ती पहा,पडली गझल ती...

Submitted by सत्यजित... on 27 January, 2017 - 06:12

ती पहा पडली गझल ती,जीव गेल्यासारखी...
दादही यावी इथे,तर..लाच देल्यासारखी!

पावसाचे थेंब..वणवा,तू नको काही लिहू...
जाणिवांची जाग मेल्याहून मेल्यासारखी!

कोपऱ्यावरती गुलाबी पिंक कोणी टाकते...
रंगते मैफील इथली पान-ठेल्यासारखी!

हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी...
जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी!

काय मी जगलो जरासा!जिंदगी वेडावली...
लागली मागेच माझ्या,ती झमेल्यासारखी!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच...मस्त !! !
लाच देल्यासारखी!>>> इथे दिल्यासारखी पाहिजे का??

तत्काळ प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद कावेरीजी!
>>>इथे दिल्यासारखी पाहिजे का??>>>
होय! अपेक्षित अर्थ तोच,उच्चार जरा वेगळा! दर २५ किमी वर असा हलकासा फरक पडतो आपल्या भाषेत!

सुन्दर

तू दे मला मग देईन मी पण तुला
दादही झालीय व्यवहार केल्यासारखी