नकटीच्या लग्नाला यायचं हं... - झी मराठीवरील नवी मलिका

Submitted by योकु on 1 January, 2017 - 21:26

नकटीच्या लग्नाला यायचं हं... ही मालिका झी मराठी वाहीनीवर १८ जानेवारीपासून चालू होतेय, तर चला त्याबद्द्ल चर्चा, वाभाडे, पिसं काढायला हा धागा... Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मालिकाच बघत नसल्याने मला काही मालिकेबद्दल लिहिता येत नाही.. पण शीर्षकातला शब्द एखादीच्या शारीरिक बाबीबद्दल हेटाळणी करतोय असे मला वाटते. या बाबीमूळे लग्न जमणे कठीण आहे, आता ते कसंबसं जमलंय.. वगैरे छटा दिसतात मला....... तिरस्करणीय वाटते मला हे सगळे.

मी मालिकाच बघत नसल्याने मला काही मालिकेबद्दल लिहिता येत नाही.. पण शीर्षकातला शब्द एखादीच्या शारीरिक बाबीबद्दल हेटाळणी करतोय असे मला वाटते. या बाबीमूळे लग्न जमणे कठीण आहे, आता ते कसंबसं जमलंय.. वगैरे छटा दिसतात मला....... तिरस्करणीय वाटते मला हे सगळे.>>>> ओरिजनल म्हणच तशी आहे,"नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने" हया म्हणीवरुन सिरियलचे शिर्षक बेतलेले आहे.

तसे काही नाही दिनेशदा, ती नकटी दिसायला खुपच छान आहे actually. तिची हेटाळणी वगैरे काही करत नाही कुणी मालिकेत. पण मालिका अतिशय भंगार आहे.

तसे काही नाही दिनेशदा, ती नकटी दिसायला खुपच छान आहे actually. तिची हेटाळणी वगैरे काही करत नाही कुणी मालिकेत. पण मालिका अतिशय भंगार आहे.

मी मालिकाच बघत नसल्याने मला काही मालिकेबद्दल लिहिता येत नाही.. पण शीर्षकातला शब्द एखादीच्या शारीरिक बाबीबद्दल हेटाळणी करतोय असे मला वाटते. या बाबीमूळे लग्न जमणे कठीण आहे, आता ते कसंबसं जमलंय.. वगैरे छटा दिसतात मला....... तिरस्करणीय वाटते मला हे सगळे.>> आवरा.. मालिका बघितली नाही तरिही छटा दिसतात आणि तिरस्करणीय वाटते.. अवघड आहे.. Happy

तसे काही काही पांचट जोक्स सोडले तरी सगळे कलाकार मस्त अभिनय करताहेत आणि त्यांचे (विनोदाचे) टायमिंग चांगले असल्याने ती सिरियल बघायला मला आता बरी वाटायला लागलीय.

आश्चर्य म्हणजे प्राजक्ता माळी जमलीय नकटी बर्‍यापैकी. शशांक केतकर चा भाग चांगला वाटाला सगळ्यात. बाकी मला दोघे आवडले नाही ...
प्रसाद ओकचे विनोद ओढून ताणू केले होते( त्याने अभिनय केला पण तो संडास सीन्स आणि फोन्स वगैरे अति होते).

Pages