नकटीच्या लग्नाला यायचं हं... - झी मराठीवरील नवी मलिका

Submitted by योकु on 1 January, 2017 - 21:26

नकटीच्या लग्नाला यायचं हं... ही मालिका झी मराठी वाहीनीवर १८ जानेवारीपासून चालू होतेय, तर चला त्याबद्द्ल चर्चा, वाभाडे, पिसं काढायला हा धागा... Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्नाची आणि प्रेमाची अशा दोन-दोन बायका - हे जरा अतीच कै०च्या-कै वाटलं>>> त्यात काय नविन? झी मराठीच्या प्रत्येक सिरियलमध्ये ( अपवाद कादिप आणि तुझ्यात जीव रन्गला ) हेच तर सध्या चालू आहे.

तुझ्या वाचुन करमेना मध्ये होता तो>>> तो माझे मन तुझे झाले मध्ये सुद्दा होता छान काम केले होते त्यात.

सिरीयल गावात घडते?
काळ एकच शॉट पहिला ,तो मुलगा ट्याक्सितून उतरतो तो,
काली पिली, MH 02 रजिस्ट्रेशन ची टॅक्सी होती,
म्हणजे मुंबई,

अभिजित आमकर, पहिली सिरीयल माझे मन तुझे झाले मधला यश.
दुसरी सिरीयल, अरे वेड्या मना मधला नील, आणि तिसरी सिरीयल होती तुझ्यावाचून करमेना मधला सिड.

असली गळेपडू आणि गृहित धरणारी माणसे असतील आजुबाजुला तर कुणीही लग्नाला नाहीच म्हणेल, तो नीरज (???) नाही म्हणाल्यावर घराचे वासे पण हलायला लागले Proud

त्यात काय नविन? झी मराठीच्या प्रत्येक सिरियलमध्ये ( अपवाद कादिप आणि तुझ्यात जीव रन्गला ) हेच तर सध्या चालू आहे.

>>> पण दोघी एकाच घरात राहणार्‍या कुठे दाखवतात ?!

>>> पण दोघी एकाच घरात राहणार्‍या कुठे दाखवतात ?!>> हो ना. आणि राखेचामध्ये याच माईंनी शेवंताला घरात पण येऊ दिलं नाही. Wink आता स्वतःच प्रेमाच्या दुसर्‍या बनून त्याच घरात एकत्र राहताना दिसतायत. Lol

या मालिकेचं शिर्षक गीत किती भयंकर चित्रित केलंय Sad झीट आली बघून.
त्याउलट चूभूद्याघ्या चं शिर्षक गीत फारच गोड आहे Happy

मोस्टली शेवटी लग्न नीरजशीच दाखवतील असं वाटतंय, आजीचा एक डायलॉगपण तसाच होता.

माझे मन तुझे झाले मधला गुरुकृपा बंगला यात जुनाट वाडा म्हणून दाखवला आहे. काय सुंदर बंगला होता, काय करुन टाकलं त्याचं.

काल भाजीवाला येतो तिथपासून बघितलं. कंटाळा आला पुर्ण बघायचा. आता एकेक सेलिब्रिटीज एकेक आठवडा येतील.

नकटी लग्नासाठी वेगवेगळी मुलं बघतेय असं दाखवतायत का? मला तरी २-३ एपिसोडसमध्ये अनिकेत विश्वासरावच दिसला.

लग्न म्हणजे नट्टापट्टा, साड्या, दागिने, मेंदी, मजा-मजा असे विचार करणारी, लग्नाळलेली नकटी ते लग्न-संसार म्हणजे या पलिकडेही खूप काही, एक कमिटमेंट, असं तिचं evolve होणं दाखवण्याचा मोठा चान्स आहे मालिकावाल्यांना. पण तेवढे कष्ट घेतील की नाही शंकाच आहे... Sad

नकटी लग्नासाठी वेगवेगळी मुलं बघतेय असं दाखवतायत का?>> हो. असंच असणारेय. सेलिब्रेटी येणारेत पण प्रत्येकवेळी नवरामुलगा म्हणून नाही. तर नवर्‍या मुलाचा कोणीतरी नातेवाईक वगैरे बनून येणारेत. Happy
अनिकेत विश्वासराव काय भयानक सुजल्यासारखा दिसतो आता. Sad

काल प्रसाद ओक आला होता. टीपी होता कालचा भाग, शेवटाला मस्त टीपी झाला. आज आणखी 'पाणी' ओततील Proud

अनिकेत विश्वासराव काहीतरीच दिसत होता. वर करेक्ट म्हणालंय- सुजकट Sad

लग्न-संसार म्हणजे या पलिकडेही खूप काही, एक कमिटमेंट, असं तिचं evolve होणं दाखवण्याचा मोठा चान्स आहे मालिकावाल्यांना. पण तेवढे कष्ट घेतील की नाही शंकाच आहे...>> लले गं लले, तुझा आशावाद बघून गहिवरले बघ! :प

काल प्रसाद ओक आला होता. टीपी होता कालचा भाग, >>> धमाल होता भाग .
मुळातच प्रसाद ओक चं टायमिन्ग आवडत. म्हणून जास्त आवडला .
काही सीन्स मस्त जमून आलेले .
तो घरात येताना साईड टेबल ला अडखळतो , मग पायाने सरकवून परत तसाच चालत येतो .
डॅम ईट .
अरे तो मोठा झालाय हा आपला गैरसमज आहे .
नकटी खाण्याचा ट्रे घेउन येते आणि तो त्यातली चकली उचलायला जातो
त्याच्या आईचा सारखा फोन येतो तेन्व्हा

या आठवड्यात कोण येणार आहे, नकटीला बघायला ???

>> होसुमियाघ फेम "श्री".

मलाही प्रसाद ओक वाला भाग आवडला. नकटीचा भाऊ कसली काळजी घेतो त्याची. आणि त्या दारुड्या बापाचे पंचेस. Lol

मिडियामधिल्/वृत्तपत्रिय तसेच मालिकांच्या भाषेबद्दल आक्षेप नोंदविणारा धागा आहे. त्यास पुरक म्हणून अजुन एक विषय येतोय या मालिकेत, तो म्हणजे मध्यमवर्गिय पांढरपेशा घरात "दारू पिऊन झिंगत बोलणारे" व्यक्तिमत्व सर्रास दाखवले जाते आहे, व एकप्रकारे मालिकेद्वारे त्याचे सार्वत्रिकीकरण करुन अशा प्रकारे दारु पिऊन झिंगुन भर बैठकीत पाहुण्यांसोबत बोलणे, या बाबीचे "हॅमरिंग" करुन दारु पिऊन झिंगण्याला प्रतिष्ठाच मिळवुन दिली जाते आहे. हे आक्षेपार्ह आहे. किमान झी कडून ही अपेक्षा नव्हति.
माझ्या आजवरच्या आयुष्यात केवळ अन केवळ असे एक व्यक्तिमत्व बघितले आहे, पण ते देखिल पिऊन झाल्यावर "बैठकीत" वगैरे नसायचे, गपगुमान आतल्या खोलित जाऊन पडायचे, नाही पडले, तर त्याची बायको पोरे त्याला आत डांबायची.
आजही, कोणत्या मध्यमवर्गीय पांढरपेशा देशपांडे आडनाव असलेल्या देशस्थ ब्राह्मणी घरांमध्ये "झिंगुन गप्पा मारत बसलेले" ते देखिल वरा कडच्या मंडळींबरोबर , असे बघायला मिळतात? हे असले भिकार "कल्चर" रुजवावयाचा प्रयत्न झी चा कोणता डायरेक्टर का करतो आहे?

लिंबु +११११११११
आज काल मालिकेत आणि सिनेमात हे असे प्रसंग सर्रास दाखवले जातात . आता आलेल्या " ती सध्या काय करते " मधली नायिका त्या तिच्या कॉलेज मधल्या मित्राला गच्चीवरती स्वताच्या वडिलांच्या दारूच्या बाटल्या पुरवते चोरून चोरून पुरवते आणि तिचे दोन मित्र ती चोरलेली दारू गच्चीवर पीत बसलेले दाखवताहेत. नायकाच्या तोंडी पण नायिकेला उद्देशून वाक्य आहे "तुझे बाबा असे आईसमोर बिनधास्त पितात ? माझे बाबा लपून छपून" वगैरे वगैरे . आज काल असे दारू चे प्रसंग दाखवले कि त्यातून आपण काही तरी विनोद निर्मिती करतोय असं दिग्दर्शकाला आणि निर्मात्यांना वाटत असावं. पिणार्यांना प्रतिष्ठा देऊ बघताहेत हि मंडळी. यांच्या घरात एक एक दारू पिणारे रोगी निपजले कि खाडकन थांबतील

आज काल मालिकेत आणि सिनेमात हे असे प्रसंग सर्रास दाखवले जातात . आता आलेल्या " ती सध्या काय करते " मधली नायिका त्या तिच्या कॉलेज मधल्या मित्राला गच्चीवरती स्वताच्या वडिलांच्या दारूच्या बाटल्या पुरवते चोरून चोरून पुरवते आणि तिचे दोन मित्र ती चोरलेली दारू गच्चीवर पीत बसलेले दाखवताहेत. नायकाच्या तोंडी पण नायिकेला उद्देशून वाक्य आहे "तुझे बाबा असे आईसमोर बिनधास्त पितात ? माझे बाबा लपून छपून" वगैरे वगैरे .>>>> जुन्या बावर्ची सिनेमात पण असेच काहीतरी दाखवले आहे.

जुन्या बावर्ची सिनेमात पण असेच काहीतरी दाखवले आहे.>>म्हणजे त्यांनी चोरलाय तो प्रसंग जुन्या सिनेमातून . जुन काय आणि नवं काय . त्यावेळेला हि चुकीचंच होत आणि आत्ताही . आज काल असे सर्रास मालिकांमधून पण दाखवायला लागलेत जे घरातले सगळेजण बघतात. सिनेमाचं काय थियेटर मध्ये जाऊन बघितला तर. पण मालिका तर घरोघरी सगळे घरातले लहान- मोठे सगळेच बघतात . ती १०० डेज मधली राणी सर्रास रोज उठून दारू ढोसताना दाखवतात . "दारू पिणं हे आरोग्यास अपायकारक आहे "अशी एक ओळ टाकली कि यांची जबाबदारी संपली Sad

प्राजक्ता गोड दिसते मात्र मालिका तद्दन भंगार आहे. सगळे कलाकार शाळेतल्या नाटकासारखे काम करतात. सोनाली पंडित मला भारी आवडायची मात्र या मालिकेत असह्य झाली आहे.
बादवे, सोनाली पंडितची ती मालिका कुणाला आठवतेय का, तिची लाडावलेली मैत्रिण असते, मैत्रिणीचे प्रेमळ दादा वहिनी असतात. त्यांचा मुलगा कुठेतरी लांब असतो म्हणुन वहिनी दु:खी असते. समीर धर्माधिकारी आणी सुनिल बर्वे ही होते त्यात. काय नाव त्या मालिकेचे? खुप छान वाटायचे ती मालिका पहायला.

सोनाली पंडित >>> ही 'प्रपंच' मधे होती ना? >>> हो. भरत जाधव, सुनील बर्वे, रसिका जोशी हे आणि सोनाली भावंडं असतातना. भार्गवीपण होती. तेव्हा माझ्याकडे केबल नव्हती, पण आईकडे कधी गेले तर बघायचे. मस्त होती.

राया - रिमझिम
अभिजित चव्हाण, सुमा गोखले, सचिन खेडेकर , मृणाल कुलकर्णी.

Pages