बागकाम - अमेरीका २०१७

Submitted by स्वाती२ on 28 January, 2017 - 13:20

बघता बघता जानेवारी संपत आला. २०१७ च्या बागकामाच्या नियोजनासाठी , सल्ल्याच्या देवघेवीसाठी आणि कौतुकाने बागेचे फोटो शेअर करण्यासाठी हा धागा.

परागिभवनात मदत करणार्‍या विविध किटकांसाठी आणि पक्षांसाठी म्हणून यावर्षी काही झाडे लावणार असाल तर त्यासाठी मार्गदर्शक पुस्तीका उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या भागात रहाता त्या भागासाठी खास तयार केलेल्या या मोफत पुस्तीका आहेत.
Ecoregional Planting Guides

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जास्वंदी शेड्स ऑफ ग्रीन म्हणुन नर्सरी आहे तिथून आणली. कॉईट वर आहे. बहुदा मेन इंटरसेक्शनला. तिथे लोकल झाड टेक्सास मध्ये जगणारी छान मिळतात. >> शेड्स ऑफ ग्रीन रोलॅटर जवळ आहे. जास्वंदी बहुतेक सगळ्या नसरीमधे मिळते. lowes, homedepot मधे धीर धरला तर ७०-८०% clearance वर मिळते.

हल्ली हापूस आंब्याची कलमं ही मिळायला लागली आहेत म्हणे. Happy

आमच्या ओळखीत दोन मित्रांनीं मागवली आणि बागेत लावली आहेत इकडे बे एरियात.

मला हार्डी जास्वंद मिळते हेच माहिती नव्हते, ते आता कळाले. जाईन शेड्स ऑफ ग्रीन मधे Happy

आणि सशाला गोकर्ण खायला आवडते , तेवढी काळजी घ्यायची Happy

राजगिरा (अमरन्थ) हे एक चांगले, उपयोगी, दिसायलाही चांगले झाड आहे. बियांपासून लागवड करता येते. उन्हाळ्यात चांगले वाढते. चार पाच फूट उंच होऊ शकते. त्याला लाल तुरे येतात त्यात राजगिरे बनतात. चिवट झाड आहे. फार काळजी घ्यावी लागत नाही. पानांची भाजी बनते. बघा प्रयोग करुन.

राजगीरा भाजीच्या वाफ्यात लावते मी. अगदी दोन-तीन झाडांपासून भरपूर पालेभाजी आणि नंतर राजगीरा मिळतो. यावर्षी एका मित्राने रशियन रिवर अमरन्थचे बी दिले आहे.

लेमन्ग्रास आरामात वाढति.
मी तिथे असताना, ग्रोसरीतून उरलेली काडी खोचली कुंडीत. मस्त वाढली. तसेच पुदीना आणि कढीपत्ता ची काढी खोचायची.

कोणाला कृष्णकमळ लावण्याचा अनुभव आहे का? खूप invasive असते का? >> वरच लिहिलय न मी Happy दोन वर्षे भरभरून फुले आली आहेत. सम्र मधे मंदावते पण परत फॉल मधे मस्त फोफवते ते थेट फ्रॉस्ट ने मरेपर्यंत. आम्ही कुंडी मधेच लावतोय.

माझ कृष्णकमळ जमीनीत आहे. प्रत्येक सिझन मधे २५/३० फुल येतात.
आजच लेमन ग्रास ग्लास मधे पाणी घालुन ठेवला आहे. बघु कधी मुळं येतात.

गणेशवेल काय भारी दिसतो आहे स्नेहा.
सीमा असामी म्हनतो त्यापैकी कोणत्या जातीचं जास्वंद आहे तुझ्याकडे? बाहेर जमिनीतच आहे असं वाटतय तुझ्या पोस्ट्वरून.
मला पण डाळींबाबद्दल तोच प्रश्न होता Happy

माझ्याकडे कढीपत्ता आणि अनंत मी आतबाहेर करते. स्टार जॅस्मिन गेल्यावर्षी अजिबात नाह्ही पण ह्या सिझन ला मस्त फुलते आहे. ती बाहेरच एका अजस्त्र कुंडीत आहे. परवाच हाय्ड्रॅन्जिया लावलय. रोझमेरी बाहेर जमिनीत आहे गेले अडीच वर्षे.

कृष्णकमळ म्हणजे इंग्लिशमध्ये काय? >> passion flower. स्नेहा जमिनीत चालते फक्त मग इथल्यासाठी पेरीनियल होईल कि नाहि माहित नाही. try करून सांग Happy

शूम्पी, मागे मी उल्लेख केलेले डाळिंबाचे झाड Red Barn Garden Center , Austin या नर्सरीच्या प्रवेशदाराजवळच आहे. तुम्ही नर्सरीचे नाव गूगल केलेत तर जे फोटो दिसतात त्यातल्या एका फोटोत पांढर्या रंगाच्या इमारतीच्या कडेला फुलांची रोपे पुढेमागे घेऊन उभे असलेले ते झाड दिसतेय आणि त्याला बहुतेक डाळिंबेसुद्धा दिसतायत. तुमच्याकडच्या नर्सरीत अधिक माहिती मिळू शकेल लावायचे असेल तर.
गणेशवेल फारच छान वाढली आहे. हार्डी जास्वंद मलाही माहीत नव्हती. बघते मिळते का. अनंत पण हार्डी आणि बुटका मिळतो. माझ्या जमिनीतल्या रोपाला फुले आली नाहीत अजून.
एक प्रयोग म्हणून आधी कुंडीत २फूट उंच वाढवून यंदा कढीपत्ता जमिनीत लावला आहे. पुढच्या वर्षी कळेलच तगतो की नाही ते Happy

अनंत वर चंद्रा म्हणतायत तसा बुटका गेल्या वर्षी आणलेला. आळसाने बाहेरच राहिला, आणि मस्त तगलाय. अर्थात बे-एरियाचा विंटर तो काय असणार. रादर आत आणला असता तर नक्की मारला असता, बाहेर या वर्षी चिक्कार पाउस पडला त्यामुळे ४-५ महिन्यात कुंडीला एकदाही पाणीही मिळालं नाही. हार्डी म्हणजे असा पहिजे. Happy

अदिती
कॉमन मोगरा Jasminum sambac असेल तर त्याबद्दल Missouri Botanical Garden च्या प्लांट फाइंडर डेटाबेस मधे ही माहिती आहे.

तुमच्या इथे किती थंडी आहे त्यानुसार झाड वर्षभर बाहेर ठेवायचं की नाही ते ठरवा.

Winter hardy to USDA Zones 9-11 where it is best grown in loose, humusy, evenly moist but well-drained soil in full sun to part shade. If climbing is desired, tie stems to a support. Prune as needed to maintain plant shape. Propagate from cuttings in summer. In St. Louis, plants may be purchased in spring in containers. Container plants may be brought inside before first fall frost for overwintering in bright sunny rooms of moderate temperature with reduced watering.

मी इथे माझे सध्याचे फ्लॉवर बेड्स आहेत त्याचे प्लॅन देतेय. कुणाला उपयोग झाला तर चांगलेच एवढाच हेतू.
झोन ५ब/६
माझा लॉट छोटासा आहे. त्यात शेजार्‍याच्या लॉनची तो काही काळजी घेत नव्हता. म्हणून मग मधे बॉर्डर करायचे ठरवले. जोडीला फाउंडेशन बेड्स. इथल्या कडक थंडी आणि कडक उन्हाळा झेलू शकतील, शिवाय ससे खाणार नाहीत अशी स्थानिक झाडे लावायची होती. जोडीला फार खर्चही करायचा नव्हता आणि जी झाडे आधीपासून होती ती देखील उपयोगात आणायची होती. खर्च आटोक्यात ठेवायला मी पेरेनियल्ससाठी विंटर सोईंग केले. बागकाम करणारे ग्रुप्स, आर्ट म्युझियमची बाग अशा मंडळींचे वार्षिक सेल असतात त्यातुन काही चांगल्याजातीची खात्रीची झाडे देखील स्वस्तात मिळाली.
ऊन चांगले येते त्या बॉर्डरच्या काही भागात स्प्रिंगसाठी डॅफोडिल्स, लवकर येणारे सिंगल ट्युलिप्स आणि थोडे उशीरा येणारे गुच्छासारखे ट्युलिप्स लावलेत. त्यांच्यामधे साधारण एक ते सव्वा फुटाच्या भागात ओरिएंटल लिली लावल्यात. त्यांच्या सगळ्यांसमोर आता ब्लॅकबेरी लिली आणि फॉलमधे डे लिली असे एकत्र लावणार . बॉर्डरच्या पुढल्या भागात नॉक आउट रोझेस ३, यातले सध्या बजेट मुळे एकच लावले आहे. बाकी जागेत यावर्षी विंटर सोइंग मधून तयार केलेली अ‍ॅनुअल्स लावेन. या गुलाबांसोबत येत्या फॉलमधे माझ्याकडे असलेले पिंक ब्रिकियन्सी आणि अ‍ॅलियम लावणार आहे. त्याला लागून पिओनी आहेत. या पिओनीच्या मधे गुच्छासारखे ट्युलिप्स आहेत आणि बाहेरच्या बाजूला सलग
जांभळे आयरीस आहेत.

रेझ्ड बेड्स करण्यामागे काय हेतू असतो? माझं बॅकयार्ड मोठं आहे पण फेन्स्ड नसल्यामुळे हरणं असतातच. त्यामुळे जमिनीत अजिबात काहीही लावलेलं नाही. जे काही लावलंय ते सगळं कंटेनर्समध्ये, डेकवर.

रेझ्ड बेड केले तर तण काढायचा त्रास कमी होतो असे म्हणतात. दुसरे म्हणजे वावरासाठी सोपे जाते. रोटेशन करायला पण बरे पडते.

>>अनंत पण हार्डी आणि बुटका मिळतो. <<

बुटका म्हणजे कुठल्या संदर्भात? आमच्याकडचं (झोन ७ब/८अ) अनंताचं झाड बर्‍यापैकी फोफावलेलं आहे.

हे फ्रंटयार्ड मधलं -
13322116_10154290437331383_5619327947929280148_n.jpg

आणि हे बॅकयार्ड मधलं - तुलनेसाठी, शेजारचा सायप्रस ४० फुटी आहे...
13310466_10154292636531383_2074654395313840945_n.jpg

Pages