माझ्या पाऊलखुणा

Submitted by आनन्दिनी on 9 January, 2017 - 19:20

इथवर कधी आले कळलंच नाही

मागे वळून पाहिलं तर माझ्या पाऊलखुणा
रस्त्यावर पसरल्या होत्या

काही स्पष्ट , काही धूसर ,
मातीवर विखुरल्या होत्या

उद्या यांचा माग घेत कोणी इथे येईल
मी कशी होते हे डोकावून पाहील

सगेसोयरे, गणगोत आणि असेच कुणीही
आणि अवचित कधीतरी तूसुद्धा येशील
सहजच घेतल्यासारखी माझी वही हातात घेशील
पण खरं तर माझ्या वहीत तुझं नाव शोधशील

ओळींवरून जेव्हा बोटं फिरवशील
तेव्हा ओळींच्या मध्येसुद्धा बघशील ना

ओळींच्या मध्ये दडलेलं
माझ्या मनाच्या आरशामागे लपलेलं तुझं नाव
तुला तेव्हा तरी दिसेल ना .....

आनन्दिनी
http://drmadhurithakur.blogspot.co.uk/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

धन्यवाद कावेरी आणि विनिता . खूप वर्षांनी मायबोलीवर परत येणं झालं . कुणी दखल घेतली की नक्कीच छान वाटतं

खूपच सुंदर लिहिले ......
का कुणास ठावूक पण वाचून प्रसंग समोर उभा राहिला...
छान वाटले .... धन्यवाद !!!!!!!!!!!