वाटचाल

Submitted by vijaya kelkar on 7 February, 2017 - 04:27

** वाटचाल **

दिवसभराची वाट-चाल काळवंडली निशा
काळोखातून प्रवास करत उजळली उषा

धडोतीच्या वस्त्राच्या झाल्या चिंध्या कशा?
उब देती चिंध्यांच्या गोधड्या सुबकशा

ज्योत तेवेल .. प्रकाशाची आशा
काजळीच्या काळजीत तेवते निराशा

जीव जन्मतो लादून मृत्युच्या आयुष्या
जाणतो अजाणता आपल्या भविष्या

जळी मीन असा कोरडा कसा?
प्रपंच जाळ्यात मनावर कोराला हाच ठसा

पिऊन पाण्यास तरंगतो जसा
पावेल देव, पावेल असा .............
विजया केळकर __________

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद,
सवय झाली तुमच्या प्रतिसादाची
पुन: आभार