दंगलच्या निमित्ताने - चित्रपटात दाखवली जाणारी भ्रष्ट सरकारी यंत्रणा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2017 - 03:36

चित्रपटात भ्रष्ट सरकारी यंत्रणा आणि उदासीन किंवा माज आलेले सरकारी अधिकारी दाखवले जाणे काही नवीन नाही. विविधतेने नटलेल्या भारताची कित्येक रुपे आहेत आणि त्यातील जे रूप पडद्यावर दाखवायचे आहे ते साकारायचा पुर्ण अधिकार एखाद्या दिग्दर्शकाला आहे. पण तेच एखादा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असतो तेव्हा मात्र संबंधित व्यक्तींबद्दल चुकीचे चित्रण करणे अयोग्य आहे असे मला वाटते. मुख्यत्वे अश्या चित्रपटातून भारताची काय इमेज आपण जगासमोर ठेवतो आहे याचे भान जरूर पाहिजे. चित्रपटाचे बॅनर जेवढे मोठे तेवढे हे भान अधिक ठेवायला हवे. कारण अश्यावेळी चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आणि तितक्याच ताकदीचा असेल तर तो ऑस्करवारी करत जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचण्याची शक्यता असते.

दंगल चित्रपटामधील गीता फोगट आणि बबिता फोगट या बहिणी कमी अधिक फरकाने एकाच ताकदीच्या पैलवान असल्या तरी चित्रपटामध्ये गीतावरच फोकस करण्याच्या नादात तिचा अर्जुन आणि बबिताचा नकुल-सहदेव केला गेलाय असे मला वाटल्याने मी सहज दोघींचे रेकॉर्ड शोधायला घेतले.
पण याबाबत माहिती गूगाळताना मला थोडी आणखी माहीती सापडली, आणि तिने मला संभ्रमात टाकले.

चित्रपटात दाखवलेय की सरकारी कारभार फारच गोंधळाचा आहे. कोच आणि सपोर्ट स्टाफ निकृष्ट दर्जाचे वा उदासीन आहेत. आपले तेच खरे करण्याचा त्यांच्यात एक अहंकार आहे. ट्रेनिंगवर फोकस न करता त्या नावावर थोडीफार मौजमजा चालते. प्रसंगी बेशिस्तपणा खपवून घेतला जातो. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या नावाने बोंब आहे. प्रत्यक्ष कोचिंग ऐवजी बोलीबच्चन देणार्‍या वशिल्याच्या तट्टूंची वर्णी लागली आहे. अशी एकूणच दुरावस्था असल्याने आपल्याला मेडल मिळवता येत नाहीये.

पण मी कुतुहलाने चित्रपटात दाखवलेल्या २०१० कॉमनवेल्थ स्पर्धेतील कुस्ती या खेळाची पदकतालिका चेक केली तर काय आश्चर्य!

कुस्ती या प्रकारात सर्वाधिक १० सुवर्ण आणि एकूण १९ पदके मिळवत आपण सर्वात वरच्या स्थानावर होतो.
आपल्याखालोखाल कॅनडा फक्त ४ सुवर्णपदकांकसह १४ पदके मिळवत दुस‍र्‍या स्थानावर होता.

dangal 1.jpg

मग मी निव्वळ मुलींची पदके पाहिली. तर त्यातही गीता सोबत अलका आणि अनिता नावाच्या आणखी दोन मुलींनी ईतर वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते. तसेच गीताची बहीण बबिता हिने त्याच स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. अजून एकीने रौप्य तर एकीने कांस्य अशी एकूण सहा पदके पटकावत निव्वळ महिलांमध्येही भारतच अव्वल होता.

dangal 2.jpg

अर्थात चित्रपटात दाखवल्याप्रमाणे या सहाही महिलांचा कोच तेव्हा एकच असणार. अर्थात त्याचा या यशात नक्कीच वाटा असणार. तर मग त्यालाही या चित्रपटात व्हिलन बनवायची काय गरज होती? किंवा एकूणच स्त्री-पुरुष दोघांनीही अव्वल कामगिरी केली असूनही आपली सिस्टीमच सडकी आहे असे बोलायची खरेच काय गरज होती?

कारण सरळ आहे, बॉक्स ऑफिसवरील धंद्याचे गणित !

पण चित्रपटातील नायकाला / नायिकेला भारी दाखवायच्या प्रयत्नात आपण आपल्या देशातील कारभाराला पर्यायाने आपल्या देशाला हलके दाखवायची चूक तर नाही ना करत आहोत? ते देखील तसे नसताना !

जर हे असे चुकीचे आणि नकारात्मक चित्रण केले गेले तर उदयोन्मुख खेळाडूंना हुरुप कसा येणार? पुढे हे असे वाढून ठेवलेय या विचारांनी त्यांचे मनोधैर्य आधीच खच्ची नाही का होणार? या नकारात्मक विचारांचा प्रसार झाल्यास येणारी नवीन पिढी खेळांकडे वळणार कशी?

या सर्वात गंमत मला एका गोष्टीची वाटली. मागे आमीरने देशातील वाढत्या असहिष्णूतेबद्दल केलेल्या भाष्यावरून बरेच काही वादळ उठले होते. पण त्याच्या चित्रपटात त्याने जे आपल्या स्पोर्ट्स सिस्टीमवर भाष्य केले आहे, ते खरे खोटे करणारा व्हॉटसपवर एकही मेसेज फिरला नाही Happy

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर एखादा विद्यार्थी गणितात कच्चा आहे का, अशी शंका उपस्थित केली गेली असेल. तर त्याला ईतिहास भूगोलात पैकीच्या पैकी मार्क आहेत हे त्या शंकेचे कसे समाधान असू शकेल.
या पठडीतल्या प्रतिसादांना पास करत ईतर प्रतिसादांना सावकाश उत्तरे देतो.

सिनेमा बघून असे लाईफ डिफायनिंग निर्णय नाही घेत कुणी / किंबहूना घेऊ नये.
>>>>
सहमत. निव्वळ चित्रपट बघून कोणीही निर्णय घेत नाही. पण चित्रपट प्रभावशाली असेल, त्यात जे दाखवले गेलेय त्यावर विश्वास बसला असेल, तर ते कुठेतरी डोक्यात राहतेच. आणि त्याचा इन्फ्लुअन्स आपल्या निर्णयावर होऊ शकतो.
आणि हा तर सत्यघटनेवर आधारीत चित्रपट आहे अशी याची जाहीरात झाली आहे ना.
जेव्हा आपण सीआयडी सारखी मालिका बघतो तेव्हा आपल्या डोक्यात फिट्ट असते की आपण एक मनोरंजनाचा कार्यक्रम बघतोय. यातल्या गोष्टी अतिरंजित असतात.
पण तेच क्राईम पेट्रोल बघत असू तर हे भारतात खरेच कुठेतरी घडलेले आहे, असे आपल्याशीही घडेल हे डोक्यात ठेवून बघतो. त्यामुळे उद्या त्यात अधूनमधून काहीही खोटेनाटे पेरायला सुरुवात केली तरी आपण ते ओळखू न शकल्याने त्यावर भक्तीभावाने विश्वास ठेवणारच. त्यात कोणाचीही खोटी बदनामी केली तर ती खरीच वाटणार.

चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. त्यात त्याने काय दाखवावं, काय नाही हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. निर्माता करोडो रूपये खर्च करतो, त्यामुळे त्याचा ROI सुद्धा तितकाच महत्वाचा असतो.
>>>>
जराही सहमत नाही. पैसे खर्च करतो म्हणून ते वसूल करायला ईतरांबद्दल काहीही दाखवू शकतो का. मुळात पैसे खर्च करतो ते व्यवसाय म्हणून कमवायलाच, किंवा आपली कला दाखवायला. दोन्हीमागे स्वार्थच झाला. त्या स्वार्थातूनच मग हे असे खोटे चित्रण होते.

चित्रपटात जे दाखवलय ते आवडलं का हा प्रश्न एक प्रेक्षक म्हणून माझ्यापुढे असतो आणी ह्या चित्रपटापुरतं त्याचं उत्तर होकारार्थी आहे.
>>>>>
अर्थात मलाही चित्रपट आवडलाच आहे.
कारण ना मी बबिता फोगट आहे ना तुम्ही सरकारी कोच आहात. आपल्या पुढचा प्रश्न त्यामुळे होकारार्थी उत्तर द्यावे असाच आहे.

या पठडीतल्या प्रतिसादांना पास करत >>> थँक्स !!!! नाहीतर विपूत उत्तर द्यावे लागले असते.
>>>
सपना मी आपल्या प्रतिसादापर्यंत अजून पोहोचलो नाहीये. यूट्यूबवर गाण्यांचा आस्वाद घेता घेता सावकाश रिप्लायतोय. आपला प्रतिसाद मी त्या पठडीत टाकलाय हे ठरवायची कृपया घाई करू नका. तो तसा नाहीये. आपली पोस्ट आवडलीय Happy

वशिल्याच्या तट्टूंची वर्णी वगैरेही दाखवलंय का? मला डुलकी लागली असावी तेव्हा नेमकी.
>>>>>
सायो, हे मी खेळाडूबद्दल नाही तर कोच बद्दल म्हणालोय. Happy
आणि हो, हे माझे वाक्य नाहीये, तर आशूचॅम्प यांच्या दंगल धाग्यावरच त्या कोचबद्दल ही मते काही मायबोलीकरांकडूनच व्यक्त करण्यात आली आहेत.
म्हणजे बघा, लोकांना ते खरे वाटून त्या कोचला ईथेही नावे ठेवली गेली आहेत.
नंतर त्या पोस्ट मी ईथे कॉपीपेस्टतो.

पिक्चर बघणं, खायला, फिरायला बाहेर जाणं ही मौजमजा दाखवली आहे त्याबद्दलच बोलतोयस ना?
>>>>>
ती मौजमजा कशी दाखवलीय दिग्दर्शकाने ते बघा.
तिथे अशी मौजमजा चालते, नाचतात, गातात, पिक्चर बघतात, गोलगप्पे खातात, केस वाढवतात....... एकंदरीत कोणी ट्रेनिंगबाबत सिरीअस नसते, आणि यामुळे गीताचा परफॉर्मन्स घसरतो.
पण तेच महावीर फोगट सूत्रे हातात घेतात. गीता खेळावर फोकस करायला केसही कापून टाकते Happy आपल्या कारकिर्दीबाबत सिरीअस होते आणि मग ईतिहास घडतो.

सपना,
तो धागा काळजीपूर्वक वाचला असतास तर आकडेवारी न पाहता गीताच्या कोचची कामगिरी पहायला हवी असे मी लिहील्याचे तुला दिसले असते.
>>>>
सपनाजी आपला काहीतरी गैरसमज होतोय. आपल्या कोणत्या पोस्टला वा विचारांना खोडायला मी हा धागा काढला नाहीये.

कोचने जरी प्रत्यक्षात गीताच्या वडिलांना कोंडून ठेवले नसले तरीही प्रत्यक्षात या कोचमुळेच सुवर्णपदके मिळाली आहेत का हे मला तरी नाही सांगता येणार.
>>>>>
एक्झॅक्टली, हे तर मी देखील सांगू शकणार नाही. ज्याने त्यांना जवळून पाहिले नाही असा कोणीच सांगू शकणार नाही की या कोचमुळे मिळाली आहेत की नाही. भले नसेलही समजा तो तितक्या ताकदीचा कोच, पण व्हिलन होता का? हा प्रश्न आहे. का दाखवला? कोच नव्हे तर सिस्टीमच... ज्यांचा कुस्तीत भारताला सर्वाधिक पदके मिळवून देण्यात वाटा होता..

बाकी आपली ईतर पोस्ट, वर म्हटल्याप्रमाणे ईतिहास भूगोलाचे कौतुक आहे. अर्थात दंगल हा माझा आजवरचा दुसर्‍या क्रमांकाचा क्रिडा चित्रपट झाला असल्याने त्या पोस्टलाही प्लस वन Happy

पहिला क्रमांक आजही चक दे ईंडियाचा आहे !

हे राम,, एवढा मोठ एक्सप्लेनेशन का ?????
मला गरज वाटते मी धागा काढला.बस्स एवढच लिहायच की रे.
>>>
अंकु, मी पर्ररफेक्शनिस्ट आहे Wink

चित्रपट पहिल्यानंतर कोच इव्हिल आहे असे कोणाला वाटले असेल तर ते थोडे हास्यास्पदच आहे
>>>>>
सुमुक्ता, मी शोले बघून अमजद खानला किंवा मिस्टर इंडिया बघून अमरीश पुरीला इव्हिल समजत नाहीये.
फरक आहे Happy

एक प्रश्न सर्वांनाच -

मायबोलीवर गडकरी प्रकरणावरून दोन धागे चालू आहेत.
पुस्तकांमध्ये थोर पुरुषांचा योग्य उल्लेख न केल्याने (मग ते खरे असो वा खोटे हे देखील महत्वाचे नाही) त्यावरून दंगे घडत आहेत.
तेच चित्रपटामध्ये एखाद्याबाबत तो प्रत्यक्षात तसे नसताना दाखवले जातेय, पण तो महापुरुष म्हणून नावाजलेला नसल्याने ते दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य झाले. त्याने मुकाटपणे गप राहायचे.
असे का?

हे महापुरुषांवर पुस्तक लिहिणारे नाही का घेऊ शकत लिबर्टी? Happy

चित्रपट आणि पुस्तकं लिहिणारे महा (आणि सामान्य) स्त्री पुरुषांवर लिहिताना लिबर्टी घेऊ शकतातच. तू पण हे वर लिहिताना लिबर्टी घेतोच आहेस.
एम एफ हुसेन, नथुरामचे लेखक, तेंडूलकर, यादव ते अगदी भन्साळी आणि कु. ऋन्मेष सगळ्याच्या लेखन/ विचार/ अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठींबा.

कु. ऋ. फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य हक्क म्हणून घेताना त्याबरोबर येणार्‍या जबाबदार्‍यांची जाणीव ठेवायचे भान आहे का हे ही बघायला हवं..

दंगल चित्रपटाच्या परीक्षणाच्या आणि चर्चेच्या धाग्यांवर प्रतिसाद येताहेत आणि तिथे श्री यांनी हा "असली दंगल" वर धागा काढलाय तिथे कोणी लिहित नाहीये.... आणि तरी लोकं म्हणताहेत अमुक तमुक घडलेय हे दंगलचे यश Happy

लोकं म्हणताहेत की चित्रपटाला व्यावसायिक यश मिळावे म्हणून सिनेमॅटीक लिबर्टी वापरावी लागते म्हणून कोचला व्हिलन रंगवले,
याचा अर्थ कोचची केलेली बदमानी हा सिनेमाचा सेलिंग पॉईंट असे समजायचे का Happy

>>
>>>>>
ती मौजमजा कशी दाखवलीय दिग्दर्शकाने ते बघा.
तिथे अशी मौजमजा चालते, नाचतात, गातात, पिक्चर बघतात, गोलगप्पे खातात, केस वाढवतात....... एकंदरीत कोणी ट्रेनिंगबाबत सिरीअस नसते, आणि यामुळे गीताचा परफॉर्मन्स घसरतो.>> सॉरीच, पण गीताचा परफॉर्मन्स त्या मजेने घसरतो असं पिक्वर बघून मला तरी वाटलं नाही. ती छोट्या गावातून, वडिलांच्या कडक शिस्तीतून बाहेर पडून शहरातल्या मोकळ्या वातावरणात आली आहे. समवयस्क मुलींबरोबर मोकळी मजा करायला मिळतेय हे दिसलं. तिच्या वडिलांनी शिकवलेली टेक्निक्स आणि कोचने शिकवलेल्या वेगळ्या टेक्निक्समध्ये कन्फ्युज होऊन तिचा परफॉर्मन्स घसरतो असं मला पिक्चर बघून वाटलं.
>>पण तेच महावीर फोगट सूत्रे हातात घेतात. गीता खेळावर फोकस करायला केसही कापून टाकते स्मित आपल्या कारकिर्दीबाबत सिरीअस होते आणि मग ईतिहास घडतो.>> पुन्हा एकदा सॉरी. हे लिहिलेल्याशीही सहमत नाही.

असं मला पिक्चर बघून वाटलं.
>>>>
एखाद्याला असे वाटणे शक्य आहे, पण दिग्ददर्शकाला वर मी नमूद केलेय तसेच दाखवायचे होते. हे वर्षानुवर्षे चालत आलेले सिंपल फिल्मी फंडे आहेत.

"पण चित्रपट प्रभावशाली असेल, त्यात जे दाखवले गेलेय त्यावर विश्वास बसला असेल, तर ते कुठेतरी डोक्यात राहतेच.' - प्रभावी (प्रभावशाली अगदीच हिंदी ईंटु मराठी वाटतं) चित्रपट च कशाला, झी हॉरर शो बघताना सुद्धा 'अरे ते बघ, तुझ्या मागे भूत आहे, असं काय करतोयस वेंधळ्यासारखं' अस ओरडून टीव्ही मधल्या पात्राला सावध करण्याचा प्रयत्न करणारे, तल्लीन झालेले एक काका ओळखीचे आहेत. पण समाजातल्या सर्व थरातल्या बौद्धीक पातळींचा विचार करून चित्रपट तयार नाही होत.

" खर्च करतो म्हणून ते वसूल करायला ईतरांबद्दल काहीही दाखवू शकतो का. मुळात पैसे खर्च करतो ते व्यवसाय म्हणून कमवायलाच, किंवा आपली कला दाखवायला. दोन्हीमागे स्वार्थच झाला. त्या स्वार्थातूनच मग हे असे खोटे चित्रण होते." - काहीतरी मिसिंग आहे ह्या प्रतिवादात . एकदमच समाजवादी आर्ग्यूमेंट आहे. भावनिक आहे. पैसे कमावणं = स्वार्थ वगैरे. पण खर्च वसूल करण्यासाठी ईतरांबद्दल काहीही दाखवलं नसून, एका खेळाविषयी / खेळाडूंविषयी अनास्था, उदासीनता असलेल्या सिस्टीम मधून (कोच, तो फेडरेशन चा आधी चा दाखवलेला माणूस, फोगट चा बॉस ही सगळी त्या सिस्टीम ची प्रातिनिधीक रूपं आहेत.) एका पॅशन मधून, कष्टांतून घडलेल्या खेळाडूंची आणी ती पॅशन त्यांच्यात रूजवणार्या आणी स्वतःदेखील मुलींच्या बरोबरीनं कष्ट घेणार्या कुटुंबाची कथा आहे.

करप्ट सिस्टीम विषयी (खेळांमधलम) उदाहरणं मी क्रिकेटपुरता एक-दोन देऊ शकेन. निरंजन शहा चा मुलगा जयदेव शहा हा सौराष्ट्रा चा कॅप्टन होता आणी गुजराथ लायन्स ने सुद्धा त्याला २० लाख देऊन टीम मधे घेतला. ज्याचा फर्स्ट क्लास मधला बॅटींग अ‍ॅव्हरेज २८ आहे (६७ मॅचेस, २,७९६ रन्स) तो केवळ निरंजन शहा (सौराष्ट्र क्रिकेट चे सर्वेसर्वा) ह्या वडिलांच्या नावावर ईथवर आला आहे. तो सौराष्ट्र क्रिकेट बोर्डावर पदाधिकारी सुद्धा आहे.

लालुप्रसाद यादव चा मुलगा तेजस्वी यादव, शिवलाल यादव चा मुलगा अर्जुन यादव आणी अशी कित्येक उदाहरणं आहेत. त्यामुळे खेळात घुसलेलं राजकारण, किंबहून सर्वच क्षेत्रात असलेला भ्रष्टाचार, लॅक ऑफ कमिटमेंट ह्या गोष्टी एखाद्या सिनेमामुळे अचानक पुढे आल्या आहेत आणी हे धक्कादायक आहे असं वाटणं / म्हणणं मला तरी भोळसटपणाचं (naive) वाटतं.

हल्ली- म्हणजे दोन फुलं एकमेकांवर आपटण्याऐवजी, थेट चुंबनदृश्य दाखवायला लागल्यापासून - प्रतिकात्मक गोष्टी बघून त्यामागची कथा समजून घेण्याचा काळ संपल्यागत झालाय असं वाटायला लागलय.

फेरफटका,
खेळात राजकारण चालते म्हणून तुम्ही प्रत्यक्षात प्रामाणिक माणसालाही त्याच पातळीचे दाखवणार का?

समजा जर महावीर फोगट यांनाच व्हिलन ठरवले असते. स्वत: कुस्तीपटू असून त्यांनी आपल्या मुलींना केवळ मुलगी आहे म्हणून कुस्ती खेळू दिले नाही. तरी मुलींनी कसे वडिलांचा अत्याचार न जुमानता त्यांच्या नाकावर टिच्चून मेडल मिळवले. असे दाखवले असते तरी ते चालले असते का?

किंवा बबिता फोगटने आपली बहिण गीता फोगटच्या यशावर जळून तिचा काटा काढायचे ठरवले असे दाखवले असते. तर ते देखील चालले असते का?

हे सारेच समाजात घडतेच Happy

पैसा कमावणे हा माझ्यामतेही स्वार्थ नाही. पण अतिरीक्त पैसा कमवायला गैर मार्ग अवलंबणे, एखाद्याला खोटेच बदनाम करणे याला मी स्वार्थ समजतो.

ऋन्मेष, एका खेळाविषयी / खेळाडूंविषयी अनास्था, उदासीनता असलेल्या सिस्टीम मधून (कोच, तो फेडरेशन चा आधी चा दाखवलेला माणूस, फोगट चा बॉस ही सगळी त्या सिस्टीम ची प्रातिनिधीक रूपं आहेत.) एका पॅशन मधून, कष्टांतून घडलेल्या खेळाडूंची आणी ती पॅशन त्यांच्यात रूजवणार्या आणी स्वतःदेखील मुलींच्या बरोबरीनं कष्ट घेणार्या कुटुंबाची कथा आहे ह्या चित्रपटात. काही गोष्टी प्रतिकात्मक असतात.

चेहेर्याच्या पलिकडे जाऊन पाहिलं तर ती प्रतिकं दिसतील. कॉपी-पेस्ट मोड ऑन. "हल्ली- म्हणजे दोन फुलं एकमेकांवर आपटण्याऐवजी, थेट चुंबनदृश्य दाखवायला लागल्यापासून - प्रतिकात्मक गोष्टी बघून त्यामागची कथा समजून घेण्याचा काळ संपल्यागत झालाय असं वाटायला लागलय."

बरं, बरं, आता तुला सगळ्यातलं सगळं कळतं म्हटल्यावर प्रश्नच मिटला, नाही का?
>>>>
सॉरी फॉर लेट रिप्लाय सायो, काल आपली एक ओळीची पोस्ट नजरेतून निसटलेली.
चला ईतर सर्व सोडूया, एक प्रतीकात्मक उदाहरण घेऊया.
मला सांगा चित्रपटात आधी तिचे केस कापलेले दाखवणे आणि अकादमीत तिने ते वाढवणे आणि मग क्लायमॅक्स जवळ येताच पुन्हा ते कापणे हे नेमके कशाचे प्रतीक असावे? चित्रपटात हे नक्की का दाखवले असावे? तिचे केस छोटे असतानाचा परफॉर्मन्स चांगला आणि वाढलेले असतानाचा वाईट हा योगायोग होता की दिग्दर्शकाला यातून काही सुचवायचे होते?
(बाकी केस वाढवल्याने खेळावरून फोकस कमी होतो हे एक गंडलेले लॉजिक आहे हे महेंद्रसिंग धोनीने सप्रमाण सिद्ध केले आहे ती गोष्ट वेगळी.)

तसेच,
<<<<तिच्या वडिलांनी शिकवलेली टेक्निक्स आणि कोचने शिकवलेल्या वेगळ्या टेक्निक्समध्ये कन्फ्युज होऊन तिचा परफॉर्मन्स घसरतो असं मला पिक्चर बघून वाटलं.>>>>>>

हे नाही पटले. ती कन्फ्यूज नाही दाखवली. तर ती ठामपणे कोचच्या टेकनिकला फॉलो करते आणि हरते असे दाखवलेय. कोचच्या टेकनिक सिद्ध करायला खुद्द आपल्या वडिलांशी कुस्ती करते तिला कन्फ्यूज कसे बोलू शकता?

पिक्चर बघून मला जे कळलं ते मी वर लिहिलंय. कुणाला पटावंचं असा आग्रह नाही तेव्हा पुन्हा लिहिण्यात माझा वेळ वाया घालवत नाही. असो.

ओके नो प्रॉब्लेम, आपला प्रतिसाद धाग्यासाठी मोलाचा. त्यानिमिताने मला माझे विचार मांडता आले Happy

Pages