सिर्फ नामही काफी है!

Submitted by ॲमी on 21 December, 2016 - 03:06

गेल्या अडीच वर्षात मराठी आंजावर स्वतःचे एक खास स्थान किंवा ब्रँडनेम बनवणार्या आयडी कोणकोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा धागा.

* मोदीभक्त किंवा मोदीद्वेष्टे 'एवढीच' ओळख असलेल्यांना यातून वगळले आहे.

* फार जुनी, सध्या फारशी अॅक्टीव नसलेली नावं नकोत. कारण आताच्या नवीन लोकांना ती माहीत नसणार.

* गेल्या अडीच वर्षात मआंजावर खळबळ माजवणारे आयडी हवेत. You can love them, you can hate them, but you can't ignore them. वाचकांच्या किंवा त्यांच्याशी संवाद साधणार्यांच्या भावना को हिलाके रख देनेवाले आयडी!
बर्याचजणांना ते इरीटेट करतात. पण त्यांचा स्वतःचा फ्यान फॉलोवींग/कल्टदेखील असतो. आपापले शांतपणे येऊन, अभ्यासू धागे/प्रतिसाद टाकून गपचूप राहणारे आयडी हे नाहीत...

* माबो, मिपा, ऐसी या तीन साइट्सच्या माझ्या अल्प अभ्यासावरुन मी काही नावं खाली प्रतिसादात दिली आहेत.

* तुम्हाला ज्यांना मत द्यायचंय त्याला +1 करा.

* एकाच व्यक्तीला मत द्या.

* त्याखेरीज इतर नावंदेखील सुचवू शकता.

तर मग करा चालू नॉमिनेशन्स, प्रचार आणि मतदानची रणधुमाळी!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी आंजा या तीन साईटहून ही फार जास्त आहे.
आता जुनेजाणते लेखकही ब्लॉग /फेबु द्वारे नव्याने समोर येत आहेत.

भाऊ तोरसेकर, सतीश तांबे, विश्वंभर चौधरी, गज्जू तायडे

तुम्ही दिलेल्या नावातले ऋन्मेष, राकु,अनुराव हे तिघंच तुलनेने नविन आहेत.
२-३ वर्षांतले.
बाकी सगळे जुने जाणते आहेत.

सध्यातरी ब्लॉग/फेबु विचारात घ्यायला नको असे मला वाटते. तिथे मराठीखेरीज इतर भाषिकदेखील आहेत.
माबो, मिपा, ऐसीखेरीज सध्या चालू असलेले मनोगत हे एकच मराठी संस्थळ मला माहीत आहे. उपक्रम, मीमराठी बंद पडलेत.

मंगेश सपकाळ, भाऊ तोरसेकर, सतीश तांबे, विश्वंभर चौधरी, गज्जू तायडे हे फेसबुकवरचे ना?

तुम्ही दिलेल्या नावातले ऋन्मेष, राकु, अनुराव हे तिघंच तुलनेने नविन आहेत. २-३ वर्षांतले. बाकी सगळे जुने जाणते आहेत. >> डांगे, श्रीगुरुजीपण मला आत्ताच दिसले.

अडीच वर्षाचाच कालवधी का? >> अहो अडीच वर्षापुर्वीच सध्या सगळीकडे चालू असलेल्या हलकल्लोळाची बीजं रोवली गेली ना! म्हणून Wink

You can love them, you can hate them, but you can't ignore them >> हा तर ऋन्मेषच. Happy मी माझं वोट दिलं बरकां, कोणाला ते विचारु नका Wink

ऋन्मेषकरीता वोटींगच्या चौकोनात पाच आकड्यांकरीता जागा आहे ना? बघा बरं! नाहीतर जागा कमी पडायची. Wink

ओ सका,
मोदीकाकांना भावनगर नगरपालिकेच्या निवडणुकीत उभं करू नका.
Wink

ते पण त्यांचं मतही दुसर्‍या उमेदवाराला असताना!

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र असं होतं होय.
त्या समाधान / असमाधान धाग्यापासुन २-३ ठिकाणी वोट करायची सवय लागली होती. Lol

अ‍ॅमी, तू ब्लॉग घेतले नाहीस बघ विचारात.
नाहीतर माझं एक हाय्फाय नवं फाईंड होतं.
मनभावनवाल्या
मिथिला सुभाष!
Wink

मिथिला सुभाषबद्दल थोडंफार ऐकून आहे.
ब्लॉग किंवा फेबुवरील मराठी माणसांचा अजीबातच अभ्यास नाही माझा Sad
कोणाला हवे असेल तर वेगळा पोल काढा वाटल्यास.

===
दक्षिणा,
जरा करमणूक गं!
किती ना नोटबंदीवर/ विरुद्ध लिहिणार आम्ही तरी! >> +1

आणि वर्षाअखेरीस असे बरेच पोल, लिस्टींग वगैरे होत असते वेगवेगळ्या साइट्सवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर. सर्वात प्रभावी, सर्वात श्रीमंत, सर्वात लोकप्रिय, सर्वात हँडसम/सेक्सी... तसेच हे Happy

साती, अ‍ॅमी Rofl

म्हणलं ऋ बाळाशेजारी बांधून घातल्यामुळे गुण लागला की काय Proud

मायबोलीवर सध्या मला आवडलेले दुसरे आय डी.
समीर गायकवाड (बापू).

यांच्या ब्लॉगला आत्तापर्यंत दोनदा (माझ्यापहाण्यात तरी) सर्वोत्तम ब्लॉग पुरस्कार मिळालाय.
माबोवरही ते सातत्याने आणि विविध विषयांवर लेखन करत असतात.

समीर गायकवाड

मायबोलीवर आवडलेली नविनपैकी तिसरी आय डी टीना.
पण हल्ली फार कमी लिहिते.
माझी अगदी लाडकी आय डी आहे.
(राजकारणावर लिहित नाही ती, नाहीतर मी तिला माझीच धाकटी बहिण म्हटलं असतं.)

तशी सहा वर्षांची आहे, पण लिहायला हल्ली एक दोन वर्षांत लागली होती.
एकदम धडाकेबाज आहे बाबा!

टीना

मानव,
बॅटमनला तुम्ही वोट केलंत?
सांगते त्याला जाऊन, पृथ्वीकर माणूस तुझ्या फॅन क्लबात आहे.

धागा वाचता वाचताच फक्त एकच नाव डोक्यात क्लिअर होत गेलं.. त्याच्यासाठीच धागा काढला असावा असं वाटलं. Happy
You can love them, you can hate them, but you can't ignore them >> हे वाचल्यावर तर खात्रीच पटली आणि पुढे पहिलं नाव त्याचच. मग काय त्यालाच मत दिलं. Happy

हो! पूर्ण लेख वाचून त्याचेच नाव डोक्यात आले, आणि यादीतही तोच पहिला होता.....
पण मी बेफींचा पंखा असल्याने त्यांना पण निवडणूकीत उभं केलं.....(आणि त्यांनाही मत दिलं, हे कुणाला सांगू नका)...

भारी आहे हे. कसला आनंद झालाय मला. तो ही मनापासून ... अगदी मायबोलीचा शाहरूख झाल्यासारखे वाटतेय Happy

तरीच त्या नो ईंटेंडेड काय पण च्या धाग्यावर कोणीतरी सिर्फ नाम ही काफी है ऋन्मेष असे लिहिले होते Happy

श्री काही पण म्हणा रे, मी तर घाईघाईत शक्ती कपूर टाईप केलेले. आनंदाने पटकन काही सुचेनासे झालेले..

पद्म, ३१ ला माझा पगार झाला की १ तारखेला नोटांचा लफडाही सारा सॉल्व्ह झाला असेलच, तर २ ला तुम्हाला बँकेतून कोर्‍या करकरीत नोटा काढून पार्टी देतो.
त्या आधी तुम्ही बस माझ्या ३१ च्या पार्टीची सोय करा.

Pages