Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही 
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Mango kulfi
Mango kulfi

Yeast-free wholewheat bread

Ani tyache Cheese Garlic toasts

गेल्या २-३ दिवसात बनवलेले
गेल्या २-३ दिवसात बनवलेले पदार्थ.
१. होममेड पिझ्झा

२. शनिवार रात्रीचा मेनु : पिझ्झा, पास्ता, चिज गार्लिक ब्रेड

३. कोल्हापुरी कट वडा :
४. दाल बाटी चुरमा :
मॅंगो कुल्फी मस्त दिसतेय
मॅंगो कुल्फी मस्त दिसतेय.मलाही करायची आहे.
लाळेर गळून पडलेली बाहुली .
लाळेर गळून पडलेली बाहुली . जबरी पदार्थ .
हा बाफ जेवायच्या वेळेस उघडायला नको
काय एकेक पदार्थ मस्तच अमृता
काय एकेक पदार्थ मस्तच अमृता अमित !!
Tl,
Tl,
आंब्याचे बाठे कसे काढलेत? मी आज प्रयत्न केला. 2 आंब्याçhya कोयी कशाबशा काढल्या.फ्रीजमध्ये सध्या आहेत.तिसऱ्या आंब्याचा बाठा काढताना साल फाटली. मग त्याचा रस काढून बाकीच्या दुधात मिसळला.त्याचे वेगळे आईस्क्रीम/कुल्फी जे काय असेल ते बनवले.
मी सुद्धा पिझ्झा केलेला पण
मी सुद्धा पिझ्झा केलेला पण इथे फोटो कसा अपलोड करतात?
वा वा.. TI आणि अमृता.. killer
वा वा.. TI आणि अमृता.. killer फोटोज.
TI ह्या कुल्फीचा व्हिडीओ वा.अँ. वर पाहिलेला..कमाल जमलीये!
आंब्याचे बाठे कसे काढलेत ~~ +१२३ हे खरच सांगा कारण तिथे बघायला सोपे वाटते.
ब्रेड पण मस्त.
अमृता.. सगळे आत्ता खावेसे वाटतायतं..
काल मी घरी लादीपाव केले आणि
काल मी घरी लादीपाव केले आणि बटाटे वडे.
जरा कुटाणा काम आहे. पण मजा आली करताना.
सही!
सही!
@piku मस्तच .... मला पण
@piku मस्तच .... मला पण करायचे आहेत ग लादी पाव... पण हिम्मत होत नाही
पिकु पावासाठी कोणती रेसिपी
पिकु पावासाठी कोणती रेसिपी फॉलो केली ? छान दिसतायत
पाव एकदम मस्का दिसत आहेत
पाव एकदम मस्का दिसत आहेत
गरम गरम चहात बुडवून खायलाही मजा येईल.. उभा आडवा चिरून हलकासा मस्का त्याच सुरीने फिरवायचा
@Devki, Piku
@Devki, Piku
ambyachya bathi kadhna motha task hota, pahilya ambyachi saal fatli thodi..varcha bhag surine kapun ghetla ani nantr surine baath halu halu sodvun ghetli, video madhe dakhavla tashi easily nighali nahi,. pan amba hatat dharun suri gol firvat firvat sutli neet..
hi kulfi mhannyapeksha rabdi sarkhi lagte, chav swargiya!
थँक यू देवकी, देवरूप,
थँक यू देवकी, देवरूप, प्राजक्ता आणि ऋन्मेष.
मी हेब्बर्स किचन फॉलो केली.
https://hebbarskitchen.com/eggless-ladi-pav-recipe-pav-bread-recipe/
हिम्मत होत नाही ~~ हाहा देवरूप.. हे सुद्धा मी अति विचारांती करून पाहिले आहेत. करून बघाच तुम्ही या लिंक प्रमाणे, होतील मस्त.
१ २ गोष्टी आता लक्षात आल्या, त्या म्हणजे -
* अगदी तंतोतंत रेसिपी व प्रमाण फॉलो करणे गरजेचे आहे
* यीस्ट खूप जुने नको आणि भिजवले की छान फुलले पाहिजे
* डो ट्रे मध्ये ठेवल्यावर २० मि.त जेवढा फुगतो तेवढाच / त्या पेक्षा किंचित जास्त बेक करताना फायनल आकार येतो.
* पूर्ण थंड झाल्यावर च पाव मऊ होतात.
*संध्याकाळी पाव बनवायचे असतील तर दुपारी ४ ४३० पासून तयारी सुरू करा..
वाॅव.. काय सुंदर पदार्थ आहेत
वाॅव.. काय सुंदर पदार्थ आहेत एकेकीचे.. मस्त.
लादीपाव करुन बघेन या वीकांंताला.
@अमृता - कोल्हापुरी कट वडा
@अमृता - कोल्हापुरी कट वडा कसा केला??
@ thanks a lot piku.
@ thanks a lot piku.
हाय अनामिका.. आपण नेहमी करतो
हाय अनामिका.. आपण नेहमी करतो तसेच बटाटे वडे करुन घेतले... कट करण्यासाठी कांदा थोड्या तेलात परतुन घेतला... सोबत थोडी काळी मिरी, तमालपत्र, लवंग पन भाजुन घेतली... कांदा ब्राऊन कलरचा झाला की त्यात टॉमेटो टाकुन छान परतुन घेतलं.. पुर्ण शिजल्यावर थंड करुन मग मिक्सरवर पेस्ट करुन घेतली.. ही पेस्ट तेलात परतुन घेतली अगदी बाजुनी तेल सुटेपर्यंत. मग त्यात हळद, मीठ, तिखट, थोडा गरम मसाला घालुन शिजवुन घेतले.. त्यात पाणी घालुन उकळी काढली कि कट तयार.
आता एका प्लेट मधे बटाटे वडा घेउन त्यावर हा तयार कट घालायचा आणि वरुन शेव व कच्चा कांदा घालुन सर्व्ह करायचं..
धन्यवाद अमृता. मस्त रेसिपी.
धन्यवाद अमृता. मस्त रेसिपी.
*संध्याकाळी पाव बनवायचे असतील
*संध्याकाळी पाव बनवायचे असतील तर दुपारी ४ ४३० पासून तयारी सुरू करा.. >>>> हे बाकि खर हां .

मी २-३ आठवड्यापूर्वी चिकन आणि पावाचा प्लॅन केला डिनर साठी .
लवकर जेवायला मिळेल म्हणून चिकन ची तयारी ३ वाजल्यापासूनच केली . ५ पर्यन्त चिकन तयार झालं , त्याच सुमारास पावाच पीठ मळलं .
पाव तयार होउन जेवायला बसेपर्यन्त जवळ्जवळ १० वाजले
मी तर म्हणेन , दूपारची जेवण आटपली तर लगेच पावाची तयारी करायला घ्या
स्वस्ति.. खरय पण. रेसिपी
स्वस्ति..
खरय पण. रेसिपी लिंक वर जरी given time वेगळा असेल तरी आपल्या साठी १ २ तास जास्त पकडा.
अमृता मी खाल्ला नाही कटवडा पण मसालेदार रेसिपी वाचून तों पा सु. करून बघते.
Anniversary Celebration in
Anniversary Celebration in Lockdown ..
Fully Home made menu
रसमलाई
कॅरामल कस्टर्ड
मिल्क & चॉकलेट डोनटस
हराभरा कबाब
वेज पिझ्झा
अंडा बिर्याणी
चॉकलेट & वॅनिला आईस्स्क्रीम
कमाल म्हणजे बायकोने एकटीने हे सर्व केले. मी मूल सांभाळले तिने चूल सांभाळली
.
.
.
.
.
.
.
.
.
अर्रे काय हे? इतकं एकाच दिवशी
अर्रे काय हे? इतकं एकाच दिवशी? एकटीने? वॉव!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
रसमलाई पाहून त्रास झाला.
रसमलाई पाहून त्रास झाला.
अर्रे काय हे? इतकं एकाच दिवशी
अर्रे काय हे? इतकं एकाच दिवशी? एकटीने? वॉव!
>>>>
डोनटस आणि पिझ्झा आदल्या रात्री बाराच्या सेलिब्रेशनला केले होते.
बाकीचे पाच पदार्थ ॲनिवर्सरीच्या संध्याकाळी. दुपारी असंच थालीपीट वगैरे केलं आणि आदल्या रात्रीचा शिल्लक पिझ्झा होताच.. जेणेकरून वेळ मिळाला. बाकी तिचे प्लानड होतेच. मलाही कल्पना नव्हती ईतका घाट घालतेय. कारण याआधी आमचे घर स्विगीवालाच चालवायचा
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! >> धन्यवाद
@ सामो, शिल्लक आता रसमलाईच राहिली आहे. लॉकडाऊन नसता तर केली असती होम डिलीव्हरी
धन्यवाद ऋन्मेष.
धन्यवाद ऋन्मेष.
उलटे म्हण - स्वीगीवाल्याचे घर
उलटे म्हण - स्वीगीवाल्याचे घर तुम्ही चालवायचा....
च्रप्स हो
च्रप्स हो

लॉकडाऊनचा मला झालेला सर्वात मोठा फायदा. घरचे जेवण आणि नवनवीन पद्धतीने केलेले पदार्थ. आणि आज तर बायकोबद्दलचा आदर अफाट वाढला. आयुष्यात पहिल्यांदा मी फेसबूकवर कधी नव्हे ते खाद्यपदार्थांचे फोटो टाकले
हराबरा कबाब आणि रसमलाई फारच
हराबरा कबाब आणि रसमलाई फारच सुंदर , सगळेच छान.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! ऋ तुला आणि तुझ्या बायकोला.
Pages