भाग्यश्री

Submitted by vijaya kelkar on 17 January, 2017 - 02:25

भाग्यश्री

भाळीची चंद्रकोर अमोल ठेवा
आकाशीच्या चंद्रकोरीस वाटावा हेवा

ग्वाड रुपडं अति देखणं
मनमोराचे थुईथुई नाचणं

यजमान फाकडा ,नथीचा आकडा
व हिरवा चुडा ,जो तो पाही होऊन वाकडा

श्रीदेवी सम मुखकमळ हासरे
जली कमळ डोलणेच विसरे

आगळे काळे मणी, खोप्यावर शेवंतीची वेणी
बकुळीहार, तोडे,वाकी ल्याली ऐसी मोजकीच लेणी

पदर सावरून पाऊलउचली हलके हलके
पण चाळ होती वाचाल अन डोळे बोलके

टेकले बोट हनवटीवर, नवलाने पाही आई
वदे== हे राजसबाळे , स्वयंसिध्दा हो माझे बाई

विजया केळकर __

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults