बागकाम - अमेरीका २०१७

Submitted by स्वाती२ on 28 January, 2017 - 13:20

बघता बघता जानेवारी संपत आला. २०१७ च्या बागकामाच्या नियोजनासाठी , सल्ल्याच्या देवघेवीसाठी आणि कौतुकाने बागेचे फोटो शेअर करण्यासाठी हा धागा.

परागिभवनात मदत करणार्‍या विविध किटकांसाठी आणि पक्षांसाठी म्हणून यावर्षी काही झाडे लावणार असाल तर त्यासाठी मार्गदर्शक पुस्तीका उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या भागात रहाता त्या भागासाठी खास तयार केलेल्या या मोफत पुस्तीका आहेत.
Ecoregional Planting Guides

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरामागच्या झाडीत कोल्ह्याची फॅमिली आहे. छोटी बाळं आहेत बहुतेक. कोल्हीणबाई दररोज ठराविक वेळेस दर्शन देतात. अ‍ॅनिमल कंट्रोलला फोन केला तर ते म्हणे जो पर्यंत पिसाळत नाही, तोपर्यंत आम्ही काही करणार नाही Uhoh . त्यामुळे आजकाल जास्तवेळ बागेत काम करता येत नाही. पिल्लं मोठी झाली की इथून दुसरीकडे जातील ही आशा. आमच्या कोकोलाही बागेत सोडता येत नाही आजकाल. बागेत आली की ती खारींच्या मागे त्या झाडीत सुसाट धावत सुटते. वैताग आहे... बाकी कोल्हीणबाई एकदम छान आहेत दिसायला. शेपटी एकदम झुपकेदार आहे.

शूम्पी, झोन ८ बी मध्ये रातराणी बाहेर लावली तर जगत नाही Sad स्वानुभव! आत - बाहेर करणे सोपे व्हावे म्हणून मी ती कुंडीत लावली आहे.
डाळिंबाचं झाड मात्र छान जगतं जमिनीत लावलं तर. इथल्या नर्सरीत एक आहे - साधारण १२ फूट उंच. मोसमात फळांनी लगडून जातं अगदी. फार सुंदर दिसतं ते दृश्य. (पण इतकी फळं खपवण्याची सोय माझ्याकडे नसल्यामुळे ते लावण्याचा विचार मी बाद केला Happy ) त्यापेक्षा हवे तेव्हा लागेल तेव्हढे विकत घ्यावे हे बरे वाटले. पिंक जस्मिनविषयी काही माहिती नाही.
घरामागच्या झाडीत कोल्ह्याची फॅमिली! >>> अरे बाप रे ! हे वाचून खारी / ससे परवडले एक वेळ असे वाटून गेले.

अंजली, आमच्या इथे पण एक दोन शेजार्‍यांनी कोल्हयांची पिल्लं पाह्यलाचं सांगितलंय.

फुलझाडे, भाजी पाला यात हैदोस घालणारे मोल्स, ग्राउंहॉग्स, ससे, खारी यांच्या पॉप्युलेशनवर कोल्ह्यांचा कंट्रोल असतो थोडा फार.

हर्ब गार्ड्नचा फोटो टाक प्लीज

मेधा, हो फोटो टाकेन. मार्जोरीम परत आणून लावायला लागेल असं दिसतंय. बाकी लागली सगळी हर्ब्ज. पुदिना एकदा 'हार्वेस्ट' करून त्याची पाणीपुरीच्या पाण्याची चटणी करून फ्रीज केली. बेझील जीव धरायला लागलाय. ओरेगानो, सेज जवळ गेलं की छानसा मंद सुगंध जाणवतो.

सायो, आमचं फेन्स्ड बॅकयार्ड नाहीये. इथे फारसं फेन्स घालत नाहीत, मलाही नको वाटतं फेन्स घालणं. पूर्वीच्या घराला होतं पण इथे नको असं ठरवलंय.

टेक्सासात जगेलच ना सगळं ?? का इतक्या उन्हात म्हणून शुप्मी विचारत्येय. >> ६+ hours Sun लिहिलेले असणारी झाडे पण कोमजतात असा अनुभव आहे. लोकल झाडांना पर्याय नाही.

शूंपी रातराणी आत बाहेर करावी लागते. मोगरा आत बाहेर करावा लागतो. ईडलिम्बू पण आत बाहेर करावे लागते (mayers lemon नसेल तर frost warning च्या वेळी), कृष्ण कमळ आत नेले तर जगते. फिग बाहेर मस्त जगते फक्त पक्षी धूमाकूळ घालतात.

धन्यवाद. रातराणे लिस्टीतून बाद करते.
चंद्रा कोणत्या नर्सरीत आहेत म्हणे डाळींबाची झाडे? आणतेच नक्की.
डाळींबे खपायचा काहीच प्रॉबलेम नाही. असामी फिग्स मात्र खपणार नाहीत असे वाटते तेव्हा तुझ्याकडचीच आणून खाउ Happy

विंटरहार्डी जास्वंदीबद्दल काय मत? तगेल बाहेर इन-ग्राउंड?

डाळिंब मलाही लावायला (आणि खायला) आवडेल. फिग बाजुवाल्याच १/१० आमच्या बॅकयार्ड मधे आहे Happy सो वेगळ लावायची गरज नाही.पिच आणि प्लम चे दुसरे वर्ष आहे. मागच्या वर्षी १०० एक आलेलेत. ह्या वर्षी पण तितकेच येतील. ऑरेंज ची भरभरुन आलेली बरीच फुल गळुन गेली. ५/१० आलीत तरी खुप आहेत.

हर्ब गार्ड्न मधे मी एकदा ट्रेडर्स जो मधुन कुंडी आणलेली. त्यात मिंट, स्पिअर मिंट, ओरेगानो, अजुन एक काहीतरी एकत्र होते. त्यातील मिंट पुढच्या वर्षी तगले. सेज आणलेले ते पण ३ वर्ष चाललय. इन्डीयन ग्रोसरी मधुन कडईपत्ता आणलेला त्याचे ४थे वर्ष आहे पण कधीच भर्भरुन पाणं आली नाहीत. बेसील पण ट्रे. जो मधुन आणलेले ते वर्ष भर चालल. मग जळुन गेले.

विंटरहार्डी जास्वंदीबद्दल काय मत? तगेल बाहेर इन-ग्राउंड? >> rose of Sharon म्हणतेयस कि dinner plate type hardy hibiscus म्हणते आहेस ? दोन्ही नीट तगल्यात. rose of Sharon सगळ्यात उशिरा फुटतात जमिनीतून हे लक्षात ठेव नि घाईघाईत मेल्या म्हणून उपटू नकोस.

माझ्याकडे पण डाळींंबं, अंजीरं निम्म्याच्यावर पक्षी खातात किंवा टोच्या मारुन खराब करतात. पण चालायचंच ना! निसर्गातील इतर घटकांना त्यांचा शेअर मिळायला नको का?

६+ hours Sun लिहिलेले असणारी झाडे अ‍ॅरिझोनाच्या ऊन्हातसुद्धा कोमेजत नाहीत. त्यांना पाणी पण इतरांपेक्षा जास्त द्यायला हवे.

अंजली , ते कोल्हे आहेत का कायोटीज? आमच्या भागात आसतात कायोटी.

शुगोल,
कोल्हे आहेत (गुगलवर फोटो पाहून परत एकदा खात्री केली Happy ).

अदिती, अशी एकत्र हर्ब्ज लावलेली कुंडी दिसायला छान दिसली तरी पुदिन्यामुळे बाकिचे हर्ब्ज तगत नाहीत. शक्यतो पुदिना वेगळ्या / स्वतंत्र कुंडीतच लावावा. बेझील तसं वर्षभरच टिकतं. फारतर पुढच्या वर्षी परत येईल. पण पुदिना / ओरेगानोसारखं वर्षानुवर्षे येत नाही.

अस काही नाही ग मेधा. अ‍ॅक्च्युअली उलट आहे. टेक्सास मध्ये गार्डनिंग करन सोपी गोष्ट नाही. कुल वेदर क्रॉप लावाव म्हटल तर अचानक वेदर वार्म होत आणि हॉट वेदर मध्ये इतक हॉट होत कि भाज्यांची फुल गळून जातात. Sad किडींचा प्रादुर्भाव फार. बरं गवती चहा सारखी गवत टु मच वाढतात. पण हवेत जरा दमटपणा आला कि सापांची भिती. गेल्यावर्षी दोन साप गवती चहामुळ निघाले. काढून टाकला मग.
पालेभाज्या लावायला फक्त २ महिने. जुन आला कि बंद. टोमॅटो चांगले येतात जोवर तापमान १०० च्या आत आहे. १०० च्या वर गेल कि फुल गळायला सुरुवात होते. काकडी पन १०० च्या वर कन्सिस्टंट तापमान झाले कि कडू जार.
गारपीट ने तर वैताग आणला यावेळी.
एकाच दिवसात तीन सीझन बघायचे असतील तर चांगल आहे इकडे. दुपारी ७० असु शकत. ५:३० ला ८८ आणि १० वाजता एकदम ५५ वगैरे. असो. Happy

फिग्ज आणि पेअर्स चांगले येतात. माझ्याकडे पेअर लागलेत यावेळी २५/३०.
लाल जास्वंदीच झाड माझ्याकडे गेली दहा वर्ष आहे. मोठच्या मोठ होत. हिवाळ्यात मरत. स्प्रिंग मध्ये फांद्या कापून टाकल्या कि परत नव्यान येत.
गणपतीला सप्टेंबर मध्ये फुल मिळतात.
रातराणी ,बोगनवेल ,कडीपत्ता आत बाहेर कराव लागेल. भेंडी सगळ्ञार सोपी आहे. काही कराव लागत नाही. येतेच.
डाळींब खाण्यालायक येतात का? यासाठी विचारल कि घरी सासरी भारतात मोठ झाड आहे. उगाच आपली किडूक मिडुक डाळींब बुट्टीभर लागतात. नुस्त्या बीया आत मध्ये. उगाच शोभेला.

यावेळी भरपूर लावल्या आहेत भाज्या. लिहिते नंतर लिस्ट.

सीमा, जास्वंद हार्डी आहे का? कुठुन आणली?
शूम्पी,
स्टार जस्मिन ,मोगरा आणि कृष्ण कमळ इथे राहतात बाहेर, माझ्याकडे बाहेरच आहेत. मागच्या वर्षी कारली पण छान आली होती, आणि शिरांचे दोडके, घोसाळे पण.
मलबेरी पण इथे छान होतात.

इथे टेक्सास मधे कण्हेर पण हार्डी आहे. गणेशवेल अ‍ॅनुअल आहे, पण एका सीझनमधे वाढते आणि भरपूर बिया तयार होतात्,जरा जास्तच!

IMG-20160912-WA0000.jpg

सीमा गवती चहा बद्दल विचारणार होते पण त्यामुळे साप बिप येत असतील तर नको.
स्नेहा गणेश वेल ला ईग्लिश मधे काय म्हणतात?

गणेशवेल मस्त आला आहे !! बिया कुठे मिळतील त्याच्या? पुण्याला आमच्या घरी खूप येतो. गोकर्णाच्या बिया मिळतात का इथे?
सगळ्यांचे अपडेट्स मस्त.

सायो, मी बिया मागवल्या होत्या.
पराग, मागच्या वर्षीचा फोटो आहे. एट्सी वर गणेश वेल आणि गोकर्ण मागवले होते, गोकर्णाला बटरफ्लाय पी vine नावाने बघता येईल. निळा आणि पांढरा दोन्ही मिळतात.
तशा बिया अ‍ॅमेझॉन वरती पण असतील Happy

पराग,
www.etsy.com

सुप्रिया, ७ ब मधे फिग (अंजीर), पीच अगदी व्यवस्थित येतात. थोडी काळजी घ्यावी लागते कीड, पक्षी वगैरे पासून, पण छान झाडं लागतात. पेअर, सफरचंद पण लागतील.

स्नेहा जास्वंदी शेड्स ऑफ ग्रीन म्हणुन नर्सरी आहे तिथून आणली. कॉईट वर आहे. बहुदा मेन इंटरसेक्शनला. तिथे लोकल झाड टेक्सास मध्ये जगणारी छान मिळतात.
आदिती जरुर लावा गवती चहा. फक्त शक्यतो कुंडीत लावा किंवा जमिनीत लावला तरी वेळच्यावेळी बाजुला पसरलेले कंद काढून टाका. आमच काय झाल कि पसरत गेला गवतीचहा आणि नंतर उपडने अशक्य झाल. ग्रोसरी मधून काडी मिळते ती लावली किंवा लोज मधून आणला तरी चालेल.

गवती चहा बद्दल विचारणार होते >> कुंडीत व्यवस्थित जगतो गवती चहा. आमच्या झोनमधे आत बाहेर करावा लागतो एवढाच काय तो व्याप. पण रोझ मेरी, बे लीफ, मोगरा, अबोली , कडीपत्ता, रातराणी, जास्वंद असे सगळे आता बाहेर करताना एक गवती चहा काही फार जास्त होत नाही Happy

मी यावेळेस मिक्स्ड कॉस्मॉस, cleome आणि साल्विया च्या मागच्या वर्षी हार्वेस्ट केलेल्या बिया लावल्या आहेत. कॉस्मॉस फटाफट रुजलेत. बाकीच्या रोपांचं मात्र इंतेहा हो गयी इंतजार की Sad

स्नेहा, गणेशवेल काय छान वाढलेय!
माझ्याकडे पण गवतीचहा, कढीपत्ता, हळद, फिग हे कुंडीत आहेत. मोठी फुलं येणारी हार्डी जास्वंद बाहेर. त्याला दरवेळी स्प्रिंगमधे इतर हर्बेशिअस पेरेनियल प्रमाणे नवे कोंब येतात. झोन ५ब/६

गणेशवेल मस्तच दिसतोय.
पुर्वी हौशीने बीया आणलेल्या पण झाड आलच नाही. आता वरुन मागवतो.
गवती चहाची कांडी होल फुड्स, एशिअन स्टोर मध्ये मिळते. ती २ आठवडे ग्लासात पाणी घेउन त्यात बुडवून ठेवली की खाली मुळं फुटतात. मग कुंडीत मस्त वाढतो.

Pages