Submitted by vijaya kelkar on 8 February, 2017 - 05:58
भूपाळी
उठोनिया प्रात:काळी
वदनी वदे चंद्रमौळी
आळविते भालचंद्रा
हाका मारिते कित्येकदा
उठा उठा पतिदेवा
'बेड टी' मज द्यावा
पति व्रत आचरणे
बहु लाभ असे जाणे
तासभर समाचार वाचणे
'व्हाटस अप' वर गप्पा मारणे
कामाची नाही घाई
सोडायची नाही दुलई
जेव्हां गरम ओघ येईल गंगेचा
तेव्हां योग येईल स्नानाचा
अवकळा थोडी स्वयंपाक घरास
पळी विळी ही दिसती उदास
कळवळा मायक्रोव्हेवला
इडली, उपमा इ. मिळते खायला
जेवायला काय आवडते?
जे जे म्हणून मिळते आयते
ह्यांना कोणी तरी विचारात होते -
माझ्या बद्दल --सध्या तीई काय करते?
गळ्यात हात घालून मिरवीते
हसायला लागला कि चक्क ..
अरे, ह्या वयात? हे ही थक्क !!
हो रे हो !हात ना मोडलाय
मग काय गळ्यात कि पडलाय
******
सध्या ती काय करते?
सध्या ती आरामात कविता करते ...........
विजया केळकर _______
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अहो ताई हि कविता तुम्ही
अहो ताई हि कविता तुम्ही लिहिली आहे ना आधी???
विनोदी लेखन मधे टाकली ना आज्??छान...
हो कावेरि
हो कावेरि
कवितेवर तसा सल्ला मिळालाम्हणून केला प्रयोग
धन्यवाद