काबिल-ए-तारीफ (Movie Review - Kaabil)

Submitted by रसप on 27 January, 2017 - 00:38

हृतिक रोशन हा आजच्या काळातल्या अतिशय मेहनती अभिनेत्यांपैकी एक आहे. कदाचित अभिनय क्षमतेत इतर काही लोक त्याच्याहून सरस असतीलही, नव्हे आहेतच. खास करून संवादफेकीत तो खूप कमी पडतो, असं माझं एक निरीक्षण आहे. बऱ्याचदा त्याच्या वाक्यांच्या शेवटचा शब्द नीट समजून येत नाही. वाचिक अभिनयात कमी पडत असला तरी आपल्या मेहनतीतून तो त्यावर मात करत असतो. भारतात लोकप्रिय ठरलेला आजवरचा एकमेव देशी सुपरहिरो म्हणूनच तर तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवू शकला आहे !
'काबिल' ही त्याने गाठलेली अजून एक उंची मानता येईल. 'मोहेंजोदडो'च्या वेळी 'रुस्तम' अक्षय कुमारशी हृतिकची टक्कर झाली होती. तेव्हा नकारात्मक प्रसिद्धीचा फटका त्याला बसला होता. मात्र तरीही पुन्हा एकदा एका मोठ्या सिनेमासमोर उभं राहताना हृतिक डगमगत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच, ह्यासाठी दाद द्यायला हवी. ह्या वेळी तर चक्क किंग खान च्या 'रईस' समोर हृतिकचा 'काबिल' उभा ठाकला आहे आणि believe me, ह्यावेळी तो नक्कीच मात खाणार नाही.

Kaabil Movie Poster.jpg

'काबिल'मध्ये 'काबिल-ए-तारीफ' होण्यासाठीचे जवळजवळ सर्व ingredients आहेत.
रोहन भटनागर (हृतिक रोशन) आणि सुप्रिया भटनागर (यामी गौतम) हे एक अंध दांपत्य. नवीनच लग्न होऊन आलेल्या सुप्रियावर स्थानिक नगरसेवक माधवराव शेलार (रोनित रॉय) च्या लहान भावाची (अमित - रोहित रॉय) वाईट नजर असते. तो व त्याचा मित्र तिच्यावर अत्याचार करतात. हे सगळं कथानक ट्रेलर्समधून स्पष्ट समजून आलंच असेल. ह्यानंतर, सूडभावनेने पछाडलेला अंध रोहन ह्या सगळ्या बाहुबलींचा बदला घेण्याचा प्लान आखतो. कसा ? तो किती यशस्वी ठरतो ? आणि त्यानंतर त्याला काय परिणाम भोगावे लागतात ? हे उर्वरित कथानक, जे ट्रेलर्सनी दाखवलेलं नाही.

पटकथेत काही त्रुटी आणि काही पळवाटाही आहेत. सगळ्यात मोठी पळवाट म्हणजे रोहन आणि सुप्रियाला कुणीही नातेवाईक नसणं. ह्यामुळे कुठलाही पसारा न होता फक्त मुद्द्याचं कथानकच मांडता येण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. अश्या अजूनही काही बाबी आहेत, पण ते सगळं किरकोळच.

दिग्दर्शकं संजय गुप्ता, त्यांच्या उचलेगिरीसाठी (कु)प्रसिद्ध असले, तरी कथानकाची वेगवान मांडणी मात्र त्यांच्या सिनेमात दिसून येतेच. तशीच ती इथेही आहे. नाही म्हणायला, अगदी सुरुवातीला गती जराशी धीमी आहे, पण लौकरच वेग पकडला जातो. त्यांच्या नेहमीच्या आवडत्या पिवळ्या व लाल रंगांची अनावश्यक उधळण इथे नाही, हे एक विशेष !

यामी गौतम अतिशय सुंदर दिसते. अंध व्यक्तीचा वावर सहज नसतोच. मात्र ते अवघडलेपण पडद्यावर सहजपणे आलं पाहिजे, अशी काहीशी विचित्र मागणी ह्या भूमिकांची होती आणि त्यात दोघेही कमी पडलेले नाहीत. यामीच्या भूमिकेला फारशी लांबी नाहीय. मात्र असलेल्या वेळेत तिने स्वत:ला चांगलंच सिद्ध केलेलं आहे.

'रोहित रॉय' गुप्तांचा आवडता असावा. इंडस्ट्रीतील साईड लाईन झालेल्या अनेक चांगल्या अभिनेत्यांपैकी रोहित रॉय एक असावा. कुवत असूनही एकही लक्षणीय भूमिका आजपर्यंत त्याला मिळू नये, हे एक दुर्दैवच. त्याचा बॅड बॉय अमित खूपच कन्व्हीन्सिंग आहे. अगदी पहिल्या फ्रेमपासून त्याची इमेज आपल्या मनात बनूनच जाते.

'रोनित रॉय' च्या करियरने गेल्या काही वर्षांत जो आकार घेतला आहे, त्याची अपेक्षा त्याने स्वत:देखील कधी केली नसावी. सोनी टीव्हीवरील एका टुकार मालिकेतील दमदार भूमिकेनंतर ह्याचे सगळे गहच पालटले आहेत ! ९० च्या आसपासच्या हिंदी सिनेमाच्या दळभद्रीणाचे जे काही चेहरे होते, त्यांच्यापैकी एक रोनित रॉय. पण आजकाल त्याला पडद्यावर पाहताना विश्वासच बसत नाही की जान तेरे नाम, बॉम्ब ब्लास्ट वगैरे टुकारक्यांतून सहनशक्तीचा अंत पाहणारा तो हाच का ? त्याचा हा कायापालट केवळ अविश्वसनीय आहे. गुंड आणि बेरकी 'माधवराव शेलार' लक्षात राहील. ग्लासआडून त्याने फिरवलेली नजर - ट्रेलरमध्येही दिसेल - तर हायलाईटच !

सिनेमा हृतिकसाठी आहे आणि त्याचाच आहे. सिनेमाच्या सुरुवातीला असलेल्या 'कदम से कदम जो मिले...' गाण्यावरील हृतिकच्या नाचासाठी त्याला सलाम आहे ! अप्रतिम कोरिओग्राफ केलेलं आणि सादर केलेलं गाणं खासकरून पाहायलाच हवं असं आहे.
वर म्हटल्याप्रमाणे अंध व्यक्तीच्या अवघडलेपणाला अत्यंत सहजपणे हृतिकने सादर केलं आहे. त्याची हताशा आणि नंतर मनात भडकलेला सुडाग्नी त्याने अप्रतिम रंगवला आहे. प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या प्रयत्नांत पूर्णपणे यशस्वी होते, तेव्हा एक त्रयस्थ म्हणूनही आपल्याला एक समाधान मिळतं. हृतिकचा 'रोहन भटनागर' पाहताना ते समाधान मिळेल.

व्हेटरन राजेश रोशन आजच्या काळाशी सुसंगत संगीत देतात. काबिल हूं, कदम से कदम.. आणि 'सारा जमाना..'चं रिमिक्स मस्त जमली आहेत.

अधिक काही लिहित नाही. बऱ्याच दिवसांनी 'रईस' आणि 'काबिल' अशी डबल ट्रीट आहे. बॉक्स ऑफिसचे आकडे ह्याला 'लढत' ठरवतील आणि दोघांतल्या एकाला विजेताही बनवतील. पण प्रेक्षकांनी ह्याकडे लढत म्हणून न बघता मनोरंजनाची मेजवानी पाहायला हवं. कारण जर एक 'दमदार' आहे तर दुसराही 'काबिल-ए-तारीफ' आहे.

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/01/movie-review-kaabil.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

वरची कॉमेंट काबील पिक्चरवर नाही, जनरल कॉमेंट आहे. या आठदहा वर्षातील कुठलाही चित्रपट उचला आणि त्याला लावा, नव्यान्ण्व टक्के फिट बसेल.
हल्ली एखादा मसालापट कसा बनतो? तर एखादी मसाला स्टोरी घेत यात कोण फिट बसेल याचा विचार करून मग त्या हिरोला कास्ट केले जाते असे नसते काही...
तर सर्वात आधी आपल्या कंपूतील एखादा हिरो सिलेक्ट केला जातो, मग त्याला साजेशी स्टोरी आपल्या पोतडीतून काढली जाते, जमल्यास पटकथेत बदल केला जातो, आणि त्याला सूट होईला अशी त्या मसाल्याला फोडणी दिली जाते..

अरे तुला तेच सांगतोय ना ! पिक्चर बघ !! काबिल चांगला पिक्चर आहे. रईस पण चांगला पिक्चर आहे. शाहाण्या बाळासारखे दोन्ही पिक्चर बघ मग काय बोलायचे ते बोल.

तू उगीच पिक्चर न बघता भारंभार प्रतिक्रिया देऊ नकोस . त्यांची काहीच किंमत राहत नाही. Lol

ऋ, तू उगीच पिक्चर न बघता भारंभार प्रतिक्रिया देऊ नकोस . त्यांची काहीच किंमत राहत नाही. Lol

चित्रपट चांगला की वाईट यावर आपण बोलत नाही आहोत, तर काबील (वा काबीलसारखा कुठलाही अबक चित्रपट) चालला असता की नाही यावर चर्चा सुरू आहे.

तरी माझे हे प्रतिसाद काबील परीक्षणाच्या धाग्यात असल्याने त्या चित्रपटाशी जोडले जाणार असतील तर मी वेगळा धागा काढू असे सुचवायचे आहे का आपल्याला Happy

अवांतर - काबील चांगला असेल तर चांगलेच आहे. माझा विकेंड सार्थकी लागेल. शनिवारी रात्री बघायचा विचार आहे.

अरे बाबा चित्रपट चांगला असेल तर तो चालतो. तसे नसते तर हृतिकचा कहो ना प्यार है पण इतका मोठा हीट नसता ठरला. प्रेक्षकांना उगीच मूर्ख ठरवू नये.

आता शनिवारी बघून ये. मग काय वाटले ते लिही. तो पर्यंत आळी मिळी गुपचिळी Wink

ऋन्मेऽऽष १००% सहमत.
तुम्ही द्या हो प्रतिक्रिया. लोकशाही आहे,
प्रेक्षकांना मूर्ख बनवले आहे ह्रितिक आणि कम्पनीने. उगाच आपलं 'नये packet भरके चीज पुरानी' type सिनेमा आहे.
रईस मसालापट असला तरी शाखाचा आहे. नाम ही काफी हैं.
अमिताभचे angry यंग man type मसालापट त्याला स्टार ऑफ the Millenium बनवून गेले. त्याचे टुकार सिनेमेसुद्धा फक्त त्याच्या नावाने चालले. तसेच शाहरुखचे पण आहे
शाहरुख is नंबर १. कोई भी ह्रितिक उसके सामने कुछ नहीं. . शाहरुखचे cutouts लागतात अमेरिकन थिएटर मध्ये. आणखी कुठल्याच स्टार्सचे लागत नाहीत हॉलिवूड स्टार्सचे पण फक्त पोस्टर्स असतात. आम्हाला एक भारतीय म्हणून शाहरुखचा अभिमान आहे.

धनि, मी स्वत:लाच कसा मुर्ख म्हणेन. एखाद्या हिरोचे फॅन असणे आणि त्याच्यासाठी म्हणून पैसे खर्च करत चित्रपट बघणे ही जर आनंददायी आणि पैसा वसूल गोष्ट असेल तर त्यात मुर्खपणा कसला..

कहो ना प्यार है किती सालचा चित्रपट आहे? हल्ली धंद्याची गणिते पार बदलली आहेत.
चित्रपट चांगला असला तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांकडून बघितला जातो. पण तो थिएटरलाच बघितला जाणे गरजेचे नसते. हल्ली प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये नवीन चित्रपट सात दिवसाच्या आत येतो. त्यामुळे कोणता चित्रपट थिएटरला जात पैसे खर्च करत बघायचा हे ठरवले जाते. कारण हे पैसे थोडेथोडके नसतात. म्हणून मग हट्टाने मोठ्या पडद्यावरच बघावे असे त्या चित्रपटात काही आहे का हे तपासले जाते. प्रत्येकाचे निकष वेगळे असू शकतात. मात्र बहुतेक जण बिग बॅनरचे, मोठे स्टार असलेले, खर्चा केलेले चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघतात. पण एखादा लो बजेट वा फारसे आवडता स्टार नसलेला पण तरीही चांगला चित्रपट आहे असे समजले तरी पैसे खर्च न करता तो मोबाईल, लॅपटॉपवर बघणे पसंद करतात.

पहा आता मी तुझ्या मूर्खपणाबद्दल काही म्हटलेच नव्हते , तो विषय तूच काढतो आहेस Wink

घे मागच्या वर्षीचे उदाहरण पाहिजे तर सैराट चे घे रे. कोण ओळखिचे होते त्यात ? कोण स्टार होता ? पिक्चर चांगला होता - लोकांनी पाहिला Lol

काबिल चांगला आहे. तो त्याच्या स्वतःच्या बळावर रईस इतके नाही पण तरिही चांगलेच यश मिळवतो आहे.

इतकंच स्टार चं वलय असतं ना तर फॅन ने सुद्धा २०० - ३०० कोटी मिळवले असते रे !

तू उगीच पिक्चर न बघता भारंभार प्रतिक्रिया देऊ नकोस . त्यांची काहीच किंमत राहत नाही. Lol

धनि अहो तुम्हीच प्रेक्षकांच्या मुर्खपणाचा उल्लेख केला. मी फक्त स्वत:ला प्रेक्षकांपैकी एक म्हटले ईतकेच Happy

तुम्ही वर सैराटचे उदाहरण दिले. तो मराठी चित्रपट आहे. मराठी चित्रपटाची धण्द्याची गणिते वेगळी असतात. ते एकाचवेळी हजार स्क्रीनवर लागून पहिल्याच आठवड्यात सुपरहिट नाही होत. चांगले असतील तरच चालतात. आणि चांगले नसले तर स्वप्निल, सई, अंकुश हे मराठी सुपर्रस्टार देखील प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचू शकत नाही.
किंबहुना आपल्याला उदाहरण द्यायला हिंदी चित्रपट न सापडता मराठी आठवला यातच सारे आले Happy

फॅन बाबत किंवा एकंदरीतच शाहरूखच्या चित्रपटांबद्दल मी वेगळे सविस्तर बोलतो. कारण एकदा शाहरूखचा विषय निघाला की मी थांबत नाही Happy

पण त्या आधी मला सांगा, वर तुम्हाला मी चित्रपट न पाहता मत व्यक्त करतोय याचे कौतुक वाटतेय. पण प्रीबूकींग, म्हणजे चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच त्याची एडवान्स बूकींग काही कोटींमध्ये होते. तर ती कश्याच्या भरवश्यावर. म्हणजे चित्रपट चांगला आहे की वाईट हे गुलदस्त्यात असताना, कोणताही रिव्यू हाताशी नसताना लोकं आपले पैसे कश्याचा जीवावर गुंतवतात? याचे उत्तर शोधा, ईतर उत्तरांचीही लिंक लागेल.
तरी उत्तर न मिळाल्यास पुढच्या प्रतिसादात ते मी देणार Happy

तू उगीच पिक्चर न बघता भारंभार प्रतिक्रिया देऊ नकोस . त्यांची काहीच किंमत राहत नाही>>>> Proud Lol

धनि, वेळ जात नाहीये म्हणून गीता वाचताय का ? Wink

ऋन्मेऽऽष ,
तू उगीच पिक्चर न बघता भारंभार प्रतिक्रिया देऊ नकोस रे. त्यांची काहीच किंमत राहत नाही.

Happy
Lol

तू उगीच पिक्चर न बघता भारंभार प्रतिक्रिया देऊ नकोस रे. त्यांची काहीच किंमत राहत नाही >>> Rofl

चालू द्या तुमचं सकाळी सकाळी .... मजा येतीये

रितिकच्या अंगातून अभिनयातून "जादू"चे भूत कधी जाईल तेव्हा सुदिन असेल.
धूम-२ या एकाच चित्रपटात रितिक हा रितिक दिसला आहे वागला आहे. बाकी सगळ्या चित्रपटात "कोई मिल गया" मधल्या लहान मुलाची आठवण आणून देतो.
रितिक ने सर्वात आधी स्वतःच्या केसांची स्टाईल बदलावी. तो नाचताना त्याच्या डोक्यावरचा कोंबडा सुध्दा नाचतो. त्याला बघावे कि याला बघावे या संभ्रंमात लोक पडतात.
असाच "केसांचा कोंबडा" आधी अजय देवगण नाचवायचा. ज्या दिवशी त्याने बदलला लोकांनी त्याच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.

धनि.
चित्रपट ५०% ट्रेलर मधून दाखवला आहे. उरलेल्या ५०% साठी चित्रपटगृहात जाणे ऋन्म्याला पटणार नाही Biggrin

हेअर स्टाईल किंवा नाचाच्या संदर्भात 'हृतिक' आणि 'देवग्न'ची तुलना करणे म्हणजे गाण्याच्या संदर्भात 'सोनू' आणि 'हनी'ची तुलना करण्यासारखं आहे.
__/\__

नाच नाही हो... केसांचा कोंबडा नाचवणे बोललो. अजय चा नाच आणि रितिकचा नाच कुठे तुलना तरी होऊ शकते का ? Uhoh
एक वेळ सन्नी देओल आणि अजय यांच्या नाचाची तुलनात्मक चर्चा मायबोलीवर केली तर चालेल

२००२ साली "भगत सिंग" या चित्रपटासाठी त्याने हेअरस्टाईल बदलली होती. तेव्हा पासून त्याच्यात बदल आला.

हृतिकची आणि अजय देवगणची हेअरस्टाईल तुलना करायला हरकत नाही. कारण हृतिकची हेअरस्टाईल सुद्धा काही खास नाही. कोंबडा तर देवानंदला शोभायचा. त्याच्या चॉकलेट हिरो लूकला सुद्धा आणि त्याच्या डिस्को गरबा नाचाला सुद्धा.

आणि लोकहो, जास्त खुश होऊ नका. शनिवार रैवारी मी पिक्चर बघून आलो की सोमवार पासून किती लिहितो त्याचे टेंशन घ्या..

हे मात्र अति होतंय राव
रुंम्याला तुम्ही
तू उगीच पिक्चर न बघता भारंभार प्रतिक्रिया देऊ नकोस रे. त्यांची काहीच किंमत राहत नाही >

असे म्हणताय, उद्या विषयाची माहिती न घेता भारंभार धागे काढू नकोस म्हणाल. का बिचार्याच्या पोटावर पाय आणताय.

आरे बास रे...
काबिल बद्दल बोला, ऋन्मेष बद्दल नको. Happy

कोंबडा तर देवानंदला शोभायचा. त्याच्या चॉकलेट हिरो लूकला सुद्धा आणि त्याच्या डिस्को गरबा नाचाला सुद्धा. >>> आ, देवानन्द कधी डिस्को गरबा नाचला?

तू उगीच पिक्चर न बघता भारंभार प्रतिक्रिया देऊ नकोस रे. त्यांची काहीच किंमत राहत नाही

तो नाही का जरासा मानेला झटका देत, डोक्यावरच्या कोंबड्याला झिणझिण्या आणत, गरब्यासारखे पदलालित्य दाखवत, एका हाताची टाळी वाजवत डिस्को गरबा नाचतो कधीमधी..

आता आपण पाकिस्तानबाबत मवाळ होऊया - राकेश रोशन

------
नशिब हे शाहरुख ने बोलले नाही. अन्यथा रईस पार डब्यातच घातला असता. Wink

Pages