले दाखवला असणार