फटा पोस्टर निकला हिरो ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 January, 2017 - 15:16

नवीन वर्षामध्ये नुकतेच आपण एंट्री केली आहे, म्हणून एक एंट्रीचा धागा ..

फुल्ल बॉलीवूड ईस्टाईल हिंदी चित्रपटात हिरोची एंट्री म्हणजे एक कमाल असते. आपली पब्लिक सुद्धा शिट्ट्या, टाळ्या वाजवत आणि खुर्चीवर उभे राहून हिरोच्या पडद्यावरच्या पहिल्या एंट्रीचे स्वागत करते.

अर्थात तो सीनही तसाच दमदार हवा ..
आणि त्यापेक्षा दमदार त्या हिरोची क्रेझ असावी लागते..

अश्याच एंट्रया गोळा करायला हा धागा..
तर येऊ द्या तुमच्या आठवणीतील शिट्ट्या, टाळ्या आणि उसासे खेचणार्‍या हिरो हिरोईनींच्या एंट्रया..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओम शांती ओम मधील पहिल्या दिपिकाची एन्ट्री. Happy

मनमोहीनी 'ऐश्वर्या' हम दिल दे चुके सनममधे. Happy

सलमानच्या समद्याच येन्ट्र्या आवरतात मना Blush

पाहुणे कलाकार किंवा मुख्य भूमिका असतानाही चित्रपटात मध्यंतरानंतर किंवा उशिरा प्रवेश असेल तर तो प्रसंग खास असतो. निदान प्रेक्षकांना तरी इतका मोठा कलाकार असा अचानक कसा इतक्या उशिरा कसा काय आला बुवा याचा धक्का बसतो.
>>>>>
फार छान मुद्दा आहे, डिअर जिंदगीमध्ये शाहरूखची एंट्रीही अशी सिंपल असूनही सुखद होती Happy

पिक्चर मधल्या सीन मधे उपस्थित लोकांना आख्खा हीरो आलेला एकदम दिसू शकत असताना फक्त आपल्याकरता उगाचच त्याच्या पायावर क्लोज अप मारून हळुहळू बाकी हीरो दाखवणार्‍या सर्व एण्ट्र्या.

चॉपरने उतरल्यावरही तुम्हे कैसे पता चला मां असे म्हणणारा तो सीन
>>>>>
सपनाजी, तुम्हाला हेलीकोप्टरला उद्देशून चॉपर चॉपर करत होता का.. मला आधी ते भाई लोकांचे सामान वाटलेले.
तुमचा मुद्दा असा आहे का की चॉपरच्या आवाजाने ओळखले, चिटींग केली?
जर हा मुद्दा असेल तर माझ्याकडे याचे उत्तर आहे.

अवो कसल्या तु फुटकळ शाखामृगाच्या आणि सलम्याच्या एन्ट्रया बघताय म्हणतो मी....

ये देखो सुपरस्टार.....

पडदा फाडके नही आसमान फाडके आता है, और पूरा थिएटर खडा हो जाता है

https://www.youtube.com/watch?v=AgKIwnV9Qc0

रजनीकांत अबॉव ऑल आहे. त्याचे इतरांसोबत नाव घेणे म्हणजे.... उपमा नै सुचत. रजनीकांतला विचारायला लागेल.

या धाग्यावर मर्त्यमानवांच्या क्षुद्र योनीत जन्माला आलेल्या पालापाचोळ्यातल्या सुकलेल्या पानांच्या एन्ट्र्या सांगायच्या... रजनी इज रजनी

हमारा एंजल कब आयेगा ..

https://www.youtube.com/watch?v=9cXpoxDXUpg

एक रोमँटीकली फिलोसॉफिकली स्टायलिश एण्ड म्युजिकल एंट्री .... अर्थात आणखी कोण.. भारत की आन बान शान ....

कसले भारी वाटते हे थिएटरला बघताना ..

तेजाब मधली लोटिया पठाण (किरणकुमार ) ची एंट्री. १ २ ३ गाणे चालू असतानाच एकदम मध्येच आंधारातून सावली सारखा येतो आणि कसला जबरी चेहरा दाखवलाय !!

https://www.youtube.com/watch?annotation_id=annotation_4111108771&featur...

तेजाब मधलीच अनिल कपूर ची एंट्री. आंधारात बुटांचा आवाज करत येतो. सगळे लोक मुन्ना भाई आ गये म्हणून पळापळ करतात.

https://youtu.be/xmXgztLZc9k?t=15m24s

अनिल कपूर ची एंट्री - राम लखन मधली. माय नेम इज लखन गाण्याची सुरूवात. ढोल वाजवून मस्त वातावरण निर्मिती केलेली आहे. फुल्ल शिट्ट्या !!

https://www.youtube.com/watch?v=fjEBIVA0U2o

तेजाब मधील तो अनिल कपूरचा अचानक टोन चेंज करत डायलॉग - तुममे से मुकुद बिहारी कौन है? .. हा मला खूप आवडायचा Happy

अरे कसली पेद्रु एंट्री रे ही कखुकग मधली.

वर बर्‍याच जणांनी लिहिलेल्या :

दामिनी मधली सनीची एंट्री
तेजाबमधे अनिल कपूर :इश्शः

सलमानच्या सगळ्याच एंट्र्या. जबरी आणि त्यात पब्लिक शिट्ट्या मारुन थेटर डोक्यावर घेतं तर अजुनच भारी वाटतं.

ते असं लिहायला हवं तेजाबमधे अनिल कपूरची केसाळ एंट्री
>>>
दोस्ताना मधली जॉन अब्राहम ची टकली एंट्री असं म्हणायचं का मग???

गुंडा मधल्या सर्व पात्रांच्या एंट्र्या... >>> येस. आणि त्यांच्या त्या यमकवाल्या इन्ट्रो देणार्‍या ओळी. जणू प्रत्येक अभिनेत्याला सांगितले होते, की तुझ्या कॅरेक्टरची ओळख सांगणार्‍या दोन ओळी तयार कर तोपर्यंत सिनेमात तुझी एण्ट्रीच होणार नाही. त्याप्रमाणे लोकांनी सुचेल ते बनवून आणले.

शाहरुख उसके हर एंट्रीके साथ अपना फेव्हरेट था... है....रहेगा >>>>> +११११११११११११११११११११

K3G मधली entry खास आहे.
आमच्याकडे ह्याच्या उलट आहे. मी घरात पाऊल टाकलं की माझा मुलगा मम्मा करत रूममधून बाहेर येतो.
ती telepathy खरंच खरी आहे माझ्या आणि माझ्या मुलाच्या बाबतीत खूपदा होत. त्याने काही सांगण्याआधीच मला अंदाज असतो.

ये जवानी है दीवानी मधल्या 'बदतमीज दिल' मधली रणबीर ची एण्ट्री ही त्याची त्या चित्रपटातील एण्ट्री नव्हे, पण ती ही मस्त आहे.

लॉरेन्स ऑफ अरेबिया मधील ओमर शेरिफची एन्ट्री. क्षितीजापासून उण्टावर बसून दौडत येणारा , गोळ्या झाडणारा, मोठा मोठा होत जाणारा ओमर शरीफ.

बॉली वूडात लै भ्रष्ट कॉप्या झाल्या त्याच्या ...

https://www.youtube.com/watch?v=il-CWVHDnvU

जवान बघून आलो आणि हा धागा आठवला...
एकाच पिक्चरमध्ये पिता पुत्र झालेल्या दोन्ही शाहरूखच्या दहा बारा डॅशिंग आणि डायनामिक एन्ट्री आहेत.. आणि त्या प्रत्येक एकूण एक एंट्रीला लोक नुसत्या शिट्ट्या टाळ्या.. नुसता माहोल.. आजवर कधी असा अनुभवला नाही

आजवर कधी असा अनुभवला नाही>>>> तीच तर आहे अटलीकुमारची कमाल..त्याचे तमिळ सिनेमे बघा ..ऑलरेडी हे फंडे आहेत त्यात

हो, दिग्दर्शकाची कमाल तर आलीच..
शाहरूखच्या स्टारडमचा एकस फॅक्टर आणि swag चा पुरेपूर वापर ..

याच धाग्यावर लोकं बोलत होती की दाखव शाहरूखच्या dashing dynamic एन्ट्री..

घ्या आता.. एकाच पिक्चरमध्ये दहा दिल्या Happy

Pages