रस्त्यावरचे आकस्मिक भांडण: एक प्रचंड मन:स्ताप...

Submitted by एक मित्र on 20 January, 2017 - 02:27

काल एक प्रसंग घडला. असे प्रसंग माझ्या आयुष्यात काही महिन्यातून एकदा घडतातच. पण त्याचे मनावर इतके वाईट डाग पडतात कि अनेक दिवस त्यातून बाहेर येता येत नाही. ते आठवले तरी मनाची प्रचंड चरफड होते. एरवी ज्यांची आपले जोडे सुद्धा पुसायची लायकी नाही असले नीच आणि हलकट लोक आपल्याला सहजगत्या अपशब्द बोलून गेले आणि आपण काहीच करू शकलो नाही हे आठवल्याने मनाचा संताप संताप होत राहतो.

झाले असे कि मी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला चाललो होतो. कारमध्ये बरोबर ऑफिसमधली एक सहकारी मैत्रीण होती. सकाळी आठ-साडेआठची वेळ असेल. रस्त्यावर फार वर्दळ नव्हती. इतक्यात डाव्या बाजूची पण माझ्या बरीच पुढे असलेली एक गाडी (टेम्पो ट्रॅक्स असावी) अचानक थांबली. सिग्नल वगैरे काही नव्हता. मुळात तो चौक पण नव्हता. त्यामुळे पुढे असलेले डाव्या बाजूचे वाहन का थांबले याची फिकीर करायची मला काही गरजच नव्हती. मी आपला माझ्या स्पीडने माझ्या लेन मधून तसाच पुढे जात होतो. डाव्या बाजूला उभ्या राहिलेल्या त्या टेम्पो ट्रॅक्सच्या पुढे आता मी जाणार इतक्यात एक उपटसुंभ (हाच तो हरामी) आपली फडतूस बाईक घेऊन त्या टेम्पो ट्रॅक्सच्या पुढून थेट आडवा माझ्यापुढे आला. मी करकचून ब्रेक दाबला. नशिबाने माझ्या कारचा स्पीड जास्त नव्हता नाहीतर तो जाग्यावरच गचकला असता (एका अर्थाने ते बरे झालेही असते. असले हलकट लोक जगून करायचे तरी काय? दुसऱ्यांना त्रास देत जगत राहणार. असल्या भिकार**ना एकत्र करून कुठेतरी लांब नेऊन जाळून टाकायला हवे खरे तर). पट्कन मी ब्रेक दाबल्याने बेसावध असलेली माझी सहकारी मैत्रीण समोर केवळ आदळायचीच बाकी राहिली होती. मी पण कसाबसा स्टीअरिंग पकडून स्वत:ला सावरले. क्षणार्धात घडलेल्या या प्रसंगाने दोघे पण हबकून गेलो. मी प्रचंड रागात त्या इसमाकडे पाहू लागलो. राग येणे स्वाभाविक आहे. पण मुजोर वृत्ती त्याच्या नसानसात भरलेली. पैदाइशच तशी असावी. डुक्कर घाणीतच लोळणार. तसे काही लोक शिकत नाही. आपली मूळ वृत्ती धरूनच राहतात. स्वत:ची चूक झालेली असूनही केवळ मी रागाने पाहत आहे म्हणून माझ्या कारच्या आडवी बाईक लावून हातवारे करून मला काहीतरी बोलू लागला. मी पूर्ण दुर्लक्ष केले. पण मी प्रतिकार करत नाही म्हणून त्याला जोर चढला. माझ्या कडे पाहून त्याने शिव्या दिल्यासारखे तोंड हलवले.

मग मात्र माझी सटकली. काहीही चूक नसताना माजोरडे पणा आणि वरताण म्हणून शिव्या पण खायच्या? मग मी पण त्याला तसेच हावभाव करून प्रत्युत्तर दिले. तर तो बाईक आडवी उभी करून तावातावाने माझ्या गाडीजवळ येऊ लागला. बरोबर मुलगी असल्याने मी फार काही प्रतिकार करू शकणार नाही असे त्याला वाटले असावे. पण मी पण त्याला न जुमानता दार उघडून बाहेर त्याच्याशी दोन हात करायची तयारी केली. तितक्यात मैत्रीण म्हणाली, "दार उघडून बाहेर जाऊ नकोस. तो चांगला वाटत नाही. ह्या भागात भुरटे गुंड आहेत. त्यांच्या खिशात काहीही हत्यार असते." तिचे म्हणणे मनाला पटले. पूर्वी पण अशा किरकोळ वादावादीतून खून पडल्याचे ऐकले होते. मी कसे बसे स्वत:वर नियंत्रण मिळवले आणि हाताने त्याला, "चल फूट इकडून मा***त" असे काचेतूनच खुणावले. तो अजून चवताळला. ओरडून शिव्या देऊ लागला. अशा प्रसंगी हे हिणकस लोक कारला बाहेरून लाथा मारणे किंवा खिडकीच्या काचेवर जोरजोरात थपडा मारून बाहेर यायला उद्युक्त करतात असा माझा पूर्वअनुभव आहे. पण याने तसे काही केले नाही. थोडा वेळ आरडाओरडा केल्यावर तो तिथून निघून गेला. तशी मी पण पटकन काच खाली करून त्याच्या दिशेने "हाड रे कुत्र्या. हरामी" वगैरे ओरडून थोडी भडास काढली. पण बरोबर सहकारी मुलगी असल्याने त्याच्या शिव्यांना तसेच प्रत्युत्तर देऊ शकलो नाही याचे खूप वाईट वाटले.

नंतर मी ऑफिसला आलो. पण सकाळी सकाळी आपली काहीही चूक नसताना घडलेल्या या प्रकाराने दिवसभर मन अस्वस्थ होते. कामात लक्ष लागत नव्हते. चूक नसताना एका हिणकस दर्जाच्या हलकटा कडून मैत्रिणी समोरच शिव्या खायची वेळ आली हि गोष्ट मनाला दिवसभर खूप बोचत राहिली. अजूनही बोचते आहे. ढेकूण चावल्यावर त्या जागी प्रचंड आग आग होते. तशी इथे हा दलदलीतला किडा चावल्याने मनाची आगआग झाली होती. नक्कीच तो काही कामधंदे न करणारा भुरटा गुंड असणार. कामधंदे करणारा असता तर अशी भाषा याने वापरली नसती. कुणाच्या तरी चुकीमुळे अशा औलादी कुठल्यातरी गटारात जन्माला येतात. काही कामधंदे न करता आयुष्यभर गुंडा मवालीगिरी करत इतरांना त्रास देत जगतात. आमच्या करावर यांना आम्ही पोसायचे. आणि हे वर आम्हालाच शिव्या देणार. आणि एकदिवस कुठल्यातरी गटारातच मरणार. हे लोक जिवंत ठेवायचे तरी कशाला? असले काहीबाही विचार माझ्या मनात दिवसभर येत राहिले. ह्या प्रवृत्तीच्या लोकांना मनातून प्रचंड शिव्याशाप देत दिवस गेला. ह्यांच्या पिढ्या तडफडून मरायला हव्यात. नामोनिशान नष्ट व्हायला पायजे ह्या हरामखोरांचे. इत्यादी इत्यादी शिव्याशाप मन दिवसभर देत होते. मनाची प्रचंड चरफड सुरु होती. अजूनही सुरूच आहे. ती पूर्ण शमायला अजून काही दिवस जातील.

असो. पण वर सुरवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे माझा एक अनुभव आहे. माझ्या आयुष्यात काही महिन्यातून किमान एकदा तरी अशा रस्त्यावरच्या वादावादीला सामोरे जायचा प्रसंग माझ्यावर येतोच असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. मला एक गोष्ट कळत नाही कि हे केवळ माझ्याबाबतच घडते कि सर्वांनाच असे अनुभव येतात? तुमची चूक नसतानाही केवळ तुमच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन कोणी असभ्य भाषेत तुम्हाला शिव्या देऊ लागले तर तुम्ही काय करता? खरोखरच या प्रश्नांची उत्तरे मला हवी आहेत. कारण मला खात्री आहे अजून सहा एक महिन्यात किंवा वर्षभरात मला काहीही ध्यानीमनी नसताना अचानकपणे अशाच अजून एखाद्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे.

Group content visibility: 
Use group defaults

सस्मित, स्टेजवरच्या खुर्चीवरुन नै कै.. स्टेजसमोर पहिल्या रांगेतल्या खुर्चीवरुन उठवलेले ते हेच.

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार. लिहिताना जरा तडका जास्त पडला आहे. त्यामुळे ठसका लागला असेल तर सॉरी. पण त्या अज्ञात व्यक्तीबाबत साठून राहिलेली वाफ मोकळी करायचीच होती. अर्थात धागा काढायला ते मुख्य कारण नाही. दु:ख आणि मनातली सल वाटल्याने हलकी होते. म्हणूनच असे काही घडले कि मी कोतबो मध्ये येऊन तुम्हा सगळ्यांना सांगतो. जेंव्हा लिहून पोष्ट केले तेंव्हाच पन्नास टक्के धगधग कमी झाली. तुम्हा लोकांचे प्रतिसाद वाचून उरलेली पन्नास टक्के गायब झाली. आता मन पूर्ण शांत झाले आहे.

तुम्हा सर्वांचे खरोखरच खूप खूप आभार.

@कावेरि, जिज्ञासा, दक्षिणा, अमा, सुलक्षणा, मानव पृथ्वीकर, atuldpatil ... तुम्ही सगळे खरेच खूप मोलाच्या गोष्टी बोलून गेलात. माझ्यासाठी हि मोठी ठेव आहे.

@श्री: मी तुमच्या प्रश्नाला वरती उत्तर दिलेच आहे Happy

@सिंथेटिक जिनियस: हि भीती त्या माणसाला पण हवी ना?

@केदार जाधव: तसे काही नाही रे भाऊ. गाव सोडून आला काय आणि लोकल असला काय. ज्याच्याकडे हाणामारीला वेळ आहे तो हे बघत बसत नाही.

@ऋन्मेऽऽष: तुला गर्लफ्रेंड(स) आहे(त) असे मी तुझ्या एका धाग्यावर वाचले आहे. (आपण समवयस्क आहोत असे मला वाटते म्हणून तुला अरे तुरे. माइंड नकोस करू प्लीज). बोलायला सगळे तत्वज्ञान सोपे आहे रे. प्रत्यक्षात वेळ आली आहे का कधी? मैत्रिणीसमोर कोणी बोलले कि किती टोचते अनुभवले आहेस का कधी? संयम वगैरे ठीक आहे. म्हणूनच तर कित्येक महिन्यातून एकदा हे घडते माझ्याबाबत. पण चोवीस बाय सात सारखे संयमाची बंदूक धरून सावध बसता येत नाही ना. काहीतरी टेन्शन असते, डोक्यात विचार असतात, आपण नकळत बेसावध राहतो. आणि नेमके तेंव्हाच असला एखादा गटारीतला डास येतो आणि टाळ्या वाजवायला लावतो. साला एक मच्छर संयमी आदमी को हिजडा बनाता है.

@maitreyee: गाडीच्या पट्कन आडवे येणे हि चूक नाही का? माझ्याकडून अशी चूक झाली असती तर मी अशा उलट्या बोंबा मारल्या नसत्या. कारवाल्याला सॉरी म्हणालो असतो. हाच फरक आहे आम्हा दोघांत. तुमच्या आयुष्यात वादावादीचे प्रसंग कधीच येत नाहीत किंवा आलेले नाहीत असे तुम्हाला सांगायचे आहे का?

@च्रप्स: अमेरिकेत बसून लिहिलेला तुमचा सल्ला खूपच मार्मिक आहे. खूप खूप हसलो. पण नाही हो. व्यवहारिक नाही ते. तुम्ही काही म्हणा.

@नानाकळा: तुमचा सल्ला अप्रतिम. मुद्दे स्पेसिफिक आहेत. मी नोंद करून ठेवत आहे. त्याचा मला नक्कीच फायदा होणार आहे. येणाऱ्या काळात असा प्रसंग उद्भवलाच तर कसे react करायचे ते तंतोतंत सांगितलेत. हे सोशल मेडीयावर शेअर करण्यासारखे आहे. तुमची हरकत नसेल तर तुमच्या नावासहित करेन. पण शेवटच्या ओळी थोड्या पटल्या नाहीत. धागा काढून फणफण मल्टीप्लाय नाही झाली. कमी झाली. पण अगदी शेवटचे वाक्य मात्र पूर्ण सहमत.

@मंजूताई @Nidhii @सस्मित: ऑफिसात जर कुणाशी माझे वाजले कि काही मुली लांबून माझ्याकडे बघून कुजबुजत असतात. त्या नक्की काय कुजबुजत असतात याची आजवर मला नेहमी उस्तुकता असायची. तुमच्या प्रतिक्रियांमुळे आज ते कळले. धन्यवाद. "हाच गं तो परवाचा" असेच काहीतरी त्या म्हणत असाव्यात नक्कीच Happy

हे सोशल मेडीयावर शेअर करण्यासारखे आहे. तुमची हरकत नसेल तर तुमच्या नावासहित करेन.
>> नक्की करा. जेवढा जास्त प्रचार तितकी कमी भांडणे होतील रस्त्यावर... Happy

पण शेवटच्या ओळी थोड्या पटल्या नाहीत. धागा काढून फणफण मल्टीप्लाय नाही झाली. कमी झाली.
>> चालायचंच, ते माझं वैयक्तिक मत, पर्सनली घेऊ नका.

पण अगदी शेवटचे वाक्य मात्र पूर्ण सहमत.
>> खूप खूप धन्यवाद!

आत रिलेक्स वाततय ना... झल तर मग...
मी मुद्दम तूम्हाला बर वाटावं म्हणून बोलल...
सगलच शिव्य देता हो अशा वेळी..तुम्ही काह चूक नाही केले... राग बाहर निघनें महत्वाचे..

अरे एक मित्रा, आपल्याला अरेतुरे करणारे बरेच आहेत यासारखा आनंद नाही जगात.

@ संयम, म्हंणशील तर जे मी स्वतः आचरणात आणू शकतो किंवा किमान प्रयत्न करतो तेच सल्ले ईतरांना देतो.
खरे तर मी एक कमालीचा शॉर्ट टेंपर / शीघ्रकोपी मनुष्य आहे. होतो असे म्हणणार नाही, कारण आजही आहे आणि पुढेही राहीन. तो माझा स्वभाव आहे. तो बदलता येणं सोपं नाही. पण स्वभावाला औषध नसते असे म्हणतात ते खोटे आहे. औषध असते. ज्या रोगांना बरे करायचे औषध नसते तेव्हा तो आजार कंट्रोलमध्ये ठेवायचे औषध तरी असतेच. प्रयत्न तर कर.. बाकी नानाकळा यांचे मुद्दे तुला पटले हे छान झाले Happy

मैत्रिणीसमोर कोणी बोलले कि किती टोचते अनुभवले आहेस का कधी?
>>>>
हे आपणच ठरवतो, की आपण सो कॉलड मर्द आहोत आणि आपल्याला मर्दासारखे वागायचे आहे, जश्यास तसे उत्तर द्यायचे आहे.
उद्या माझा असा गर्लफ्रेंडसोबत असताना कोणाशी वाद झाला, एकदम फुल्ल ठस्सन आणि मी काकांची गुप्ती, चॉपर वगैरे काढून राडा करायला निघालो तर माझी गर्फ्रेंडच मला अडवेल आणि म्हणेन, ऋन्मेष तुला माझी शपथ जाऊ नकोस...
कधी त्या मैत्रीणीलाही विचारून बघा तिला कश्या प्रकारचे वागणे अपेक्षित आहे आपल्याकडून...

कधी त्या मैत्रीणीलाही विचारून बघा तिला कश्या प्रकारचे वागणे अपेक्षित आहे आपल्याकडून...>>> व्वा: ऋन्मेष!!! लई भारी म्हटलंत!!! हम तो फिदा हो गए आप पर.

वेल सेड ॠण्मेश अन नानाकळा.

या रोड रेज सारखे प्रकार आपल्या मुंबईच्या लोकल ट्रेनमधे पण अनुभवायला मिळतात. आपली काही चुक नसताना कधी कोण तुमच्यावर आपले frustration बाहेर काढेल सांगता येत नाही, अश्यावेळी स्वःतालाच समजावुन शांत करावे लागते नाहीतर मग जास्त मनस्ताप आपल्यालाच. कारण समोरची व्यक्ती तीला जे करयचे ते करुन शांत झालेली असते आणी तो भार आपण वाहत असतो.

ऑफिसात जर कुणाशी माझे वाजले कि काही मुली लांबून माझ्याकडे बघून कुजबुजत असतात. त्या नक्की काय कुजबुजत असतात याची आजवर मला नेहमी उस्तुकता असायची. तुमच्या प्रतिक्रियांमुळे आज ते कळले. धन्यवाद. "हाच गं तो परवाचा" असेच काहीतरी त्या म्हणत असाव्यात नक्कीच :-)>>>> Lol

ऑफिसतही वरचेवर वाजतं का?

"हाच गं तो परवाचा" असेच काहीतरी त्या म्हणत असाव्यात नक्कीच>> असंच काही नाही, हाच ना तो उठसूठ भांडत असतो किंवा मग किती भांडत असतो हा, असंही काही असू शकतं Happy

अरे बस्स करा...
किति अत्यक कर्यचा लेखकवर ... त्यने फक्त मन मोक्ले केले आहे ... किति चध्तय

च्रप्स Happy

तुमच्या बद्दलचे माझे कुतुहल अजून जागृत झालेय!

स्व अनुभव ....

मला एकदा असा अनुभव आलेला.... त्या वेळी मी मन आणि डोक शांत ठेवल... आणि.. पुढील २ वर्ष मनापासुन मेहनत घेउन जीम केली .... पुर्ण व्यवस्थीत शरीर कमावल...

त्या नंतर असे किस्से घडले.. खुप वैताग आल्यावर एक दोनदा समोरच्याला प्रेमाने समजवायला मी कार मधुन उतरुन बाहेर आल्यावर, समोरचा मला पाहुन थोडी माघार घ्यायचा....

मन आणि डोक शांत ठेवा व व्यवस्थित शरीर कमवा... अस रोड वर कोण नाही नादी लागनार मग तुमच्या...

एक जुना प्रसंग आठवला, कॉलेज ला असताना चा.

आमच्या वरच्या वर्गात एक भाई मुलगा होता, त्याची गर्लफ्रेंड आमच्या वर्गात होती. सुंदर होती, पण जरा लबाड होती
आमचा एक मित्र तिच्यावर खुश होता, आम्ही त्याला समजावयचो की बाबा जपून
भाई मुलगा लोकल मराठी आमचा मित्र अमराठी श्रीमंत.
एकदा ह्याने तिला सांगितलं मला तुझ्याशी platonic friendship करायची आहे की काहीतरी,
तिने जाऊन तिच्या बॉयफ्रेंड ला सांगितलं.
मग काय, एकदा मित्र आणि मी दोघे कॉलेज कॉरिडॉर मधून येत होतो आणि तेवढ्यात तो भाई आणि त्याची २-३ मित्र मंडळी, आम्हाला घेरलं, समोर भाई आणि एक आणि मागे दोघे उभे.
आणि मग सुरुवात, आई बहीण इत्यादी इत्यादी, मित्र पण हिरोगिरी करून उत्तरं द्यायला पाहत होता
त्यावेळी मी जवळ जवळ त्या दोघांच्या मध्ये उभा राहिलो आणि मराठी मध्ये सुरुवात केली,
जाऊ दे ना भाई मी सांगतो चुकला मी सॉरी बोलतो इत्यादी
मी मराठी आहे आणि सपशेल शरणागती पत्करली आहे हे पाहून भाई जरा नरम आले
पण त्यावेळी जर हे केलं नसत तर त्याच्याबरोबर माझी ही हाडं मोडली असती नक्कीच
इतकं घाबरलेल मला इतर कधी आठवत नाही Happy

तात्पर्य, इतर लोकांनी सांगितलं आहे तेच, शांत राहा प्रसंग कदाचित टळू शकतो

संयम आणि शांत राहाणे हे शहाणपणाचे आहे.. पण....
प्रत्येक वेळी तस राहता येइलच अस नाही.... जर कोणाला खुम खुमी आलीच दोन हात करायची तर फक्त मनाची नाहीच तर शरीराची पण तशी तयारी ( जीम ला जाउन) ठेवावी... Happy

कारण बर्‍याच वेळी आपली चुक नसताना देखील, समोरचा आपण काही प्रतिकार करनार नाही म्हणुन जास्त भांडण करु वा वाढवु शकतो... आपण स्व:ता सुरवात करायची नाही ... पण कोणि अंगावर आलच तर योग्य प्रतीसाद देता येईल एवढ बळ तरी नक्कीच असु द्याव ....

ऋन्मेष सोबत सहमत आहे मी सुद्धा, तुमच्या वर्णनशैलीतुन 'मी कोण कर्तुमकर्तुम आहे अन एक बाईकवाला मला बोललाच कसा?' हा विषाद जास्त जाणवला.

खरं सांगायचं झालं तर माझ्याकडे कार पण आहे अन बाईक पण म्हणजे अर्थाअर्थी मी महिन्याचे १० दिवस मवाली असतो तर २० दिवस सभ्य माणूस! Proud

>>>> मला एक गोष्ट कळत नाही कि हे केवळ माझ्याबाबतच घडते कि सर्वांनाच असे अनुभव येतात? <<<<<
सर्वांनाच येतात असे अनुभव.

>>>>> तुमची चूक नसतानाही केवळ तुमच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन कोणी असभ्य भाषेत तुम्हाला शिव्या देऊ लागले तर तुम्ही काय करता? <<<<<
एक तर मी स्वतःस कधीच असहाय वगैरे समजत नाही.
असभ्य भाषेला तशाच भाषेत प्रत्युत्तर द्यावे असाही नियम नाही.
समोरच्याच्या "शब्दाने" माझी "सटकून जावी" इतका निर्बुद्ध मी नाही.
मी फक्त काळ वेळ (म्हणजे आजुबाजुला माझ्या बाजुने उभे रहाणारे कोणी असतील वा नाही याचा अंदाज, अन माझ्या हाताशी भांडत बसायला खरोखरच किती वेळ आहे त्याचा अंदाज) बघतो.
जोडीला लिंबी असेल, तर मला फिकीर करायची गरजच नसते.
समोरचा अंगावर येतोय हे गृहित धरुनच बाह्या सरसावुन दोन तडाखे आधीच द्यायची तयारी "कायमच" ठेवलेली असते.
फक्त सहसा तडाखे देत नाही, कारण माझ्या एका तडाख्यात समोरच्याची एखाददोन हाड तुटणार हे नक्की. तेव्हा स्वतःला आवरतो.
असे मूर्ख पावलोपावली असणारच, हा सृष्टीचा नियम आहे वगैरे गोष्टी लक्षात घेतो. Proud
चिखलात लोळणार्‍या डुक्करांबरोबर फाईट द्यायची तर अंगाला चिखल लागतोच, तो लावुन घ्यायचा की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे.
मात्र फाईट द्यायची ठरवलेच, तर ती अंतिम निर्णयापर्यंत पोहोचणारीच असावि असे माझे मत.
मूर्खांसमोरुन दोन पावले माघार घेतली/घ्यावी लागली, तर तो पळपुटेपणा/घाबरटपणा ठरत नाही हे माहित असल्याने अशा प्रसंगानी व्यथित व्हायचे कारण नाही.
रहाता राहिला प्रश्न, सोबतच्या महिला सहकार्‍यासमोर झालेल्या "शोभे"मुळे अपमानित वाटणे, तर त्याचीही फिकीर करण्याचि गरज नाही. कारण महिलांना वासोळ्या नरपुरुषांकडून यापेक्षाही जास्त अपमानास्पद परिस्थितीस नित्यच सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांना अशा निर्लज्जांना किती दुर्लक्षित करावे याची जाण आपल्यापेक्षा जास्त चांगली असते.
अन हे असले प्रकार केवळ "बाईक्वाले" करतात असे नाही, "कारवाले" माजोरी देखिल असले प्रकार करतातच, इतकेच नव्हे, तर कारवाले माजोरडे, बंदुका वगैरे घेऊन धमकवतात, अशा प्रसंगात माणसे मारल्याचे गुन्हे देखिल दप्तरी दाखल आहेत. तेव्हा बाईक्/कारवाले/बसवाले/ट्रकवाले/सायकलवाले/पादचारी असे काहीएक सरसकटीकरण करता येत नाही.

Pages