तुमच्या जवळपास आहे का कुणी " सायकोपॅथ "????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 25 December, 2016 - 16:20

सायकोपॅथीला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही.सायकोपॅथी हे एक उत्क्रांत झालेलं स्वभाववैशिष्ठ्य आहे.काय आहे सायकोपॅथी? आपला त्याच्याशी काय संबंध आहे?
सायकोपॅथ हा अश्या लोकांचा समूह आहे ज्यांना आपल्यासारखा conscience नसतो,conscience म्हणजे moral sense of right and wrong.नैतिकदृष्ट्या काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे ठरवण्याची सामान्य माणसामध्ये क्षमता असते ,ती क्षमता सायकोपॅथीक व्यक्तीकडे नसते.असे लोक प्रामुख्याने गुन्हेगारी वृत्तीचे असतात.एका अंदाजानुसार यांची एकुण टक्केवारी लोकसंख्येच्या ४% एवढी आहे.४% हा आकडा जरी कमी वाटत असला तरी यांचे जे बर्डन समाजावर पडलेले आहे ते फार मोठे आहे.बहुतांश गुन्हेगार हे सायकोपॅथ असतात,७५% टक्के इतके.पण हे एवढ्यावरच थांबत नाही.सायकोपॅथ इतरही अनेक क्षेत्रात आघाडीवर असतात.जगभरातले हुकुमशहा,अनेक मोठ्या कॉर्पोरेशन्सचे CEO ,मिलीटरी पर्सनल्स ,पोलिस दलातील व्यक्ती ,इतकेच काय काही वैज्ञानिकही सायकोपॅथ या प्रकारात मोडतात .भीतीची कमतरता हे सायकोपॅथ लोकांचे मुळ लक्षण आहे.fear conditioning, म्हणजेच एखाद्या नकारात्मक घटनेचा संबंध भीतीशी जोडणे व त्यानुसार व्यवहार करणे ही सामान्य माणसाची उपजत क्षमता सायकोपॅथ्समध्ये नसते.त्यामुळे सायकोपॅथ्सना कशाचेही बंधन वाटत नाही.ते बर्याचदा त्यांना उत्तेजित करतील असे व्यवहार करत असतात.lower arousal हा सायकोपॅथीक व्यक्तीचा आणखी एक गुणविशेष.
सायकोपॅथी चा अभ्यास अनेक वर्ष चालू आहे.पैकी रॉबर्ट हेअर हे त्यातील तज्ञ समजले जातात.तीन दशकाहूनही अधिक काळ त्यांनी या स्वभावाच्या लोकांचा अभ्यास करुन एक प्रश्नावली तयार केली आहे. Hare psychopathy checklist revised ही ती प्रश्नवली आहे.
https://www.wikipedia.org/wiki/Psychopathy_Checklist

त्यांचे without conscience हे पुस्तक या क्षेत्रातले उत्तम पुस्तक व अभ्यासग्रंथ म्हणून ओळखले जाते.

सायकोपॅथ आणि सामन्य व्यक्ती यांच्या मेंदूत मुलतः फरक असतो हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे.आपल्याला नियंत्रणात ठेवणारा,विचारशक्ती देणारा मेंदूचा अग्रभाग( prefrontal cortex) ,हा भाग सायकोपॅथीक व्यक्तीमध्ये फार कमी उत्तेजीत असतो,सामान्य माणसांमध्ये मात्र हा भाग बर्यापैकि उत्तेजीत अवस्थेत असतो.जास्त उत्तेजना म्हणजे या भागाचा जास्त वापर असे गणीत आहे.

normal-brain-vs-psychopathtic-221x300.jpg
(आंतरजालावरुन साभार)

सायकोपॅथ हे मुळातच या बाबतीत कमी उत्तेजीत असतात.मेंदूतील मुलभुत फरकामुळे त्यांची अनेक स्वभाववैशिष्ठ्ये असतात .ती कोणती ते बघूयात.
१. भीतीचा अभाव- सायकोपॅथ हे अत्यंत धाडसी असतात.त्यांच्यात भीतीचा खूप अभाव असतो.त्यामुळे असामाजिक आणि बेकायदेशीर व्यवहार करताना त्यांना कसलीच भीती वाटत नाही.
२. आपल्या वागण्या बोलण्यातून एखादे सावज टिपणे .स्वतःच्या फायद्यासाठी त्याच्याशी चांगले वागण्याचे नाटक करणे.असे नाटक करण्यात सायकोपॅथ तरबेज असतात.इंग्रजीत याला superficial charm असे म्हणतात.
३.स्वतः विषयी असलेल्या अवास्तव कल्पना हे यांचे महत्वाचे लक्षण आहे.,सायकोपॅथीक व्यक्ती स्वतःच्या गरजा पुर्ण करण्याला महत्व देते.स्वतःचा वाढवलेला मोठेपणा ,फक्त स्वतःच्याच गरजा महत्वाच्या समजणे हे गूण आढळतात.
४. आक्रमकपणा(impulsivity)- सायकोपॅथ हे अत्यंत आक्रमक असतात.थोड्याश्या provocation मुळेही ते मारामारिपासून ते खूनापर्यंत कोणतीही गोष्ट लिलया करु शकतात.poor self control असणे ,आपल्या कृत्यातून होणार्या परिणामांची पर्वा न करणे .
५.उत्तेजना देणारे व्यवहार करणे- सायकोपॅथीक व्यक्ती त्यांना उत्तेजना देईल असे वर्तन करतात.सामान्य माणसाला जोखमीच्या ,risky वाटतील अश्या गोष्टी ते सहजतेने करत असतात. वेगात वाहन चालवणे,सार्वजनिक ठीकाणी असभ्य व बेकायदेशीर व्यवहार करणे ,स्त्रीयांचि छेड काढणे इत्यादी प्रकार ते लिलया करत असतात.
६.खोटं बोलणे- स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलणे इतरांना फसवणे .
७.दयेचा आणि अपराधीपणाचा अभाव(lack of remorse and guilt)- सायकोपॅथ्सना कुणाविषयी कसलीही दयाभावना नसते,सामान्य व्यक्तीला असलेले दया ,करुणा हे भावबंध त्यांच्यात नसतात.
दुसर्या व्यक्तीला दिलेल्या त्रासाचा त्यांना कसलाही गिल्ट नसतो.
८.स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्यावर अवलंबून राहणे हे सायकोपॅथ्सचे आणखी एक लक्षण,इंग्रजीत ज्याला parasitic living म्हणतात,असे आयुष्य जगणे .स्वतःच्या भविष्याविषयी कोणतेही प्लॅनिंग नसणे.
९.अनेक लैंगिक जोडीदार असणे .promiscuous sexual behavior.काही तज्ञांच्यामते सायकोपॅथी ही उत्क्रांतीतून जन्माला आलेली reproductive strategy आहे.अनेक जोडीदारांशी बळजबरीने संबंध ठेवणे व आपला वंश वाढवणे यासाठी उत्क्रातीत या स्वभाववैशिष्ठ्याचा फायदा झाला असावा.व हा स्वभावविशेष बळावला असावा.त्यामुळेच बहुतांश बलात्कारी सायकोपॅथ म्हणून सहज क्वालीफाय होतात.
१०.विस्तृत गुन्हेगारीकरण- सायकोपॅथ अनेक प्रकारच्या गुन्हांमध्ये गुंतलेले असू शकतात.दरोडा,बलात्कार ,खून यासारखे ब्लू कॉलर गुन्हे ते करतच असतात.त्याच बरोबर फ्रॉड,आर्थिक गुन्हे असे व्हाइट कॉलर गुन्हे ही करत असतात.
मला सायकोपॅथी विषयी जी माहीती आहे ती इथे सोप्या शब्दात मांडली आहे.माझ्या व्यक्तीगत आयुष्यतही मी अनेक सायकोपॅथना जवळूण बघितले आहे.त्याविषयीही लेखात लिहिले आहे.आंतरजालावरुनही बरीच माहीती घेतली आहे.चित्र आंतरजालावरुन घेतले आहे.धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.

काही व्यक्ती होत्या पहाण्यात, गावी. तसेच हैद्राबादला खूप वर्षांपूर्वी एक मोलकरीण होती वयस्क, तिची मुलगी अशीच होती. मोलकरीणच सांगायची तिच्याबद्दल अन रडायची.
व्हाईट कॉलर्ड सायकोपाथ असतीलही जवळपास, ओळखु न येणारे.

छान लेख. आवडला !

फक्त 4 टक्के आकडा कमी वाटतोय. कदाचित लेटेस्ट नसावा. संख्या वाढतेय. जेवढे मी माझ्या आजूबाजूचा समाज बघतोय त्यावरून हे म्हणू शकतो. यांना आवर घालावेत असे संस्कारही झपाट्याने लोप पावू लागलेत. सर्वात वाईट म्हणजे अश्या विचारांची लोकं एका ठराविक ध्येयाने संघटीत होत आहेत वा केली जात आहेत. या जगाच्या विनाशालाही हेच लोकं कारणीभूत ठरणार आहेत. जेव्हा जगातील बलाढ्य राष्ट्रांच्या अध्यक्षपदी हे लोकं विराजमान होणार तेव्हा ते अटळ आहे.

@ सिंथेटिक जिनियस, एकदम माहितीपूर्ण लेख आहे. आवडला.

असं काही छान छान लिहित जा हो!!!

जवळपास नाहीये कोणी, पण मायबोलीवर महिन्यातुन एखादी चक्कर टाकली की धागे बघुन इथे त्यांचा सुळसुळाट झालेला दिसतोय Wink

>>जवळपास नाहीये कोणी, पण मायबोलीवर महिन्यातुन एखादी चक्कर टाकली की धागे बघुन इथे त्यांचा सुळसुळाट झालेला दिसतोय Lol

>>> फक्त 4 टक्के आकडा कमी वाटतोय. कदाचित लेटेस्ट नसावा. संख्या वाढतेय. <<<
बरोबर....
"स्वार्थांध" हा शब्द अचूक ठरेल, अन अशी लोक पावलोपावली भेटतात हल्ली.

"प्रेमात अन युद्धात, सर्व क्षम्य आहे" अशी विचारधारा असेल व त्यास धरुन नैतिकता खुंटीवर टांगली जात असेल, तरीही जरुर समजावे की आपण स्वतःही त्या सायकोपॅथ बनण्याकडे घरंगळत चाललोय. (कळ्ळ का ऋनेम्षा? Proud )

"प्रेमात अन युद्धात, सर्व क्षम्य आहे"
या वाक्यात काही गडबड नाही. ती अर्थ लावण्यात झाली आहे.
युद्ध हे नेहमी वर्चस्व गाजवायलाच लढले जाते असे नाही. ते अस्तित्व शाबूत राखायलाही लढले जाते.
युद्धात दोन्हीही बाजू असत्याच्या असणे गरजेचे नाही, एखादी सत्याचीही असू शकते.
वरील वाक्य या दुसरया प्रकारासाठी बनवले गेले आहे.

दुर्जनांना या वाक्याची आठवण करून द्यायची गरज नाही. ते नेहमी नाठाळच वागणार.
हे वाक्य सज्जनांसाठी आहे. त्यांनी आपल्या हक्काची लढाई लढताना दरवेळी आपण नैतिकतेच्या मर्यादेत आहोत का हे तपासत राहायची गरज नाही. कारण शेवटी ही नैतिकताही आपल्या समाजानेच बनवलेली असते. आणि त्याचा बेंचमार्क स्वत: सतप्रवृत्तीचे लोकच असतात.

हेच प्रेमालाही लागू. प्रेम मिळवण्यासाठी काही पण करा, हे गुंडमवाल्या आणि रोडरोमिओसाठी नाही आहे, जे प्रेमात मुलगी नाही म्हणाली तर तिच्या तोंडावर एसिड टाका, तिला धमकवा, वा जोरजबरदस्ती करत ते मिळवायचा प्रयत्न करा.. असे नाहीये ते..

पण तुमचे हक्काचे प्रेम मिळवायला मात्र समाजाची बंधने पाळायची गरज नाही हे लक्षात ठेवा Happy

सायकोलॉजीबद्दल माहिती नाही. पण लेखातले ४,५ आणि ७ हे मुद्दे वगळले तर इतर गुण फक्त नॉर्मल लोकांच्यात नसतात का ?

लेखावरून कायदे मोडणारी प्रत्येक व्यक्ती ही सायकोपॅथ असते असा समज होतो तो खरा आहे का ? कायदा मोडणा-यांचा अभ्यास हा कायद्याच्या व्यावसायिकांपेक्षा जास्त असतो असे म्हणतात. देव नाही याची खात्री असलेल्याला देव, दानव, भूतपिशाच्च यांची भीती वाटेनाशी होते. अशी प्रत्येक व्यक्ती अविवेकी असेल असे नाही. सामाजिक शिक्षणाने ते भान येऊ शकते असं वाटलं. लेखात यातला फरक (असल्यास) लक्षात आला नाही. माझं अज्ञान आहेच..