शाहरूख की एक्टींग और किंग खान का स्टारडम - फिल्म "रईस"

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 January, 2017 - 05:13

बनिये का दिमाग और मियाभाई की डेअरींग!

शाहरूख की एक्टींग और किंग खान का स्टारडम - फिल्म "रईस"

रईस उलटे वाचले की सईर असे वाचले जाते. सई कोण हे सांगायची गरज नाही आणि र रुन्मेषचा हे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण बस्स तेव्हाच हा चित्रपट बघायचे नक्की झाले होते Happy

जोक्स द अपार्ट - शाहरूख खान आहे तर पिक्चर बघितलाच पाहिजे असा काही माझा रूल नाही. गेल्या दोनचार वर्षात त्याचे काही चित्रपट मी केबल टीव्हीवर देखील पुर्ण बघू शकलो नाहीये. उदाहरणार्थ, जब तक है जान किंवा हॅपी न्यू ईयर. त्या मागच्या फॅनबद्दल संमिश्र मते ऐकून बघायला गेलो होतो पण अपेक्षा ठेवल्याने निराशच झालेलो. पण आता हवा बदलू लागलीय. मध्यंतरी डिअर जिंदगी बघून आलो. आलियाचाच चित्रपट आहे असे डोक्यात ठेवून बघायला गेलेलो. पण काय सुखद धक्का दिला शाहरूखने. कदाचित त्याच्याकडून अपेक्षा नसल्याने असावे. कदाचित.. पण आता मात्र रईसकडून बरयाच अपेक्षा तयार झाल्या होत्या. त्यामुळे धाकधूकही फार होती. पण सांगायला आनंद होतोय की जी अपेक्षा ठेवून गेलो होतो, एक शाहरूख स्पेशल मूवी बघायची. ती अफलातून पुर्ण झाली.

तर, रईस कोणाला म्हणतात - ज्याच्या मोबाईलमध्ये एचडी क्वालिटीची चित्रपटाची पायरेटेड कॉपी पडून आहे. तरीही दोन दिवस ती जराही उघडून न बघता जो थिएटरला चित्रपट बघायला जातो. पण विश्वास ठेवा, चित्रपट आहेच त्या काबिल की पैसे वसूल होतात.

शाहरूखच्या चाहत्यांना तर रईस चित्रपट पर्वणीच आहे. फॅन बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही, त्यात कित्येक दोष मी स्वत: काढले, पण तरीही त्यात फॅन झालेल्या शाहरूखचे काही दृश्यात कौतुक वाटले होते. डिअर जिंदगी चित्रपटातही त्याचा वयाला साजेशा संयमित अभिनय आवडला होता. आता वयाला अनुसरून त्याने अश्याच भुमिका करावे असे मलाही वाटलेले. पण पुढच्याच चित्रपटात त्याने मला सपशेल फोल ठरवावे.. अरे तो वाटतच नाही की पन्नास वर्षांचा कलाकार आहे. काय ती स्टाईल, काय ती एक्शन, काय ते डोळे, काय ती दाढी, काय तो बॅटरी वाला मियांभाई कम बनिया लूक. काय ते अफलातून बेअरींग पकडलेय. मजा आ गया.. शाहरूखचे जे टिकाकार त्याचे वय झालेय आता म्हणून चकाट्या पिटतात त्यांनी तर हमखास बघावा. त्याची साठी उलटेपर्यंत तरी पुन्हा कधी हे विधान करायला धजावणार नाहीत.

चित्रपट फक्त आणि फक्त शाहरूखचा आहे आणि त्यासाठीच बघितला जातो. मात्र ज्या फ्रेममध्ये शाहरूख नाही अश्या फ्रेममध्ये नवाझुद्दीन आहे. आणि त्यानेही कमाल उडवलीय. त्यालाही मस्त डायलॉग दिलेत आणि त्याने अर्थातच ते म्हटलेही कमाल आहेत. त्याच्यासारख्याचे या चित्रपटात असणे फार गरजेचे होते, नाहीतर फॅन सारखे ईकडून तिकडून शाहरूख सारखा फटका बसला असता. कारण अकराच्या अकरा सचिन तेंडुलकर बघण्यातही मजा नाही. एखादा धोनीही जोडीला हवाच. समोरून नवाझुद्दीन सारखा जोडीदार असल्याने यात सबकुछ शाहरूखचा धोका टळला आहे. सचिन वरून आठवले, शाहरूखचा रईस परफॉर्मन्स म्हणजे वयाच्या सदतिसाव्या वर्षी सचिनने खेळलेल्या एकदिवसीय सामन्यातील द्विशतकी खेळीसारखा आहे. रिस्पेक्ट !
आणि म्हणूनच अधूनमधून अग्नीपथच्या अमिताभची आठवण झाल्यावाचूनही राहत नाही. पण त्यातही अमिताभ वयस्कर वाटलेला, जे ईथे शाहरूख जराही वाटत नाही.

त्या महिरा खानबाबत बरीच टिका ऐकली पण ती कुठेही असह्य वाटत नाही. तिने गरजेपुरते काम चोख बजावलेय. त्यापेक्षा जास्त काही करायची गरजही नव्हती. उलट नवीन चेहरयाची गरज ती भागवते ईतकेच पुरेसे ठरते.

क्रमश:

हायला, परीक्षणात मध्येच क्रमश: कसे आले? तर तांत्रिक कारणाने सध्या मोबाईलवरच आहे आणि वेळेचा जरा तुटवडा. तर सवडीने ईथेच खाली प्रतिसादात भर टाकेन. बडे दिनों के बाद एक रईस मूवी बघण्यात आला आहे. तर बॅटींग करायचा चान्स मी सोडणार नाही. शाहरूखबद्दल आणि त्याच्या या भुमिकेबद्दल लिहिण्यासारखे अफाट आहे माझ्याकडे. तसेच चित्रपटातल्या दोनचार दोषांबद्दलही लिहायचे आहे. पण ते नजरेआड करणे जड नाही. उदाहरणार्थ नायक चित्रपटात जसे अनिल कपूर झोपडपट्टीतल्या गुंडांशी अचाट फायटींग करतो तश्या एक दोन फाईट यात टाकल्या आहेत ज्याची गरज नव्हती. एकदोन फाईट चांगल्याही आहेत. असो.. तुर्तास,

क्रमश:

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल कुलकर्णीचा तुलनेत छोटा रोल आहे. किंवा तो तसा वाटतो. कारण त्यात दोघांची जुगलबंदी मस्त दाखवली आहे, त्यामुळे ते आणखी असावे असे वाटते. अर्थातच भावखाऊ डायलॉग हिरो म्हणून शाहरूखलाच असले तरी दोघांचा अभिनय, एक्शन-रिएक्शन छान जमून आलेय. शाहरूखने स्वत:चा धंदा करायचाय हे त्याला सांगतानाचा प्रसंग एक्टींगतोड जमलाय. एकदा पिक्चर मी थिएटरमध्ये बघून झालाय, आता तो सीन पुन्हा पायरेटेड कॉपीवर पाहिल्यास पाप लागणार नाही.
तसेच त्या प्रसंगातील अतुल कुलकर्णीच्या एका घड्याळ डायलॉगचा संदर्भ घेत पुढे पतंगबाजी करतानाच्या सीनमध्ये शाहरूखने तोच रिटर्न फेकलेला डायलॉग, तिथे आपला शाहरूख दिसतो.. मजा येते Happy

कावेरी, मला बरेच लिहायचे आहे अजून. अर्थात तरीही तिथेही लिहू शकलो असतो. पण शाहरूखला कसे वाटले असते. हा रुनम्या आठवड्याला चार धागे काढतो, पण मी एक ब्लॉकबस्टर जबरदस्त पिक्चर दिलाय तर आता याला एक स्वतंत्र धागा जड झाला होय. आधीच दंगलच्या निमित्ताने आमीरच्या चित्रपटावर 3 धागे काढायचे पाप करून बसलोय. त्यामुळे तो नाराज आहे. त्यामुळे आता आमचे संबंध बिघडतील असे मला आणखी काही करायचे नाहीये Happy

अश्याच प्रकारच्या उत्तराची कल्पना होती ...आणि झालंही तसेच..छान आहे हा धागाही....
आणि राहिला प्रश्न शाखा चा तर मस्त....मस्त ...मस्तच दिसतोय यात,याआधी रबने बना दि जोडी,चक दे इंडिया मध्ये खूप आवडला होता.मुव्ही पाहीली नाही पण त्यातलं धिंगाणा गाण खूप आवडलं....मिकूचा आवाज सूट झालाय.....नाही रागावणार शाखा....smile.png
सॉरी.... जर वाईट वाटलं असेल तर....

बालपणीचा शाहरूख खान फुल्लऑन अग्नीपथचा विजय दिनानाथ चौहान च! आणि मोठे होतानाचा सीन सुद्धा. मुसलमानांचा जुलूस, पाठीवर ब्लेड आणि सुरयांचे वार करून घेणे. त्या द्रुश्यात शाहरूखची एंट्री. तो माहौल, तो आवेश, ती करारी नजर, ज बर दस्त .. हि तर फटा पोस्टर निकला हिरो एंट्री आहे..

अवांतर - दक्षिण मुंबईत बालपण गेल्याने हे प्रकार लहानपणी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहेत. लहान मुलांनाही रक्तबंबाळ झालेले बघून थरकाप उडायचा. पण हल्ली असे अघोरी प्रकार असलेले जुलूस कुठे दिसत नाहीत. फार तर छात्या पिटणे होते. तुलनेत सौम्य प्रकार असतात. रक्तपातावर बंदी आणली असावी बहुतेक.

रईसच्या डायलॉगची क्रेझ बघा

A SRK fan uses dialogues from Raees in a job interview, gets the job.
.
Interviewer - Why should we hire you?
SRK Fan - Mere paas Baniye ka dimaag aur Miyanbhai ki daring hai.
.
Interviewer - Why do you want to work for a start-up like ours?

SRK Fan - Ammi Jaan kehti thi, koi dhandha chhotaa nahi hota aur dhandhe se bada koi dharm nahi hota.
.
Interviewer - It's a sales job, you will have to be calm while dealing with prospective customers.
.
SRK Fan - Gussa shaitan ka hunar hai, isliye haraam hai.
.
Interviewer - We have working Saturdays and sometimes working Sundays too. Are you okay with it?
SRK Fan - Jo dhandhe ke liye sahi vo sahi..Jo dhande ke liye galat vo galat.
.
Interviewer - Since we are a start-up, we can offer you some profit share but no fixed salary and no job security.
SRK Fan - Agar katne ka daar hota na....toh patang nahi chalata...firki pakadta.
.
Interviewer - You are hired. You can join from tomorrow..
.
SRK Fan - Aa raha hun Proud

मला तर विनोद खन्नाचा दयावान आणि संजय दत्त चा 'वास्तव' यांची सरमिसळ करुन बनवलेला सिनेमा बघतोय असंच वाटलं. अतुल कुलकर्णीसाठी ** (दोन स्टार)

विनोद खन्नाचा दयावान>>> दयावान हा मूळ कमल हासन च्या 'नायकन' ह्या तांमिळ चित्रपटाचा रिमेक आहे.

रईस हा अल्टीमेटली नायकन वरून आला आहे तर Happy
मागेही मी शाहरूख आणि कमल हसनची तुलना एकेठिकाणी केलेली ते आठवले.

संगीताबद्दल फारसे मुदामच सुरुवातीला लिहिणे टाळलेले कारण त्यांचे योग्य मूल्यमापन काळानुसार होते.

धण्द्याचा धिंगाणा गाणे चित्रपटात जसे चित्रित केले होते त्यानुसार फार भारी वाटलेले. आताही बरे वाटते पण पुन्हा पुन्हा ऐकले जात नाही.

बालिमा जालिमा गाणे पहिल्यांदा ऐकताच जबरदस्त वाटलेले. आताही ऐकले जाते. पण अधूनमधून. मात्र त्याची पहिली म्युजिक कातिल आहे. रिंगटोन ठेवावी आणि माहौल बनवावा अशी.

पण आजच्या तारखेला सगळ्यात भारी वाटतेय ते उडी उडी जाये रे.. आमच्याघरी ते गाणे लावून चक्क गरबा डॅन्स वगैरे केला जातो. प्रत्यक्ष नवरात्र सुरु होईल तेव्हा हे गाणे मार्केट खाऊन टाकणार हे नक्की.

धण्द्याचा धिंगाणा गाणे चित्रपटात जसे चित्रित केले होते त्यानुसार फार भारी वाटलेले.>>> मराठी गाणे आहे का हे?

पण आजच्या तारखेला सगळ्यात भारी वाटतेय ते उडी उडी जाये रे.. आमच्याघरी ते गाणे लावून चक्क गरबा डॅन्स वगैरे केला जातो. प्रत्यक्ष नवरात्र सुरु होईल तेव्हा हे गाणे मार्केट खाऊन टाकणार हे नक्की. +१११११११११११११११११ माझे सुद्दा फेवरेट गाणे आहे हे. हल्ली अशी इन्डियन गाणी bollywood मध्ये ऐकायला मिळत नाही. शेवटच बाजीराव मस्तानीची गाणी ऐकली होती. सध्या बद्रिनाथ कि दुल्हनियाचे टायटल song मस्त आहे.