जरा विसावू या वळणावर - भटकंती मागोवा २०१६

Submitted by जिप्सी on 30 December, 2016 - 08:37

सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नविन वर्षाचे स्वागत करायला आता काही तासच उरले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या भटकंतीचा मागोवा घेताना जाणवले कि यावर्षी जरा जास्तच भटकलो. Happy २०१६ ची सुरूवात माणदेशीच्या सफरीने झाली तर शेवट कोल्हापुर भटकंतीने. सातारा परिसरातील कल्याणगड, वर्धनगड, महिमानगड, संतोषगड, वारूगड, पुण्यातील सिंहगड, मल्हारगड, नाणेघाट, पन्हाळा, कर्जत तालुक्यातील पेडगावचा किल्ला (बहादुरगड), रायगड जिल्ह्यातील उंबरखिंड, वढु-तुळापुर येथील संभाजी राजांची समाधी, मायबोलीकरांसोबत हरिश्चंद्रगड इ. ऐतिहासिक स्थळे, मायबोलीकरांसोबत उरण, बदलापुर येथील गटग, यवत येथील अप्रतिम भुलेश्वर मंदिर, सासवड परिसरातील मंदिरे, मालेगाव, झोडगे येथील माणकेश्वर मंदिर, कोल्हापुर मधील खिद्रापुर येथील कोपेश्वर मंदिर, अष्टविनायकातील पालीचा बल्लाळेश्वर, रांजणगावचा महागणपती, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, नरसोबाची वाडी, कोल्हापूर महालक्ष्मी, जोतिबा इ. मंदिरे, कायम स्मरणात राहणारी नागपूर, औरंगाबाद भटकंती, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर, सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊसृष्टी, मेणवली,वाई येथील प्रसिद्ध घाट, नांदगाव, नाशिक येथील गिरणा धरण, भंडारदरा येथील काजवा महोत्सव, कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धबधबा, माळशेज घाट, कोलाड येथील काष्ठशिल्प संग्रहालय, इ. महाराष्ट्रातील भटकंती तर डलहौजी, खज्जियार, चंबा, धरमशाला हि हिमाचल प्रदेशमधील भटकंती.

या सर्व २०१६ मधील भटकंतीच्या आठवणींचा हा कॅलिडोस्कोप. Happy

कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून ...
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून
(मंगेश पाडगांवकर)

(०१) जानेवारी :- माणदेशी भटकंती
 (०२) फेब्रुवारी :- नागपुर भटकंती
 (०३) मार्च :- हिमाचल प्रदेश :- डलहौजी, खज्जियार, चंबा, धरमशाला
 (०४) एप्रिल :- मेणवली घाट(वाई, सातारा), उंबरखिंड(रायगड)
 (०५) मे :- हरिश्चंद्रगड
 (०६) जुन :- नाणेघाट-माळशेज घाट
 (०७) जुलै :- कर्जत, पवई तलाव, मायबोलीकर निरू यांचा फार्महाऊस (बदलापुर) येथील पावसाळी भटकंती
 (०८) ऑगस्ट :- औरंगाबाद - वेरूळ, अजिंठा लेणी, बिबि का मकबरा, सिंदखेडराजा, लोणार सरोवर
 (०९) सप्टेंबर :- सिंहगड, निळकंठेश्वर, आळंदी, वढु-तुळापुर
 (१०) ऑक्टोबर :- बहादुरगड (पेडगावचा किल्ला), सिद्धटेकचा सिद्धिविनायक, श्रीगोंदा
 (११) नोव्हेंबर :- सासवड भटकंती - मल्हारगड, भुलेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर
 (१२) डिसेंबर :- कोल्हापुर भटकंती:- नरसोबाची वाडी, रंकाळा, महालक्ष्मी मंदिर, जोतिबा, सिद्धगिरी म्युझियम, पन्हाळा
 ___/\___ज्यांच्यासोबत यावर्षी मनसोक्त भटकंती करता आली त्या सर्वांचे मनापासुन आभार ___/\___

Happy आणि समस्त मायबोलीकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख ! सर्व फोटु फार्फार आवडले. Happy
ज्यांच्यासोबत यावर्षी मनसोक्त भटकंती करता आली त्या सर्वांचे मनापासुन आभार >>> हे तर सहीच...

Pages