झेप

Submitted by आनन्दिनी on 3 February, 2017 - 07:10

पक्ष्यांनी तर उंच उडावे 
क्षिती नसावी पडण्याची
अन भीती नसावी आभाळाची
डोळ्यांमधल्या स्वप्नांसाठी
पक्ष्यांनी तर उंच उडावे
 
पिंजरे सगळे तॊडून टाकून
दाणे पेरू मागे सोडून
नजर लावूनी निळ्या नभांवरी 
पक्ष्यांनी तर उंच उडावे

कुणी क्वचित मेघांत हरवतील 
इंद्रधनूच्या पारही जातील,
ना जावे तर कसे कळावे
पक्ष्यांनी तर उंच उडावे

शोध नव्हे हा आभाळाचा
शोध पंखांतील बळाचा
गंगनभरारी घेताना पक्ष्याने स्वतःला तोलावे
पक्ष्यांनी तर उंच उडावे

आनंदिनी
https://drmadhurithakur.blogspot.co.uk/2017/02/blog-post_3.html?m=1

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शोध नव्हे हा आभाळाचा
शोध पंखांतील बळाचा
गंगनभरारी घेताना पक्ष्याने स्वतःला तोलावे
पक्ष्यांनी तर उंच उडावे>>>अर्थपुर्ण....छान...

कविता छान,
आपण ही स्वक्षेत्रात उंच भरारी घ्यावी ,ही सदिच्छा