भारतीय जवानाची कैफियत

Submitted by आशुचँप on 10 January, 2017 - 07:46

भारतीय जवानाची कैफियत

आज तेज बहादुर यादव या बीएसएफ जवानाचा व्हिडीयो पाहिला आणि काटा आला अंगावर. आपले जवान कुठल्याही परिस्थितीत पडेल ते काम करत, कमालीच्या विषम हवामानात आपले कर्तव्य बजावत असतात. पण ती यंत्रे नाहीत तर माणसे आहेत याचा जणू वरिष्ठांना विसर पडला असावा आणि अगदीच असह्य झाल्यानंतर त्याने ही कैफियत सगळ्या जगासामोर मांडली असावी.

मला व्हिडीओ बघताना तेच जास्त जाणवत होते की आपल्याच देशबांधवांविरुद्ध, आर्मीच्या सगळ्या शिस्तीच्या आणि कायदेपालनाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस त्याला करावे वाटले या प्रोसेस मध्ये त्याने किती सोसले असेल. कित्येक रात्री तळमळत घालवल्या असतील, संतापाने, असह्यतेने पोखरून निघाला असेल.

त्याने परिस्थितीला वैतागून जीव दिला असता तर त्यावर साधी चर्चाही झाली नसती. वृत्तपत्रात एखादी छोटा कॉलम बातमी आली असती, की जवानाची ताण सहन न झाल्यामुळे आत्महत्या. विषय संपला.

पण त्याने हा मार्ग निवडला. याचे परिणाम काय होतील याची त्याला पूर्ण कल्पना असणारच, कारण व्हिडीओमध्येच त्याने ते सांगितले आहे. आणि बीएसएफने दिलेले स्पष्टीकरण बघता आणि लगोलग घेतलेली अॅक्शन बघता त्याचे म्हणणे किती खरे होते याची जाणिव झाली.

त्याला आता दारूच्या नशेत राहणारा, मनोस्वास्थ्य बिघडलेला ठरवण्याची सुरुवात झाली आहे. अशा जवानाला तुम्ही सीमेवर रक्षण करायला पाठवू कसे शकता हे कुणी विचारू शकत नाही. त्याला हळू हळू इतके खच्ची करतील की पुन्हा कुणी जवान असे धाडस करणार नाही.

एक भारतीय म्हणून मी या सगळयाचा तीव्र निषेध व्यक्त करतो. आता यावर इतक्या उलट सुलट बातम्या येतील की कोण खरे आणि कोण खोटे हे देखील कळणारनाही. पण आज तेज बहादुर यादवच्या पाठीशी उभे राहणारे गरजेचे आहे. इतकी वर्षे आपले जवान खंबीरपणे आपल्या आणि शत्रुच्या मध्ये उभे राहीले आहेत. आज वेळ आलीये आपण त्यांच्या आणि भ्रष्टाचाराच्या मध्ये उभे राहण्याची.

https://www.youtube.com/watch?v=OwWjZ7xlRjU

हाच तो व्हिडीओ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगवेगळ्या नावाने प्रतिसाद देणारी एक व्यक्ती, नुकतीच एका नावाने निधन पावून पुन्हा नव्या नावाने जिवंत झालेली दुसरी व्यक्ती आणि मूळ आयडीने संभावित पण ड्युआयडीने आक्रस्ताळी अशी तिसरी व्यक्ती हे जाणूनबुजून ट्रोलिंग करत आहेत.

काळजी घेऊन भ्रष्टाचार उघडकीस आणणे म्हणजे काय हे माझ्या प्रतिसादात अत्यंत स्पष्ट लिहीलेले आहे. सूज्ञास सांगणे न लगे.

थोड्याफार फरकाने जनरल व्ही के सिंग हे कसे चुकीचे होते हे सांगणारे आज यादवांच्य बाजूने आहेत. तर ते कसे बरोबर होते हे सांगणारे विरोधात आहेत. या दोन्ही बाजूंनी सोशल मीडीया ताब्यात घेतलेला आहे आणि कुठलाही प्रतिसाद ते फक्त याच दोन चष्म्यातून तरी पाहतात किंवा आपल्या किंवा विरोधींअशा दोनच रंगांत रंगवायला पाहत असतात. अशांच्या कुठल्याही प्रतिक्रियेला कितीही आदळआपट/ आक्रस्ताळेपणा केला तरी उत्तर मिळणार नाही.

उघडकीस आणणे आणि संपवणे यात फरक है का नाय भाऊ? कित्येक राजकारणी भ्रष्टाचारी आहेत हे सामान्य लोकांना पण माहिती असते पण न्यायालयात सिद्ध होत नाही तो पर्यंत प्रत्येक जण निर्दोष असतो
>>>>>

मलाही हेच तर म्हणायचे आहे,
ज्या कायदेशीर मार्गाने जायचा हट्ट केला जात आहे त्यानेही न्याय हा मिळत नाहीच. किंबहुना कित्येक केसेस तर उजेडात यायच्या आधीच दाबल्या जात असतील. म्हणजे उजेडात आणायलाही तो मार्ग या सडक्या सिस्टीममधे सेफ नाही Happy

काल
गुल्मर्ग येथे असणारा स्नो वॉर शाळेची माहीती झी न्युज चॅनल वर दिली गेली. जी आज पर्यंत कुठल्याही चॅनलवर आली नव्हती. फार क्वचित भारतीयांना त्याची माहीती होती.

ती शाळा कुठे आहे, तिथे कसे प्रशिक्षण चालते. कोण कोण तिथे शिकत आहे, जवानांच्या मुलाखती, त्यांच्याकडे असणारी साधन सामुग्री, हत्यारे, इ. सर्व इत्यंभूत सविस्तर माहीती काल झी न्युजच्या चॅनल वर दिली गेली.
या आधी ही या चॅनल ने सियाचिन ला जाऊन तेथील जवानांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

हे सर्व गोपनियतेच्या अंतर्गत येत नाही का? इतक्या वर्षात कुठल्याच टिव्ही चॅनलला अशा प्रकारच्या कार्यक्रमाची परवाणगी दिली नसेल. मग आता कुठल्या बेसवर ही माहीती राष्ट्रवादी न्युज चॅनल द्यायला परवाणगी दिली?
Uhoh

स्वतः सैनिक त्रासाची माहीती दिली तर गोपनियतेचा भंग आनि सरकारच्या आवडत्या राष्ट्र्भक्त न्युजचेनल ने सगळी सविस्तर माहीती दिली कि ती गोपनियतेच्या अंतर्गत येत नाही.

काल लुधियाना की अजुन कुठल्या तरी कँटीन मधे कसे जेवन वगैरे बनवतात याचे रिपोर्टींग काही न्युजचॅनलवाले करत होते. आता ते लुधियाना कुठे आणि काश्मिरच्या बेस कॅम्प वरची परिस्थिती कशी याची तुलना कशी काय करत होते हे पाहून संताप ही येत होता आणि हसू ही. फक्त सरकारची बाजू कशी बरोबर आहे याचीच काळजी हे न्युजचॅनल वाले जास्त करत होते.

त्या जवानाच्या बायकोचा मुद्दा मला बरोबर पटला.

इतका वेडा आणि दारूडा असता तर इतका काळ नोकरीला नसते ठेवले ना सरकारने.
आणि पदकं मिळाली नसती ना...

त्याने हे एकट्याने न करता दहाबारा जणांना तरी घेवुन करायला हवे होते. ईतर सैनिकांचा पाठिंबा मिळाला असता तर नक्की हे प्रकरण जास्तं चांगले हँडल झाले असते.

https://readxp.com/news-feed/tej-bahadur-yadav-bsf-jawan-pakistani-faceb...

हे घ्या सध्या आयटी सेल वाल्यांनी भक्तांना हे पसरवण्यास सांगितले आहे.

तेजबहादूरने हीच स्टेटमेंट ३ वर्षापुर्वी दिली असती तर भक्तांनी त्याला परमवीर चक्रच बहाल केले असते. पण आता त्याला देशद्रोही ठरवण्याचे कारस्थान रचले जात आहे.

भक्त कसले भिक्कार वृत्तीचे आहे

कसली हलकट वृत्ती आहे च्यायला, काही दिवसात तो कसा देशद्रोही होता आणि स्वतःच रेशन बाहेर विकत होता आणि ते बाहेर येऊ नये म्हणून स्वतःच आवई उठवली अशी पोस्ट आली तरी आश्चर्य वाटणार नाही.

लखनऊ: उत्तर प्रदेश एटीएसने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीय लष्करातील निवृत्त जवानाला हापूड येथून अटक केली आहे. लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे एटीएसने हाथरस येथून सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या लष्कराच्या जवानाला अटक केली.

सौरभ शर्मा असे अटक केलेल्या निवृत्त जवानाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त जवान शर्मा हा हापूडचा रहिवासी आहे. २०१६ मध्ये तो पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या संपर्कात होता. त्याने लष्करातील गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेला पुरवले होते. पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून त्या मोबदल्यात त्याला पैसे दिले जात होते. त्याची चौकशी केली असता, तो २०१४ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात आला होता. तिने त्याच्याकडे एका घटनेसंदर्भात माहिती मागितली होती.

https://maharashtratimes.com/crime-news/uttar-pradesh-retired-army-perso...

<< सौरभ शर्मा असे अटक केलेल्या निवृत्त जवानाचे नाव आहे. >>

------ सौरभ शर्मा... देशाच्या सुरक्षेच्या संबंधात माहिती शत्रूराष्ट्राला पुरवण्याचे काम करणार्‍यात सर्वात आघाडीवर बाय डिफॉल्ट देशभक्त असणारा धर्म सर्वात आघाडीवर असतो.

पुलवामा मधे तो DSP देवेंद्र सिंह होता.... त्याला अतिरेक्यांसोबतच रंगे हात पकडले... पुढे जामिनही मिळवून दिला...

नगरमधे पण एकाला पकडले होते. पुढे काय होते त्यांचे ?

उदय % किती आहे?
इथे पण चिन आणि पाकिस्तानच्या बाजुने बोलणारे आयडी दिसतातच की!

ध्रुव सक्सेना,माधुरी गुप्ता व काल 4वर्षे पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निवृत्त जवान सुधीर शर्मा या मुस्लिमांना ATSने अटक केली आहे. हे तबलिघी देशासाठी घातक आहेत.

अनाजी पंतुकड्याच्या अवलादी अशाच देशद्रोही कारवाया करत रहाणार आणि केवळ आपल्या जातीचे-धर्माचे म्हणुन त्याचे वंशज चुकांवर पांघरूण घालत देशाचा सत्यानाश करणार.

>>>देशाच्या सुरक्षेच्या संबंधात माहिती शत्रूराष्ट्राला पुरवण्याचे काम करणार्‍यात सर्वात आघाडीवर बाय डिफॉल्ट देशभक्त असणारा धर्म सर्वात आघाडीवर असतो.

हिंदू बहुल देशात सर्वच बाबतीत हिंदू पुढे असणार यात आश्चर्य काय ? पण धर्म आघाडीवर असतो वैगेरे कोरिलेशन विदाऊट कॉजेशन आहे, त्यामुळे चूक.

काही ठिकाणी असे कोरिलेशन आणि कॉजेशन दोन्ही मिळते. त्याचे काय ? तिथेही तुम्ही वर घेतलेला टोन घ्यावा का ?

या 'पतली दाल' ने मागे वाराणासीतून श्री नंरेद्र मोदीं विरोधात लोकसभेची निवडणुक लढवली होती. कोणाला माहिती आहे की या 'पतली दाल'ला किती मते मिळाली होती ?

Pages