फटा पोस्टर निकला हिरो ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 January, 2017 - 15:16

नवीन वर्षामध्ये नुकतेच आपण एंट्री केली आहे, म्हणून एक एंट्रीचा धागा ..

फुल्ल बॉलीवूड ईस्टाईल हिंदी चित्रपटात हिरोची एंट्री म्हणजे एक कमाल असते. आपली पब्लिक सुद्धा शिट्ट्या, टाळ्या वाजवत आणि खुर्चीवर उभे राहून हिरोच्या पडद्यावरच्या पहिल्या एंट्रीचे स्वागत करते.

अर्थात तो सीनही तसाच दमदार हवा ..
आणि त्यापेक्षा दमदार त्या हिरोची क्रेझ असावी लागते..

अश्याच एंट्रया गोळा करायला हा धागा..
तर येऊ द्या तुमच्या आठवणीतील शिट्ट्या, टाळ्या आणि उसासे खेचणार्‍या हिरो हिरोईनींच्या एंट्रया..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हृतिक रोशन एंट्री सीन वॉर
काय जबरदस्त दिसतोय
बदाम बदाम बदाम च्या ही पलीकडे...

https://youtu.be/-RuSqMYcQK0?si=iv1o1AyiKkfzmalc

खरे तर काल हा सीन पहिल्यांदा कुठेतरी मी पाहिला आणि त्यामुळे काल रात्रीच शोधून वॉर चित्रपट बघितला

मला तो केजो, यश चोप्रा यांच्या चिकण्या चुपड्या रोमँटिक लुक मध्ये फार काही आवडत नाही.. या स्किनटोन मध्ये खतरनाक दिसतोय.. पूर्ण चित्रपट तसा दिसलाय ..

Pages