'तो' सध्या काय करतोय?

Submitted by विद्या भुतकर on 31 January, 2017 - 12:53

बऱ्याच लोकांचे मेसेज वाचले होते. 'तो सध्या काय करतोय' यावर पोस्ट पाहिजे म्हणून. तर इथे डिस्क्लेमर टाकते आधीच, ही पोस्ट त्याबद्दल नाहीये. पण अनेक कथा, अनेक मुलींच्या फेसबुकीय पोस्ट आणि कविता यातून 'तो' दिसत राहतो. म्हणजे त्यांच्या मनातला 'तो'. कधी वाटतं की खरंच 'तो' असतो का? म्हणजे माझ्याबाबतीत, पाहिजे त्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी मरमर करून सर्व व्यवस्थित झाल्यानंतरही 'तो' अशा एखाद्या काल्पनिक व्यक्तीवर लिहायची का इच्छा व्हावी? माहित नाही.
पण 'तो' वर लिहिताना भारी वाटतं. अगदी आपण फार दुःखात वगैरे असल्यासारखं. Happy होतं काय की तुम्ही अशा कविता लिहिल्या की लोकांना त्यांचेही कुणीतरी असेच प्रत्यक्ष किंवा काल्पनिक 'तो' किंवा 'ती' लगेच आठवतातच. त्यामुळे त्यांना अशा कविता जाम आपल्या जवळच्या वाटतात. दुसरे असेही लोक असतात ज्यांना अगदी खात्री असते की ही आपल्याबद्दलच लिहीत आहे. आणि असेही की ज्यांना कळत नाही की सर्व ठीक चालू असताना हिला काय होतंय हे असले पोस्ट लिहायला? नक्कीच तिच्या मनात काहीतरी असणार.
तर एकूण काय? 'तो सध्या काय करतोय' हा विचार मुलींच्या मनात नक्कीच असणार. आणि अनेकजणी त्यावर लिहीतही असतात. पण ज्यांना खरंच त्यावर लिहिता किंवा बोलता येत नाही, त्यांच्याबद्दल वाईट नक्कीच वाटते. त्या सगळ्या जणींना 'ऑल द बेस्ट'. आणि माझ्या सारख्या या असल्या कवितांचं, चारोळ्यांचं आणि काल्पनिक 'त्या' वर लिहिणाऱ्यांना...... चालू दे. Happy
आणि 'तो' सध्या काय करतोय? बिचारा आमच्या कवितांमध्ये अडकला आहे. Happy

आज अशीच एक चारोळी लिहीत होते आणि लक्षात आलं माझ्याकडेही असा गुच्छच आहे त्या कवितांचा, पोस्टचा. त्या सर्व इमेज स्वरूपात आहेत. तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा.

विद्या.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Slide1_4.jpgSlide1_5.jpgSlide1_6.jpgSlide1_7.jpgSlide2.jpgSlide1_8.jpgSlide1_9.jpg16115005_1228731537206379_7464536954963958651_n(1)_0.jpg13775465_1058843667528501_3753979134389586488_n.jpg
ही आजची: FullSizeRender(22).jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान....
सर्व कविता आवडल्या.....

मस्तच!

छान आहेत कविता/चारोळ्या/स्फुटे...

>>> म्हणजे माझ्याबाबतीत, पाहिजे त्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी मरमर करून सर्व व्यवस्थित झाल्यानंतरही 'तो' अशा एखाद्या काल्पनिक व्यक्तीवर लिहायची का इच्छा व्हावी? माहित नाही. <<<<<
याचमुळे पहिली कविता सोडलि (भाळणे) , तर कुठेही "त्या"चे गुणवर्णन आलेले नाहीये, किंवा तो न मिळाल्यामुळे काय अन किती गमावले याचे दु:खही नाहीये.
मात्र याचा अर्थ असाहि नाही की प्रत्येक "ती" सुरवातीच्या अल्लड वयात कुणावरच भाळली नसेल, वा "त्या"ची आठवण येतच नसेल. परंतु, स्त्रीचे आयुष्यच असे असते की ते जगताना, त्या जगण्यात स्वतःस झोकुन दिल्याखेरीज ते जगताच येत नाही, अन अशा झोकून देऊन आयुष्य जगण्यात मग "जुन्या" आठवणींना/स्मृतिंना कस्पटाइतकीही किंमत राहू शकत नाही. अन त्यामुळेच, कोणतीही "ती" सहजासहजी "त्या" कोणा बद्दल फारशी विचारणा करताना दिसणार नाही, अन विचारणा केलीच्/माहिती काढलीच तर ती उघडपणे करणार नाही, अगदी मैत्रिणींमध्येही वाच्यता होऊ देणार नाही .
पुरुषांचे मात्र तसे नसते. त्यांना बरेचदा "तिच्या" बद्दल आठवणी काढणे, त्याबद्दल चारचौघात बोलणे यात "पुरुषार्थ" देखिल वाटू शकतो, नव्हे, वाटतोच. शिवाय जवळपास प्रत्येक पुरुष "भ्रमरासारखाच" मानला गेला आहे. केवळ "परिस्थितीच" त्यास "काबुत" ठेवू शकते.

वरील मते माझी आहेत, पटलीच पाहिजेत अशी सक्ति नाही.

मस्त आहेत सर्व चारोळ्या पण ती 'समुद्रातील रेत' आणि 'अजुन एक दिवस सरला' ह्या दोन्ही मी आधी वाचल्यासारख्या वाटत आहेत.

छान प्रतिसादासाठी सर्वान्चे आभार. Happy अक्षर माझेच आहे आणि अजून खराब झाले आहे. गेले १५ वर्षे सवय राहिली नाहीये त्यामुळे. पुन्हा हात तसा वळणे अवघड जात आहे. असो.

खरेतर, ' म्हणजे माझ्याबाबतीत, पाहिजे त्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी मरमर करून सर्व व्यवस्थित झाल्यानंतरही 'तो' अशा एखाद्या काल्पनिक व्यक्तीवर लिहायची का इच्छा व्हावी? माहित नाही. '>> नन्तर आपण हे का लिहिले असे वाटले. ते लिहून मी 'त्यातली' नाही हे लिहिण्याची काय गरज होती असे वाटले. जे लोकाना वाटायचे ते वाटू द्यावे हा विचार सहजपणे का येत नाहीत मनात? प्रत्येक गोष्टीत स्वत:चे मत समजावून सान्गायह्चे बन्द केले पाहिजे. असो.
पण मायबोलीवर कविता पोस्ट करणे बन्द्च केले आहे. पण तुम्चे प्रतिसाद पाहून आनन्द झाला.

धन्यवाद. Happy

बी एस, च्र्प्स, ऋन्मेऽऽष (हे लिहिण्यासाठी कुठले लेटर्स टाइप करावे लाग्तील सान्गा, सध्या फक्त कॉपी केलेय) धन्यवाद. Happy

विद्या.

मस्त्च
असाच तो कधी
कुठे? मन वेडे

bee es
chrps
RunmeSh

.
तसेच च्र्प्सची पूर्ण भाषाच शिकायची असल्यास
https://www.google.co.in/inputtools/try/
या लिंकवर जाऊन तिथे भाषा मराठी निवडावी आणि मग बाजुला एक "म" आणि डाऊन अ‍ॅरो येईल. त्या अ‍ॅरोवर क्लिक करुन "देवनागरी (फोनेटिक)" निवडावे. तिथे मग आपण मायबोलीवर टाइप करतो तसेच व तेवढेच स्पेलिंग टाइप करावे आउटपुट काय येतेय त्याकडे दुर्लक्ष करावे. आणि मग त्याचे तिथे देवनागरीत जे काय अगाध परिवर्तन होते ते तसेच्या तसे इथे पेस्ट करावे.
कही दिफ़्फ़िचुल्त वत्ल्यस च्रप्सलच विचरवे.

वादळ आणि विरंगुळा मस्त वाटल्या. खास करून विरंगुळा... कारण 'तो' विरंगुळाच असतो.

तुमचे हस्ताक्षर पाहून्न वाटले, अरे आजकाल हाताने मी लिहितच नाही आणि मराठी तर लिहिलेच नाही कित्येक वर्षात.. लिहिलं पाहिजे. अगदी गर्व होता एके काळी मला माझ्या हस्ताक्षरावर , कित्येक बक्षीसं मिळालेले ते आठवून हसले एकटीच. असो.

Pages