सोनी टीव्ही: पेशवा बाजीराव मालिका

Submitted by निमिष_सोनार on 24 January, 2017 - 05:09

सोनी TV वर हिंदीतून २३ जानेवारी २०१७ पासून रोज (सोम-शुक्र) संध्याकाळी ७:३० वाजता भव्य दिव्य "पेशवा बाजीराव" मालिका सुरु झाली आहे. पहिला एपिसोड मी बघितला. एका तासाचा होता. मला खूप आवडला. एखादा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट बघतोय असेच वाटत होते.

उत्तम आणि श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत. कलाकारांचा अभिनय छान वाटला. एडिटिंग टाईट आहे. कथा रेंगाळत नाही! यात घटना खूप नाटकीय पद्धतीने पेश केल्या आहेत तरीही त्यामुळेच बघायला इंटरेस्ट वाटतो नाहीतर मग अशा ऐतिहासिक कथा डॉक्युमेंटरी वाटण्याची भीती असते.

ज्यांनी पहिला एपिसोड बघितला आणी जे पुढेही सिरीयल बघणार असतील ते या लेखाला पतिसाद देऊ शकतात, चर्चा करू शकतात. त्यानिमित्ताने ऐतिहासिक ज्ञानात भर पडेल. एक उत्तुंग मराठी ऐतिहासिक व्यक्तिरेखा एका आघाडीच्या राष्ट्रीय वाहिनीवर दाखवण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ आहे आणि ही एक चांगलीच गोष्ट आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी वर "बाजीराव मस्तानी" मालिका आली होती. ती सुद्धा छान होती.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रोमो मध्ये एक कोणी बाई धुणे धूत होती व एक मुलगा तिच्या बरोबरीने तलवार परजत होता. एक माणूस म्हणतो सबसे ब डी पा ठशाला तो उसकी आई होती है एक बच्चे के लिये. हे फार धेड गुजरी वाट्टॅ आहे. शिवाय ती तलवार इतकी लवचीक आहे. ते काही पटले नाही. इथली मस्तानी कोण असेल? गोड असावी. आज घरी जाउन बघीन अ‍ॅप वर. तुम्ही रोज अप्डेट लिहणार का?

दुसरा भाग बघण्या आधी पहिला बघाच. तुम्ही निराश नक्की होणार नाहीत. आणि धेड गुजरी भाषा येणारच कारण पार्श्वभूमी मराठी आहे आणि सिरीयल हिंदी! थोडा ड्रामा आहे, पण चालतं! बघू पुढचे एपिसोड कसे असतात ते! सासू सुनेच्या सिरियल्स पेक्षा हे बघणे केव्हाही चांगलेच ना!

तशी लवचीक तलवार असते पण त्याला तलवार म्हणत नाहीत बहुतेक दांडपट्टा म्हणतात. मला नक्की माहित नाही.

>>> एक माणूस म्हणतो सबसे ब डी पा ठशाला तो उसकी आई होती है एक बच्चे के लिये. हे फार धेड गुजरी वाट्टॅ आहे. <<<<
क्का म्हणून वाट्टय तस?
अन आम्ही म्हणले की मराठीमध्ये हिंदी/इंग्रजी शब्द नकोत, तर तेव्हा मात्र सोय आठवते.
मग इथे हिंदीमध्ये मराठी शब्द घुसडवुन प्रसिद्ध केला तर लग्गेच धेडगुजरी का वाटावे?
स्वभाषेबद्दलचा हा निव्वळ न्यूनगंड बरे !
होऊदेत की हिंदीमालिकांमधे मराठी शब्दांचि रेलचेल.... बिघडतय काय कुणाचं?

काल पहिला भाग बघितला. कास्टिंग आवडलंय. पल्लवी जोशी खूप दिवसांनी दिसतेय. अनुजा साठे गोखले आवडतेच Happy लहानपणीचा बाजीराव प्रोमोज मध्ये आवडला होता. अजून काही दिवस बघेन Happy

यात काशिबाई superdancer show मधली दिपाली बोरकर आहे असे वाचले होते पेपरमध्ये...

लहानपणीचा बा़जीराव ' रुद्र सोनी' आहे त्याने संलीभ च्या ,' बाजीराव मस्तानी' मध्ये नानासाहेबचं काम केलं होतं.
सिरियल मस्त वाटतेय , सेट्स मस्त वाटतात, कपडेपटांकडे थोड्ं लक्ष द्यायला हवं .

शिवाय ती तलवार इतकी लवचीक आहे. ते काही पटले नाही. >>> अमा बहुतेक दांडपट्टा म्हणतात त्याला.

कपडे अगदी वाईट नाहीत (ब्राह्मणी पद्धतीच्या नसल्या तरी अगदीच पॅण्ट सारख्या दिसणार्‍या नव्वारी नाहीत) पण बाजीरावाची आई कायम केस मोकळे सोडते ते नाही बरोबर वाटले. गावाचा सेट चांगला होता पण "चिपळूण" नाही वाटले ते !!
लहान शिवाजी राजांनी इतकी गुळगुळीत दाढी अन पार साफ केलेली मिशी चांगली दिसली नाही Happy सोळा वर्षांचे दाखवायचे तर दिसू देत की मिसरुड फुटलेले !

भयाण सिरीयल आहे आणि बरोबर उचलली आहे कारण बाजीराव मस्तानी विवाहबाह्य सबंध, घरचे राजकारण आणि कट कारस्थान
सगळे सासू सुनाचे सिरीयल फक्त ऐतिहासिक साज लेव्युन येणार. अशोक कुणी बघत होता का?
सिनेमटीक लिबर्टी च्या नावाखाली काय वाट्टेल ती थेर दाखवणार याची खात्री आहे.

जर माझा अंदाज खोटा ठरला तर मी निर्मात्यांना पत्र लिहून माफी मागेन. आणि याची शक्यता नाहीच

मरथि शब्द तक्तत चन्ग्ले आहे... कशल उगच इकदे निशेध नोन्दव्तय... धेद गुजरि म्हने...
चन्ग्ले आहे न... नोन मराथि लोकना मरथी शब्द कल्तिल...

limbutimbu++१

नॉन मराठी जाऊ दे, इथे मराठी लोकांना तुम्ही मराठी सदृश काय लिहीता ते कळेना झालंय, त्याचे काय करणार

मेरे लिये बाजीराव पेशवा बोले तो वन्ली रणवीर सिंग असं झालंय. Happy

सिरेल बघणार नाही. कारण घरी झी शिवाय कुठलंही चॅनेल लागत नाही. पण प्रोमोमधे तो मुलगा छान वाटला.

हठी नही तो मराठी नही मधे हठी म्हणजे काय? हट्टी का?

मी अ‍ॅप वर सर्व आठवड्याचे एपिसोड वीकांताला बघते. ते अ‍ॅप मेन कपिल शो साठी आहे. एकूण बाजीराव प्रकरणाचा ओवर्डोस झाल्यासारखे वाट्ते आहे. तेच तेच
परत परत काय बघायचे. त्या ऐवजी शोध कादंबरीचे रूपांत् र ण करायला हवे. बाल बाजीराव मोठा होउन मस्तानी आली की बघू. तोपरेन्त रोज कढी भात खाल्ला आणि दां ड
पट्टा ते काय बघायचे. पुणेरी माणसाला पेशव्यांचे काय अपरूप? पर्वती चढून येते.

इथे मराठी लोकांना तुम्ही मराठी सदृश काय लिहीता ते कळेना झालंय, त्याचे काय करणार>>>> Lol
ती मराठी नाही , ती मोडीलिपी आहे>>>> Lol

श्री, तुमच्या स्माईल्या कशा काय उमटतात? Uhoh

सस्मित , ती स्मायली कंप्युटरवर सेव्ह करुन मग माबोवर अपलोड करा , तुम्ही फोटोज अपलोड करता तसे आणि मग जेव्हा पाहीजे तेव्हा इमेजवर क्लिक करुन हवी ती स्मायली प्रतिसादात द्यायची.
happy0002.gifhappy0008.gifhappy0009.gif

शिवाय ती तलवार इतकी लवचीक आहे. ते काही पटले नाही. >>> अमा बहुतेक दांडपट्टा म्हणतात त्याला>>>>>
तो दांड्पट्टाच आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचे ते आवड्ते शस्त्र असल्याचे वाचलेय कुठेतरी.

२६ जानेवारीच्या एपिसोड मधील तिन्ही बालकलाकारांचा (बाजीराव, त्याचा भाऊ चिमणाजी आणि बहिण) सहज सुंदर आणि उत्स्फूर्त अभिनय खूप आवडला. मनीष वाधवा (बालाजी भट) हा कलाकार मराठी नाही तरीही त्याचा अधून मधून येणारा "हो" आणि "सरकार" या शब्दांचा मस्त मराठमोळा उच्चार एकदम दाद देण्याजोगा!

मनीष वाधवाचा २५ तारखेच्या एपिसोड मधील एक संवाद छान लिहिलाय:
"संस्कृती ही साचलेलं डबकं किंवा विहिर नसून ती एक प्रवाही नदी असते जी सतत आपले रूप बदलत असते!" वगैरे वगैरे!

मला तिघांच काम जाम आवडलं , भावांमधली सिबलिंग रायव्लरी आणि परक्याने त्रास दिल्यावर तेवढ्चं घट्ट नातं छान दाखवलयं. छोटी भिउ तर कमालीची गोड आहे, आणि मोठ्या भावावर ती चा प्रचंड विश्वास आहे. ' तोते उड गये' अशी छोटी वाक्य आणि हावभाव मस्त जमलीत.

हि सिरीयल पहिली नाही पण ट्रेलर मध्ये जे शस्त्र आहे ते दांडपट्ट्या सारखा आहे, पण दांडपट्टा नाही. जुन्या काळी वापरात असलेले पट्टे इतके लवचिक कधीच नव्हते. अश्या लवचिक पट्ट्याने फारतर फार फळं आणि भाज्या कापता येतील पण अखंड माणूस मारता येणार नाही. खरंतर सळसळत्या पात्याचा असं शस्त्र दक्षिण भारतातील प्रसिद्ध खेळ 'कलारी पय्यातू' मध्ये आजही वापरतात, तिकडे त्याच 'अरुमी' असं नाव आहे.

दांडपट्याचा पात साधारतः दिड हात लांब असायचा (जवळजवळ २७ ते ३० इंच लांब) शिवाय पट्ट्याला जी मूठ ज्याला खोगळा म्हणतात त्यामध्ये हाथ घालून वार करावे लागत, मनगट बंदिस्त असल्याने तलवारी च्या वापरासारखी सहजता पट्ट्या मध्ये नव्हती. दंडा मध्ये असलेल्या ताकतीचा जोरावर वार करावा लागत असे म्हणून तलवार चालवण्यात पटाईत माणसाचं दांडपट्याला हाथ घालत. पट्टा चालणाऱ्याला पट्टेकरीं म्हणत, आणि निष्णात तलवार बाजाला 'धारकरी'.

लाठी जवळ असणारा एकटा मनुष्य ५ -१० मनुष्यावर भारी असे,
तलवार जवळ असणारा मनुष्य ५ -१० लाठी वाल्यानंर भारी असे,
आणि पट्टा जवळ असणारा एकटा मनुष्य ५ -१० तलवार वाल्या मनुष्यावर भारी असे.

तोफखान्यातून अगदी तोफेसारखा माहितीचा खजिनाच बाहेर आला. खूप खूप आभार आणि धन्यवाद ही सगळी माहिती शेअर केल्याबद्दल!

Pages